जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन बोस्टनमधील एका रिसर्च कंपनीत काम करत असताना, रे टॉमिल्सन यांनी १९७१ मध्ये पहिला ईमेल पाठवला आणि ईमेलद्वारे संभाषणाला सुरुवात झाली. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९४१ रोजी झाला. रे टॉमिल्सन यांनी ही कामगिरी केली, तेव्हा इंटरनेटची सुरुवादेखील झाली नव्हती. मात्र जगात ही क्रांती घडायला पुढची २० वर्षं जावी लागली. टॉमिल्सन यांनी @ या साईनचा वापर केला होता जो आजपर्यंत वापरला जातो. टॉमिल्सन यांनी १९६० सालीच SNDMSG या प्रोग्रामद्वारे एकाच कॉम्प्युटरमध्ये एकीकडून दुसरीकडे पत्र पाठवण्याचं तंत्र विकसित केलं होतं. यात मेल कम्पोज करून, त्यावर पत्ता लिहून ते दुसऱ्या युजरला पाठवण्याची व्यवस्था होती.
थोर प्रतिभावंत व ‘कल्ट फिगर’ असूनही निगर्वी आणि मनमिळावू स्वभावामुळे रेमण्ड माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात प्रिय व आदरणीय होते. अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी टॉमलिन्सन यांना गौरविण्यात आले होते. सन २०१२ मध्ये ‘इंटरनेट हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांना सन्मानपूर्वक स्थान देण्यात आले. प्रत्येकाचा ई-मेल अॅड्रेस लिहिण्याची ठराविक पद्धत जगन्मान्य झाली आहे. त्यात सुरुवातीस युजरनेम व नंतर त्याचा पत्ता अशी रचना असते. या दोन्हींच्या मध्ये @ हे चिन्ह सर्वप्रथम वापरण्याचे श्रेयही टॉमलिन्सन यांच्याकडेच जाते. रे टॉमिल्सन यांचं ५ मार्च २०१६ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 5, 2019
चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमळाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र मा.विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन,राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या. मा.चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. गदिमा लिखीत, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १० व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. मा.चंद्रकांत गोखले यांचे २० जुन २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपीडिया
January 7, 2017
October 11, 2017
डॉ.अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे.
अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नीा डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. डॉ. अनिल अवचट हे स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे.
डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणार्याा कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केले आहे. डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत. नवीन पिढीलाही त्यांचे लेखन प्रेरणादायी वाटते यात शंका नाही. डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत.
त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळविणार्या व्यक्ती : पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे, प्रमोद उदार, वगैरे.
डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने "सर्वोत्कृष्ट पुस्तके" म्हणून जाहीर केली आहेत. अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.
सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७). साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार १४ नोव्हेंबर २०१०. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २०११. डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२ व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला.
श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 26, 2017
जॉन अब्राहमचा जन्म १७ डिसेंबर १९७२ रोजी झाला. पूर्वी एक चांगला मॉडेल उत्कृष्ट अभिनेता होऊ शकत नाही, असे बॉलिवूडमध्ये म्हटले जाते असे. मात्र जॉनने यशस्वी मॉडेलसोबतच स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणूनही सिद्ध केले आहे. २००३ मध्ये 'जिस्म' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणा-या जॉनने पहिल्याच सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार आपल्या नावी केला होता. यशस्वी मॉडेल, अभिनेता आणि पिळदार शरीरयष्टी असलेला जॉन बाइक्ससाठी क्रेजी आहे. त्याच्याकडे बाइक्सचे मोठे कलेक्शन आहे. जॉनला JA या स्वतःच्या ब्रॅण्डची जीन्स परिधान करणे पसंत आहे. याशिवाय तो अरमानी ब्रॅण्ड्सचे शर्ट्स वापरतो. या ब्रॅण्ड्सच्या शर्टची किंमत साठ हजारांपासून सुरु होते. डिझायनर नरेंद्र कुमार अहमद यांचे कट सूट्स तो परिधान करतो. याशिवाय रॉकी एससुद्धा त्याचे आवडते डिझायनर आहे.
जॉनचा फुटबॉल हा त्याचा आवडता खेळ असून फुटबॉलपटू होण्याचे त्याचे स्वप्न होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.
मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. मिल्खा सिंग यांनी आपल्या जीवनात ८० शर्यतीत भाग घेतला. त्यात ते ७७ वेळेस विजयी झाले. तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५८ मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली १९६० च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत ४०० मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं.
रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यत ४५.७३ सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅनपेक्षा ते सेकंदाच्या १०० व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे ४० वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.मिल्खा कॉमनवेल्थ खेळात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते.१९५८ च्या टोकियो इथं झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये मिल्खा सिंग यांनी २०० मीटर आणि ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर १९६२ च्या जकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये ४०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकलं होतं.
लष्करात जाण्याची मिल्खा सिंग यांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला; मात्र तीन वेळा त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी लष्करात जाण्याचा विचार सोडला. मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग सीख' हे नाव पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आयुब खान यांनी १९६० मध्ये दिले होते. त्या वेळी मिल्खा यांनी पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता अब्दुल खालिकला पाकिस्तानातच हरवले होते. मिल्खा सिंगच्या आई-वडिलांचा मृत्यू फाळणीदरम्यानच्या दंगलीमध्ये झाला. मिल्खा यांचे लग्न भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौरसोबत झाले. मिल्खा सिंग यांची पत्नी देखील एक खेळाडू होती. हे अनेक जणांना माहीत ही नसेल कदाचित. दोन महान खेळाडूंच्या मृत्यूमुळे क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. मिल्खा सिंह आणि त्यांची पत्नी निर्मला कौर यांची लव्हस्टोरी वेगळी आहे. मिल्खा सिंह हे पहिल्या नजरेतच निर्मला यांच्या प्रेमात पडले होते.
मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजर ही खेळाच्या मैदानावरच भिडली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली. मिल्खा सिंग यांचं अनेक मुलींसोबतच्या अफेअरच्या चर्चाही गाजल्या होत्या. एक दोन नव्हे तर तीन मुलींसोबत मिल्खा सिंह यांचं नाव जोडलं गेलं होतं. या मुलींसोबत प्रेमाचे किस्सेही चांगलेच रंगले होते. मात्र मिल्खा यांचा जीव जडला तो मैदानावरच्या हॉलीबॉल खेळणाऱ्या राणीवर.
1955 मध्ये श्रीलंकेमध्ये मिल्खा सिंग आणि निर्मला कौर पहिली भेट झाली होती. याच ठिकाणी दोघांची एकमेकांशी ओळखही झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिला असल्याचा किस्साही फार गाजला आहे.
पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा झाली. 1960 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनलं होतं. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत गेलं.
दरम्यान या दोघांच्याही लग्नासाठी निर्मला कौर यांच्या घरातून मात्र विरोध होता. मिल्खा सिंग शिख असल्याने निर्मला कौर यांचे वडील दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा येत होता. अशावेळी पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.
१९६२ मध्ये मिल्खा आणि निर्मला या दोघांचं लग्न झालं. मिल्खा सिंग यांनी अनेकदा आपल्या पत्नीचे जाहीरपणे कौतुक केलं केलं होतं. ते आपल्या बायकोला स्वतःची सर्वात मोठी ताकद मानत असत.
त्यांचा मुलगा जीव सिंग गोल्फचा प्रसिद्ध खेळाडू आहे. भारत सरकारने त्यांना अर्जून पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
भाग 'मिल्खा भाग मिल्खा' हा चित्रपट मिल्खा सिंग यांच्या १९४६ ते १९६० पर्यंतच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. यात फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांचा अभिनय केला आहे. या वयात ही मिल्खा सिंग हे देशातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत असत. यासाठी सरकारनंही त्यांना मदतीचा हात दिला होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचं १३ जून २०२१ कोरोनामुळं निधन झाले होते.
मिल्खा सिंग यांचे १८ जून २०२१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
June 18, 2022
December 15, 2010
औरंगाबाद येथे जन्मलेले इक्बाल कुरेशी यांना लहान पणापासून संगीताची आवड होती. औरंगाबाद सोडून ते हैद्राबाद येथे फाईन आर्ट अकॅडमीला नोकरीसाठी गेले. ती बदलीची नोकरी असल्याने ते मुंबईत आले. ६.४ इंच उंची असलेले मा.इक्बाल कुरेशी त्या काळी बॉलीवूड मधील एक भारदस्त व्यक्तिमत्व होते. इक्बाल कुरेशी यांचा यांचा संगीतकार म्हणून १९६० साली आलेला पहिला चित्रपट पंचायत,कि जो मनोज कुमार यांचा सुद्धा पहिला चित्रपट होता. फिल्मालयचा लव्ह इन सिमला या चित्रपटातील इक्बाल कुरेशी यांची सगळी गाणी गाजली. बिंदिया, ये दिल किसको दु, उमर केंद हे त्यांचे संगीत दिलेले इतर चित्रपट. मा.इक्बाल कुरेशी यांच्या वाट्याला "ब" अथवा "क" दर्जाचे निर्माते व दिग्दर्शक आले. परन्तु त्यातील काही गाणी खूप लोकप्रीय झाली होती. त्यांनी एकूण २८ चित्रपटाना संगीत दिले. इक्बाल कुरेशी यांचे २१ मार्च रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
इक्बाल कुरेशी यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=81z-a7IxSHY
May 29, 2017
सहायक दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू करणा-या बासू चटर्जी यांनी दिग्दर्शक म्हणून रजनीगंधा, चितचोर, छोटीसी बात, खट्टामीठा, बातों-बातों में सारखे सुंदर चित्रपट दिले. त्यांचा जन्म १० जानेवारी १९३० रोजी झाला. स्वच्छ मनोरंजक चित्रपटात विविधता देणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटाची गती वाढवली. त्यांचे एकाच वर्षात दोन चित्रपट येणे सुरू झाले. बासूदा आपल्या चित्रपटांतून मध्यमवर्गाची छोटीसी बात सांगत. मुंबईतील बसस्टॉपपासून चाळीपर्यंत त्यांचे ‘पिया का घर’ अगदी ‘खट्टा मिठ्ठा’ खुले. म्हणजे पुन्हा चित्रीकरणाचे दिवस ते किती? फार-फार तर पस्तीस-चाळीस. तेदेखील बातो बातो में कधी निघून जात, हे समजतही नसेल. पन्नासहून अधिक हिंदी व बंगाली चित्रपटांसह त्यांनी रजनी, व्योमकेश बक्षी या मालिकांचे दिग्दर्शन केले. मा.हृषिकेश मुखर्जी आणि मा.बासु चॅटर्जी यांची त्या काळी असलेल्या निकोप स्पर्धेमुळे खरोखर मनाला विरंगुळा देणारे चित्रपट निर्माण झाले. बी. आर. चोप्रा यांनी ‘छोटीसी बात’च्या वेळी बासू चटर्जींना तसेच स्वातंत्र्य दिल्याने निखळ मनोरंजन करणार्याज मध्यमवर्गीय चित्रपटाचा प्रवाह सुरू झाला. मा.राजेंद्र यादव यांच्या सारा आकाश कादंबरीवर बासु चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा मृणाल सेन यांच्या भुवनशोमच्या बरोबरीने समांतर धारेतला पहिला चित्रपट ठरला.मा.बासु चॅटर्जी यांची कन्या रूपाली गुहा यांनी आपल्या वडीलांची परंपरा पुढे सुरू ठेवत मराठी सिनेनिर्मितीत पाऊल टाकले आहे. त्यांचे पती कल्याण गुहा हे हिंदीतील मानवंत निर्माते दुलार गुहा यांचे पुत्र असून गुहा दाम्पत्याच्या निर्मितीखाली `नारबाची वाडी’ हा पहिला वहिला मराठी सिनेमा तयार झाला आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांची सेकंड जनरेशन मराठी सिनेमाकडे वळली आहे असं म्हणता येईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 11, 2017
१२ एप्रिल १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. पुन्हा प्रुथ्वी वर उतरताना सात हजार फुट उंची वरुन ते कँप्सुल च्या बाहेर येऊन पँराशुटच्या साह्याने पृथ्वी वर उतरले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले.
March 9, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti