(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले

    अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले

    अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या मेघराज राजे भोसले यांनी १९९७ मध्ये ‘पांडव एंटरप्रायजेस’ या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करून ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘डंक्यावर डंका’, ‘संत वामनभाऊ’ या चार मराठी चित्रपटांची निर्मिती केली.

      November 25, 2021


  • सुरेश काशिनाथ टावरे

    सुरेश काशिनाथ टावरे हे भिवंडी नगरीचे प्रथम महापौर व याच लोकसभा मतदारसंघामधून २००९ मध्ये खासदार म्हणुन निवडून आले होते. सामान्य जनतेपासून ते उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये राहणार्‍या मतदारांना भेडसावणार्‍या समस्या मुळापासून सोडवणे हा त्यांच्या व्यक्तित्वामधील असाधारण असा गुण आहे. २०१० ते २०११ या आर्थिक वर्षामध्ये आपल्या स्थानिक विकास निधीतून सुचविलेल्या ३२ विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून सुमारे १ कोटी ९९ लाख रूपये खर्चाची कामे मतदारसंघात पूर्ण केली आहेत. यामध्ये शाळांचे वर्ग बांधणे, स्मशान भूमी रोड विंधन विहीर व गटारे बांधणी, पाऊल वाट, रस्ते दुरूस्ती, आणि काँक्रिटीकरण चा समावेश आहे. आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य चिकीत्सा शिबीर मोठ्या प्रमाणावर आयोजित केले होते. यामध्ये काही रूग्णांना मोफत औषधे व काही रूग्णांना चष्मे वाटण्यात आले होते.

    त्यांच्या मतदारसंघातील ज्या ज्या गरीब लोकांना मोठया व महागडया आजारांनी ग्रासले होते, त्यांना या शिबीरानंतर निराश न होण्याचा संदेश दिला गेला, इतकेच नाही तर त्यांच्या उपचारांसाठी पंतप्रधान सहायता निधीमधून ४४ रूपयांना ३२ लाख रूपयांचे अर्थसाहाय्य त्यांनी मिळवून दिले. त्याचप्रमाणे ग्रामीण पाणी टंचाई दूर करण्यासाठी बोअरवेल अधिक खोल करण्याचे अनोखे अभियान त्यांनी सुरू केले ज्यासाठी लागणारा संपुर्ण खर्च हा शेतकर्‍यांच्या खिशातून एक पायलीही न काढता, खासदार निधीमधून भागवण्यात आला.

    भारत निर्माण अभियानाअंतर्गत शासनांच्या विविध योजनांची माहिती तमाम शेतकरी वर्गापर्यंत पोहोचविण्याचे त्यांनी केलेले प्रयत्न व त्यांना आलेले यश आजही वाखाणले जाते.

      January 12, 2015


  • लेखिका मालतीबाई बेडेकर

    मालतीबाई बेडेकर उर्फ विभावरी शिरुरकर यांची ‘ हिंदोळ्यावर ‘ ह्या कादंबरीतून वैचारिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या स्त्रीमुक्तीचा महत्वाचा टप्पा गाठला होता आणि आजही आपण किती पुरोगामी आहोत यांचा विचार करणे आवश्यक आहे. पुढे त्यांनी विभावरी शिरुरकर या नावाने विरलेले स्वप्न , बळी , बाई , दोघांचे विश्व आणि इतर कथा , शबरी ही पुस्तके लिहिली आहेत . तर रानफुले , हिंदू-व्यवहार धर्मशास्त्र , स्त्रियांच्या हक्कांची सुधारणा ही पुस्तके त्यांनी ‘ बाळूताई खरे ‘ या नावाने लिहिली.

      July 13, 2021


  • मधुकर धोंड

      December 15, 2010


  • चरित्रलेखक, इतिहाससंशोधक यशवंत दिनकर फडके

    चरित्रलेखक, इतिहाससंशोधक यशवंत दिनकर फडके यांचा जन्म ३ जानेवारी १९३१ रोजी सोलापूर येथे झाला. कै यशवंत दिनकर फडके यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडके यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. व एम्‌.ए. चे शिक्षण केले. १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून पीएच्‌.डी. पदवी मिळवली. य. दि. फडके हे साहित्यिक, साक्षेपी संशोधक आणि राजकीय इतिहासकार म्हणून प्रसिद्ध होते. २००० साली झालेल्या बेळगाव साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी मांडलेले संशोधन तसंच राजकीय विचारांवर त्यांनी केलेले भाष्य खूप महत्त्वाचे आहे. त्यांची सत्तरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसंच र. धों. कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, सेनापती बापट अशा दिग्गजांची खरी ओळख त्यांनी चरित्र लिहून करून दिली. डॉ. आंबेडकरांवर अरुण शौरी यांनी लिहिलेल्या टीकेला तसेच खणखणीत उत्तर त्यांनी दिले होते. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा इतिहास लिहून त्यांनी मराठी माणसाला समृद्ध केले आहे. यशवंत दिनकर फडके यांचे ११ जानेवारी २००८ रोजी निधन झाले.

    त्यांची साहित्यसंपदा
    द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया- य दि फडके आणि आर. श्रीनिवासन, सेनापती बापट यांचे चरित्र
    सोशल रिफॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातील समाजसुधारक, पॉलिटिक्स अॅन्ड लॅगवेज, वी के चिपळुणकर
    वूमन इन महाराष्ट्र, आगरकर शोध बाळगोपाळांचा, रा. धो. कर्वे, केशवराव जेधे, नथुरामायण, आंबेडकरांचे मारेकरी अरुण शौरी, शाहू छत्रपती आणि लोकमान्य, केतकर लेख संग्रह (संपादन - य. दि. फडके)

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 3, 2019


  • शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार

    नगरपरिषदेच्या वीस वर्षाच्या सत्ता कार्यकाळात अडीच-तीन वर्षे सोडता पूर्ण कार्यकाळ अब्दुल सत्तार दांपत्यांनी नगराध्यक्ष म्हणून भूषविले आहे व आजही सत्ता त्यांच्याकडे असून नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी नफिसाबेगम अब्दुल सत्तार असून नगरपरिषदेच्या एकूण एकोणतीस सदस्यांपैकी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस नगरसेवक सभागृहात आहेत.

      January 1, 2022


  • डॉ. प्रमोद पाटील (संशोधक)

    उर्जेसाठी सक्षम पर्याय निर्माण करायचे तर तशी पूरक साधनेही हवीत. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांत याविषयी महत्वपूर्ण संशोधन सुरु आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांचे काम हे असे उर्जेला बळ देणारे आहे. थीन फिल्म, नॅनोटेक्नॉलॉजी व मटेरिअल सायन्स यावर त्यांचा हातखंडा असून सोपे व कमी खर्चातील नॅनो मटेरिअल बनविण्यात ते सध्या व्यग्र आहेत...


    महाराष्ट्र टाईम्समध्ये श्री प्रमोद पाटील यांच्या कार्याबद्दल आलेला अक्षय उर्जेचा आधार हा लेख खाली दिला आहे.

    patil-dr-pramod-modified

      July 24, 2015


  • हेमंत करकरे

    हेमंत करकरे

    हेमंत करकरे हे मुंबईचे दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी होते.

      December 15, 2010


  • कपिल मोरेश्वर पाटील

    २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी-बदलापूर या मतदार संघातून कपिल मोरेश्वर पाटील खासदार म्हणुन विजयी झाले आहेत;

    सुरुवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष असलेल्या कपिल पाटील यांनी १८ मार्च २०१४ या दिवशी ऐन लोकसभा प्रचाराच्यावेळी गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदीं यांच्या विकासकामांच्या दुरदृष्टीचा आपल्या मतदारसंघाला फायदा व्हावा या उद्देशाने त्यांनी भा.ज.प प्रवेश केल्याचे जाहिर केले होते.

    जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेचे अध्यक्ष, कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक, अशीही त्यांची ओळख आहे. ग्रामविकास या संकल्पनेला मध्यभागी ठेवून आरोग्य, शिक्षण प्रसार, जलसंधारण या ग्रामविकासासाठी अत्यावश्यक असणार्‍या घटकांना प्राधान्य देणार्‍या कित्येक दुरदर्शी व सर्वस्पर्शी योजनांचे ते जनक आहेत. आजपर्यंत कपिल पाटील यांनी अनेक जिल्हा अधिकारी व नगरसेवकांना बरोबर घेवून स्वयंपुर्ण प्रभावी योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी केली.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      January 14, 2015


  • अफाट कर्तृत्वाच्या वडिलांची तेवढीच अफाट कन्या.. !

    “अफाट कर्तृत्वाच्या वडिलांची ही तेवढीच अफाट कन्या.. ! संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आचार्य अत्रे, ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ व ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै..! ‘हायकू’ हा जपानी काव्यप्रकार मराठीत रुढ करणा-या ज्येष्ठ कवयित्री म्हणजे शिरीष पै. असंख्य कविता, कथा शिरीषताईनी लिहिल्या. मराठी दैनिकाच्या पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांना बहुमान मिळाला. शिरीष पै यांच्या लेखनाची सुरुवात त्यांच्या पप्पांमुळे म्हणजे आचार्य अत्रे यांच्यामुळे झाली. त्यांच्याच लेखणीचा वारसा त्यांनी घेतला. त्यांच्या सहवासातच त्यांना लिखाणाची गोडी लागली. कथा, कविता, नाटक आणि प्रासंगिक लेखन असे चौफेर लिखाण त्यांनी केले.

      September 4, 2017