(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • क्रिकेटपटू सिडने बार्न्स

    सिडने बार्न्स वयाच्या 21 व्या वर्षी 1894 मध्ये जलद गोलंदाज म्हणून नावारूपास येत होते तेव्हा ते स्टॅफोर्डशायर काउंटी क्रिकेट क्लबमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून काम करू लागले. सिडने बार्न्स यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो 13 डिसेंबर 1901 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी नाबाद 26 धावा केल्या आणि 65 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या

      April 26, 2021


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही - अंतिम भाग बारा

    आयुर्वेदात एवढी ताकद आहे तर काही रोग कायमस्वरुपी का बरे होत नाहीत ? या आयुर्वेद शास्त्राच्या मर्यादा नव्हेत काय ? असं काही जणांच्या मनात येतं.

    औषधालासुद्धा काही मर्यादा असतात. म्हणून तर सर्व रोग औषधाने बरे होत नाहीत. पण कोणते रोग कायमस्वरुपी बरे होत नाहीत, याचे सविस्तर वर्णन देखील ग्रंथकारानी करून ठेवले आहे.

    ज्या ठिकाणी आपल्या, किंवा आपल्या शास्त्राच्या मर्यादा संपतात, ती वेळ पेशंटला, दुसऱ्या शास्त्राकडे " रेफर " करण्याची असते, हे ज्या वैद्याला किंवा डाॅक्टरला समजते, तो यशस्वी !
    ज्याला आपल्या मर्यादा समजतात, ते शास्त्र महान असे मला वाटते.

    केवळ औषधांनीच रोग बरे होत नाहीत, ही दृष्टी शिकवणाऱ्या आयुर्वेद शास्त्राला त्रिवार वंदन !!!

    लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे इथे औषधांच्या मर्यादा शास्त्रकारांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. जे व्याधी औषधांनी बरे होत नाहीत तिथे क्षारकर्म, अग्निकर्म, शस्त्रकर्म करावे लागते. चरकाचार्य देखील स्पष्टपणे म्हणतात, इति नास्ति मम अधिकारः । शस्त्राधिकारः ।। अमुक व्याधी हा केवळ औषधांनी बरा होणारा नाही.

    प्रमेहासारखा आजारच घ्या ना ! त्याचे एकुण वीस प्रकार. त्यातील कफापासून होणारे दहा प्रकार सहज साध्य सांगितले आहेत. पित्तामुळे होणारे सहा प्रकार औषध घेतलं तर साध्य, याला याप्य असा शब्द ग्रंथकार वापरतात. तर वातामुळे निर्माण होणारे चार प्रकार, किंवा पहिल्या वर्णन केलेल्या सोळा प्रकारांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर होणारे मधुमेहासारखे व्याधी औषध घेतले तरी सुद्धा पूर्ण नष्ट होत नाहीत. त्यांना असाध्य म्हणतात.

    आयुर्वेदात शस्त्रसाध्य व्याधी, ग्रहचिकित्सा वर्णन केल्या आहेत, कारण औषधांच्या मर्यादा ग्रंथकाराना माहिती होत्या. मोतीबिंदूचे शस्त्रकर्म, अॅपेंडिक्स, हर्निया यांची शस्त्रकर्मे एवढेच नव्हे तर ह्रदयाच्या शस्त्रकर्मामधे उपयोगी ठरणारे, आणि तर्जनी या बोटावर टोपीसारखे बसणारे, एक अति सूक्ष्म यंत्र देखील ग्रंथात वर्णन केलेले आहे, जे आजही अगदी तसेच, तेवढ्याच कामासाठी सर्जनमंडळी वापरतात.

    मध्यंतरीच्या कालावधीत यवनांनी केलेल्या प्रचंड विध्वंसामुळे, केलेल्या जाळपोळीमुळे, राजकीय अनास्थेमुळे, अहिंसात्मक जीवनाचा अतिरेक झाल्यामुळे, आयुर्वेदातील काही महत्त्वपूर्ण विषयाच्या अभ्यासापासून, पुढील काही पिढ्या वंचित राहिल्या, हे सत्य आहे.

