जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता अतुल कुलकर्णीचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. आत्तापर्यंत ७ भाषांमधून ६० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या अतुलने अनेक मानसन्मान प्राप्त केले. हा संवेदनशील अभिनेता सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आपल्या लेखांद्वारे आणि मुलाखतींमध्ये रोखठोक मते मांडतांना पाहायला मिळतो. ‘हे राम’, ‘चांदनी बार’, ‘खाकी’, ‘पेज ३’, ‘रंग दे बसंती’, ‘वळू’, ‘नटरंग’, ‘पोपट’, ‘एका प्रेमाची गोष्ट’सारख्या चित्रपटांमधून त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.
September 10, 2017
अदिती सारंगधर यांना त्यांच्या करीयरच्या सुरवातीला कांचन अधिकारी यांनी त्यांच्या "दामिनी" या मालिकेत संधी दिली . तिचा जन्म १६ ऑक्टोबर १९८१ रोजी झाला. "दामिनी" नंतर "वादळवाट" या मालिकेतून त्यांना ओळख व लोकप्रियता मिळाली. स्टार प्रवाह वरील "लक्ष्य" या मालिकेतील सलोनी देशमुख भूमिकेनी त्यांना खुप प्रसिद्धि मिळवून दिली.
राजन ताम्हने दिग्दर्शित "प्रपोजल" हे नाटक त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरत आहे. अदितीला या नाटकासाठी मटा सन्मान अवार्ड, जी गौरव अवार्ड आणि महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा या तिन्ही ठिकाणी सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या नाटकाने सर्वच नाट्य पुरस्कारांमध्ये बाजी मारली.
टिव्ही मालिका व नाटकासोबतच त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 5, 2017
आप्पासाहेब खाडिलकर साहित्यिकही होते.त्यांनी संसारशकट, सदानंद, आजकाल या तत्कालिन समाजस्थितीचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या देखील लिहिलेल्या होत्या.
July 19, 2022
’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ’सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत.
October 25, 2021
ज्येष्ठ संगीत समीक्षिका, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार व ‘उंबरठा’ या चित्रपटाच्या कथालेखिका शांता हरी निसळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९२८ रोजी पुणे येथे झाला.
शांता निसळ या ज्येष्ठ संगीत समीक्षिका, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध होत्या. शांता हरी निसळ या पूर्वाश्रमीच्या शांता व्यंकटेश जोशी. अगदी लहानपणापासून त्यांचा स्वभाव धडपडा, बंडखोर होता. त्यांनी आपल्या विद्यार्थिदशेत त्यांनी ‘चले जाव’ चळवळीतही भाग घेतला होता. बंडखोर स्वभाव आणि देशप्रेमामुळे विद्यार्थीदशेत असताना त्यांनी १९४२च्या लढ्यात सहभाग घेतला होता. उच्च शिक्षणात स्त्रियांचा टक्का अगदी नगण्य असतानाच्या काळात त्यांनी एमए, डीटी केले. एवढेच नव्हे; तर ‘संगीत’ विषयात ‘पीएचडी’ही केली. पुण्याच्या हुजूरपागा प्रशालेत त्या शिक्षिका म्हणून काम करीत असत. त्या विद्यार्थिनीप्रिय शिक्षिका होत्या, कथा, कादंबरी, नाटक आणि संगीत समीक्षा या प्रकारांत त्यांनी लेखन मुशाफिरी केली. बदलत्या सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब ज्या मोजक्या स्त्री-वादी कादंबऱ्यांमध्ये उमटले, त्यामध्ये त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचा समावेश होता.
‘हिचे नाव शांता नाही, तर अशांती ठेवायला हवे होते,’ असे त्यांच्या वडिलांना सांगितले जात असे. याचा उल्लेख निसळ यांनी त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये केला आहे. ‘वडिलांनी सतत दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी उभी राहू शकले,’ अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली आहे.
महिलांचे अस्तित्त्व, महत्त्व आणि सामर्थ्य प्रकट करणारी शैली हे त्यांच्या लेखनशैलीचे गुणविशेष म्हणता येतील. ‘विसंवाद’ ही त्यांची कादंबरी लोकप्रिय ठरली. तुरुंगातील स्त्री-कैद्यांचे जीवन चितारणारी ‘विमुक्त’ किंवा राजकारण आणि हिंदू एकत्र कुटुंब पद्धतीवर भाष्य करणारी ‘आवर्त’ या त्यांच्या कादंबऱ्या विशेषत्वाने गाजल्या. ‘सूरभि’ हा त्यांचा कथासंग्रहही प्रसिद्ध आहे. ‘आहुती आणि एकलव्य’ हा दोन एकांकिकांचा संग्रह प्रसिद्ध आहे. ‘मृत्यू माघारी गेला’ याद्वारे त्यांनी महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंगांवर आधारित प्रसंगनाट्ये लिहिली. ‘सवाई गंधर्व महोत्सवा’चे संगीत समीक्षण त्यांनी अनेक वर्षे अतिशय सातत्याने केले. महिलांच्या विजिगिषु वृत्तीवर त्यांनी कथालेखन केलं.त्यांच्या ‘बेघर’ या कादंबरीवर ‘उंबरठा’ हा प्रसिद्ध सिनेमा बनला आणि गाजला. याच कादंबरीवर वसंत कानेटकर यांनी ‘पंखाला ओढ पावलाची’ हे नाटक लिहिले. शांता निसळ यांचे ‘विसंवाद’ ही कादंबरी, ‘सूरभि’ कथासंग्रह आणि ‘सौभाग्यकांक्षिणी’ हे नाटक अशी त्यांची साहित्य संपदा आहे. शांता हरी निसळ यांचे ७ मे २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 15, 2019
शरद रणदिवे हे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट होते. मुंबई तसेच भारतातील प्रमुख शहरांतील इमारतीची वास्तुरचना करणाऱ्या प्रसिध्द बेंटले अँड किंग, मुंबई या कंपनीचे शरद रणदिवे भागीदार-मालक होते.
October 3, 2023
ठाण्यातील नावाजलेल्या वकिलांमध्ये ज्येष्ठ अॅड. रमाकांत ओवळेकर हे सर्वांना परिचित होते. त्यांना आदराने अनेक जण ‘अण्णा’ म्हणत. कोर्टात युक्तिवादासाठी उभे राहिले की प्रतिवादी वकिलांना आता ‘अण्णा’ काय गुगली टाकतील याबद्दल उत्सुकता असे
April 18, 2011
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कंजुष गोलंदाज अशी बापूंची ओळख होती. कसोटीत सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम बापूंनी १४ जानेवारी १९६४ रोजी इग्लंडविरुद्ध रचला होता. चेन्नईच्या मैदानावर हा सामना झाला होता. बापू डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात त्यांनी ३२ षटके टाकली. त्यातील तब्बल २७ षटके निर्धाव होती. ३२ षटकांत त्यांनी १.६७च्या सरासरीने केवळ ५ धावा दिल्या होत्या. बापूंचा हा विश्वविक्रम अबाधित राहिला.
April 4, 2022
नाट्यसमीक्षक, टीकाकार, भाषाअभ्यासक आणि इतिहासाचे जाणकार होते.
July 27, 2017
प्रभाकर पेंढारकर हे चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या पेंढारकर यांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली.
July 7, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti