जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती.
June 30, 2022
साठोत्तरी मराठी सामाजिक कादंबरीतील इहवाद आणि नैतिक जाणीवांना चिकीत्सक अभ्यास या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे.
August 3, 2017
अनंत प्रियोळकर यांचे शिक्षण गोवा, धारवाड आणि सांगली येथे झाले.सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात शिकत असताना विख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. पां. दा. गुणे ह्यांच्याशी प्रियोळकरांचा निकटचा संबंध आला. त्यांच्या सहवासामुळे भाषाशास्त्र आणि पाठचिकित्साशास्त्र ह्या विषयांकडे प्रियोळकर ओढले गेले.
September 21, 2023
सोनाली बेंद्रेचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी झाला. सोनालीने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. सोनालीने अभिनेत्री म्हणून १९९४ मध्ये आलेल्या झालेल्या 'आग' सिनेमातून पदार्पण केले होते. सोनालीला उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, सोनालीचे फिल्मी करिअर काही खास राहिले नाही. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टार सिनेमांत काम केले. सोनाली सिनेमांत हवे तसे यश मिळवू शकली नाही तरी तिने जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. त्यामध्ये शाहरुख खान (इंग्लिश बाबू देशी मेम), सलमान खान (हम साथ साथ है) आमिर खान (सरफरोश), अमिताभ बच्चन (मेजर साहब), अजय देवगण (दिलजले, जख्म) आणि अक्षय कुमार (तराजू) यांची नावे सामील आहेत. सोनालीने आपल्या ११ वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास ३० सिनेमे केले. शिवाय तिने, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी सिनेमांतसुध्दा काम केले आहे. २००३ मध्ये रिलीज झालेल्या 'कल हो ना हो' सिनेमानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. दहा वर्षानंतर २०१३ मध्ये रिलीज झालेल्या 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' सिनेमातून सोनालीने कमबॅक केले. सोनाली बराच काळ चित्रपटांपासून दूर होती. कमबॅक करत तिनं एक-दोन चित्रपट केलेही, पण नंतर तिनं टीव्हीकडे मोर्चा वळवला. 'क्या मस्ती क्या धूम', 'इंडियन आयडॉल', 'इंडियास गॉट टॅलेंट', 'सिनेस्टार की खोज' असे एकामागोमाग एक रिअॅलिटी शोज तिला मिळत गेले. सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अनाहत’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. अगं बाई अरेच्चा या चित्रपटातील ‘छम छम करता है ये नशिला बदन’ या गाण्याच्या तालावर आपल्या सर्वांना थिरकायला लावून सोनाली ने एक धक्का दिला होता. सोनाली ने ‘पालकत्व’ या विषयावर एका उत्तम, दर्जेदार पुस्तकाचे लिखाण केले आहे. हे पुस्तक कथेच्या स्वरुपात आणि तिच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे. पालकत्वाची जबाबदारी सांभाळताना येणारे सुखद अनुभव याबरोबरच आयुष्यातील चढ-उतार त्यांनी नीटनेटकेपणे मांडले आहेत. या पुस्तकात सोनाली बेंद्रे ने आपल्या मुलासोबतचे वेगवेगळे अनुभव मांडले असून चांगले पालक होण्यासाठी नेमके काय करायला हवे हे समजते. सोनालीने निर्माता गोल्डी बहलसोबत लग्न केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 1, 2017
दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांसाठी केलेल्या संघर्षामुळे त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती.
November 21, 2021
मोगॅम्बो खूश हुआ'...'त्या' भारदस्त आवाजातील हे तीन शब्द कानांवर पडले की समोरच्याचा थरकाप झालाच म्हणून समजा. त्यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी झाला. 'मि. इंडिया' या सिनेमात मा.अमरिश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची व्यक्तिरेखा विसरणे केवळ अशक्य. अशा एकापेक्षा एक सरस खलनायकी व्यक्तिरेखा, चरित्र भूमिका साकारणारे मा.अमरीश पुरी हे जुन्या काळातले प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार मा.मदन पुरी यांचे धाकटे भाऊ. अमरीश यांना हिंदी चित्रपटांमध्ये नायक बनायचं होतं म्हणून त्यांनी पंजाब सोडून मुंबई गाठली. मोठ्या भावाने सरळ सांगितलं की मी अजिबात मदत करणार नाही, जे काही या क्षेत्रात करायचं ते स्वतःच्या जोरावर करायचं.
नायक बनण्याच्या अमरीश यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. मग त्यांनी पृथ्वी थिएटर्समधल्या नाटकांमध्ये कामं करायला सुरुवात केली. तिथे मोठ्या दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं. अगदी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी अमरीश यांची नाटकं बघायला आवर्जून येत. मग हळूहळू अमरीश यांनी आपला मोर्चा परत एकदा हिंदी चित्रपटांकडे वळवला. सुरुवातीलाच चांगल्या दिग्दर्शकांचे चित्रपट अमरीश यांना मिळू लागले आणि हळूहळू त्यांनी आपले पाय हिंदी चित्रपटात घट्ट रोवायला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीबद्दल नव्याने लिहायची काहीच आवश्यकता नाही. भारदस्त आवाज, भेदक नजर आणि करारी, देखणे रुप असलेले मा. अमरिश पुरी यांनी हिंदी सिनेमासृष्टीवर अनेक वर्षे राज्य केले. मा.अमरिश पुरी यांना बॉलिवूड सिनेमांमध्ये हीरो बनायचे होते. मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. ते हीरो नाही मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक बनले. अमरिश पुरी यांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक नकारात्मक भूमिका साकारल्या.
