(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुधीर ठाकरे

    गरिबांच्या मुळावर उठलेला चर्मोद्योग घोटाळा उघड करणे असेल, गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, कापूस विक्रीतून सरकारला नफा मिळवून देणे असेल..अशी विविध सरकारी कामं कर्तबगारीने पार पाडणारे अधिकारी ही सुधीर ठाकरे यांची ओळख.

    नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून एम.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स) केल्यानंतर त्यांनी प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. यानंतर त्यांनी प्रशासनात एम.ए. पदवी मिळवली. एलएलबीही पूर्ण केले. अभ्यास सुरू असतानाच त्यांनी भरती परीक्षा देऊन १९७५मध्ये विक्रीकर अधिकारी म्हणून पहिले प्रशासकीय पद स्वीकारले.

    १९७८ मध्ये त्यांची सहकार खात्यात नियुक्ती झाली. याच खात्यात ते जॉईंट रजिस्टार झाले. यावेळी त्यांनी चमोर्द्योग घोटाळा उघड केला. राज्यातील अनेक बड्या घोटाळ्यांपैकी हा एक घोटाळा मानला जातो. यामध्ये मुंबईचे तत्कालीन नगरपालांपासून ते अनेक राजकीय नेत्यांना कोर्टाच्या पायर्‍या चढाव्या लागल्या. त्यांच्या या कामात तत्कालीन आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी त्यांना खूप मदत केली.

    यानंतर ते कापूस महामंडळात जॉईंट एम.डी. म्हणून रूजू झाले. त्यावेळेस सरकार शेतकर्‍यांचा कापूस विकत घ्यायचे आणि तो चढ्या भावाने विकायचे. मात्र यामध्ये म्हणावी तितकी सुसूत्रता नव्हती. सरकारला नफा मिळवणंही अवघड होत होतं. पण त्यांनी विभागीय कामात सुसूत्रता आणून सरकारला नफा मिळवून दिला. ठाकरे यांनी त्यांच्या कारकीदीर्त एका वर्षी सरकारला ७०, तर दुसर्‍या वर्षी ५० कोटींचा नफा मिळवून दिला. त्यांच्यानंतर हा नफा मिळवणे अद्याप कोणाला शक्य झाले नाही. यानंतर ते ग्राहक हित विभागात जॉईंट एम.डी. झाले.

    १९९१ मध्ये ते आयएएस झाले. यानंतर त्यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीईओपदाची सूत्रे स्वीकारली. लगेच त्यांना जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेथेही त्यांनी विविध प्रयोग केले.

    यानंतर मंत्रालयात विविध विभागांत काम करताना त्यांनी गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान अशा योजनांना चालना दिली. ग्राम विकास विभागात सचिव असताना त्यांनी राज्यातील सर्व गावे कम्प्युटरने जोडण्याचा 'संग्राम' हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविला.

    त्यांची ग्रामविकास खात्याच्या सचिवपदावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. दोन वर्षांच्या या काळात एमपीएससीचा दर्जा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दर्जापर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे. आता नव्या विभागातील आव्हानांना सामोरे जाताना या विभागाचा कायापालट करण्याचे त्यांचे ध्येय आहे. आम्ही समाजाचे सेवक आहोत राजे नाही, अशी भावना जपणारा हा अधिकारी याही कामात यशस्वी होईल, यात शंका नाही.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017


  • प्र.ल.मयेकर

    ‘मसीहा’ या त्यांच्या कादंबरीवरून त्याच नावाचे नाटकही उदय कला केंद्राने रंगभूमीवर आणले होते. आय कन्फेस, रोप ट्रिक यांसारख्या १३ एकांकिका त्यांनी लिहिल्या.

      July 5, 2022


  • दत्तात्रेय शंकर डावजेकर

    दत्ता डावजेकर

      December 15, 2010


  • हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक

    आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. ‘बालगंधर्व’सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे.

      December 20, 2021


  • महेश एलकुंचवार

    भारतीय नाटय़सृष्टीवर सर्जनशील लेखनाची छाप उमटवणारे नामवंत नाटककार आणि प्रतिभावंत साहित्यिक महेश एलकुंचवार यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९३९ रोजी विदर्भातल्या पारवा या गावात झाला.

    त्रिधारा या नाट्य प्रकाराने मराठी नाटकाला जागतिक पातळीवर एक वेगळा आयाम मिळवून देणारे प्रयोगशील नाटककार म्हणून महेश एलकुंचवार परिचित आहेत. महेश एलकुंचवार यांचा जन्म तेलगु भाषक कुटुंबात झाला. त्यांची मातृभाषा तेलगूच. पारवा गावातच प्राथमिक शिक्षण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ते नागपूरला आले. मॉरिस कॉलेजमधून बी.ए आणि नागपूर विद्यापीठातून इंग्लिश विषय घेऊन एम.एची पदवी मिळवली. कॉलेजजीवनात असताना, १९५७ ते १९६३ या काळात,त्यांनी जवळजवळ पाचशे ते सहाशे इंग्रजी चित्रपट पाहिले होते. पण विद्यार्थिदशेतच विजय तेंडुलकर यांचे "मी जिंकलो, मी हरलो', हे नाटक पाहून त्यांना नाट्य लेखनाची प्रेरणा मिळाली. व सहजपणे पाहिलेल्या नाटक या घटनेचा परिणाम होऊन एलकुंचवार नाटक या माध्यमाकडे वळले. चौफेर वाचन असलेल्या एलकुंचवार यांनी १९६७ साली "सुलताना'हे पहिले नाटक लिहिले आणि ते सत्यकथा मासिकात प्रसिद्ध होताच,नाट्य दिग्दर्शक आणि ख्यातनाम अभिनेत्री विजया मेहता यांनी रंगायन या संस्थेतर्फे ते रंगभूमीवर आणले. मानवी जीवनातली विलक्षण गुंतागुंत, पारंपरिक चालीरीतींचा प्रभाव, त्यामुळे निर्माण होणारे विविध सामाजिक प्रश्न, लोककथा,लोककलांचा सामाजिक प्रभाव, स्त्री जीवनाची मानसिक कोंडी, याचे प्रचंड चिंतन असलेल्या एलकुंचवार यांची नाटके चाकोरीबाह्य आणि नव्या विषयांवर प्रकाशझोत पाडणारी होती. पूर्ण अभ्यास आणि चिंतन केल्याशिवाय त्यांनी नाटके लिहिलेली नाहीत. त्यांच्या नाट्य लेखनात विलक्षण ताकद असल्यामुळेच त्यांच्या नाटकातली पात्रे प्रेक्षकांनाही नवा विचार देतात. १९८४ साली "होळी' या नाटकावर केतन मेहता यांनी तर गोविंद निहलानी यांनी "पार्टी' या नाटकावर हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती. या दोन्ही चित्रपटांसाठी पटकथा लेखनही एलकुंचवार यांनीच केले होते.

    रुद्राक्ष, झुंबर, एका म्हाताऱ्याचा मृत्यू,कैफियत, यातनाघर, वासनाकांड, वाडा चिरेबंदी, प्रतिबिंब, धर्मपुत्र, एका नाट्याचा मृत्यू, रक्तपुष्प, यासह त्यांनी लिहिलेली तीस नाटके मराठी रंगभूमीला नवी दिशा देणारी ठरली आहेत. त्यांच्या काही नाटकांचे हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन भाषातही अनुवाद झाले आहेत.

    मराठी भाषेवर विलक्षण प्रेम आणि या भाषेचा अभिमान असलेल्या महेश एलकुंचवार यांनी मराठीतच नाट्य लेखन केले. मराठी नाटक हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव असल्याचे ते सांगतात. ‘मौनराग’ या त्यांच्या ललित लेखसंग्रहाने मराठी ललित लेखनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. वाडा चिरेबंदी, भग्न तळ्याकाठी, युगांत,गाबरे यासारख्या प्रसिद्ध नाटकाचे लेखन करून क्रांती घडवून आणणाऱ्या महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला राज्य सरकारने १९८७ मध्ये उत्कृष्ट नाटक म्हणून सन्मानित केले होते.‘आत्मकथा’ या त्यांच्या नाटकाला १९८९ मध्ये अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे पुरस्कार मिळाला.

    सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी दिला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ‘युगांत’ या नाटकाला देण्यात आला. १९९४ मध्ये संगीत नाटक अकादमीचा २००३ मध्ये अत्यंत मानाचा असा ‘सरस्वती सन्मान’,२००४ मध्ये साहित्य अकादमीचा व २००८ मध्ये पु.ल देशपांडे यांच्या नावाने देण्यात येणारा ‘पुलोत्सव सन्मान’ त्यांना मिळाला. मराठी नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या सुवर्ण पदकाने त्यांचा सन्मान झाला होता.त्यांना ‘प्रिय जी. ए. सन्मान पुरस्कार,’ के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे ‘सरस्वती पुरस्कारा’साठी सन्मानित करण्यात आलेआहे. तसेच संगीत मराठी अकादमीने विशेष अभ्यासवृत्ती जाहीर करून त्यांचा गौरव केला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      October 9, 2017


  • फू बाई फू फेम अभिनेता संतोष मयेकर

    सिडेनहैम महाविद्यालयात त्या स्नातक असून त्यांनी बॉलीवुड मध्ये पार्श्वगायिका म्हणून ५० हून अधिक चित्रपटासाठी व १० हून अधिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत.

      June 28, 2022


  • सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे

    त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात म्युझिक ॲ‍रेंजर म्हणून काम करणाऱ्या भिडे यांनी कालांतराने चित्रपटांना स्वतंत्रपणे संगीत देण्यास सुरुवात केली.

      April 4, 2022


  • मराठी सिनेअभिनेते मोहन गोखले

    घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत लीलया मा.मोहन गोखले वावरले.

      April 17, 2019


  • आशा बगे

    आशा बगे या मराठी कादंबरीकार, लेखिका आहेत. त्यांना २००६ मध्ये भूमी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

    त्यांचे प्रकाशित झालेलं साहित्य -

    भूमी (कादंबरी, मौज प्रकाशन गृह)
    दर्पण (कथासंग्रह, मौज प्रकाशन गृह)
    निसटलेले (कथासंग्रह, मेहता पब्लिशिंग हाऊस)
    मारवा (कथासंग्रह, मौज प्रकाशन गृह)
    त्रिदल (कादंबरी, मौज प्रकाशन गृह)
    अनंत (ललित, विजय प्रकाशन)
    चंदन (ललित, विजय प्रकाशन)
    धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे (ललित, विजय प्रकाशन)
    श्रावणसरी (निसर्ग)

      December 15, 2010


  • जर्मन तंत्रज्ञ रुडॉल्फ डिझेल

    पाच वर्षांच्या अखंडित प्रयोगानंतर १८९७ मध्ये संपीडित हवेच्या तापमानाने इंधनाचे प्रज्वलन होत असलेले व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले इंजिन यशस्वीरीत्या तयार केले. हे दणकट इंजिन २५ अश्वशक्तीचे, उभ्या सिलडरचे, हवेच्या दाबाने इंधन तेलाचे अंत:क्षेपण होणारे, मंदगतीचे पण उच्च औष्णिक कार्यक्षमतेचे होते. रुडॉल्फ डिझेल हे १९७८ सालचे ऑटोमोटिव्ह हॉल ऑफ फेम’चे मरणोत्तर मानकरी ठरले होते.

      March 19, 2022