(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ. प्रकाश कोतवाल

    दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील अस्थिरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश कोतवाल हे हातावरील शस्त्रक्रियेतील देशातले आघाडीचे शल्यचिकित्सक. त्यांनी हे नैपुण्य अमेरिकेतील केंटकी लुईव्हिलमधील हॅंडसर्जरीची संस्था आणि न्यूयॉर्कमधील हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे मिळवले. आठ वर्षांपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दोन्ही मनगटांवर शस्त्रक्रिया करुन त्यांना हाताच्या बोटांवरील गमावलेले नियंत्रण डॉ. कोतवाल यांनी परत मिळवून दिले.

    डॉ. प्रकाश कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला या हातांनी हात दिले मज हा लेख पुढील पानावर वाचा.

    डॉ. प्रकाश कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला या हातांनी हात दिले मज हा लेख वाचा.
    kotwal-dr-prakash-modified


    MM-022

    <!--डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हा लेख वाचा. या हातांनी हात दिले मज -->

      August 26, 2015


  • प्रभाकर जोग

    एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मदानापलीकडे राहणाऱ्या सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले.

      July 7, 2022


  • आदिनाथ कोठारे

    अभिनेत्यासोबतच आदिनाथ निर्माता म्हणूनही समोर आले आहेत. छोट्या पडद्यावर ‘सरगम’ या कार्यक्रमाचा आदिनाथ क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि निर्माता होते. शिवाय ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेचासुद्धा निर्माता म्हणून त्यांनी काम केले आहे. उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.

      June 21, 2022


  • श्रीराम कामत

    कामत, श्रीराम

    जीवनभर जगातील महनीय व्यक्तींची जीवनचरित्रे लिहून त्यांचे संकलित रूप कोशाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचा ध्यास घेतलेल्या श्रीराम कामत यांचेही चरित्र समजून घेण्यासारखे आहे. जगातील अनेक नामवंतांना सतत भेटत राहिलेल्या कामतांनी त्यांची चरित्रे संकलित स्वरूपात प्रकाशात आणण्याचा संकल्प वयाच्या चाळिशीत केला. मराठीतून विश्वचरित्रकोश निर्माण करण्याची ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी कमालीची जिद्द आणि चिकाटी यांची गरज होती.

    पत्रकारितेचा अनुभव असलेल्या श्रीराम कामतांनी ही जिद्द आणि चिकाटी दाखवून आपल्या या संकल्पाला मूर्त रूप दिले. त्यांच्या या अभिनव कोशाचे पाच खंड प्रकाशित झाले आहेत आणि त्यांचे हे काम आता जगापुढे आले आहे. कविवर्य बा. भ. बोरकर यांचे कामत हे जावई. त्यामुळे साहित्यिकांचा सहवास त्यांना मिळणे स्वाभाविक होते. आपण स्वत: लेखक होण्यापेक्षा लेखकांचीच चरित्रे लिहिण्याचे त्यांनी योजले. गाठीला ‘गोमंतक’ या दैनिकातील नोकरीचा अनुभव होता. पत्रकारितेतील तात्पुरत्या साहित्यात रमण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता आणि लिहिण्याची तर हौस होती. कामतांनी मग स्वत:च ‘मांडवी’ नावाचे मासिक सुरू केले. साहित्य, कला, राजकारण, समाजकारण अशा सगळय़ाच विषयांना प्राधान्य देणाऱ्या या मासिकाचा लौकिक चांगला राहिला, याचे कारण त्यामागे कामतांची दृष्टी होती. मासिकाच्या जोडीला त्यांनी ज्या कामासाठी आपल्या आयुष्यातील उणीपुरी अडतीस वर्षे खर्ची घातली, त्या विश्वचरित्रकोशाचे काम वेगाने होण्यासारखे नव्हतेच. कविवर्य बोरकर यांचे मार्गदर्शन आणि मदत त्यांना मिळत असली, तरीही अशा कोशाच्या कामात आवश्यक असणारी पायपीट कामतांनाच करावी लागत होती. हे काम त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेले असल्याने त्यामुळे होणारी ओढगस्त क्वचित त्यांना सुखाचीच वाटत असावी. कामतांचा स्वभाव अतिशय लाघवी आणि सगळय़ांशी जमवून घेणारा. त्यामुळे या कामात त्यांना मित्र आणि हितचिंतक यांचे मोठे सहकार्य लाभले. पैसे उभे करणे आणि अशा कामात सगळय़ांचे सहकार्य मिळवणे यासाठी आवश्यक असणारा मनमिळाऊपणा कामतांकडे होता, म्हणूनच तर विश्वचरित्रकोशाचे पाच खंड प्रकाशित होऊ शकले. कामत यांना गोव्याच्या गोमंतक मराठी अकादमीने कालिदास पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. याच अकादमीचे ते फेलोही होते. आपल्या मतांबद्दल ते नेहमीच आग्रही असत. मराठी ही गोव्याची सांस्कृतिक भाषा असून तिच्यामुळेच परकीय सत्तेच्या काळात गोव्याचे व्यक्तिगत आणि राष्ट्रीय अस्तित्व टिकून राहू शकले, असे त्यांचे मत होते. मराठी साहित्यात कोशवाङ्मयाचे दालन अनेकांनी समृद्ध केले आहे. श्रीधर व्यंकटेश केतकरांपासून ही परंपरा अधिक देदीप्यमान झाली. केतकरांनी तयार केलेले कोश वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता ऐकल्यानंतर कुणाही मराठी सुसंस्कृत आणि सुजाण माणसाची मान लज्जेने खाली जाईल. घरोघरी जाऊन आपल्या कोशाची विक्री करणाऱ्या केतकरांनी केलेल्या प्रयत्नांच्या खांद्यावर श्रीराम कामत यांना आणि त्यांच्या आधीच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महादेवशास्त्री जोशी यांच्यासारख्या दिग्गजांना उभे राहता आले. मराठी माणसाला कोश साहित्याचे महत्त्व कळायला लावण्यात या सगळय़ांचा फार मोठा हातभार आहे, यात शंकाच नाही. कामत यांनी या सगळय़ामध्ये अगदी वेगळे आणि महत्त्वाचे काम केले आहे. जगावर प्रभाव टाकणाऱ्या आणि ज्यांच्या चरित्रातून नव्या पिढीला जगण्याचे इंधन मिळू शकेल, अशा व्यक्तींचे चरित्र, त्यातील बारकाव्यांसह तयार करणे हेच काम फार मोठे आहे. अशा अनेकांच्या चरित्रांचा विश्वकोश तयार करण्याचे शिवधनुष्य श्रीराम कामत यांनी केवळ उचलण्याचे धाडस केले नाही, तर ते समर्थपणे पेलूनही दाखवले. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असताना, त्यांच्या या कार्याचा दीपस्तंभ यापुढेही सगळय़ांना दिशा दाखवत राहील, असा विश्वासही व्यक्त करायला हवा.

    -------------------------------------------------------------------

    विश्वचरित्रकोशकार श्रीराम कामत

    मराठी विश्वचरित्रकोशकार श्रीराम पांडुरंग कामत

    एक जिद्दी वाङमय अभ्यासक-----

    कामत यांच्या विश्वचरित्रकोशाचे पाच खंड प्रकाशित झाले असून सहाव्या खंडाचे काम चालू होते.

    दिवंगत कवी बा.भ. बोरकर यांचे ते जावई

    कामत यांचा जन्म १७ मे १९३४ रोजी अस्नोडा येथे झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी “मांडवी” हे मासिक सुरु केले. कामत यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा “साहित्य विशारद” पुरस्कार मिळाला आहे. २००८ साली गोमांतक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन गोवा सरकारने यंदा त्यांची पदमसाठीही शिफारस केली होती.

      August 5, 2017


  • वसंतराव गोवारीकर (डॉ.)

    भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाची पाया रचणार्‍या डॉ.वसंत गोवारीकर यांचा जन्म पुण्यात १९३३ साली झाला! अवकाश , हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात मह्त्त्वपूर्ण असे संशोधन डॉ.वसंत गोवारीकर यांनी केले आहे.

      December 15, 2010


  • चित्रपती व्ही. शांताराम

    व्ही. शांताराम हे नांव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो चित्रपटाचा पडदा आणि त्यावर व्ही. शांताराम या नांवाखाली गाजलेले एक एक चित्रपट.

      August 8, 2009


  • वसंत रामजी खानोलकर

      December 15, 2010


  • मराठी नाट्यसंगीत गायक, अभिनेते छोटा गंधर्व

    हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक, अभिनेते, संगीत रचनाकार छोटा गंधर्व यांचे खरे नाव सौदागर नागनाथ गोरे. त्यांचा जन्म १० मार्च १९१८ रोजी झाला.

    बालगंधर्व यांच्यानंतर पुण्यस्मरण करावे असे रंगभूमीवरील व्यक्तिमत्त्व म्हणजे मा.छोटा गंधर्व. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती.

    छोटा गंधर्व यांनी १० वर्षे वयाचे असताना ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत.

    आपल्या गायकीने अर्धशतकाहून अधिक काळ रंगभूमी गाजविणारे स्वरराज छोटा गंधर्व हे त्यांच्या दातृत्वासाठी सर्वपरिचित होते, १९४३ मधे त्यांनी काही कलाकारांसह 'कलाविकास' ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली.

    संगीत सौभद्रातील तसेच 'सुवर्णतुले'तला कृष्ण, 'संगीत मानापमाना'तील 'धैर्यधर', 'मृच्छकटिका'तील 'चारुदत्त', 'संशयकल्लोळ' मधला अश्विनशेठ ह्यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली.

    आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणाऱ्या छोटा गंधर्व यांना आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला.

    १९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला.

    छोटा गंधर्व यांचे ३१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकी पिडीया

      December 31, 2016


  • डॉ. प्रमोद तेलगिरी

    पुण्यातील इंडियन इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. प्रमोद तेलगिरी यांनी भाषेच्या अभ्यासाचे महत्त्व आपल्या योगदानातून अधोरेखित केले. जर्मन भाषेवर प्रभुत्व असलेले डॉ. तेलगिरी हे जर्मनीत म्युनिक विद्यापीठात प्राध्यापक राहिले. परंतु पुढे दिल्लीत जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची स्थापना झाल्यावर भारतात परतले. निवृत्तीनंतरही युरोप-अमेरिकेत आज ते अभ्यागत प्राध्यापक म्हणून जातात.

    भाषेचा भाष्यकार

      July 24, 2015


  • मधू चौगावकर

    पुरुषप्रधान संस्कृतीवर हल्ला चढविणार्‍या अनेक महिला आपल्या पाहण्यात येतात. परंतु ही रुळलेली वाट सोडून महिलांइतकाच पुरुषांचाही अभ्यास करुन समान सामाजिक व्यवस्थेसाठी मधू चौगावकर देशभरात काम करीत आहेत. स्त्री-पुरुष समानता खर्‍या अर्थाने प्रत्यक्षात यावी, यासाठी त्या स्वत:च्या घरापासूनच प्रयत्नशील झाल्या आहेत. युनिसेफच्या जेन्डर एम्पॉवरमेन्ट विषयीच्या कोअर समितीच्या त्या सदस्य आहेत.

    स्त्री-पुरुष समानतेसाठी

      July 14, 2017