जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याच काम त्यांनी केलं आहे. त्यांनी गोवा मुक्ती संग्रमातही भाग घेतला होता.
July 29, 2021
मुंबईतली कामगार चळवळ जवळपास नामशेष होण्याची चिन्हे दिसत असताना या चळवळीत अतिशय मोलाची कामगिरी बजावणा-या कामगार कार्यकर्त्यांच्या पिढीचे एक प्रतिनिधीत्व करणारे वसंत गुप्ते हे होते. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, साथी जॉर्ज फर्नान्डिस यांसारख्या दिग्गज कामगार पुढा-यांच्या पाठीशी वसंत गुप्तेंसारखे दुस-या फळीतले तितकेच समर्थ नेतृत्व असल्यानेच नव्वदीच्या दशकापर्यंत कामगार चळवळीचा दबदबा महाराष्ट्रात होता. आंदोलनाची रणनीती आणि एकंदर पुढारपण जितके महत्त्वाचे असते तितकीच, किंबहुना त्यापेक्षा कणभर जास्तच विविध पातळ्यांवर समन्वय साधणारी, बारीकसारीक बाबींची खडा न् खडा माहिती असणारी निष्ठावंतांची दुसरी फळीही महत्त्वाची असते.
July 25, 2011
‘उतरन’ मालिकेमधून घराघरांत पोहोचलेल्या तपस्या अर्थात अभिनेत्री रश्मी देसाईचा जन्म १३ फेब्रुवारी १९८६ रोजी आसाम येथे झाला.
रश्मी देसाई टीव्ही इंडस्ट्रीतली स्टार म्हणून ओळख दिली. या मालिकेनंतर रश्मी अनेक रिअॅलिटी शोजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.'इश्क का रंग है सफेद' या मालिकेतही तिनं एक छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर ती 'झलक दिखला जा', 'कॉमेडी सर्कस', 'फिअर फॅक्टर' यांसारख्या रिअॅलिटी शोजमध्येच जास्त दिसू लागली होती. छोट्या पडद्यावर मालिकेपासून करिअरला सुरूवात केलेल्या रश्मीनं बॉलिवूडच्या काही सिनेमांमध्येही छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
तिचे खरे नाव शिवानी देसाई. रश्मीने मुंबईच्या नारसी मॉजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून टूर अँड ट्रॅव्हलमध्ये डिप्लोमा केला आहे. रश्मीने एका आसामी चित्रपटातूनच आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे, नंतर भोजपुरी सिनेमासृष्टीत बस्तान बसवलं आणि आता हिंदी मालिकांची लोकप्रिय नायिका झाली आहे. तिने गजब भइल रामा, कब होए गौना हमार, नदिया के तीर, गब्बर सिंह, दूल्हा बाबू, बंधन टूटे न आणि पप्पू के प्यार हो गईल यांसारख्या सिनेमात काम केलं.
रश्मी देसाई बिग बॉस 15 मध्ये देखील दिसली होती. तिने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात एन्ट्री केली होती. इतकंच नव्हे तर ती टॉप 5 मध्ये पोहोचली होती. रश्मी तिच्या कामामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत रहिली आहे. तिचं खासगी आयुष्यात अनेक चढ- उतारांनी भरलेलं आहे. श्मीनं अभिनेता आणि तिचा सहकलाकार नंदिशशी गाजावाजा न करता लग्न केलं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. रश्मी देसाई गुजराती तर नंदिश पंजाबी आहे. 'उतरन' मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्नाच्या अवघ्या एका वर्षात त्यांच्यात वाद होऊ लागले. चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. रश्मी सोशल मीडियाद्वारेही सतत आपल्या चाहत्यांना भेटत असते. आपल्या चाहत्यांसाठी फोटोज आणि व्हिडीओज देखील सतत शेअर करत असते. रश्मी आपल्या खाजगी आयुष्यातल्या रिलेशनशिप्समुळेही सतत प्रकाशझोतात असते.
-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
February 13, 2024
ब्रिटीश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म २५ जानेवारी १८८२ रोजी झाला.
अतिशय बुद्धिमान, तितक्याच संवेदनशील आणि शब्दांवर जबरदस्त पकड असणाऱ्या व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म ब्रिटनमधल्या एका सधन कुटुंबात झाला. आयुष्यभर लेखन, वाचन हा एकच ध्यास घेऊन जन्मलेल्या व्हर्जिनिया यांनी केवळ वयाच्या नवव्या वर्षी व्हर्जिनिया यांनी आपल्या भावाच्या मदतीनं ‘२२ हाइडपार्क गेट’ नावाचं कौटुंबिक साप्ताहिक काढलं होते.
शब्दांवर प्रचंड हुकूमत, सातत्य, संवेदशील लिखाण आणि लेखनात प्रयोगशीलता हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट होते. ‘मिसेस डलोवे’,‘टू द लाइटहाऊस’,‘द वेव्हज’या सारख्या कांदबऱ्या आणि ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ आणि ‘थ्री गिनीज’ हे त्यांचे निबंध खूपच गाजले. त्यांचे वडिल सर लेस्ली स्टीफन यांचा मुलींना औपचारिक शिक्षण देण्यास विरोध होता. त्यामुळे त्यांचं शिक्षण हे घरच्या ग्रंथालयावरच अवलंबून झालं, पण त्यांचे भाऊ मात्र केम्ब्रिजमध्ये शिकायला गेले, आणि तेव्हापासून स्त्रियांच्या शैक्षणिक हक्काबद्दल त्यांनी आग्रह धरला. सतत वाचन लेखन करून आपली वैचारिक पातळी उंचावली. वयाच्या १९ व्या वर्षी टाइम्स लिटररी सप्लिमेंटमध्ये ग्रंथसमीक्षणे लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली.
‘वाचकांचा भरपूर आदर करणारं लेखन आपण लेखकांनी केलं पाहिजे कारण हे वाचकच आपल्या लेखनाचं पोषण, संवर्धन करतात,’ अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच दर्जेदार आणि संवेदनशील लेखन करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांमध्ये त्यांचं नाव अग्रगण्य होतं, या लेखिकेचा अंत तितक्याच करुणपणे झाला. त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर नैराश्याचा मानसिक आजार व्हिर्जिनिया यांना जडला होता. दुसऱ्या महायुद्धाचं रणशिंग फुंकल्यावर त्यांची मानसिक स्थिती आणखीच खालावली. त्याचे पती लिओनार्ड वुल्फ ज्यू होते, त्यामुळे आपलाही लाखों ज्यूंसारखा छळ होऊन मृत्यू होईल याची कल्पना त्यांना असह्य होऊ लागली. २८ मार्च १९४१ साली त्या घरातून निघाल्या. आपल्या कोटाच्या खिशात भरपूर दगड भरून त्या घराशेजारी असणाऱ्या तलावाच्या दिशेने गेल्या त्यानंतर त्या कधीच परतल्या नाही. १८ एप्रिलला त्यांचा मृतदेह सापडला.
२०१८ मध्ये गुगलने डूडल करून साहित्यविश्वात मानाचा ठसा उमटवणाऱ्या या ब्रिटीश लेखिकेला आदरांजली वाहिली होती.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
January 25, 2022
December 7, 2011
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे झाला. बंगळूरच्या सोफिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि माऊंट कार्मल कॉलेजमधून दीपिकाने प्री-यूनिव्हर्सिटी एज्युकेशन पूर्ण केले.त्यानंतर दीपिकाने बीए करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. मात्र शिक्षण अर्ध्यावर सोडून ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. खरं तर वयाच्या ८ व्या वर्षीच दीपिकाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते. कॉलेजच्या दिवसांमध्येच तिने रॅम्प वॉक केला होता.लिरिल, डाबर दंत मंजन, क्लोज-अप, लिम्का अशा ब्रँड्सची ती अॅम्बेसेडर होती.
दीपिकाने बॉलिवूडमध्ये 'ओम शांती ओम' सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा २००७ मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर दीपिकाच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धूम घातली. दीपिकाने अनुपम खेर यांच्या अॅतक्टिंग इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आणि शामक डावर यांच्याकडून डान्स शिकली. दीपिकाचा 'ऐश्वर्या' हा कन्नड भाषेतील पहिला सिनेमा होता. आज ती आज बॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री असून २००६ मध्ये 'फिमेल मॉडल ऑफ द इयर' आणि 'फ्रेश फेस ऑफ द इयर'चा मान पटकावला.
'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्सप्रेस', आणि 'गोलियों की रासलीला-रामलीला', हॅपी न्यू 'इयर', ये जवानी है दिवानी, पिकू, रामलीला, बाजीराव मस्तानी हे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी दीपिका. हे तिचे हिट ठरलेले सिनेमे. दीपिका प्रसिध्द बॅटमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे आणि तिची आई उज्वला एक ट्रॅवल एजंट आहेत. दीपिकासुध्दा एक बॅटमिंटन खेळाडू आहे. ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅटमिंटन आणि बेसबॉस खेळली आहे. बंगळूरु येथून शालेय शिक्षण आणि माउंट कॅरमल महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा ती पदवीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिला मॉडलिंगची ऑफर आली होती. तिने मॉडलिंग एक छंद म्हणून केली, परंतु नंतर तिने या छंदाला गांभीर्याने घेतले आणि अनेक जाहीरातीत ती झळकली. म्हटले जाते, की दीपिकाला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार फिल्म इंटस्ट्रीमध्ये येण्याचा तिने कधीच विचार केला नव्हता. परंतु आज ती यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील आहे. सांगायचे झाले तर, तिचे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले होते. पण दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघे आज म्हणजेच ५ जानेवारी रोजी साखरपुडा करणार आहेत. विशेष म्हणजे दीपिकाने साखरपुड्यासाठी स्वतःच्या वाढदिवसाचा मुहूर्त निवडला आहे. राम-लीला' या चित्रपटातून रणवीर-दीपिका पहिल्यांदा ऑनस्क्रीन झळकले होते.
