जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अस्सल महाराष्ट्रीय वडापाव आणि भारतीय खवय्येगिरीची आठवण देणारी कुल्फी, बर्फाचा गोळा या गोष्टींनी लंडनमध्येही धडक मारली. स्वस्त दरांच्या स्पर्धेला तोंड देत आपल्या गुगली रेस्तरॉंद्वारे नाशिकच्या सचिन मुळाणे या मराठी तरुणाने लंडनवासियांना अस्सल भारतीय लज्जतीने भुरळ पाडली आहे.
सचिन मुळाणे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मराठी तडका हा लेख पुढील पानावर वाचा.
सचिन मुळाणे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मराठी तडका हा लेख वाचा.
September 7, 2015
कवी, शाहीर, गीतकार राम उगावकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील उगाव या गावी झाला.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथील जनता विद्यालयात उगावकर यांनी काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळेतही त्यांनी शिक्षक म्हणून काम केले.
राम उगावकर हे आदर्श शिक्षक, कवी, शाहीर, गीतकार होते. ते सेवादलातही काम करत असत. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे उगावकर यांना गुरुस्थानी होते. राम उगावकर यांना भाऊसाहेब रानडे, एस. एम. जोशी, भाई वैद्य, ग. प्र. प्रधान, कवी कुसुमाग्रज यांचे संस्कार आणि मार्गदर्शन मिळाले. शाहिरीपासून त्यांनी आपल्या कला जीवनाची सुरुवात केली. लोकनाट्य, नाटक, चित्रपट कथा, चित्रपट गीते, पोवाडे, वैचारिक लेख आदी विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनेही त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते.
‘जिद्द’, ‘पायगुण’, ‘नवरा माझा ब्रह्मचारी’, ‘मोसंबी-नारंगी’, ‘भीमगर्जना’, ‘घरंदाज’ आदी चित्रपटांसाठी तसेच ‘संत गाडगे बाबा’ या मालिकेसाठीही त्यांनी गीत लेखन केले होते. उगावकर यांनी ‘नारदमुनी मुंबईत’, ‘एक मास्तर चंदेरी दुनियेत’ हे एकपात्री कार्यक्रमही सादर केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रतीकार, संत गाडगे महाराज, हॅलो इन्स्पेक्टर, पुरुष पात्र नसलेले आज येणार पाहुणे, मुलांचा हरिजन दिन अशी त्यांची बारा नाटके रंगभूमीवर आली. तर गीतागीत सुगंध (काव्य), अंतराळ स्नेह (काव्य), मस्करी (विनोदी कविता संग्रह), शिवबाची शौर्यगाथा (पोवाडा), भारतीय स्वातंत्र्याचा पोवाडा, लोकमान्य (नाटक) जादूचा मणी, टिल्लू ही बालनाट्ये, परिताईचा मंगू असे काव्य, नाट्य व बालसाहित्य प्रकाशित आहे.
त्यांनी काव्यमय असे एका सच्चा शिक्षकाचे मनोगत, एक मास्तर चंदेरी दुनियेत या पुस्तकाद्वारे तर दाखवलेच पण त्यावर उत्कृष्ट कविता लिहून त्यांनी स्वत:चेच चरित्र काव्यातून सादर केले.
उगावकर यांनी लिहिलेली २० नाटके रंगभूमीवर सादर झाली होती. त्यांची तीन हिंदी तर सुमारे ४० मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. काही चित्रपटातूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘दलित मित्र’ या पुरस्कारानेही उगावकर यांना सन्मानित करण्यात आले होते.
संत गाडगे महाराज यांचे ते उपासक होते. त्यामुळे भगवे कपडे न घालणारे साधू म्हणूनही उगवकारांचा परिचय करून दिला जातो. परम शांतीधाम वृद्धाश्रमाचे ते विश्वस्तही होते.
राम उगावकर यांचे ५ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
April 5, 2022
आज ते हयात नाहीत. ते कथालेखक, स्तंभलेखक. गुन्हे कथालेखन हा त्यांनी आयुष्यभर हाताळलेला साहित्य प्रकार. साधी, सरळ, सोपी भाषेत कथाचित्र डोळ्यांसमोर उभे करण्यात हातखंडा. अनेक कथासंग्रह प्रकाशित. उपप्राचार्य ते उपसंपादक पदावर कार्य केले. उत्तम वक्तृत्व. सूत्रसंचालक.
दिवंगत प्रा. एकनाथ आबूज.
