(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी संगीतकार प्रभाकर पंडित

    प्रभाकर पंडित यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. त्यांचा जन्म ३० सप्टेंबर १९३३ रोजी झाला. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले. संगीतात कारकिर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी ३० वर्षे "मधुवंती व्हायोलिन विद्यालया"चे संचालन केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे ते काम करत होते. मुंबई विद्यापीठाच्या सुगम संगीत विषयाचे ते अभ्यागत व्याख्याते, तसेच परीक्षकही होते.

    संगीत क्षेत्रात सुमारे ४५ वर्षे कार्यरत असलेल्या पंडितांनी ध्वनिफीती, चित्रपट, नाटक, संगीतिका, संगीत नाटक यांसाठी संगीत दिले. संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या ध्वनिफितींमुळे प्रभाकर पंडित नावाजले गेले. याखेरीज दहा चित्रपट, वीस नाटके, संगीतिका, संगीत नाटके यांकरताही त्यांनी संगीत दिले. तसेच जाहिरातींच्या जिंगल्सचीही निर्मिती त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या "देवाचिये द्वारी'या अजित कडकडे यांच्या आवाजातील ध्वनिफितीने अत्यंत दुर्मिळ अशा "डबल प्लॅटिनम डिस्क'चा बहुमान मिळवला होता. मंगेशकरांसह सुरेश वाडकर, सुमन कल्याणपूर, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम ते स्वप्नील बांदोडकर पर्यंत सुमारे ७८ विविध गायकांचे आवाज त्यांनी आपल्या ध्वनिफितींच्या माध्यमातून लोकांसमोर आणले.

    भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, अभंग, आरत्या, संतरचना, बालगीते असे अनेक गीतप्रकार त्यांनी संगीतबद्ध केले. रंग ओलेत्या फुलांचे, मन हा मोगरा, अभंग प्रभात, वृंदावनी वेणु, छंद हा विठ्ठलाचा, भक्तिप्रकाश, झुकझुक गाडी, देव दयानिधी अशा अनेक ध्वनिफितींची उदाहरणे सांगता येतील. "सुगम संगीताचे सौंदर्य' या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले होते. प्रभाकर पंडित यांचे निधन २८ डिसेंबर २००६ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 28, 2017


  • काशिनाथ त्र्यंबक तेलंग

    प्राच्यविद्यासंशोधक आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांनी मराठी भाषा व मराठी वाङ्‌मय यांच्या समृद्धीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी महाराष्ट्र भाषासंवर्धक मंडळी स्थापन केली. तिचा उद्देश ऐतिहासिक, चरित्रात्मक, बोधपर व उपयुक्त विषयांवर ग्रंथनिर्मिती करावी असा होता.

      June 4, 2022


  • एन. दत्ता

    एन. दत्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९२७ रोजी झाला. वसंत देसाईंचा सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य संगीतकारांनी इंग्रजी आद्याक्षरांचा आसरा घेत मराठीपण लपविण्याचा प्रयत्न केला. के. दत्ता (कोरगावकर) सी. रामचंद्र (चितळकर) दत्ताराम(वाडकर), सुधीर (फडके) यांसारख्या मराठमोळ्या संगीतकारांनी आपली आडनावे खुबीने लपवीत या क्षेत्रात मुसंडी मारली. हिंदी सिनेमात एन. दत्ता हे नाव प्रथितयश संगीतकारांच्या श्रेणीत आदराने घेतलं जावं अशी नेत्रदीपक सांगीतिक कामगिरी त्यांच्या नावावर जमा आहे. एकापेक्षा एक सरस व यादगार गाणी एन. दत्तांनी या चित्रपटात दिली आहेत. एन. दत्ता यांचे खरे नाव दत्ता नाईक.

    एन. दत्तांचं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते. मा.एन. दत्ता हे गोवेकर अगदी लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत सातत्याने कानावर पडत असल्याने जात्याच संगीतात रस असणारे दत्ता नादावून गेले नसल्यासच नवल. शालान्त परीक्षेनंतर त्यांनी थेट मुंबई गाठली व देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. त्या वेळी गुलाम हैदर बॉम्बे टॉकीज व व फिल्मस्तानच्या चित्रपटांचे संगीत करीत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात होत असलेल्या देशभक्तिपर मेळ्यातून एन. दत्तांना आगळ्यावेगळ्या ढंगातील गाणी गाताना सचिनदेव बर्मन यांनी ऐकले होते व आपल्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्याची ‘ऑफर’ही दिली होती. फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानात निघून गेले व सचिनदेव फिल्मस्तानचे संगीतकार बनले. त्यानंतर एन. दत्ता त्यांचे साहाय्यक बनले. सचिनदांच्या ‘अफसर’, ‘एक नजर’, ‘नौजवान’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘मुनीमजी’ ते थेट ‘देवदास’पर्यंत त्यांनी सचिनदांकडे साहाय्यक संगीतकाराची धुरा समर्थपणे सांभाळली. या काळातल्या एस.डी. बर्मन यांच्या कित्येक चालींवर एन. दत्तांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो.

    एस.डी. बर्मन यांच्या ‘बुजदिल’ मधील लताबाईंचं शास्त्रीय सुरावटीतील ‘झन झन झन पायल बाजे’ हे लोकप्रिय गाणं एन. दत्ता यांचं असल्याची चर्चा त्या काळी सर्वत्र होत होती. पुण्यातील एका समारंभात पु.ल. देशपांडेंनी एन. दत्ता यांचे नाव न घेता या गाण्याचे श्रेय एका मराठी माणसाचे असल्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. लता मंगेशकरांबरोबर महेंद्र कपूरने गायलेलं ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’ हे शायरी ढंगातलं युगुलगीत व ‘धडकने लगी दिल के तारों की दुनिया’ हे महेंद्र कपूर व आशाभोसलेच्या स्वरातलं चिरतरुण प्रेमगीत एन. दत्तांनी अप्रतिम सुरावटीत बांधलं आहे. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ हे अर्थपूर्ण गाणं रफीच्या, तर ‘कासे कहूं मन की बात’ हे गाणं सुधा मल्होत्राच्या अजरामर गाण्यांपैकी एक समजलं जातं. ‘झुकती घटा गाती हवा सपने जगाए.’ या कर्णमधुर गाण्याच्या मुखडय़ाची चाल गजानन वाटवेंच्या ‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ या गाण्यावर बेतलेली आहे, हे एका मुलाखतीत एन. दत्तांनी सांगितले होते. बी.आर. चोप्रांचा ‘साधना’ हा चित्रपट एन. दत्तांच्या कारकिर्दीच्या दृष्टीने ‘टर्निग पॉइंट’ होता. या चित्रपटात त्यांनी मुजरा, कव्वाली, भक्तिगीत, प्रेमगीत व सामाजिक आशयाची गाणी देऊन आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं होतं.

    लता मंगेशकर यांच्या स्वरात ‘कहोजी तुम क्या खरीदोगे’ हा साहिरच्या अभिजात काव्याने नटलेला मुजरा एन. दत्तांच्या लाजवाब प्रतिभेचा उत्तुंग आविष्कारच म्हणावा लागेल. मोहम्मद रफी आणि बलवीरने गायलेल्या ‘आज क्यों हमसे परदा है’ या कव्वालीला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रफीने आशा भोसलेबरोबर गायलेलं ‘संभल ऐ दिल तडपने और तडपाने से क्या होगा’ या अवीट गोडीच्या गाण्याची खुमारी औरच होती. ‘औरत ने जनम दिया मर्दों को’ हे ठाय लयीतलं अजरामर गाणं एन. दत्तांच्या मुकुटात मानाचं शिरपेच खोवून गेलं. ‘साधना’मुळे एन. दत्तांचं नाव प्रथितयश संगीतकारांच्या बरोबरीने घेतलं जाऊ लागलं. १९५९ साली आलेल्या ‘ब्लॅक कॅट’ चित्रपटात ‘सितारे राह तकते है चले आओ’, ‘नशे में तुम नशेमे हम’, ‘कौन मुझे रोके कौन मुझे टोके’ यांसारखी चांगली गाणी एन. दत्ता यांनी दिलेली असली तरी हा चित्रपट आठवतो तो लता मंगेशकरांनी गायलेल्या ‘मैं तुम्हीसे पुछती हूं’ या सदाबहार गाण्यामुळेच! त्यांनी तेरा मराठी चित्रपटांना संगीत दिले होते. १९८० साली प्रदर्शित झालेला ‘चेहरे पे चेहरा’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. महाराष्ट्र शासनाने नागरी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. मा.एन.दत्ता राहत असलेल्या अंधेरी भागातील त्यांच्या निवासस्थानाजवळच्या रस्त्याला मुंबई महापालिकेने ‘एन. दत्ता पथ’ असे नाव देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. एन. दत्ता यांचे ३० डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर
    संदर्भ :- इंटरनेट

    मा.एन. दत्ता यांनी संगीत दिलेली काही चित्रपटगीते.

    हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
    निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
    धुंदीत गाऊ मस्तीत राहू
    माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते, संसार मांडते
    निळे गगन, निळी धरा
    तेरे प्यार का आसरा चाहता हूं
    कासे कहूं मन की बात

      December 30, 2016


  • ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर

    ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांनी अनेक वर्षे अभिनयविश्वात काम करूनही त्यांना छोट्या छोट्या भूमिकाच मिळत गेल्या. मात्र त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जीव ओतून साकारली. प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच त्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

      April 24, 2021


  • अरुण बाळकृष्ण कोलटकर

    अरुण बाळकृष्ण कोलटकर

    अरुण कोलटकर हे महाराष्ट्रातील बहुभाषिक कवी होते. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी व इंग्लिश भाषेत कविता लिहिल्या आहेत.

      December 15, 2010


  • नटसम्राट ! ऐसा चित्रपट होणे नाही

    नटसम्राट हा चित्रपट गेल्यावर्षी १ जानेवारीला नाना पाटेकरांच्या वाढदिवशी प्रदर्शीत झाला होता.
    नटसम्राट ! ऐसा चित्रपट होणे नाही.

    यशाच्या अत्तुच्य शिखरावर पोहोचल्यानंतर, वृद्धापकाळात तेच यश एक शाप ठरावे अशी गाथा असलेल्या कलाकाराची भूमिका वठावणे हे एक शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड आहे. नाना पाटेकरांनी साकारलेले गणपतराव वयाच्या साठीत कलेच्या ४० वर्ष सेवेतून निवृत्त होतात. एक असा नट ज्याने हॅम्लेट, सिजर, ओथेल्लो आणि अशी बरीच मात्तबर पात्रे साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. नाना पाटेकर कलाकार म्हणून महान आहेच. पण आज महेश वामन मांजरेकर यांच्यातला दिग्दर्शक जिंकला असे वाटते. एखादी महान कथा हाताळणे म्हणजे शिवधनुष्य! त्यातूनच नाना पाटेकर यांचा सारखा कलाकार ! लहानपणी डॉ.लागूं चे नाटक पहिले होते. तत्कालीन कलाकार हे फक्त कलेला वाहून घेणारे होते. त्यांना व्यवहारज्ञान नव्हतेच. मग ते काल्पनिक गणपतराव बेलवलकर असोत, किंवा बालगंधर्व , दादासाहेब फाळके या सर्व लोकांनी जी कला लोकांसमोर सादर केली याची तोड नाही.असो ! एक सर्वोत्कृष्ठ चित्रपट सहकुटुंब पाहून वर्षाची सुरुवात छान झाली.

    खूप खूप आपल्या रडवतो हा चित्रपट !
    अगदी नाना च्या सर्वश्रेष्ठ संवादफेकीपासुन ते विक्रम गोखले सोबतच्या अभिनयाच्या लाजवाब जुगलबंदीपर्यंत सगळचं कसं काळजात खोलवर रुतणारं... वैभवकाळ पुरेपुर भोगुन समाधानानं रंगमंचावरुन निवृत्त झालेला नटसम्राट खर्याा आयुष्यात मात्र नशीबाच्या पायाखाली तुडवल्या जाताना बघवतं नाही... अन जे दिसतं ते अश्रु भरल्या डोळ्यांनी! विक्रमजी गोखले आणि नाना पाटेकर कित्येक फ्रेम मधे अक्षरशः रडवतात.. त्यांचं दुःख काळजाला भिडतं. विक्रमजींच्या घरातला प्रसंग केवळ अभिनयाची शाळाच म्हणुन पहावादिग्गज कलाकारांनी पूर्वी सजवलेला नटसम्राट नाना पाटेकर वेगळ्याच उंचीवर नेतात, नट, बाप, आजोबा, प्रेमळ पती आणि शेवटी बेघर वृद्ध सगळी रुपं नाना पाटेकर यांनी लीलया रंगवली आहेत. केवळ असाच्या असा नाटकातून उचलून आणलेला चित्रपट नाही. नाटकाच्या तीन भिंतींच्या मर्यादा येथे नाहीत इतपतच हा विचार मर्यादीत नाही. केवळ दृश्यात्मक बदल असेदेखील नाही. एक चित्रपट म्हणून हे कथानक नव्याने मांडायची ही संधी आहे हे लेखक, पटकथालेखक आणि दिग्दर्शकाला व्यवस्थित कळले आहे. आणि या सर्वाचे भान कलाकारांना आहे. थोडक्यात सगळं जुळून आलंय असेच म्हणावे लागेल. विस्तारीत कथेतील संवाद आणि मूळ कथेतील प्रसिद्ध संवाद यांचा मेळ व्यवस्थित घातला आहे.
    "कट्यार" मधे एक पुढील आशयाचं वाक्य आहे "कलाकाराला दाद केवळ टाळ्यांनीच मिळते असं नव्हे तर निःशब्द शांतता अन पाणावलेले डोळे ही त्याहून उच्च दाद होय"

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 1, 2018


  • विनायक लक्ष्मण भावे

    प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक अशी ख्याती असलेल्या विनायक भावे यांचा जन्म ६ नोव्हेंबर १८७१ साली कोंकणातील पळस्पे या गावी झाला होता. त्यांचे बालपण व शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या जनार्दन बाळाजी मोडक या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. विनायक भावे यांनी विल्सन विद्यापीठातून बी. एस्सी ची पदवी संपादन केली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच विनायक लक्ष्मण भावे यांनी ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली.

    विनायक भावे यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले सारे आयुष्य महाराष्ट्र कवी नावाच्या मासिकासाठी अर्पण केले. या मासिकाने सलग चार वर्षे रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजविताना अनेक ग्रामीण व होतकरू कविंच्या व लेखकांच्या, उजेडात न आलेल्या कवितांना व इतर कलाकृतींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. या मासिकाने अनेक मराठी काव्ये, बखरी, व इंग्रजी अमदानीच्या पुर्वी होऊन गेलेल्या कवींच्या कवीतांना पुन्हा उजाळा देऊन या सांस्कृतिक ठेव्याचे संवर्धन करण्याची धडक मोहिम राबवली होती. हे एकीकडे सुरु असताना, दुसरीकडे त्यांचे वाचून झालेल्या ग्रंथसंपदेचे विवेचनात्मक व रसभरित विश्लेषण करणेही चालूच होते. त्यांनी इतिहास संशोधनाची नवी व प्रगल्भ दालने इतरांसमोर उघडली होती.

    साहित्य व इतिहासाव्यतिरीक्त निसर्गातील प्राणी, पक्षी, किटक यांवर अतिशय उपयुक्त टिपणवजा माहिती त्यांनी संग्रहित करून ठेवलेली आहे. विनायक भावे यांनी आजवर अनेक जुने अप्रकाशित लेखक व कवींच्या, काव्य-लेखनसंपत्तीचे आभ्यासपुर्ण मंथन केले. आध्यात्मिक व वृत्तालंकारादी व्याकरणाच्या जंजाळात फसलेल्या कवितांपेक्षा, त्यांनी मुक्तेश्वरांच्या व शाहिरांच्या कवितांचे, रसग्रहण करण्यात अधिक धन्यता मानली. कारण या कवितांमध्ये भक्तीरसापेक्षा, त्या कवितेच्या आशयाला व भावनेला अधिक आपलेसे केले गेले होते. “महाराष्ट्र सारस्वत“ ही तर त्यांच्या काव्यप्रेमाने गाठलेली उत्कटतेची परिसीमा मानली जाते. ह्या कधीही विसरता न येणार्‍या दर्जेदार साहित्य विवेचकी वृत्तीने रसिकांसमोर उलगडुन दाखविले होते.

    महाराष्ट्र सारस्वतची पहिली आवृत्ती ग्रंथमाला नावाच्या मासिकामध्ये प्रसिध्द झाली होती. त्यानंतर ह्या ग्रंथाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती म्हणजे केवळ ९८ पृष्ठांचा एक निबंध होता. भावे यांनी पुढे त्यात सतत भर घातली. त्यामुळे हा ग्रंथ तिसर्‍या आवृत्तीपर्यंत ७४४ पृष्ठांपर्यंत वाढला. “ग्रंथमाला“त पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्‌मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे “चक्रवर्ती नेपोलियन“ हा देखील त्यांच्यामधील प्रतिभावंत व बोलक्या लेखकाचा, एक विनम्र प्रयत्न होता. भावे हे कोणताही ऐतिहासिक प्रसंग आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या बळावर जिवंत करण्यात तज्ञ होते, याचा प्रत्यय हा ग्रंथ वाचताना वारंवार येतो.

    १२ सप्टेंबर १९२६ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.

      January 12, 2015


  • हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे

    शिवाजी महाराजांचे लढावू आयुष्य, सुरुवातीचा लढा, पहिली स्वारी आणि तोरणागडावरील विजय, शहाजीराजांना अटक, जावळी प्रकरण, आदिलशहाशी संघर्ष, अफझलखानाचा वध, प्रतापगडावरची लढाई, कोल्हापूरची लढाई, सिद्धी जोहरचे आक्रमण, पावनखिंडीतील लढाई, पुरंदराचा तह, मोगल साम्राज्याशी संघर्ष, शाहिस्तेखान प्रकरण, सुरतेची पहिली लूट, मिर्झाराजे जयसिंग प्रकरणे, आग्य्राहून सुटका, सवर्त्र विजयी घोडदौड, राज्याभिषेक, दक्षिणेतील दिग्विजय असा शिवाजीराजांचा एकंदर इतिहास मन भारावून टाकणारा आहे.

      February 19, 2022


  • शिल्पा शिरोडकर

    बॉलिवूडमध्ये शिल्पाला शिरोडकर यांची बोल्ड अभिनेत्री म्हणून ख्याती होती. यूकेत स्थायिक व व्यवसायाने बँकर असणार्‍या अप्रेशरंजीत या व्यक्ती सोबत ११ जुलै २००० यादिवशी मुंबईत विवाहबध्द झाली .लग्नानंतर शिल्पा यूकेत स्थायिक झाली. २००३ मध्ये शिल्पाने मुलीला जन्म दिला. तिचे नाव अनुष्का असून शिल्पा तिच्या संगोपनात बिझी झाली.

      March 13, 2014


  • गायिका पद्मा वाडकर

    गायिका पद्मा वाडकर यांचा जन्म १९ जून १९७२ रोजी झाला.

    पद्मा वाडकर या मुळच्या केरळच्या आहेत. त्यांनीही अनेक गाणी गायली आहे. दहा वर्षाच्या असताना पद्मा या आचार्य जियालाल वसंत (सुरेशजी यांचे गुरु) यांच्या कडे गाणे शिकत होत्या. १९८५ मध्ये गुरुजींचे निधन झाल्यावर त्या सुरेशजींच्या संपर्कात आल्या. रूपारेल कॉलेज शिकत असताना कॉलेजला दांडी मारून त्या सुरेशजींच्या रियाझाला जात असत. त्या काळात त्या दोघांचे प्रेम जमले व सुरेश वाडकर यांनी १९८८ मध्ये पद्मजा वाडकर यांच्यासोबत लग्न केले.

    या वाडकर दाम्प्त्याला दोन मुली असून जिया आणि अनन्या अशी त्यांची नावे आहेत.

    पद्मा वाडकर यांचा 'मोरे पिया' अल्बम प्रसिद्ध आहे. यामध्ये सुरेश वाडकर आणि सोनू निगम यांचा सहभाग आहे.

    झी टीव्हीवर प्रसारित झालेल्या ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स’या प्रसिद्ध गायन रिॲ‍लिटी स्पर्धेत त्यांनी परीक्षक म्हणून काम केले आहे.

    त्या एक संगीत शिक्षिका असून आणि सुरेश वाडकर यांच्या अकादमीची सर्व धुरा सांभाळ आहेत त्या या अकादमीच्या उपप्राचार्य आहेत.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      June 21, 2022