त्यानंतर दोघांचं अफेअर असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली. 'बाजीराव-मस्तानी'या चित्रपटानंतर जणू त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. काही दिवसांपूर्वी फिल्मफेअरच्या पार्टीत दीपिकाने रणवीरचा 'बॉयफ्रेण्ड' असा उल्लेख केला होता. इतकेच नाही तर रणवीर दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यासोबतही अनेकदा दिसला आहे. 'पद्मावती'या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित चित्रपटात हे दोघे दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे तर दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 5, 2018
नाट्य-चित्रपट क्षेत्रातले ख्यातनाम अभिनेते अशोक सराफ हे गोपीनाथ सावकार यांचे भाचे.
June 25, 2022
ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे.
February 2, 2010
प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२० कोलकाता येथे झाला. त्यांची गेल्या सहा दशकांहून अधिक त्यांची प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना अशी ख्याती राहिली होती. सितारा देवींनी देशविदेशांमध्ये कथ्थक नेले. लोकप्रिय केले आणि कथ्थकला रसिकांच्या मनात कायमसाठी एक उन्नत स्थान त्यांनी मिळवून दिले. त्यांचे वडिल सुखदेव महाराज मिश्रा यांनी त्यांना कथ्थकची उत्तम तालीम आणि प्रशिक्षण दिले.
आपल्या वडीलांप्रमाणेच लखनौ घराण्यातील अच्छन महाराज, लच्छू महाराज आणि शंभू महाराज यांच्याकडूनही त्यांनी कथ्थकचे धडे गिरवले. बनारस आणि लखनौ घराण्यांचा मिलाफ त्यांच्या नृत्यातून दिसून येत असे. भावविभोर डोळे, ठसठशीत सौंदर्य आणि त्याला भारतीय भारदस्तपणाची डुब हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़ होते. एक नर्तकी म्हणून त्यांच्या अदाकारीमुळे त्यांच्या सौंदर्यामध्ये काही औरच जीव ओतला गेला होता.
सितारादेवी या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक के. आसिफ यांच्या पत्नी. जवळपास १९३४ पासून ते १९७४ पर्यंत त्यांनी नृत्यप्रधान भूमिका करून हिंदी चित्रपटही गाजवले. एक अवसर असा आला की, त्यांनी कथ्थक नृत्यशैलीशी पुरते तादात्म्य ठेवावे या हेतूने हिंदी सिनेसृष्टीला रामराम ठोकला. पडद्यावर आणि प्रत्यक्ष लाईव्ह डान्समध्ये सितारा देवींचे नृत्य पाहणे हा एक चित्तथरारक, रोमहर्षक आणि प्रेक्षकाला खिळवून ठेवणारा असा अनुभव असायचा. प्रेक्षकाला अधिक करणारा, कलेच्या निरामय लाटेवरून स्वर्गीय आनंदाची सर घडवणारा असा तो अनुभव असायचा. ‘रोटी’ चित्रपटातील जंगल डान्स (१९४२) किंवा ‘सौतन के घर ना जाईयो’ हा ‘आबरू’ चित्रपटातील (१९४३) डान्स अशा त्यांच्या अनेक उल्लेखनीय कलाकृती आहेत. नागनृत्य हे स्नेक डान्स या नावाने जास्त प्रचलित आहे.
१९५७ मध्ये ‘अंजली’ या चित्रपटामध्ये सितारा देवींनी स्नेक डान्स केला आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शनही केले होते. वयाच्या १६व्या वर्षी सितारादेवींनी गुरुवर्य पं. रवींद्रनाथ टागोर यांच्यासमोर सुंदर कथकनृत्य सादर केले. सितारादेवींचे सुरेख नृत्य पाहून पं. रवींद्रनाथ टागोर भारावून गेले व त्यांनी सितारादेवींना ‘कथकक्वीन’ उपाधी (पदवी) दिली. सितारादेवी यांना त्यांच्या नृत्य कारकिर्दीत आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री, आणि कालिदास सम्मान यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले होते. कथ्थक या नृत्यप्रकाराला त्यांनी बॉलिवूडमध्ये स्थान मिळवून देण्याचे श्रेय त्यांना जाते. नृत्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना २०११ मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सितारा देवी यांचे निधन २५ नोव्हेंबर २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 8, 2018
वयाच्या बाविसाव्या वर्षी दादांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पाठशाळेत भगवद्गीतेवर प्रवचनं द्यायला सुरुवात केली.१९५४ मध्ये जपान येथे झालेल्या दुसर्या धार्मिक परिषदेत त्यांनी वेद आणि भगवद्गीतेवरील तत्त्वज्ञानावर भाषण केले.
July 5, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti