प्रियंवदा म्हडाळकर

मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्ससाठी राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच झालेल्या 'सीमॅट' या परीक्षेत व्हीजेटीआयच्या प्रियंवदा म्हडाळकरने मुलींमध्ये पहिला नंबर मिळवत बाजी मारली.

दहावीमध्ये शाळेतून पहिली...बारावीला कॉलेजमधून तिसरी...इंजिनीअरिंगला व्हीजेटीआय कॉलेजमधून चारही वर्षं पहिल्या पाचात आणि आता सीमॅट (कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट) या राष्ट्रीय परीक्षेत देशभरातून मुलींमध्ये पहिली येण्याचा घसघशीत मान तिने मिळवला. व्हीजेटीआय कॉलेजमध्ये शिकणार्‍या प्रियंवदा म्हडाळकर या विद्यार्थीनीने मिळवलेलं हे सुयश आहे.

सीमॅटच्या ४०० मार्कांच्या या परीक्षेत २८८ मार्क मिळवत प्रियंवदाने बाजी मारली. मुलींमध्ये पहिली आलेली प्रियंवदा देशातून ४३ व्या क्रमांकावर आहे. 'फेब्रुवारीमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी मी गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच तयारीला लागले होते. आयआयएमसाठी कॅटची परीक्षासुद्धा दिली होती. यानंतर आयआयएम-कोझीकोडेमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. सीमॅटची परीक्षा मी एक ऑप्शन म्हणून दिली होती,' असं प्रियंवदा सांगते. इंजिनीअरिंगनंतर आयआयएममधून एमबीए आणि त्यानंतर आयएएस अधिकारी बनण्याची तिची इच्छा आहे. 'दोन वर्षं जॉब करून त्यानंतर पुन्हा एकदा कॅटची परीक्षा देऊन आयआयएममध्ये अॅडमिशन मिळवायची प्रयत्न मी करणार आहे. आयएएस अधिकारी बनून देशासाठी काम करत विकासामध्ये हातभार लावण्याचा माझा निर्धार आहे,' असं ती आपण कमावलेल्या यशाबद्दल आणि भविष्यातल्या वाटचालीबद्दल बोलताना सांगते.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)




मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्ससाठी राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच झालेल्या ‘सीमॅट’ या परीक्षेत व्हीजेटीआयच्या प्रियंवदा म्हडाळकरने मुलींमध्ये पहिला नंबर मिळवत बाजी मारली.

दहावीमध्ये शाळेतून पहिली…बारावीला कॉलेजमधून तिसरी…इंजिनीअरिंगला व्हीजेटीआय कॉलेजमधून चारही वर्षं पहिल्या पाचात आणि आता सीमॅट (कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट) या राष्ट्रीय परीक्षेत देशभरातून मुलींमध्ये पहिली येण्याचा घसघशीत मान तिने मिळवला. व्हीजेटीआय कॉलेजमध्ये शिकणार्‍या प्रियंवदा म्हडाळकर या विद्यार्थीनीने मिळवलेलं हे सुयश आहे.

सीमॅटच्या ४०० मार्कांच्या या परीक्षेत २८८ मार्क मिळवत प्रियंवदाने बाजी मारली. मुलींमध्ये पहिली आलेली प्रियंवदा देशातून ४३ व्या क्रमांकावर आहे. ‘फेब्रुवारीमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी मी गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच तयारीला लागले होते. आयआयएमसाठी कॅटची परीक्षासुद्धा दिली होती. यानंतर आयआयएम-कोझीकोडेमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. सीमॅटची परीक्षा मी एक ऑप्शन म्हणून दिली होती,’ असं प्रियंवदा सांगते. इंजिनीअरिंगनंतर आयआयएममधून एमबीए आणि त्यानंतर आयएएस अधिकारी बनण्याची तिची इच्छा आहे. ‘दोन वर्षं जॉब करून त्यानंतर पुन्हा एकदा कॅटची परीक्षा देऊन आयआयएममध्ये अॅडमिशन मिळवायची प्रयत्न मी करणार आहे. आयएएस अधिकारी बनून देशासाठी काम करत विकासामध्ये हातभार लावण्याचा माझा निर्धार आहे,’ असं ती आपण कमावलेल्या यशाबद्दल आणि भविष्यातल्या वाटचालीबद्दल बोलताना सांगते.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


Author