(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जेष्ठ संगीतकार रोशन

    रोशनलाल नागरथ ऊर्फ "रोशन" यांनी लहानपणीच प्रसिद्ध गायक मनोहर बर्वे यांच्याबरोबर बालगायक म्हणून संपूर्ण भारत दौरा केला. त्यांचा जन्म १४ जुलै १९१७ रोजी गुजरानवाला येथे झाला. पुढे रविशंकर, अली अकबर खाँ, तिमिरबरन भट्टाचार्य यांचे गुरू असलेल्या उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांच्याकडे गायकी शिकण्यासाठी वर्षभर काढले. पण अल्लाउद्दीन खाँ साहेबांची त्यांच्या शिकवण्याव्यतिरिक्त आठ तास रियाझ करण्याची कडक शिस्त न मानवल्याने पळ काढला. त्यानंतर लखनौच्या मॉरिस संगीत महाविद्यालयातून संगीतात एम. ए. केले आणि दिल्ली रेडिओ स्टेशनवर पियानोवादक म्हणून नोकरी सुरू केली. बडोदा रेडिओ स्टेशन वर नोकरी करत असताना प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आणि गीतकार केदार शर्मा यांचे लक्ष रोशनकडे गेले आणि त्यांच्या कंपनीमध्ये रोशन संगीतकार स्नेहल भाटकर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करू लागले.

    १९४९ मध्ये "नेकी और बदी" चित्रपटाच्या वेळी रोशनच्या काही चाली आवडल्याने त्यांनी स्नेहल भाटकरांना तीन चार महिने रजा देऊन त्या चित्रपटाचे काम रोशन यांना दिले. चित्रपट आणि गाणी सपशेल अयशस्वी झाली. रोशन यांच्या १९४९ ते १९६७ अशा आपल्या कारकीर्दीत आपल्या पहिल्या १९४९ ते १९६० काळात अभिजात, शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी दिली. मात्र हे चित्रपट आणि गाणी गाजली नाहीत. या काळात आलेले मल्हार, अनहोनी, नौबहार, रागरंग, आगोश, बराती, रंगीन रातें, मधु, अजी बस शुक्रिया, अश्या चित्रपटातली गाणी ऐकली तर हे प्रकर्षाने लक्षात येते. आणि १९६० ते १९६७ काळात म्हणजेच दुसऱ्या भागावर मुख्यतः मुसलमानी संगीताचे वर्चस्व राहिले आहे. बरसात की रात, ताजमहल, बाबर, नूरजहाँ, बेदाग, वगैरे चित्रपटातली गाणी ऐकली तर हे लक्षात येईल. अर्थात आरती, ममता, भीगी रात असे मुसलमानी संगीत नसलेलेही चित्रपट या काळात आले. नवीन कवींना संधी देणारा संगीतकार अशी रोशन यांची प्रतिमा होती. नुसतेच नवीन नाही तर जुन्या काळातले "हम भोर के दिये है बुझतेही जा रहे है" असे अस्ताला चाललेल्या पिढीचे तनवीर नकवी, डी. एन. मधोक, खुमार बारा बंकवी, नक्षब यांच्यासारखे, त्या काळातले शैलेंद्र, मजरूह, प्रेम धवन, राजेंद्र कृष्ण यांच्यासारखे प्रस्थापित, इंदीवर, आनंद बक्षी, नक्ष ल्यालपुरी यांच्यासारखे संघर्ष करणारे आणि पुढे प्रस्थापित झालेले, सत्येंद्र, कैफ इर्फानी, उद्धवकुमार, वीर मोहंमद पुरी, शिवकुमार, राहिल गोरखपुरी असंख्य होतकरू गीतकार तसेच गीतकार नसूनही हौस म्हणून एखादे गाणे लिहिणारी संगीतकार उषा खन्ना यांच्यासारखे सर्व प्रकारचे गीतकार या काळात रोशनच्या संगीतात दिसतात.

    इंदीवर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते" मी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून स्थिर झालो तो संगीतकार रोशनमुळे. रोशन आम्हाला तुमचे गीत हे रवींद्रनाथांच्या कवितेसारखे झाले पाहिले असे सांगत असे, एका एका गाण्याचे दहा दहा अंतरे लिहून घेऊन त्यातले सर्वोत्तम तीन अंतरे निवडत असे. "त्याच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे कवी आणि कवितांमधील विविधता. जरी संगीतकार रोशनचे नाव घेतल्यावर साहिर लुधियानवी आणि मजरूह सुलतानपुरी या दोनच गीतकारांची नावी प्रामुख्याने समोर येत असली तरी ५३ चित्रपटांसाठी रोशन यांनी ५२ गीतकारांबरोबर काम केले. रोशन हे संगीतकार राजेश रोशन व अभिनेते राकेश रोशन यांचे वडील व अभिनेते ऋतिकचे आजोबा. रोशन यांचे १६ नोव्हेंबर १९६७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    रोशन यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=kh8PqtYUQCc
    https://www.youtube.com/watch?v=EECgvIxsHCs
    https://www.youtube.com/watch?v=q1RgtdfWTV0

      November 27, 2017


  • पूर्व पाकिस्तानचे राजकारणी शेख मुजिबुर रहमान

    मुजिबुर रहमान हे बांगलादेशचे प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होते. मुजिबुर रहमान यांना बंगबंधू नावानेही संबोधत. भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून बांगलादेशाच्या मुक्तीसाठी लढाई केली. ती अगदी थोडक्यात, झटपट, कमीतकमी मनुष्यहानी करून केली त्याला इतिहासात तोड नाही.

      March 17, 2022


  • शाम जयवंत देशमुख

    शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू सैनिकांपैकी एक असलेले श्री शामराव देशमुख हे मुंबईतील सीकेपी बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक आहेत.

      November 7, 2011


  • अॅड. रमाकांत ओवळेकर

    अॅड. रमाकांत ओवळेकर

    ठाण्यातील नावाजलेल्या वकिलांमध्ये ज्येष्ठ अॅड. रमाकांत ओवळेकर हे सर्वांना परिचित होते. त्यांना आदराने अनेक जण ‘अण्णा’ म्हणत. कोर्टात युक्तिवादासाठी उभे राहिले की प्रतिवादी वकिलांना आता ‘अण्णा’ काय गुगली टाकतील याबद्दल उत्सुकता असे

      April 18, 2011


  • दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीत संयोजक केरसी लॉर्ड

    दम मारो दम', 'चुरा लिया है तुमने जो दिल को' अशा सदाबहार गीतांमध्ये महत्त्वाचे योगदान देणारे, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीत संयोजक केरसी लॉर्ड यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३५ रोजी झाला.
    केरसी लॉर्ड. हिंदी चित्रपटसंगीताला सदाबहार सुरांचे चैतन्य बहाल करून अजरामर करणारे एक मनस्वी व्यक्तिमत्त्व. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तालवादक मा. कॉवस लॉर्ड हे मा.केरसी लॉर्ड यांचे वडील. "कावस लॉर्ड" हे ‘कावस काका’ म्हणून ओळखले जात. अगदी पहिला बोलपट ‘आलम आरा’पासून त्यांनी चित्रपटसृष्टीत कामं केली. ते तालवाद्यातले" पायोनिअर "मानले जात. घरात आई बानूबाईही पियानिस्ट, आईचं माहेर म्हणजेही संगीतघर. अशा संस्कारात बालपण गेलेल्या केरसीजींनी १४ व्या वर्षी संगीत हेच आपलं सर्वकाही असं ठरवलेलं होतं. ''उत्कृष्ट जॅझ ड्रमर'' म्हणून नाव मिळवल्यावर इंडियन -हिदमला अनुसरून केरसींनी आपली अशी प्लेइंग स्टाईल निर्माण केली, जी त्यांची एक वेगळा ‘ड्रमर’ म्हणून खास ओळख ठरली.शास्त्रीय तबल्याचं शिक्षण केरसींनी इनामअली खांसाहेबांकडे घेतलं होतं. मॅलेट इन्स्ट्रमेंट्समध्ये (वूलन किंवा रबरी गट्टनी वाजवलं जाणारं) व्हायब्रोफोन, झायलोफोन सोबत १९६०/६१च्या काळात ग्लॉकेन्स्पायल (ग्लॉक्स) हे वाद्य केरसींनी इंट्रोडय़ुस केलं."मिस रोडा खोडियाजींकडे" पियानो शिकायला सुरुवात केली होती. "पी. मधुकर "यांच्याकडे हार्मोनियमचं शास्त्रीय शिक्षण घेतलं होतं. त्या पाठोपाठ ज्याच्याविषयी आंतरिक ओढ होती, ते पियानो अॅशकॉर्डियन वाद्य केरसींनी ‘गळय़ाशी’ घेतलं नि सातत्य व अनेक प्रयासांनंतर "निष्णात अॅ कॉर्डिनिस्ट" म्हणून स्वत:चं नाव केलं. सचिनदांच्या संगीतात ‘काला पानी’ सिनेमातल्या ‘अच्छाजी मैं हारी’ तसंच सलीलदांच्या ‘माया’मधल्या ‘तस्वीर तेरी दिल में’,आज सनम मधुर चांदनी में हम इ. गाण्यांतून केरसींचं अॅ कॉर्डियन वाजलंय. मेलडी व -हिदम दोन्हींवर प्रभुत्व असल्यामुळे दोन्ही सेन्सच्या समन्वयातून अॅरकॉर्डियनवर बीट्सच्या अंगाने बेलोच्या (भात्याच्या) टेक्निकने एक्स्प्रेशन्स देण्याचा अनोखा प्रयोग केला. पंचमही एक प्रयोगशील संगीतकार असल्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं व ते अॅपकॉर्डियनचं जॅझ स्टाईलचं जीवंत उदाहरण आहे. ‘आराधना’तलं ‘रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना.’ आणखी एक बर्मनदांच्याच ‘शर्मिली’मधल्या ‘मेघा छाए आधी रात बैरन बन गयी निंदिया’ गाण्यातलं अॅरकॉर्डियन. नौशाद साहेबांबरोबर केरसी लॉर्डनी शेवटपर्यंत काम केलं. त्यात ‘द स्वार्ड ऑफ टिपू सुलतान’ ही मालिकाही केली होती. सुमारे १९६७ मध्ये त्यांच्याकडे राजेंद्रकुमार व वैजयंतीमाला हिरो-हिरोईन असलेला मद्रासचा एक सिनेमा आला होता ‘साथी’! निर्मात्याला नौशादचं संगीत वेगळय़ा रंगाचं हवं होतं. केरसींकडे ‘साथी’ची गाणी अॅारेंजमेंटला आली. त्यांनी पठडीतले काही रूल्स ब्रेक करून ती अॅअरेंज केली. नौशादच्या संगीतात ‘अंदाज’च्या काळानंतर पुन्हा मुकेश आला. हा चेंज तमाम फिल्म संगीत शौकिनांनी स्वीकारला होता. एवढेच नव्हे; तर मद्रासचा ‘इलिया राजा’सारखा मातब्बर संगीतकार ‘साथी’ची अॅीरेंजमेंट एकून केरसींचा फॅन झाला होता.

    १९६ ७नंतर कम्पोजर, वादक, अॅूरेंजर म्हणून सगळय़ा बडय़ा संगीतकारांबरोबर काम करता करता आणखी एक लक्षणीय काम केरसी लॉर्ड यांनी केलं आहे ते मदन मोहनसाठी. चेतन आनंदाच्या ‘हंसते जख्म.’ मधलं लताबाईंचं ‘आज सोचा तो आंसू भर आए’ हे गाणं म्हणजे दीदी आणि त्यांच्या मदनभैयाच्या स्वर्गीय स्वरांचा अमृतयोग. केरसींनी त्या गीताला अनुरूप असा आपल्या अॅारेंजमेंटचा हळुवार मोर पीस स्पर्श दिला. त्याच सिनेमाचं दुसरं सुपर हिट गाणं ‘तुम जो मिल गए हो, तो यह लगता है, के जहां मिल गया.’ हे कारमध्ये पिक्चराईझ केलंय. कारची गती आणि अँगल्स, वळणावरचे जर्कस् हे सगळं ग्रुप व्हायोलिन्स पार्ट्समधून, विंड इंस्ट्रूमेंट्स आणि -हिदमचे चेंज ओव्‍‌र्हर्स वापरून केरसींनी सजवलंय नि गाण्याइतकीच अॅधरेंजमेंटचीही उंची राखली होती. ‘देखो कसम से, कसम से’ (तुमसा नहीं देखा), वाद्य- कॅस्टेनट्स. ‘तेरी दुनिया में जिने से’ (हाऊस नं. ४४) वाद्य- अॅहकॉर्डियन, झनक झनक तोरी बाजे पायलिया (मेरे हुजूर), वाद्य- घुंगरू ‘अंधे जहां के अंधे रास्ते’ (पतिता) वाद्य- बोंगो ‘जाने क्या तूने कही’(‘प्यासा)’, वाद्य- वूडब्लॉक्स. ‘दिल लेना खेल है दिलदार का’ (‘जमाने को दिखाना है’) वाद्य- इलेक्ट्रिक ऑर्गन. यात मा. केरसी लॉर्ड यांनी केलेली वाद्यांची मनोहर कलाकुसर दिसते.तसेच जयदेव यांच्या ''हम दोनो ''चित्रपटातील त्यांचे ''लायटर म्युझिक'' केवळ अविस्मरणीय होते.

    संगीत क्षेत्रात डी.डी. म्हणून संगीतरसिकांना माहीत असलेले डावजेकर हे भारतात तयार झालेल्या पहिल्या सिंथेसायझरचेही जनक आहे , हे मात्र अनेकांना ठाऊक नसेल. केरसी यांनी पहिला सिंथेसायझर भारतात आणला होता. त्याची गोष्ट सांगताना मा केरसी लॉर्ड दिवंगत संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या बद्दल सांगत. ही आहे १९७१ची गोष्ट. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वाद्ये भारतीय बाजारात सहज मिळत नव्हती. अमेरिकन मूग सिंथेसायझर बाजारात येण्यापूर्वी खोलीभर पसरतील एवढे अवाढव्य आकाराचे सिंथेसायझर असायचे. अशावेळी आपणच सिंथेसायझर बनवला तर? असा विचार केरसी यांच्या मनात आलाला. या विचार येताक्षणीच त्यांच्या समोर पहिले नाव आले ते दत्ता डावजेकरांचे. कारण संगीत आणि इलेक्ट्रॉनिक वाद्य या दोन्ही विषयांचे सखोल ज्ञान व त्यावर हुकमत असणारे डीडी एकटेच होते. त्यावेळी डीडी गिरगावात तर केरसी लॉर्ड गँट रोडला राहत. मग केरसींनी डीडींना गाठले. काय काय इलेक्ट्रॉनिक सामग्री लागेल, याची दोघांनी यादीच केली. डीडींनी ऑपेरा हाऊसच्या माकेर्टमधून सारी सामग्री आणली. डीडी कामाला लागले आणि सहाव्याच दिवशी भारतातल्या पहिल्या देशी सिंथेसायझरचा जन्म झाला. ही आगळी जन्मकथा सांगून केरसी म्हणाले की डीडींनी बनविलेला सिंथेसायझर घेऊन आम्ही ' पंचमदां ' कडे गेलो. तो सिंथेसायझर पाहून आरडी खूषच झाले. तो डीडींनी बनवला आहे , म्हटल्यावर तर त्यांनी आदराने मस्तक झुकवले. तेव्हा हे अफलातून वाद्य बनवण्यासाठी डीडींनी केवळ पाचशे रुपये खर्च केला. डीडींचा स्पर्श झालेल्या या वाद्याचा वापर नंतर त्यांनी निदान तीनशे गीतांच्या संगीतात तरी केला. डीडींनी तयार केलेला हा ३६ वर्षांपूवीर्चा सिंथेसायझर आजही केरसी लॉर्ड यांच्या संग्रहात मोलाच्या जागी आहे. आता तर इलेक्ट्रॉनिक वाद्यांची प्रचंड मांदियाळी तयार झाली आहे. त्यांचे आकार , त्यांची कार्यक्षमता आणि सर्वच प्रकारच्या संगीतात अशा वाद्यांचा होणारा वापर हे सारे आमूलाग्र बदलून गेले आहे. तरी एका महान संगीतकाराने तयार केलेले हे पहिलेवहिले वाद्य म्हणजे चित्रपटसंगीताच्या इतिहासातले पिंपळपान आहे. ते पिंपळपान केरसी लॉर्ड आजही जीवापाड जपून आहेत. डावजेकरांनी तयार केलेला हा अस्सल भारतीय सिंथेसायझर मा.केरसी लॉर्ड यांनी मोठ्या प्रेमाने जतन केला आहे. आर.डी बर्मन हे वेस्टर्न संगीताकडे आकर्षित केले हे खरे असले तरी वेस्टर्न संगीताशी आर.डी ची खरी ओळख करून दिली ती केरसी लॉर्ड यांनी. सुट्यात पंचम केरसी लॉर्डकडे जॅझ्झ, लॅटिन अमेरिकन, युरोपिअन आणि मिडल इस्टच्या रेकॉर्ड्स ऐकत असत. केरसी लॉर्ड व त्यांचे बंधू बुर्जोर लॉर्ड यांना ‘ओ. पी. नय्यर पुरस्कार’ मिळाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळजवळ ६० टक्के गाण्यात कावस, केरसी व बजी या लॉर्ड फॅमिलीचं योगदान आहे. एकट्या केरसी लॉर्ड यांचीच पंधरा हजार गाणी आहेत. आपल्या परम मित्राचं पंचमचं निधन झाल्यावर केरसीनी २००० साली सिनेव्यवसायातून निवृत्ती पत्करली. केरसी लॉर्ड यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित केले गेले होते. मा.केरसी लॉर्ड यांचे १६ ऑक्टोबर २०१६ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 14, 2017


  • गोल्डी उर्फ विजय आनंद

    विजय आनंद हे देव आनंद आणि चेतन आनंद यांचे लहान भाऊ. त्यांचा जन्म २२ जानेवारी १९३४ रोजी झाला.वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी देव आनंदच्या टॅक्सी ड्रायव्हरसाठी पटकथा लिहून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार्यार मा.विजय आनंद यांनी दिग्दिर्शित केलेला पहिला चित्रपट हा नौ दो ग्यारह. देव आनंद आणि कल्पना कार्तिकच्या भूमिका असलेल्या या रहस्यपटानंतर त्यांनी काला बाझार या चित्रपटात नोकरी मिळवण्यात आणि मिळालेली टिकवण्यात अपयशी ठरलेल्या, आणि मग वाममार्गाला लागलेल्या तरूणाची कथा सादर केली. यात त्यांनी एक छोटीशी पाहुण्या कलाकाराची भूमिकाही केली होती. या चित्रपटात एका गाण्याच्या आधी एक अप्रतीम दृश्य आहे. नायक देव आनंद वाममार्गाने भरपूर पैसे कमावतो आणि एके दिवशी आई-बहिणीसाठी कपडे आणि दागिने घेउन घरी येतो. जिना चढताना त्याला ठेच लागते, सगळे दागिने वगैरे वस्तू इतस्ततः पडतात आणि त्याच वेळी सुरु झालेल्या भजनातल्या 'ना मै धन चाहूं, ना रतन चाहूं' या शब्दांनी सदसदविवेकबुद्धी जागृत असलेला नायक एकदम चपापतो. मा.विजय आनंद यांना सस्पेन्स सिनेमांचा बादशाह समजले जायचे. त्यांचे 'तिसरी मंझिल', 'काला पानी', 'ज्वेल थीफ' हे रहस्यमय सिनेमे आज इतक्या वर्षांनंतरही वारंवार पाहिले जातात, त्यातलं रहस्य माहिती असूनही. मा.विजय आनंद यांनी रहस्यपटांमध्ये प्राविण्य मिळवलं होतं. १९६६ साली आलेला तीसरी मंझील हा १९५७ सालच्या नौ दो ग्यारह नंतरचा मा.विजय आनंद यांचा पुढील रहस्यपट. निर्माता नासीर हुसेनशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर देव आनंद या चित्रपटातून बाहेर पडले होते. पण दिग्दर्शकाच्या भूमिकेत मा.विजय आनंद मात्र तसेच राहिले. देव आनंद यांच्या जागी नायक म्हणून आलेल्या मा.शम्मी कपूर यांची मनस्थिती गीता बाली हे जग सोडून गेल्या मुळे ठीक नव्हती. शम्मी कपूर यांची मानसिक अवस्था लक्षात घेत त्याला सांभाळून घेऊन अशा नाजूक परिस्थितीतही मा.विजय आनंद यांनी हा चित्रपट ठरवलेल्या वेळेत पूर्ण केला. चित्रपटातील पात्रांपेक्षा कॅमेरा हाच प्रमुख निवेदक असला पाहिजे याची जाणीव असलेल्या गोल्डीने सिनेमातील पात्रांच्या बरोबर फिरत असलेल्या कॅमेर्यािच्या वेगवान हालचाली, तुकड्यातुकड्यात चित्रीत केलेली दृश्ये एकत्र गुंफणे अशा करामतींचा प्रभावी वापर करून हिंदी चित्रपटांच्या इतिहासातल्या उत्तम थरारपटांपैकी एकाला जन्म दिला. विजय आनंद यांनी पुढच्याच वर्षी ज्वेल थीफ हा आणखी एक जबरदस्त रहस्यपट दिला. उत्कृष्ठ पटकथा-संवाद लेखक असलेल्या गोल्डी यांना या सिनेमात दिग्दर्शनाबरोबर याही गोष्टी करायला मिळाल्याने असलेल्या स्वाभाविक स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करत अनेक अनेक नव्या गोष्टी समोर आणल्या. 'कहीं और चल' हा चित्रपट दिग्दर्शित केल्यावर फायनॅन्सरकडून फसवणूक वाट्याला आलेल्या गोल्डीने नायक म्हणून कारकीर्द उताराला लागलेल्या देव आनंदला 'जॉनी मेरा नाम' मार्गे यश मिळवून दिलं. 'तेरे मेरे सपने' बरोबरच त्यांनी अनेक चित्रपटात नायकाची भूमिकाही केली, पण त्यातले 'मै तुलसी तेरे आंगन की' आणि कोरा कागज' हे दोनच उल्लेखनीय म्हणावे लागतील. कालांतराने त्यांनी 'तहकीकात' या दूरदर्शन मालिकेत डिटेक्टिव्ह सॅमच्या रूपात आपल्यातल्या अभिनयाची पुन्हा एकदा चुणूक दाखवली. रेडिओ मिर्ची पुरस्कृत पुरानी जीन्स फिल्म महोत्सवात मा.शम्मी कपूर यांना एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला होता. " तीसरी मंझील हा चित्रपट पुन्हा बनवायचा झाला तर नायकाच्या भूमिकेसाठी सद्ध्याच्या अभिनेत्यांपैकी तुम्हाला कोण योग्य वाटतो?" "मला नाही वाटत हा चित्रपट पुन्हा कुणी बनवू शकेल" प्रचंड आत्मविश्वासाने क्षणाचाही विलंब न लावता मा.शम्मी कपूर ताडकन् उत्तर दिले होते. चित्रपट्सृष्टीतील अनेक कलावंतांप्रमाणे विजय आनंदही काही काळ सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष होते. पण त्याने केलेल्या अनेक सूचना आणि नाविन्यपूर्ण कल्पना धुडकावल्या गेल्यावर गोल्डीने बाणेदारपणा दाखवत पदाचा राजीनामा दिला. विजय आनंद यांचे २३ फेब्रुवारी २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    संदर्भ. इंटरनेट

      February 23, 2017


  • अण्णा मार्तंड जोशी

    अण्णा मार्तंड जोशी हे एक महाराष्ट्रीय नाटककार होते. ते अण्णासाहेब किर्लोस्करांचें समकालीन होते. अण्णासाहेबांच्या देखरेखीखालीं बेळगावमध्ये स्थापन झालेल्या “भरतशास्त्रोत्तेजक” मंडळींत जोशी होते.

      June 20, 2014


  • अशोक रोकडे

    त्सुनामी असो, भूकंप असो वा महाराष्ट्रातला दुष्काळ.. कोल्हापूरच्या अशोक रोकडे यांनी अशावेळी धावून जाणारी “व्हाइट आर्मी” उभी केली आहे. आपत्तीची वर्दी मिळताच दीड हजार जवानांचे बळ मदतीला धावते आणि शिस्तीत काम सुरु करते.

    व्हाइट आर्मी चे कमांडर

      July 24, 2015


  • मराठमोळा मोहक चेहरा – स्पृहा जोशी

    स्पृहा जितकी परखड आहे तितकीच मदत करणारीसुद्धा! एका व्यावसायिक शूटच्या वेळी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन स्पृहाला चक्क दहा वेगवेगळे पेहराव करावे लागले होते, ते तिने कोणतीही तक्रार न करता केले. हिंदुस्थानी सणांवर हे शूट बेतलं होतं. वेगवेगळे हिंदुस्थानी सण आणि एकच चेहरा अशी थीम होती. कल्पना सुरेख असली तरीही ती तडीस नेणं हे तसं कठीण होतं. आपल्या चेहऱयावर एकाच दिवशी दहा प्रयोग होणार होते. त्यातून आपली वेगळी प्रतिमा जगासमोर येणार होती. या सर्वांचा अभ्यास करूनच स्पृहाने या शूटला होकार दिला असावा.

      December 19, 2018


  • अभिनेते व दिग्दर्शक दिलीप कुळकर्णी

    एक शिस्तबद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अशी ओळख असणार्या् दिलीप कुलकर्णी यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधुन चरित्रात्मक भुमिका साकारल्या होत्या. मा.सुरेश खरे यांच्या “एका घरात होती” या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. “बखर एका राजाची”, “अफलातून”, “घरोघरी” ही नाटके व “चौकट राजा”, “आक्रित”, “रात्र आरंभ” या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. ‘ओली’ या नाटकात त्यांनी शरीरभाषेचा केलेला वापर हा अभिनेता म्हणून एक आदर्श वस्तुपाठ होता. संवेदनशील मनाच्या मा.दिलीप कुलकर्णी यांना प्रत्येक गोष्ट चांगलीच झाली पाहिजे,याचा सतत ध्यास असे.”आपलं बुवा असं आहे!” ही त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात अप्रतिम भूमिका ठरली होती.

    दिलीप कुलकर्णी यांचे २२ डिसेंबर २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 22, 2018