जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
तुमच्या दैनंदिन आयुष्यात अढळ स्थान पटकावलेले पण तुमच्या भावी पिढ्या संपवून टाकण्याची दाहकता जोपासणारे प्लॅस्टीक तुम्ही तुमच्या आयुष्यातून हद्दपार करू शकता?
‘प्लॅस्टीक’चे दुष्परिणाम आणि त्याला पर्याय' या विषयावर शेकडो व्याख्याने घेऊन अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या एका अवलियाला, ५८ वर्षाच्या तरुणाला, आज भेटूया, हे आहेत श्री. मिलिंद पगारे.
#Bharatiyans
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक गोष्ट आपल्या बरोबर नी:शब्दपणे वावरत असते. सणासुदीचे दिवस असो वा मुलांच्या शाळेची गडबड, भाजीला जायचे असो वा हॉटेलमधून पार्सल आणायचे असो, फ्रीजमध्ये भाज्या ठेवायच्या असो वा पिकनिक ला जायचे असो, प्रसंग काहीही असो, वाढदिवस, समारंभ, गणपती, दिवाळी एक वस्तू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे.
‘प्लॅस्टीक’
प्लॅस्टीकचा शोध १९ व्या शतकाच्या सुरुवातीला न्यूयॉर्क मध्ये लागला आणि काही दशकांमध्येच प्लॅस्टीकचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारात होऊ लागला. होऊ लागला आणि आता तर प्लॅस्टीक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालंय.
पण ह्या प्लॅस्टिकचे जसे उपयोग आहेत त्यापेक्षा शतपटीने त्याचे अनेक गंभीर दुष्परिणाम आज सायन्सच्या आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या लक्षात आले आहेत.
आजघडीस प्लॅस्टीकचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात आणि वारंवार होतो आहे की त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. आणि याचे अतोनात गंभीर परिणाम प्राणी आणि मनुष्याच्या आऱोग्यावर दिसून आले आहेत.
शासनाने प्लॉस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले असले तरी या आदेशाची सर्वत्र सर्रास पायमल्ली सुरू असून प्लास्टिकच्या अतिरेकी वापराने प्रदूषणात दिवसेंदिवस भयंकर वाढ होत आहे. अनेक नाल्या-गटारांमध्ये प्लॅस्टीक अडकून पडल्याने पावसाळ्यात सांडपाणी तुंबते आणि साचते. तसंच अनेकदा प्लॅस्टीकमधून शिळे खाद्य पदार्थ फेकण्यात येत असल्याने हे प्लॅस्टीक खाऊन गाय, म्हशीसारखी अनेक जनावरे सर्रास मृत्युमुखी पडत आहेत.
जितक्या सहजतेने प्लॅस्टिकने त्याचे जाळे पसरवले तितकेच कठीण होऊन बसले आहे त्याचे अस्तित्व मिटवणे आणि कमी करणे .
आज अनेक देशांनी प्लॅस्टिकवर काही अंशी बंदी आणली आहे. प्लॅस्टिकची गुणवत्ता ठरवून फक्त त्याच गुणवत्तेचे प्लॅस्टीक वापरण्याचे कायदेही निघालेत. प्लॅस्टीक अगदी माती, पाणी, हवा यांच्यातून थेट आपल्या रक्तात जाऊन मिसळले आहे.
मित्रानो, आज प्लॅस्टीकच्या या भस्मासुराने पृथ्वीला गिळायला सुरुवात केली आहे. अश्या प्लॅस्टीक विरोधी चळवळ उभारणारा, त्याचे दुष्परिणाम सांगून त्यावर पर्याय सांगणारा, जागृती करत फिरणारा ५८ वर्षाच्या मॅकेनिकल इंजिनिअर तरुण मिलिंद पांगारे.
“YES WE CAN” आपण करू शकतो, ह्या वाक्याने सुरुवात करत अफाट उत्साहाच्या जोरावर शेकडोहून अधिक व्याख्यान देत महाराष्ट्र पिंजून काढलाय यांनी आत्तापावेतो. गुजरात मधल्या जामनगर मध्ये मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून नोकरी करत असताना "प्लॅस्टीक हटाव, देश बचाव"चा नारा देत जनजागृती करता आहेत.
कॉलेज, कंपन्या, संस्थामार्फत आयोजित अनेक कार्यक्रमांत त्यांनी प्लॅस्टिकच्या दुष्परिणावर व्याख्याने केलीत ह्या व्याख्यानांसाठी ते पैसे घेत नाहीत. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराथी ह्या भाषांमधून ते व्याखाने करतात.
ते म्हणतात, "माझ्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे एक माणूस जरी जागा झाला तरी माझ्या प्रयत्नांचे चीज झाले असे मी समजेन."
आपण टाकलेल्या किंवा केलेल्या कचऱ्याचे पुढे काय? हा सततचा भेडसावणारा प्रश्न घेऊन उत्तर शोधण्यासाठी त्यांनी काही गोष्टीवर अभ्यास केला. अशावेळी आश्चर्यकारक पण चिंता वाढवणारे आकडेवारी त्यांच्या हाती लागली .
प्लॅस्टिक खाऊन मुक्या प्राण्यांचे किती जीव जातात? गटारे तुंबतात, वाढत्या घाणींने आणि दुर्गंधीने किती लोकांचे आरोग्य धोक्यात येते? कोणतेही व्यसन नसलेल्या किती व्यक्तींना कॅन्सर झाला? त्याचे कारण काय? अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे शोधत असतांना धक्कादायक आकडेवारी पाहून मिलिंद पगारे विचलित झाले.
अशातच त्यांचा एक जवळचा निर्व्यसनी मित्र कॅन्सर मुळे हे जग सोडून गेला आणि सुरु झाले त्यांचे युद्ध प्लॅस्टीक विरोधी चळवळीचे.
मिलिंदजींनी सुरु केलेल्या ह्या चळवळीने अनेक कंपन्यांमध्ये प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला आहे. प्लॅस्टीकच्या बॉटल्स , चहाचे कप आणि प्लेट जाऊन त्या जागी स्टील किंवा काचेच्या चिनीमातीच्या कुठेकुठे अगदी मातीच्या वस्तूंचा पर्याय निवडला गेलाय. अनेक लोकांनी दैनंदिन वापरातील प्लॅस्टीकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडाच्या पिशव्या, कागदाच्या पिशव्या वापरायला सुरुवात केलीय.
"भारतीयन्स"ने देखील जुन्या साड्यांपासून पिशव्या तयार करणाऱ्या महिलांची ओळख काही दिवसांपूर्वी एका लेखात करून दिली होती.
संशोधनाचा संग्रह, काही माहितपट, लॅपटॉप, प्रोजेक्टर असा लवाजमा घेऊन प्रवास करणारे किरकोळ शरीरयष्टीचे वार्धक्याकडे झुकलेले पण अंगी प्रचंड ऊर्जा असणारे मिलिंद पगारे.
मिलिंदजी म्हणतात, " एका माणसानं जरी स्वतःसाठी स्वतःपासून सुरुवात केली तर नजीकच्या काळात अनेक हात ह्या चळवळीत सहभागी होतील. चळवळ अखंडपणे टिकावी आणि निसर्गाला पर्यायाने स्वतःला वाचवायची वेळ आता आली आहे.
आपण सर्व ह्या चळवळीत सहभागी होऊ. दैनंदिन जीवनात किमान सहज टाळता येतील असे प्लॅस्टीक टाळू आणि त्याला सक्षम पर्याय शोधू.
मिलिंदजींच्या उत्साहाला आणि ह्या चळवळीला टीम भारतीयन्स’च्या शुभेच्छा.