    औषधाला जसा गुण आहे, तसाच अवगुण पण त्याच्यातच दडलेला असतो, याचाही अभ्यास देखील ग्रंथकार सांगतात, ( वैद्याला याची जाण असते, बोगस डाॅक्टरला नसते. ) यासाठी औषध देणारा वैद्य हा ज्ञानी, अभ्यासू, दृष्टकर्मा, हवा. केवळ पुस्तकी किडा नको. आणि धनाभिसर पण नको. (ग्रंथात वैद्यांचे दोन प्रकार सांगितलेले आहेत, एक रोगाभिसर म्हणजे रोगाला दूर करणारा, आणि दुसरा प्राणाभिसर, म्हणजे प्राणाला दूर नेणारा, म्हणजे अज्ञानाने चुकीची औषधे वापरून, रोगापेक्षा प्राण हरण करणारा, म्हणून प्राणाभिसर ! ) तिसरा धनाभिसर हा नवीन प्रकार आज अस्तित्वात दिसतो.

    आज स्टिराॅईड सारखी औषधे जास्त काल घेतल्याने त्याचे प्रचंड दोष उत्पन्न ( आजच्या भाषेत "साईडइफेक्ट" ) होतात. हे माहिती असून सुद्धा ती वापरली जातात.

    आयुर्वेदात देखील क्षारांसारखी काही औषधे काही कालावधीनंतर बंद करावीत, हे स्पष्टपणे लिहिलेले आहे.

    म्हणजे आयुर्वेदीय औषधांना पण साईड इफेक्ट असतात ?
    हो असतातच !
    अहो,
    ज्या औषधांना "इफेक्ट" आहे, त्याला "साईडइफेक्ट" असणारच ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    30.04.2017

      May 2, 2017


  • दैनिक नवाकाळचे संपादक नीलकंठ खाडिलकर

    खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या होत्या.

      November 22, 2021


  • बालकुमार साहित्यकार सुधाकर प्रभू

    सुधाकर प्रभू मराठी भाषेतील बालकुमार साहित्यकार होते.

    सुधाकर प्रभू यांचा जन्म गोव्यात पेडणे गावी झाला. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते मुंबईला गेले. या काळातच वयाच्या अठराव्या वर्षी `आनंद` व भा.रा. भागवतांच्या `बालमित्र` या मासिकांत त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या. बी.ए. व बी.एड्. पदव्या संपादल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला.

    सुधाकर प्रभू यांनी दोनशेहून अधिक पुस्तके लिहिली. त्यातील `राजू प्रधान` ही व्यक्तिरेखा भा.रा. भागवतांच्या `फास्टर फेणे`प्रमाणे लोकप्रिय ठरली.

    पुस्तकांखेरीज `साप्ताहिक स्वराज्य`, `रविवार सकाळ`, `साप्ताहिक हिंदू`, `साधना` यासारख्या नियतकालिकांतूनही त्यांनी लेखन केले.

    बालसाहित्यातील कामगिरीबद्दल गोवा कला अकादमी, गोवा सरकार, भारत सरकारचे पुरस्कार त्यांना लाभले.

    कोल्हापूर येथे 1991 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

    30 जुलै 2007 रोजी पुणे येथे सुधाकर प्रभू यांचे निधन झाले.

      March 11, 2015


  • ज्येष्ठ तत्वज्ञ जे कृष्णमूर्ती

    कृष्णमूर्तींच्या मतानुसार दारिद्र्य, युद्धे, आण्विक संकट आणि इतर दुर्दैवी गोष्टींचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. आपल्या विचारांप्रमाणे आपण जगतो आणि वागतो त्या प्रमाणेच युद्धे आणि सरकारे त्याच विचारांचा परिपाक आहेत.

      February 17, 2022


  • श्रीराम भिकाजी वेलणकर

    भारतीय टपालखात्याच्या 'पिन कोड' प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचा जन्म २२ जून रोजी झाला.

    ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं त्यांच्या पत्रव्यवहारासाठी १७२७ मध्ये कोलकात्यात पोस्टाची सेवा चालू केली. श्रीराम भिकाजी वेलणकर हे ब्रिटिशांच्या राज्यात आयसीएसंच्या लेखी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले तरीही त्यांना पोस्ट आणि टेलीग्राफ खात्याच्या तोंडी परीक्षेत ठरवून अनुत्तीर्ण करण्यात आले होते. कारण ह्या दोन परीक्षांमधील काळात रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्याकडून मागविलेल्या इतिवृत्तानुसार, सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना संध्याकाळी आपल्या घरी लहान मुलांना जमवून गोष्टी सांगत त्या ऐकायला श्रीराम भिकाजी वेलणकर नावाचा मुलगा जात होता अशी माहिती ब्रिटीश सरकारला कळली होती.

    भारतातल्या वाढत्या पत्रसेवेचा भार सांभाळणं हे दिवसेंदिवस मोठं काम होऊ लागलं होतं. त्यातच निरनिराळ्या भाषा, अपुरे लिहिलेले पत्ते अशा इतर अडचणीही होत्या. नंतर आपल्या पोस्ट आणि टेलीग्राफ नोकरीत असताना मा.श्रीराम भिकाजी वेलणकर त्यावर उपाय म्हणून श्री. श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली. श्री. श्रीराम भिकाजी वेलणकर यांना 'पिन कोड' प्रणालीचे जनक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं. श्रीराम भिकाजी वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासक होते. श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे १ एप्रिल १९९९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    आज दुदैवाने या श्रीराम भिकाजी वेलणकर यांच्या बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे.

      April 1, 2019


  • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर

    महाराष्ट्र कविचरित्रमाला” ही ३००० पृष्ठांची, ११ पुस्तकांची माला सिद्ध करणारे जगन्नाथ आजगावकर यांचा जन्म १६ ऑगस्ट १८७९ रोजी झाला.

    'कवन-कुतूहल' (पद्यरचना), “प्रणय विकसन”, “प्रणयानंद” ही नाटके आणि “मुकुंदराजाचा सार्थ-परमाकृत” हा संपादित ग्रंथ, तसेच काही बाल-पुस्तके त्यांनी लिहिली.

    Jagannath Raghunath Ajgaonkar

      November 7, 2017


  • अलौकिक गणिती श्रीनिवास रामानुजन

    गणिती प्रज्ञावंतांना सहसा त्यांच्या योगदानानुसार उत्तम आणि अत्युतम अशा दोन वर्गात विभागले जाते. पण काही गणितज्ञ अपवादात्मक असामान्य अशा तिसर्याु वर्गात मोडतात. अशा मोजक्या प्रतिभावंतांमध्ये भारताचे रामानुजन यांचा समावेश असणे आपल्यासाठी गौरवास्पद आहे. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी झाला.

    वयाच्या दहाव्या वर्षी गणिताची ओळख झालेल्या मद्रास प्रांतातील मा.बबरामानुजन यांची गणिती प्रतिभा शाळेपासूनच थक्क करणारी होती. पण दुसर्याप विषयांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ते महाविद्यालयातील स्नातक पदवी मिळवू शकले नाहीत. पोटापाण्यासाठी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये कारकुनाची नोकरी पत्करली व वेळ मिळेल तेव्हा त्यांनी गणितात संशोधन चालूच ठेवले. त्यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातील सुप्रसिद्ध गणिती प्राध्यापक जी. एच. हार्डी यांना एका नऊपानी पत्रात आपले काही गणिती शोध कळवले. ते वाचून प्राध्यापक हार्डी अचंबित झाले व त्यांनी रामानुजनला १९१४ मध्ये इंग्लंडला बोलवून घेतले. तेथे त्यांच्या प्रतिभेला आणखीन पंख फुटले व त्यांनी मूलभूत असे काम करून अनेक सिद्धांत मांडले. मात्र इंग्लंडमधील हवामान आणि रामानुजन यांची सनातन कर्मठ जीवनशैली यांचा मेळ जमेना. प्रकृती ढासळल्याने अनेकदा त्यांना रुग्णालयात राहावे लागे. शेवटी १९१९ मध्ये ते मायदेशी परतले. केवळ ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अतिशय नम्र आणि निगर्वी वृत्तीच्या रामानुजन यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत आहे.अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत.

    रामानुजन सांगत की त्यांच्या स्वप्नात त्यांची नामाककलची नामगिरी ही आराध्य देवता आणि नरसिंह देव प्रकट होऊन रक्ताचे थेंब सोडत. त्यात असंख्य अतिशय प्रगत गणिती सूत्रे त्यांना दिसत आणि जागे झाल्यावर त्यातील आठवतील तितकी ते लिहून काढत व ती सिद्ध करण्यासाठी अपार कष्ट घेत. त्यांच्या मते, गणिती सूत्र म्हणजे देवाच्या मनातील विचार, असा होता. कदाचित अशा निष्पाप, अतिशय संवेदनशील ग्रहणशीलता व तरल चित्तवृत्तीमुळेच त्यांना ती सूत्रे दिसत, रोखठोक तर्कशात्र आणि निर्विकार गणिती चौकटीत शिक्षण झालेल्यांना ती सहसा दिसणार नाहीत, असा एक मतप्रवाह आहे. रामानुजन हा निसर्गाचा एक गणिती चमत्कार होता असे मानणे रास्त ठरेल.

    रामानुजन यांनी अल्पकाळात दिलेले योगदान आजदेखील संशोधकांना आव्हान असून आणखी काही शतके काम करता येईल एवढी त्यांची सूत्रे सखोल आहेत. १९९७ पासून ‘द रामानुजन जर्नल नावाचे एक आंतरराष्ट्रीय नियतकालिक प्रसिद्ध होत असून त्यात त्यांच्या कार्याशी निगडित असे दर्जेदार शोध लेख प्रसिद्ध होतात.

    आपण गणितातील मूलभूत तसेच उपयोजन संशोधन यासाठी रामानुजन यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यांनी आर्थिक, शैक्षणिक आणि शारीरिक प्रतिकूल परिस्थितीतही गणितासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले आणि भारताची गणितातील गौरवशाली परंपरा वाढवली. केवळ 32 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मा.रामानुजन यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत आहे. त्यांनी मांडलेल्या जवळपास ४००० सूत्रांपैकी दोन तृतीयांश अगदी नवीन आहेत व काही तुरळक वगळता सगळी बरोबर आहेत. अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत.

    श्रीनिवास रामानुजन आजारी होते तेव्हा त्यांचे गुरु प्रो. हार्डी त्याना भेटावयास आले. गप्पा मारता मारता प्रो. हार्डी सहज म्हणाले की मी ज्या टॅक्सीतून आलो तिचा क्रमांक अशुभ होता. १७२९.

    तेव्हा रामानुजन म्हणाले अहो ही अतिशय शुभ संख्या आहे. कारण दोन संख्यांचा घन करुन त्यांची बेरीज केली असता एकच उत्तर येते अशी दोन उदाहरणे असलेली सर्वात लहान संख्या आहे ही.
    तेव्हा प्रो. हार्डी म्हणाले ते कसे काय?

    तेव्हा चटकन रामानुजन यानी पुढील गणित करुन दाखविले.
    ०९×०९×०९= ७२९
    +१०×१०×१०= १०००
    ===========
    १७२९

    १२×१२×१२ = १७२८
    +०१×०१×०१ = ०००१
    ==============
    १७२९

    रामानुजन यांचे निधन २६ एप्रिल १९२० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 22, 2018


  • डॉ. के. एन. दस्तुर

    हृद्य ही मानवाला मिळालेली सर्वात अमुल्य व कलात्मक भेट आहे. सामान्य माणसाला कवित्व देणारे, विवीध भावनांचे पितृत्व स्वीकारणारे, यंत्रांच्या गर्दीमध्ये हरवत चाललेल्या व्यक्तींना संवेदनांचे व हळुवार जाणीवांचे शहारे देऊन त्याला माणुस म्हणून जगण्यास प्रवृत्त करणारे, व त्याच्यातील ‘दर्दीपण’ जोपासणारे हृद्य जेव्हा त्याच्या तांत्रिक बाबींमध्ये गुरफटते तेव्हा नश्वर देहाची परलोक यात्रा सुरू होते. परंतु आज वैद्यकीय क्रांतीमुळे दुर्मिळ हृद्यविकारांवर देखील औषधे व शस्त्रक्रिया जन्मास आल्या आहेत.

      August 18, 2011


  • पद्मा चव्हाण

    अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.

      July 23, 2017