त्यांनी बीडमध्ये कल्पना प्रकाशन सुरू केलं. आम्हा नवोदितांना हक्काचा मंच मिळाला. प्रकाशक कसा असावा याच उत्तम उदाहरण. माझी पहिली कादंबरी 'पांढरा कावळा' त्यांनीच प्रकाशित केली. राज्य शासनाचा साने गुरूजी पुरस्कार मिळाला. त्यांना इतका आनंद झाला. घरी बोलावून माझा सन्मान केला. दादासाहेब सादोळकर सोबत होते. पुढे कादंबरीस बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचा पुरस्कार लाभला.त्यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. तीही संपली. तिसरी आवृत्तीही प्रकाशित केली. आता चौथ्या आवृत्तीसाठी सर नाहीत याची सल मनात आहे.
माझ्या लेखनाविषयी भरभरून बोलत. तो आनंद चेहर्यावर स्पष्ट दिसायचा. 'बटाटीची धार' हा माझा कथासंग्रहही त्यांनीच प्रकाशित केला. पुन्हा एका कादंबरीची चर्चा झाली. मी लिहिणार होतो. ते प्रकाशित करणार होते. त्यांच्या पश्चात ती अपूर्ण आहे.
त्यांच्या सहवासात घडलो आम्ही. माझ्यासह अनेक मित्रही. मित्रनगरातील घर आमच्यासाठी संकुलच होते. आज तिथे सर नाहीत. पुस्तकंही नाहीत. सुने-सुने वाटते.
साहित्यिक दिशांचे होकायंत्रच जणू ते! आठव दाटतो.
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
पुण्यनगरी मध्ये पूर्वप्रकाशित
November 9, 2016
महाराष्ट्रातल्या एकपात्री प्रयोग करणाऱ्या प्रमुख पाच-सहा नावांमध्ये डॉ. लक्ष्मण देशपांडे यांची गणना होईल. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९४३ रोजी झाला. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए., पीएच.डी., मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.
१९८० ते २००० डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागात विविध विषयांवर चर्चासत्र, शिबिर त्यांनी आयोजित केली. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाटय़कथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाटय़-चित्रपट कारकीर्द होती. डॉ. देशपांडे यांनी डॉ. अनुया दळवी यांच्याबरोबर द्विपात्री 'नटसम्राट'चे शंभरावर प्रयोग केले. त्यांनी दोन चित्रपटांतही काम केले. डॉ. देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा हा बहुमान त्यांना वऱ्हाड निघालय लंडनला ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. . ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८० मध्ये झाली.
लक्ष्मण देशपांडे यांनी 'वऱ्हाड..'च्या सुमारे २८०० प्रयोगांतून अवघा महाराष्ट्र पालथा घातलाच; पण या नाटकाला खरोखरीच सातासमुद्रापार लंडनला नेलं होतं. अफाट उर्जा आणि दर्जेदार अभिनयानं एक अख्खं कथानक ते सहजगत्या उभं करायचे. 'लंडनला शिकायला गेल्यावर तिथ जुडीच्या प्रेमात पडलेला काशीनाथ', 'मला बोलीलं का बाप्पा', असं सारखं बोलून बाप्पाला भंडावून सोडणारा बबन्या, 'मायवं हे बुईंग वर गेलं आनी पल्डं तंर', असे प्रश्न करीत विमानात सगळ्यांच्या छातीत धस्स करणारी अनेक कार्टी, 'वंस, सासूबाई, सून यांच्यातील रुसवे फुगवे', हे असं सारं म्हणजे थोडक्यात गावच्या भाषेत ज्याला आपण 'बारदान' अं म्हणतो ते अख्ख मराठवाड्याचं गाव आणि जोडी इंग्रजीची फोडणी देणारे ज्युडी, जानराव या सगळ्यांना घेऊन डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी नाट्यरसिकांना प्रचंड हसवलं, रडवलंही.
‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या त्यांच्या एकपात्री नाटय़प्रयोगाने ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. त्यांनी नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम त्यांनी नगिर्स कॅन्सर हॉस्पिटल (बाशीर्), अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हे या नाटक सध्या संदीप पाठक करत आहे. त्यांनी पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि नागपूर या संस्थेवर महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम केले होते.
