(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर

    २००० साली प्रदर्शित झालेल्या रिफ्यूजी या सिनेमातून करिना कपूरने आपल्या सिने करिअरची सुरुवात केली. करिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅमिली असलेल्या कपूर परिवाराशी संबंधित आहे. कपूर परिवाराचे भारतीय सिनेमाशी ८५ वर्षापासूनचे जुने नाते आहे.

      September 21, 2017


  • इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद स्वामी

    ते गीतेवर सविस्तर प्रवचने करत. प्रभुपाद स्वामींनी वयाच्या ३३व्या वर्षी दीक्षा घेतली व गौंडिय वैष्णव शिकवणुकीसाठी सारे आयुष्य वाहून घेतले.

      September 1, 2021


  • भारूडरत्न निरंजन भाकरे

    मुंबईतील एका कार्यक्रमात साडेआठ किलोच्या या पायघोळा सह २० किलो वजनाचा जडसांभार अंगावर घेऊन त्यांनी सलग अडीच तास आपली कला सादर केली होती. गणेश वंदना, वासुदेव, नंदीबैल, कुडबुडय़ा जोशी, भविष्यकार आणि त्यांचे प्रख्यात भारुड या सर्व पात्रांना रसिकांनी भरभरून दाद दिली. या ७५ मीटर इंच घेर असलेल्या या पायघोळाच्या गिरकीची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती.

      April 23, 2022


  • अशोक शेवडे

    अशोक शेवडे यांचा साहित्य, शिक्षण, राजकारण अशा विविध क्षेत्रात अफाट जनसंपर्क होता या सर्वांपेक्षा सुद्धा प्रत्येकाशी मैत्रीचे संबंध जोडणारे, माणुसकीच्या नात्याने वागणारे संयमी, सुहास्यवदन, संवेदनाशील सौजन्याने ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्व होते.

      June 21, 2022


  • निर्मल मेहेंदळे

    प्रदूषण होते म्हणून कारखानेच कसे बंद करणार? उलट कारखान्यांमधील टाकाऊ पदार्थ, पाणीव्यवस्थापन याबाबत शास्त्रीय कसोट्या वापरुन प्रदूषण रोखणे, हा त्यावरचा उपाय. हरयाणात स्थिरावलेले प्रदूषण नियंत्रक इंजिनीअर निर्मल मेहेंदळे हे गेली तीन दशके उद्योगांमध्ये पर्यावरणाचा शास्त्रीय मंत्र रुजवत आहेत.

    निर्मल मेहेंदळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला लक्ष्य निसर्गस्नेहाचे हा लेख पुढील पानावर वाचा.

    निर्मल मेहेंदळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला लक्ष्य निसर्गस्नेहाचे हा लेख वाचा.

    mehendale-nirmal-modified

      September 7, 2015


  • शिवकर बापूजी तळपदे

    (जन्म - 1864 ) ( मृत्यू 1917 )

    शिवकर बापूजी तळपदे या मराठी शास्त्रज्ञाचा जन्म 1864 साली झाला. त्यावेळी भारत पारतंत्र्यात होता आणि आधुनिक शिक्षणाचा प्रसारही फारसा झालेला नव्हता. आपले शालेय शिक्षण झाल्यावर ते मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत अध्यापक म्हणून नोकरी करू लागले. त्यांच्या संस्कृत विद्या आणि वेद वाड्गमय यांचा मोठाच व्यासंग होता. प्राचीन काळी झालेल्या शास्त्रीय प्रगतीची पुसट ओळख त्यांना या संस्कृत वाडमयातुन झाली आणि तिकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. त्यातील यंत्रे आणि तंत्रे यांचा अधिक अभ्यास करून त्यावर सखोल चिंतन ते करू लागले. यातुनच त्यांचे त्याविषयीचे संशोधन सुरू झाले. नोकरी करता करताच ते हे संशोधनकार्य फावल्या वेळात करीत असत.

    अशा प्रकारे आपले संशोधनास स्वतंत्रपणे आणि मिळेल त्या तुटपुंज्या सामग्रीवर मोठया चिकाटीने ते करीत होते आणि एक दिवस त्यांनी विमान बनविले वेदातील मंत्राच्या आधाराने त्यानी संशोधन करुन हे विमान बनविले होते. त्या विमानाचे नाव त्यांनी मरुत्सखा असे ठेवले होते पारा आणि सूर्याचे किरण यांच्या प्रक्रियेतून जी शक्ती निर्माण होईल त्या शक्तीवर त्यांचे हे विमान चालत असे 1895 साली यांनी या विमानाचे उड्डाण मुंबईच्या चौपाटीवर यशस्वीपणे करून दाखविले होते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, लालजी नारायण, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या थोर व्यक्तीनी तेथे उपस्थित राहून हे विमानोड्डाण प्रत्यक्षपणे पाहिले आणि त्यांचे कौतूक केले.

    परंतू परतंत्र असलेल्या भारतातील या संशोधकाकडे परकिय राज्यकर्ते आपूलकिने लक्ष देणे अन त्याला पूढे सहाय्य करणे कसे शक्य होते म्हणून त्यांचा तो शोध तेवढयावरच राहिला आणि पुढे 1903 साली राईट बंधूंनी अमेरिकेत विमान तयार करुन पहिले विमान उड्डाण करण्याचा मान मिळविला. ते 1917 साली कैलासवासी झाले.

      March 11, 2015


  • प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर

    हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२० रोजी झाला. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले. मा.भालबा केळकर यांचे ६ नोव्हेंबर १९८७ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 6, 2017


  • ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अरुण निगवेकर

    नॅकचे जनक अशी ओळख असलेले डॉ.निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी २०००-२००५ या कालावधीत सांभाळली. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पंधरावे कुलगुरू म्हणून त्यांनी १९९८ ते २००० काम पाहिले.

      March 14, 2022


  • ज्येष्ठ लेखक बापू वाटवे

    मुरलीधर रामचंद्र ऊर्फ बापू वाटवे यांना प्रभात चित्रनगरीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. बापू वाटवेनी प्रभातची प्रसन्न सकाळ, नेत्रदीपक माध्यान्ह, हुरहूर लावणारी संध्याकाळ आणि मन विषण्ण करणारा सूर्यास्त हे सारे अनुभवले होते.

      March 4, 2025


  • वसंतराव गोवारीकर (डॉ.)

    भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाची पाया रचणार्‍या डॉ.वसंत गोवारीकर यांचा जन्म पुण्यात १९३३ साली झाला! अवकाश , हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात मह्त्त्वपूर्ण असे संशोधन डॉ.वसंत गोवारीकर यांनी केले आहे.

      December 15, 2010