(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शिरीष दत्तात्रय लाटकर

    “पवित्र रिश्ता”, “बडे अच्छे लगते है”, सहित सहा हिंदी आणि अठरा मराठी मालिकांचे लेखन करणारे गिरीष लाटकर हे ठाण्यातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूल आणि त्यानंतर बेडेकर महाविद्यालयातून लाटकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असतानाच एकांकिका स्पर्धांतून अभिनेता म्हणून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केले. 

      May 23, 2014


  • संत सेना महाराज

    मध्यप्रदेशातील बांधवगड संस्थानातील ईरची या गावी महाराजांचा जंन्म झाला. सेना महाराजांचे वडील देविदास बांधवगडच्या राजाकडे नाभिकाचे काम करीत असत. आई प्रेमकुंवरबाई सात्विक स्वभावाची गृहिणी होती. वडील देविदासानंतर परंपरेनुसार राजाकडील नाभिकाचे काम सेना महाराजांकडे आले. सेना महाराजांचा लहानपणापासूनच भक्तीमार्गाकडे ओढा होता. त्यांच्या हिंदी मातृभाषेतून ते भक्तीरचना सुध्दा करु लागले. कालांतराने महाराष्ट्रातील त्या काळच्या संतांची माहिती सेना महाराजांना मिळाली. त्या संतांच्या व पंढरपूरच्या विठ्ठल भेटीसाठी ते आतूर झाले. तिर्थयात्रा करित करीत ते इकडे आले संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व इतर त्यांचे समकालीन संत होते. या महान संतांच्या सान्निध्यात येऊन ते महाराष्ट्राच्या पावनभूमीत रममाण झाले.

    त्यांनी मराठी भाषा आत्मसात करुन मराठी भाषेवर इतके प्रभूत्व मिळविले की मराठी भाषेत त्यांनी अनेक उत्कृष्ट अभंगांची निर्मिती केली. भागवंत संप्रदायातील वारकरी भक्तीरसात त्यांनी स्वतःला झोकून दिले.

    एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्रातील भक्तांना जरासुध्दा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते.

    चमत्कारांनी साधुसंतांचे मोठेपण दर्शविणार्‍या लोकांना खोडच जडलेली आहे. ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली, रेडयाच्या तोंडून वेद म्हणवून घेतले. अशा प्रकारच्या अनेक दंतकथा ज्याप्रमाणे अनेक संतांच्या बाबतीत सांगितल्या जातात तशीच दंतकथा सेना महाराजांच्या बाबतीतही सांगितली जाते. राजाची हजामत करण्यासाठी राजाचा माणूस सेना न्हाव्याकडे निरोप सांगावयास जातो. परंतु भगवंताच्या नामस्मरणात दंग असलेल्या सेना न्हाव्याला निरोप ऐकू जात नाही. उशीर झाल्यामुळे राजा क्रोधीत होऊन सेना न्हाव्याला शिक्षा होईल म्हणून स्वतः भगवंतच धोपटी घेऊन राजाची हजामत करुन जातात.

    नामदेव, तुकाराम, सेना न्हावी, गोरा कुंभार, चोखामेळा अशा अनेक संतांनी त्यांच्या अभंगवाणीतून समाज प्रबोधन केले. संसारात राहून सुध्दा ईश्वर भक्ती करुन परमार्थ साधला जाऊ शकतो हे लोकांना सांगितले. कर्मठ उच्चवर्णियांनी निर्माण केलेली उच्चनीच, जातीभेद ही परंपरा मोडीत काढण्यासाठी उपदेश केला. स्वतःही तसे वागले. त्यांनी निर्माण केलेले काव्य, अभंग, यांचाच जनतेवर इतका प्रचंड प्रभाव पडला की इतर काही चमत्कारांनी त्यांचे मोठेपण सिध्द करण्याची काहीच गरज नसावी.

    नंतर महाराष्ट्रातील वास्तव्य संपवून सेना महाराज पुन्हा त्यांच्या जन्मभूमीस तीर्थाटन करीत निघून गेले. त्यांच्या हिंदी भक्तीरचना उत्तरेकडील सर्व हिंदी प्रदेशातून म्हटल्या जातात. महाराजांनी काही रचना पंजाबी भाषेत सुध्दा केल्या आहेत.

      March 12, 2015


  • नाट्यनिर्माते संतोष कोचरेकर

    संतोष, कसेही कर आणि एक गाढव घेऊन ये’… वडिल नाना कोचरेकर (नारायण धर्माजी कोचरेकर) यांनी फर्मान सोडले. संतोष कोचरेकर यांनी आजुबाजूला खूप शोधाशोध केली आणि कसेबसे एका माणसाकडून गाढव भाड्याने मिळवले. नानांनी त्या गाढवाला बाशिंग बांधले, मुंडावळ्या बांधल्या. सोबत वाजंत्री घेतली. माइक संतोष यांच्या हातात होता. ‘आज रात्रौ थिएटरमध्ये बघायला या, गाढवाचं लग्न. आहेराचा दर ३ रुपये, २ रुपये’. मालवणमधील लोक टकामका पाहू लागले. युक्ती सफल झाली आणि संध्याकाळी नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला.

      April 5, 2022


  • ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर

    ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा जन्म १५ डिसेंबर १९३५ रोजी झाला. ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न्‌ साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या उषाताई मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, ह्यांच्या बरोबरीने "उषा मंगेशकर" अशी स्वतंत्र मोहोर उमटविणाऱ्या उषाताईंनी अनेक एकलगीते, द्वंद्वगीत बालगीतं, भक्तीगीतं गायली आहेत आणि ठसकेबाज लावण्याही म्हणल्या आहेत. आरंभीच्या काळात त्यांचा गायनाकडे कल नव्हता.

    मंगेशकर कुटुंबीय मुंबईत आल्यावर उषाताईंनी मणिपुरी नृत्याचे धडे घेतले. पुढील काळात ‘सुरेल कला केंद्र’च्या कार्यक्रमात गाणे म्हणण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात ‘बैजू बावरा’ चित्रपटातील शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांनी गाजवलेले द्वंद्वगीत त्यांनी गायले. त्यातील शमशाद बेगम यांचा गाण्यातील भाग हा मीनाताई मंगेशकर गायच्या व लतादीदींनी गायलेले शब्द हे उषाताई गायच्या.

    उस्ताद बडे गुलाम अली खाँसाहेबांचे पट्टशिष्य पं. तुलसीदास शर्मा यांच्याकडे उषाताईंनी शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. उषाताई मंगेशकर आणि मीना खर्डीकर या दोघींनी संगीत दिलेला, १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला "पुन्हा एकदा" अल्बम, खूप गाजला होता, झिम्मड घाई, रात बहरली, सोन कंगनी, भिर भिर उडते, मायेच्या माहेरा ही गाणी खूप लोकप्रिय झाली. मीना खर्डीकर आणि उषाताई ह्यांचा अजून एक संयुक्त संगीताचा उपक्रम म्हणजे "लोक गणपती" ध्वनिफीत होय. विशेष म्हणजे "बाला मै बैरागन" ही आशाताई भोसले ह्यांच्या स्वरातील गाजलेल्या गाण्यांची ध्वनिफीत, ज्याच संगीत ह्या दोघींनी दिलं होतं.

    मराठी, हिंदीसह गुजराती व नेपाळी भाषेतही गायन केलेल्या उषाताईंनी भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व प्रकारांत आपली सुरेल मोहोर उमटवली. लतादीदी आणि आशा भोसले यांची असंख्य गाणी रसिकांच्या ओठांवर रुळली आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांना "उषाताई" म्हणतात तर आसाममध्ये "उखादिदी" संबोधतात, गुजराथमध्ये "उषाबेन" ह्या सुप्रसिद्ध नावाने त्या लोकप्रिय आहेत.

    उषाताई मंगेशकर यांची मोजकीच गाणी रसिकांना माहीत आहेत. उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत. त्यांनी दुरदर्शनसाठी फुलवंती या संगीत नाट्याची निर्मितीसुद्धा केली होती. "पवनाकाठचा धोंडी" "जैत रे जैत ह्या चित्रपटांची निर्मिती उषाताईंनी केलीय.

    उषा मंगेशकर यांना मेहंदी अॅवॉर्ड, वेस्ट बंगाल क्रिटिक अॅवॉर्ड, सूरसिंगार अॅवॉर्ड, रोटरी अॅवॉर्ड, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उषाताई उत्तम चित्रकारसुद्धा आहेत. अगदी लहानपणापासून त्यांना चित्रकलेत रुची होती. कोल्हापूरला चित्रकार बाबूराव पेंटर शेजारी राहायचे. स्वत: माई मंगेशकर यांची चित्रकला उत्तम होती, त्या उत्तम रांगोळ्या काढायच्या. मुंबईत आल्यावर उषाताईंची चित्रकला अभिनेता-निर्माता राज कपूर यांनी पाहिली. त्यांनी उषाताईंची चित्रे कलादिग्दर्शक एम. आर. आचरेकर यांना दाखविली.

    आचरेकर व उषाताईंची भेट घडविली. आचरेकरांनी त्या चित्रांना दिलखुलास दाद दिली. उषाताईंनी सुर्यकांत मांढरे ह्यांचेकडून पावडर पेंटिंग शिकून घेतले. जलरंग आणि तैलरंग ह्या दोहोंमध्येही उषाताईंनी त्यांची करामत सिद्ध केलीय. पोर्ट्रेट हा तर उषाताईंचा हातचा विषय. त्यांनी चितारलेल्या डोळ्यातील भाव रसिकांना खिळवून ठेवतो. डोळ्यापासून रेखाटनाला प्रारंभ करून अवघं चित्रं भावपूर्ण करण्याचं कसब उषाताईंच्या हातात सामावलं आहे. अनेक पोर्ट्रेट त्यांनी साकारली आहेत. अनेक ध्वनिमुद्रिकांची वेष्टणं उषाताईंच्या कुंचल्यातून साकारलेली आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    उषा मंगेशकर यांची हिंदी मराठी गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=gaihS2h3p88
    https://www.youtube.com/watch?v=pMg_ig8RDnA
    https://www.youtube.com/watch?v=o9YgSspKNoA

      November 2, 2019


  • सुधीर भट

    नाट्यनिर्माता संघाचा अध्यक्ष, नाटकांच्या तारखा आणि तिकीविक्री या विषयावर स्वतःची मते ठामपणे मांडणारा निर्माता म्हणून सुधीर भट यांची विशेष ओळख होती व राहील. त्यांनी गोपाळ अलगेरी यांच्या साथीने सुयोग या नाट्यसंस्थेची १ जानेवारी १९८५ मध्ये स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि एकहजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणार्‍या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली.

      March 14, 2014


  • पांडुरंग महादेव बापट (सेनापती बापट)

    राजकिय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेत असतांना राजदोहात्मक भाषणे केल्याबदल अनेकदा अनेक वर्षे सक्तमजूरीची शिक्षा झाली. संस्थानाची प्रजांच्या हक्कांकरिता चालु असलेल्या आंदोलनात भाग घेऊन संस्थानच्या प्रवेशबंद्या त्यांनी मोडल्या त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी ओदोलन गोवामुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इ. ओदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.

      March 11, 2015


  • सचिन पिळगांवकर

    मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणार नाव म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर.

    सचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

    त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन-निर्मित गीत गाता चल या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकोंसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या.

    त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले.

    मराठीसृष्टीवरील सचिन पिळगांवकर यांच्यावर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

    ## Sachin Pilgaonkar

      August 17, 2017


  • महानतम गायिका ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ

    नूरजहाँ यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ यांचे खरे नाव 'अल्लाह वसई होते. नूरजहाँ यांचा जन्म पेशावर येथील संगीतकार मदद अली यांच्या परिवारात झाला. संगीतकार परिवारात जन्म झाल्याने नूरजहाँ यांना लहानपणा पासून संगीताची आवड निर्माण झाली. नूरजहाँ यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गाणे शिकायला सुरवात केली होती. नूरजहाँ यांचा परिवार १९३० मध्ये कलकत्ता येथे आला. तेथे नूरजहाँ यांना नृत्य व गाणे शिकायला मिळाले. नूरजहाँ यांच्या गाण्यावर प्रभावित होऊन संगीतकार गुलाम हैदर यांनी पंजाबी चित्रपट ‘शीला’ उर्फ ‘पिंड दी कुड़ी’ मध्ये बाल कलाकाराची भूमिका दिली. हा चित्रपट पंजाब मध्ये गाजला. त्या काळी पंजाब म्हणजे लाहोर पण होते. १९३० च्या दशकात लाहोर मध्ये अनेक स्टूडियो स्थापन झाले. गायकाची वाढती मागणी लक्षात घेऊन नूरजहाँ यांचा परिवार १९३७ मध्ये परत लाहोरला आला. तेथे डलसुख एल पंचोली यांनी बेबी नूरजहाँ यांचे गाणे बघून ‘गुल-ए-बकवाली’ या चित्रपटात भूमिका दिली. या नंतर त्यांचा यमला जट (1940), ‘चौधरी’ चित्रपट प्रदर्शित झाला. यातील गाणी ‘कचियां वे कलियाँ ना तोड़’ व ‘बस बस वे ढोलना की तेरे नाल बोलना’ ही खूप लोकप्रिय झाली. १९४२ मध्ये नूरजहाँ यांनी आपल्या पुढील बेबी हा शब्द काढला. त्याच वर्षी ‘खानदान’ चित्रपटातून त्यांनी लोकांचे ध्यान वेधून घेतले. याच चित्रपटाचे निर्देशक शौकत हुसैन रिजवी यांच्या बरोबर लग्न केले. १९४३ मध्ये नूरजहाँ मुंबईला आल्या. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांच्या ‘लाल हवेली’, ‘जीनत’, ‘बड़ी माँ’, गाँव की गोरी और मिर्जा साहिबाँ, अनमोल घडी या चित्रपटासाठी नूरजहाँ यांची आठवण काढतात. अनमोल घड़ी चे संगीत नौशाद यांनी दिले होते त्यातील ‘आवाज दे कहाँ है’, ‘जवाँ है मोहब्बत’ और ‘मेरे बचपन के साथी’ ही गाणी आजही लोक आवडीने एैकतात. नूरजहाँ फाळणी नंतर मुंबई लाहोरला आल्या. त्यांचे पती रिजवी यांनी शाहनूर स्टूडियो चालू केला. शाहनूर प्रोडक्शन नी ‘चन्न वे’ ची निर्मिती केली ज्याचे निर्देशन नूरजहाँ यांनी केले होते. त्यातील ‘तेरे मुखड़े पे काला तिल वे’ हे गाणे लोकप्रिय झाले. नूरजहाँ यांची शेवटचा चित्रपट ‘बाजी’ होता त्यांनी पाकिस्तातात १४ चित्रपट बनवले त्यातील १० उर्दू होते. काही कारणाने त्यांना अभिनय सोडवा लागला पण त्यांनी गाणे चालू ठेवले. पाकिस्तानात पार्श्व गायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘जान-ए-बहार’ होता. यातील ‘कैसा नसीब लाई’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या फिल्मी करियर में उर्दू, पंजाबी व सिंधी भाषात अनेक गाणी गायली. त्यांना पाकिस्तान मधील सर्वोच्च सम्मान ‘तमगा-ए-इम्तियाज’ मिळाला होता. मा.नूरजहाँ यांचे २३ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 3, 2017


  • क्रिकेट महर्षी दिनकर बळवंत देवधर

    १९३४-३५ मध्ये पहिल्याप्रथम राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी रणजी स्पर्धा झाली. यात महाराष्ट्र पहिल्याच सामन्यात मुंबईविरुद्ध पहिल्या डावातील पिछाडीमुळे गमावला. महाराष्ट्राचे कर्णधार देवधर यांनी ५७ तर कोल्हापूरच्या विजय हजारेंनी ६५ धावा काढल्या होत्या.

      January 14, 2022


  • गोविंद विनायक करंदीकर (विंदा करंदीकर)

    गोविंद विनायक करंदीकर (विंदा करंदीकर)

    विंदा करंदीकर’ हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते.

      December 15, 2010