आपण श्री. मिलिंद पगारे यांना व्याख्यानासाठी बोलावू इच्छित असाल तर संपर्क करा ७०१६२०४२७४ (7016204274)
वैशाली सागर- देवकर
टिम भारतीयन्स
November 22, 2016
कवी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला. खरे सांगायचे म्हणजे ‘बी’ हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे. त्यांच्या कवितांची शैली ही अतिशय बांधेसूद आणि मधुर आहे. दीर्घकविता हे कवी ‘बीं’च्या लेखन शैलीचे वैशिष्ठ्य. त्यांच्या प्रणयपत्रिका, बकुल, माझी कन्या, चाफा, वेडगाणे या काही विशेष उल्लेख कराव्या अश्या कविता! यातील ‘माझी कन्या‘ ही कविता पूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यासाला असल्यामुळे आणि ‘चाफा‘ ही कविता लता मंगेशकरांच्या समधुर स्वरात गीतबद्ध झाल्यामुळे सर्वोपरीचीत आहे. त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका‘ ही वर्हा डात चिखलदरा येथे दिनांक १४ सप्टेंबर १८९१ रोजी लिहिली गेली. त्यावेळी ते सुमारे १९ वर्षांचे असावेत. ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ पत्रात प्रसिद्ध झाली. अनेक दिवस झाले तरी प्रियकराचे कुशल सांगणारे पत्र आले नाही म्हणून चिंताग्रस्त अशा प्रेयसीचे आपल्या प्रियकराला लिहिलेले पत्र म्हणजे ‘प्रणय पत्रिका. १९११ साली ‘बी’ हे अभिनव नाव धारण करून त्यांनी “टला-ट रीला-री । जन म्हणे काव्य करणारी ।” ही ‘वेडगाणे‘ नावाची एक अत्यंत नादमधुर व तात्त्विक कविता ‘मासिक मनोरंजनात’त प्रसिद्ध केली. केवळ यमकाला यमक जुळवून अर्थहीन काव्य करण्यावर उपहासात्मक आणि तात्त्विक अशी ही कविता म्हणजे बींच्या प्रतिभेचे एक उत्तम उदाहरण. परंतू ही अतिशय अर्थपूर्ण कविता रचताना स्वतः कवी बी मात्र यमक जुळविल्याशिवाय रहात नाहीत. पण हे सारे साधताना कवितेचे सौंदर्य देखील त्यांनी ढळू दिले नाही. १९११ ते १९३३ पर्यंत, म्हणजे सुमारे एक तपभरच ‘बी’ कवींची प्रतिभा फुलून आली असे म्हणता येईल. १९३४ साली त्यांचा “फुलांची ओंजळ” हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. 'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे. कवी बी यांचे निधन ३० ऑगस्ट १९४७ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ प्रियांका / स्वानंद
June 1, 2017
अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.
October 30, 2021
सत्तरीच्या दशकातील उत्तरार्धात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरुन घराघरात पोहोचलेला एक सुमधुर आणि लक्षणीय आवाज म्हणजे भारती गोखले-रुस्तम यांचा.
July 9, 2012
श्रीपाद नारायण पेंडसे यांनी मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार मराठी कादंबरीक्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले होते. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९१९ रोजी झाला.गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘यशोदा’, ‘कलंदर’ अशा यशाच्या शिखऱ गाठणा-या कादंब-यांचे लेखक श्रीपाद नारायण पेंडसे यांना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता. शिक्षणानंतर बी. ई. एस. टी. मध्ये ते रूजू झाले. त्यांच्या लेखनाला कथा लेखनापासून सुरुवात झाली. १९३८ मध्ये सह्याद्री मासिकात त्यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. १९४१ साली त्यांचे पहिले पुस्तक ‘खडकावरील हिरवळ’ प्रसिद्ध झाले. त्यानंतर हिंदू-मुसलमानांच्या दंग्यावर आधारलेली ‘एल्गार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. ‘हद्दपार’ ही कादंबरी खूपच लोकप्रिय झाली. पुढे ‘गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘यशोदा’, ‘कलंदर’ इ. कादंबर्यांरनी यशाचे शिखर गाठले. श्री. ना. पेंडसे यांची ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी साठच्या दशकात प्रकाशित झाली आणि मराठी साहित्यात एक लोकविलक्षण प्रेमकहाणी जन्माला आली. तीही कोकणातील पारंपरिक, कर्मठ वातावरणात! यातल्या अफाट कर्तृत्वाच्या बापूमध्ये अनेकांनी स्वत:ला कल्पिले आणि राधासारखी विलक्षण प्रेयसी आपल्यालाही लाभावी असं चित्रही मनोमन रंगवलं. ‘गारंबीच्या बापू’ ची मोहिनी अनेक पिढय़ा टिकली. नव्हे, आजही टिकून आहे. श्री. ना. पेंडसे यांनी आपल्या कादंबरीचं केलेलं नाटय़रूपांतरही तितकंच प्रभावी आहे. १९६२ साली लिहिलेल्या ‘रथचक्र’ या कादंबरीला १९६४ साली साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. पेंडसेंच्या सुरुवातीच्या कादंबर्यांकमधे कोकणचा प्रदेश आणि त्यातली माणसे हे वर्णन प्रकर्षाने येत असे. पण ‘लव्हाळी’ आणि ‘ऑक्टोपस’ ला मुंबईची पार्श्वभूमी आहे. ‘ऑक्टोपस’चे वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरी केवळ पात्रांच्या संवादातूनच पुढे जाते. त्यानंतरची मा.श्री.ना.पेंडसे यांची चैतन्यपूर्ण कादंबरी म्हणजे ‘तुंबाडचे खोत’. चार पिढ्यांच्या कहाणीची ही चौदाशे पानांची कादंबरी दोन खंडात विभागली आहे. मानवी वृत्तीचे गूढ, कोकणातील निसर्ग, जिवंत व्यक्तिचित्रण, नाट्यपूर्ण संवाद आणि ओघवते निवेदन यामुळे ही कादंबरी वाचकाच्या मनाची पकड घेते. ‘राजे मास्तर’, ‘यशोदा’, ‘संभुसांच्या चाळीत’, ‘असं झालं उजाडलं’, ‘चक्रव्यूह’, ‘रथचक्र’ ह्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवरही यश प्राप्त केलं. ‘जुम्मन’ नावाचा त्यांचा कथासंग्रहही प्रसिद्ध आहे. ‘श्री. ना. पेंडसे. लेखक आणि माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. श्री.ना. पेंडसे यांना नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा ‘जनस्थान’ पुरस्कार प्राप्त झाला होता. श्री.ना.पेंडसे यांचे २४ मार्च २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 24, 2017
जॉनीभाई म्हणतात विनोदी नटासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे उत्तम स्क्रिप्ट लेखक दुसरे म्हणजे टायमिंग आणि तिसरे म्हणजे कलाकार कसा स्वतःच्या बुद्धिमतेनुसारं इम्पप्रूव्ह होतो हे आवश्यक असते आणि त्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची असते, तिच्यावर ताबा असणे आवश्यक असते. त्यांच्या दृष्टीने त्यांना अब्रार अल्वी यांच्याकडे काम करताना मजा येत असे.
June 22, 2021
मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मा.मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नीे मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते. गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिब यांनी त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. मा.गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार. गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते. मा.मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत १९५४ साली एक चित्रपट निघाला होता व दुसरा १९८८ साली दूरचित्रवाणीसाठी बनवला होता. पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोहराब मोदी तर दुसर्याा चित्रपटाचे दिग्दर्शक गुलझार होते. मा.मिर्झा गालिब यांचे निधन १५ फेब्रुवारी १८६९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मिर्झा गालिब यांच्या काव्यातल्या सुप्रसिद्ध पंक्ती
काबां किस नूर से जाओगे गालिब, शर्म तुमको मगर नहीं आती
दिल-ए-नादाँ तुझे हुआँ क्या आखि़र इस दर्द की दवा क्या है
नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने
ये नथी हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता
हजारो ख्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकलें
हैं और भी दुनियामें सुखन-वर बहुत अच्छे, कहते हैं कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और
February 20, 2017
ज्ञान प्रबोधिनी, फिलिप्स कंपनी, नाटक, सिनेमा, विनोदी मालिका, लेखन असा सुप्रसिध्द लेखक शिवराज गोर्ले यांचा जीवनप्रवास.
October 31, 2019
December 15, 2010
सायमन कमिशन या आयोगाचे ते अध्यक्ष होते. सायमन कमिशन हे १९२८ साली ब्रिटिश भारताच्या वसाहतींत घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसद सदस्यांचा इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन होता.
March 1, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti