जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
विद्याधर ठाणेकर हे साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, नाट्य, चित्रपट या क्षेत्रातील ठाण्यातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे.
June 6, 2010
लीलावती भागवत या माहेरच्या लीला पोतदार. मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या लीलावती भागवत यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले.
September 21, 2023
प्रभात ‘ चित्रपट संस्थेत मालक असलेल्या दामले आणि फत्तेलाल या दोघांना ते भेटले कारण त्यांना चित्रकलेत जास्त रुची होती . जातिवंत चित्रकार असलेल्या फत्तेलाल यांनी त्याच्यातील चित्रकार अचूक हेरला त्यांचे कौतुक केले, दामल्यांनी त्यांचा देखणा चेहरा बघून त्यांच्या आगामी ‘ दहा वाजता ‘ चित्रपटासाठी विचारले पण विवेक याना त्यावेळी चित्रपटात काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती , त्याचा ओढा चित्रकलेकडे जास्त होता .
July 22, 2021
क्रिकेट, शिकार, वाचन, सुग्रास भोजन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. रसिकतेचे राजस जीवन जगत असतानाही त्यांनी आपल्या खाणीतील मजुरांकडे किंवा मंत्रालयातील फाइलींकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.
June 30, 2022
जन्म.३ मार्च १९४३ रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील जायगव्हाण गावी.
सामाजिक,राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या विचारांसह सांस्कृतिक कलांचा आस्वाद सर्वसामान्यांना घेता यावा, यासाठी “उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट च्या माध्यमातून अविरतपणे कार्यरत असलेल्या माधवराव खाडिलकर हे ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका आशाताई खाडीलकर यांचे पती होत.
April 27, 2024
एक चित्रपट १४ वर्षे!
पाकिजा प्रदर्शित झाला १९७२ साली, पण खरंतर त्याची सुरुवात झाली १९५८ मध्ये. पाकिजा बनायला १४ वर्षांचा वेळ लागण्याचे मुख्य कारण होते ते दिग्दर्शक कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली पाकिजाची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतर तलाक. खरंतर हा चित्रपट पूर्णच झाला नसता, पण सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर अखेर दोघे पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. प्रदीर्घ खंडानंतर चित्रपटाला पुन्हा सुरुवात झाली, तोपर्यंत मीनाकुमारीला व्याधींनी घेरले होते. पण त्याची पर्वा न करता तिने चित्रीकरण पूर्ण केले. मात्र तिच्या आजारपणाची आणि वाढलेल्या वयाची छाया चित्रपटातील काही मोजक्या दृश्यांत आणि ‘तीर ए नजर’सारख्या गाण्यात दिसते. १९७२ साली चित्रपट प्रदर्शित झाला आणि दुर्दैवाने काही दिवसांतच मीनाकुमारीचे निधन झाले. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये हा चित्रपट फार चालला नव्हता. नंतर चित्रपट हिट झाला. पडद्यावरच्या आणि प्रत्यक्षातल्या अशा दोन्ही भूमिकांमध्ये मीनाकुमारीच्या वाट्याला दु:ख आणि वंचनाच आली. पाकिजाचे संगीत गुलाम मोहम्मद यांचे. पण चित्रपट पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे चित्रपटाचे पार्श्व संगीत नौशाद यांनी दिले आणि तीन गाणीही केली. पण ‘चलते चलते’सह बहुतेक प्रसिद्ध गाणी गुलाम मोहम्मद यांची. असे म्हणतात की, गुलाम मोहम्मद यांना त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार न दिल्याच्या निषेधार्थ प्राण यांनी त्यांना त्यावर्षी मिळालेला खलनायकाचा पुरस्कार स्वीकारायला नकार दिला होता.
विश्राम ढोले
संकलन संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
February 13, 2017
मराठी चित्रपटसृष्टीत असे खूप गुणवंत आहेत ज्यांच्या कलेची व्हावी तशी कदर झाली नाही आणि त्यांच्या योग्यतेच्या तुलनेत त्यांच्या पदरी तसे फार यश पडले नाही. दिग्दर्शक आणि छायाचित्रकार प्रभाकर निकळंकर हे अशांपैकीच एक होते.
August 5, 2017
श्रीमती शुभा टोळे यांनी कॅलिफोर्निया प्रांतात कलटेक विद्यापीठात पी. एच. डी. केले.
October 4, 2010
मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्या गीतांची संख्या इतर कोणाही अमराठी गायकाच्या तोडीस तोड आहे. त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत ” अ आ आई म म मका, धुंद आज डोळे”. त्याचबरोबर “घन घन माला नभी ” ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते.”घरकुल” चित्रपटातील “हाउस ऑफ बांबू”हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते.
October 24, 2021
प्रत्येक लोकोपयोगी संशोधनाला मूलभूत विज्ञानाचा पाया असतो. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ डॉ. आशिष लेले यांचे योगदान असेच आहे. कृत्रिम हाडांच्या निर्मितीत त्यांच्या संशोधनाचा हातभार आहे व पॉलिमरच्या उपयोगाने फ्युएल सेल्सची निर्मिती करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत...
''हाडाचा'' चा संशोधक
July 24, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti