(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आधुनिक भास्कराचार्य विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे

    गहन विषयांच्या व्यासंगात गढलेल्या केरुनानांना शास्त्रीय संगीत, संगीत नाटके व स्वत: पियानो वाजवण्याची आवड होती. शिवाय किर्लोस्कर नाटक मंडळीत त्यांचा राबता होता. फार काय नाटकांच्या तालमींना हजर राहून ते मोरोबा वाघोलीकर आणि बाळकोबा नाटेकर या गायक नटांना गाण्याच्या अतिरेकानं नाटकाचा रसभंग होतो, असा सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ हे नाटक त्यांना अर्पण केलेलं आहे.

      March 19, 2022


  • बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गार्बो’ – अभिनेत्री सुचित्रा सेन

    सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ रोजी झाला. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक जीवनात मिसळणे टाळणाऱ्या सुचित्रा सेन या बंगालच्या ‘ग्रेटा गाब्रो’ म्हणून प्रसिद्ध होत्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत. ‘शेष कोठाई’ या चित्रपटापासून त्यांनी १९५२ मध्ये सुरुवात केली व नंतर बिमल रॉय यांच्या १९५५ मधील ‘देवदास’ या चित्रपटात त्यांना दिलीपकुमारच्या देवदासबरोबर साकारलेल्या पारोच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी पडद्यावर जुळली. त्यांचे हारनो सूर (१९५७), अग्निपरीक्षा (१९५४), सप्तपदी (१९६१), ग्रिहदाह (१९६७), इंद्राणी (१९५८), सागरिका (१९५६), बिपाशा (१९६२), कमल लता (१९६९), अलो आमार अलो (१९७२), हर मन हर (१९७२) व प्रियो बंधाबी (१९७५) हे चित्रपट संस्मरणीय ठरले. त्यांनी ५२ बंगाली तर ७ हिंदी चित्रपट केले. भारतभूषणबरोबरचा चंपाकली, देव आनंदबरोबर सरहद, बंबई का बाबू यासह ममता हा एक चित्रपटही त्यांनी केला होता. १९७४मध्ये त्यांनी ‘देवदास’नंतर गुलजार यांच्या ‘आँधी’ चित्रपटाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. संजीव कुमार यांच्यासमवेत त्यांनी जी भूमिका केली होती, त्यात त्यांची भूमिका ही इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती त्यामुळे तेव्हा वाद निर्माण झाला होता. १९७८ मध्ये त्यांनी सौमित्र चटर्जी यांच्याबरोबर ‘प्रणोय पाश’ हा चित्रपट केला. तो पडला. त्यानंतर सुचित्रा सेन कधीच कुणाला दिसल्या नाहीत व २००५ मध्ये त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला होता. यशस्वी कारकिर्दीनंतर अचानक त्या एकाकी आयुष्य जगू लागल्या होत्या. आपल्या घरातच त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यांना भारत सरकार कडून पद्‌मश्री आणि बंगाल सरकार कडून बंगबिभूषण हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मा.सुचित्रा सेन यांचे निधन १७ जानेवारी २०१४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 17, 2017


  • शिवसेनेचे खासदार विनायक राऊत

    शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक असणाऱ्या विनायक राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेतून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. १९८५ मध्ये महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९९२ पर्यंत विनायक राऊत पालिकेत होते. १९९९ साली विनायक राऊत विलेपार्ले मतदारसंघातून काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा पराभव करुन विधानसभेवर निवडून गेले.

      March 15, 2022


  • रणबीर कपूर

    रणबीर कपूर हा हिंदी चित्रपटसुष्ट्रीतील नव्या पिढीचा कलाकार म्हणून ओळखला जातो. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९८२ रोजी झाला. रणबीरचे शिक्षण माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठले आणि न्यू यॉर्कच्या 'लि स्ट्रॅसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूट'मध्ये अभिनयाचे धडे गिरवले. २००७ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'साँवरीया' चित्रपटात सर्वप्रथम भूमिका केली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची तारीफही झाली आणि त्याला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

    २००९ मध्ये 'वेक अप सिड' आणि 'अजब प्रेम की गजब कहाणी' या चित्रपटांसाठी त्याने समीक्षकांचा सर्वोत्तम अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. रणबीरने आतापर्यंत पाचवेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळवले आहे. सावरियाँ, बचना ऐ हसीनो, रॉकेट सिंग, वेक अप सिड, रॉकस्टार, राजनीती, बर्फी असे अनेक हिट चित्रपट त्याने दिले. केवळ अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंग यांचा वारसदार आणि राज कपूर यांचा नातू म्हणून न वावरता रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आघाडी घेत आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलाय.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 28, 2017


  • आप्पा वढावकर

    नाट्य-सिनेसृष्टीमध्ये वढावकर हे आडनाव नवं नाही. आधी राम वढावकर यांच्या निमित्ताने त्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांचे पुत्र उज्ज्वल तथा आप्पा वढावकर यांनी ही जबाबदारी नेटाने आणि कौशल्याने पुढे नेली.

      April 18, 2011


  • अनंत कान्हेरे

    अनंत कान्हेरे हे मूळचे औरंगाबादचे. त्यांचे शालेय शिक्षण हे बरेचसे औरंगाबाद येथेच झाले, परंतु नंतर ते शिक्षणासाठी नाशिक येथे झाले. जुलमी इंग्रज अधिकारी जॅक्सनच्या हत्येची शिक्षा म्हणून त्यांना फाशी देण्यात आले.

      February 10, 2010


  • सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक नारायण भिकाजी परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर

    केवळ एकट्याच्या हिमतीवर त्यांनी १ जानेवारी १९३२ रोजी ‘सकाळ’ चा पहिला अंक प्रकाशित केला. सुरुवातीची काही वर्षे नानासाहेबांसाठी खडतर गेली. आर्थिक मंदी आणि आर्थिक ओढाताण यांमुळे सर्व व्यवहार काटकसरीने करावे लागत. आर्थिक विवंचनेतून कुठे सुटका होते, तोपर्यंत संपादकीय आणि व्यवस्थापकीय समस्या डोकं वर काढत.

      January 8, 2022


  • प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर

      August 22, 2010


  • भास्कर रामचंद्र तांबे (भा. रा. तांबे)

    मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.

      December 15, 2010


  • किशोर लिंबाणी

    किशोर लिंबाणी अनेक वर्षांपासून ठाणे शहर विभागाचे युवक मंडळ उपाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. सामाजिक कार्यासोबतच धार्मिक कार्यातही ते सहभाग नोंदवत आहेत.

    हरिद्वारच्या कच्छी लालाराम आश्रमात नऊ महिने साधुसंतांच्या सेवेसाठी ते भेट देत असतात. समाजातील गरीबांवर मोफत औषधोपचार करणे हे या आश्रमाचे प्रमुख कार्य असून, या कार्याला पुर्णत्वास नेण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. लहानांपासून वृध्दांपर्यंत तसंच महिलांना सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांचा कटाक्ष आहे.

    क्रिकेट स्पर्धा, शैक्षणिक वह्या वाटप, प्रभागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, वृक्षलागवड त्याचप्रमाणे ठाणे निर्धार अभियानात उत्साही सहभाग, तसंच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने वेटलिफ्टींग चा खेळ सुरू करावा यासाठी पत्रव्यवहार आणि प्रयत्न, जनलोकपाल विधेयकाबाबत जनजागृतीप्रती विद्यार्थ्यांसाठी अर्धा डझन वह्या अशी अनेक कल्याणकारी कामे किशोर लिंबाणी यांच्याकडून करण्यात आली आहेत.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015