पाश्चिमात्य प्रेक्षकांमध्येही अमरिश पुरी लोकप्रिय अभिनेते आहेत. स्टीवन स्पिलबर्ग यांच्याबरोबरील 'इंडियाना जोन्स' या हॉलिवूड सिनेमातील मोला रामची भूमिका आणि 'टेंपल ऑफ डूम' या सिनेमातील भूमिकेसाठी प्रेक्षक त्यांना कधीही विसरु शकत नाही. त्यांची खलनायकाची प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये एवढी परिणामकारक बनली होती की त्यांच्या मुलाचे मित्र जेव्हा घरी येत तेव्हा अमरीश यांच्यासमोर नुसतं जायलाही घाबरत असत. खऱ्या आयुष्यात मात्र अमरीश अतिशय साधे, मन मिळावू, मृदू स्वभावाचे, आपल्या कुटुंबात रमणारे असे होते. आपल्या वडिलांविषयी राजीव पुरी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की ''पापा तारुण्याच्या काळात हीरो होण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांचे थोरले बंधू मदन पुरी सिनेसृष्टीत कार्यरत होते. निर्मात्यांनी त्यांना सांगितले, की त्यांचा चेहरा हीरोसारखा नाहीये. त्यामुळे ते खूप निराश झाले होते. मा.अमरिश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 12, 2018
भास्कर चंदावरकर यांची संगीतातले उत्तम जाणकार, देशी वाण सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार म्हणून ओळख कायम राहणार आहे.‘ घाशिराम कोतवाल ’ हे नाटक, ‘ सामना ’ , ‘ सिंहासन ’ सारखे चित्रपट अजरामर करण्यामध्ये भास्कर चंदावरकर यांच्या संगीताचा अविभाज्य वाटा आहे.
July 29, 2017
१९५०-६० च्या दशकात पुझो यांनी एका प्रकाशनसंस्थेत लेखक/संपादक म्हणूनही काम केले. द डार्क एरिना ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर द फॉच्र्युनेट पिलग्रिम ही दुसरी कादंबरीही गाजली. पण पुझो यांना खऱ्या अर्थाने यश मिळवून दिलं ते त्यांच्या जगप्रसिद्ध द गॉडफादर या कादंबरीने! या कादंबरीच्या १९६९ साली प्रसिद्ध झालेल्या पेपरबॅक आवृत्तीने त्यांना चार लाख दहा हजार डॉलरचे आगाऊ मानधन मिळवून दिले. याच कादंबरीवर आधारित फ्रान्सिस फोर्ड कोप्पोला यांच्या सहकार्याने बनविलेल्या, चित्रपटाला सर्वश्रेष्ठ रुपांतरित पटकथेसाठी असलेला अॅकॅडमी पुरस्कारा ने (१९७२ व १९७४ साली) सन्मानित करण्यात आले. पण त्यावर आधारित द गॉडफादर या चित्रपटानेही घवघवीत यश मिळविले. या चित्रपटाला अॅकॅडमी पुरस्काराच्या ११ विभागात नामांकन मिळाले होते.
July 2, 2021
१९६९ मध्ये "अभिलाषा' या चित्रपटाद्वारे जयश्री टी यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर एकापाठोपाठ एक चित्रपट त्या करीत गेल्या. एक उत्तम अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. काही चित्रपटांतील गाण्यांवर त्यांनी केलेली नृत्येही लोकप्रिय ठरली. शर्मिली या चित्रपटातील रेशमी उजाला है, तसेच मैं सुंदर हूं चित्रपटातील नाच मेरी जान फटाफट, व तराना चित्रपटातील सुलताना सुलताना या गाण्यांवरील नृत्यांनी त्यांना ख्याती मिळवून दिली.
मराठीमध्ये त्यांनी "बायांनो नवरे सांभाळा', "ह्योच नवरा पाहिजे', "आपलेच दात आपलेच ओठ', "गोष्ट धमाल नाम्याची', "मानाचं कुंकू', "तूच माझी राणी' असे काही चित्रपट केले. दादा कोंडके, अमोल पालेकर, अशोक सराफ, यशवंत दत्त, अरुण सरनाईक अशा आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. मराठी, हिंदीबरोबरच भोजपुरी, तमीळ, तेलगू, मल्याळम, बंगाली आदी जवळपास अठरा भाषांतील चित्रपटांत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ५० ते ६० गुजराती चित्रपटांमध्ये जयश्री टी यांनी काम केले आहे. "केशर चंदन', "तेजल गारासनी', "ढोला मारू' असे त्यांचे काही गुजराती चित्रपट गाजलेले आहेत. अठरा भाषांमध्ये जवळपास सातशे चित्रपट जयश्री टी यांनी केले आहेत.
अभिनेता चित्रसेन तळपदे हे त्यांचे वडील व अभिनेत्री मीना टी. ही बहीण.विनायक यांचे चिरंजीव जयप्रकाश कर्नाटकी हे जयश्री टी यांचे पती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 12, 2017
बाबूभाई मिस्त्री हे भारतीय चित्रपटातील स्पेशल एफ़ेक्ट्स जनक होते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपल्या हिंदू संस्कृतीतील ‘पौराणिक’ ग्रंथातील प्रत्येक कथेचा पाया हा चमत्कारावरच रचला गेला आहे. देवांचे अवतार, प्रकटदृश्ये, त्यांची दैवीरूपे हा सर्व भाग काल्पनिक असला तरीही त्याला मूर्तरूप दिलं ते ‘बाबूभाई मिस्त्रीं’नी.
February 15, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti