(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्योत्स्ना संभाजी कदम

    ज्योत्स्ना संभाजी कदम

    चित्रकार ज्योत्स्ना संभाजी कदम या ठाण्याच्या चित्रकला क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव. व्यावसायिक चित्रकार व लेखिका म्हणून प्रसिद्ध असणार्‍या ज्योत्स्ना कदम या गेली ३० वर्षे सातत्याने पेंटींग करत आहेत. एक दर्जेदार, सर्जनशील, मनस्वी चित्रकार म्हणून त्यांची कलाक्षेत्रात ख्याती आहे.

      May 16, 2014


  • डॉ. डी. वाय. पाटील (डॉ.ज्ञानदेव यशवंतराव पाटील)

    १९५७ ते १९६२ या काळात डॉ. डी. वाय. पाटील हे काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. १९६७ आणि १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते.

      June 9, 2022


  • ज्येष्ठ अभिनेते डॉ.याकूब सईद

    याकूब सईद पुण्यात शाळेत शिकत असताना दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. त्यांच्या शाळेसमोर असलेल्या ‘शालिमार फिल्म स्टुडिओ’मध्ये शाळा शिकून ते काम करत असत. संध्याकाळी काम करायचे आठ आणे किंवा रुपया मिळत असे. हे झाल्यावर रात्री ‘शिरीन’, ‘अपोलो’,’ऑडियन’, ‘कॅपिटल’ या थिएटर्सवर चित्रपटांच्या ते गाण्यांची पुस्तकं विकत असत.‘बरसात एक आणा, बरसात एक आणा’असं करता करता ते एम.ए. झाले.

      July 14, 2021


  • वर्षा माडगूळकर

    दुर्गा नागरी सहकारी पतसंस्था, जिजामाता सहकारी बॅंक आणि जिजामाता महिला सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून वर्षा माडगूळकर यांनी महिलांना स्वावलंबी बनविले. सहकारातले आगळे उदाहरण उभे केले. सामान्य कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी घेतेलेली बरारी चकित करणारी आहे...

    कर्तबगार पंखांची भरारी

      July 14, 2017


  • मराठीतील लेखिका, समीक्षिका सरोजिनी वैद्य

    मराठीतील लेखिका, समीक्षिका सरोजिनी वैद्य यांचा जन्म १५ जून १९३३ रोजी अकलूज येथे झाला.

    ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा या साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुखपदी, तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी त्यांनी काम केले. जेष्ठ कवी शंकर वैद्य हे त्यांचे पती होत. डॉ. सरोजिनी वैद्य यांनी या लंडनच्या आजीबाईंची गोष्ट ‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ या पुस्तकातून सांगितली होती. सरोजिनी वैद्य यांचे ३ ऑगस्ट २००७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      August 3, 2021


  • अरूण दाते

    अरूण दाते

    लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गाणारे अरूण दाते हे मराठीतील बहुधा एकमेव गायक असावेत. यशवंत देव, मंगेश पाडगावकर आणि अरूण दाते या त्रिकुटाने मराठी भावगीताला पुन्हा एकवार झळाळी प्राप्त करून दिली. श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांनाही अरूण दाते यांच्या आवाजावर स्वत:च्या रचना चढवण्याचा मोह आवरता आला नाही.

      June 7, 2017


  • महाराष्ट्राची ‘मर्लिन मन्रो’ अभिनेत्री पद्मा चव्हाण

    अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.

      July 7, 2021


  • मराठीतला पहिला रॉक स्टार नंदू भेंडे

    ज्या काळात मराठी घरांमध्ये पॉप आणि रॉक संगीत हे शब्द अनभिज्ञतेच्या किंवा विनाकारण हेटाळणीच्या सुरात उच्चारले जात, त्या काळात नंदू भेंडे यांनी छेडलेली मराठी रॉकची तार आज अन्य कितीतरी जणांमुळे झंकारत राहिली आहे.

      November 27, 2021


  • सर्जन डॉ.नित्यानंद उर्फ नितु मांडके

    त्यांची काम करण्याची उरक व अचुकता पाहून त्यांना ‘सुपरफास्ट’ हे नाव पडले. डॉक्टर नितु मांडके हे अतिशय कार्यक्षम सेवातत्पर प्रसंगावधानी व सर्वच रूग्णांबद्दल समान आत्मीयता व तळमळ असलेले जणु देवदुतच होते. अनेक जणांना त्यांनी मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढले आहे.

      January 31, 2022


  • निर्माते, दिग्दर्शक कमलाकर तोरणे

    भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरू. ‘महारथी कर्ण’ या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. ‘हिरवा चुडा’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.

      November 12, 2021