१९८६ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या अपना उत्सव या राष्ट्रीय व सांस्कृतिक एकात्मता कार्यक्रमात त्यांनी कला दिग्दर्शन केले. १९८७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमात समन्वयक म्हणून कार्यरत होते. १९८८ मध्ये झोपडपट्टी भागात साक्षरतेचे वर्ग घेण्यात ते आघाडीवर होते. १९९३ ते १९९५ या कालावधीत औरंगाबादेत कला आणि नाटय़ प्रदर्शनाद्वारे साक्षरता अभियानात संचालक म्हणून कार्यरत. केंद्र शासनाच्या नाटय़ विभागातर्फे कलावंत निवडण्याच्या समितीत सदस्य म्हणून सहभाग. ते परभणीच्या अ. भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. १९९९ मध्ये केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीने आयोजित पहिल्या राष्ट्रीय थिएटर महोत्सवात ते सहभागी होते.
'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' ने गौरव केला होता. स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर पुरस्कार, बेंडे स्मृती पुरस्कार, पुणे महानगरपालिका पुरस्कार, पुण्याचा राम श्रीधर पुरस्कार, मुंबईत उत्तुंग पुरस्कार, मराठवाडा विकास मंडळातर्फे मराठवाडा गौरव पुरस्कार. छत्रपती शाहू महाराज पुरस्कार. अखिल भारतीय नाटय़संमेलन ठाणे आणि नाशिक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकांकिका महोत्सवात पुरस्कार, मुंबई आकाशवाणीतर्फे पुरस्कार, सजाजीराव महाराज पुरस्कार (बडोदा) , कै. वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार, नाटय़ क्षेत्रात केलेल्या कार्याचा महाराष्ट्र शासनातर्फे गौरव. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांना असे अनेक पुरस्कार मिळाले होते.
प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ नाटक
https://www.youtube.com/watch?v=atIEn0ODN5k
https://www.youtube.com/watch?v=hVEu5uWb18E
December 5, 2017
पं. प्रभाकर कारेकर यांनी तीन दशकांहून अधिक काळ शास्रीय संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. मूळचे गोव्याचे असलेले कारेकर आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीची साधना करतात.
July 20, 2017
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात एस डी बर्मन, नौशाद, ओ पी नय्यर, शंकर जयकिशन, रोशन, रवी, सी रामचंद्र,खय्याम आदि अनेक मातब्बर संगीतकार आपल्या एका पेक्षा एक सुंदर आणि श्रवणीय रचनांनी रसिकांना तृप्त करीत होते. अशा स्पर्धेच्या काळात हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात आपल्या अनोख्या संगीताचा ठसा उमटवणे सोपे नव्हते. अशा स्पर्धेच्या युगात मदन मोहन यांनी आपली संगीतकाराची कारकीर्द सुरु केली आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या अनोख्या अशा संगीत रचनांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. एक प्रथितयश संगीतकार म्हणून अल्पावधीत त्याचं नाव मोठ्या आदराने घेतलं जाऊ लागलं…..
June 22, 2020
शशीकांत कोनकर ह्यांच्या मते ठाणे हे जणू मुंबईजवळचे पुणे आहे. उद्याच्या ठाण्याकडे पाहताना ते म्हणतात की ते नितांत सुंदर, स्वच्छ व संस्कृती जपणारे असावे. ठाणे विद्येचे माहेरघर आहे असंही ते म्हणतात.
May 23, 2014
केवळ गीतकार आणि संगीतकार एवढेच ‘शब्दप्रधान गायकी’चे पुरस्कर्ते यशवंत देवांचे कर्तृत्व नाही. ते उत्तम संगीत शिक्षक व संगीत संयोजक होते, काव्याचे डोळस अभ्यासक होते. चित्रपटांप्रमाणेच नाट्यक्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय आहे. चाळीसहून अधिक नाटकांसाठी त्यांनी गीत, संगीत, पार्श्वसंगीत देण्याची जबाबदारी सांभाळली आहे.
November 1, 2019
शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत.
June 30, 2022
राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर यांना स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. बालसाहित्यकार आणि चरित्रकार राजा मंगळवेढेकर यांचा जन्म ११ डिसेंबर १९२५ रोजी झाला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत.
आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे. जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार, गदिमा पुरस्कार, बालसेवा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. राजा मंगळवेढेकर यांचे १ एप्रिल २००६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गीतकार म्हणून राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेली गाणी
असावा सुंदर चॉकलेटचा
उर्मिले त्रिवार वंदन तुला
कोणास ठाऊक कसा
सती तू दिव्यरूप मैथिली
October 29, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti