जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
केसरीच्या संचालिका असलेल्या झेलम यांना फायनान्स, टिकिटिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन या विभागांमध्ये विशेष रुची आहे. मात्र, पर्यटनाच्या नवनवीन योजना आखण्यात त्यांचा हातखंडा आहे. नेहमीच्या ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांना पर्यटनाबरोबरच शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंबंधी नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून ॲग्रो टुरिझम, विद्यार्थ्यांसाठी ‘नासा’ टूर आणि कार्पोरेट क्षेत्रात विशेष लोकप्रिय असलेली माईस (MICE) अशा पूर्णपणे भिन्न आणि लोकप्रिय योजना आखण्याचे श्रेय ‘झेलम’ यांचेच.
June 30, 2022
हुस्नलाल व भगतराम हे दोघेही लाहोरच्या सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू. त्यांचा जन्म १९१६ रोजी जालंधर येथे झाला. हुस्नलाल उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते.
December 28, 2017
सागर सादर करत असलेले ‘चला हवा येऊ द्या’ मधील पोस्टमन काका हे प्रेक्षकांच्या मनातील हळवा कोपरा आहेत. हे पोस्टमन काका प्रेक्षकांच्या अश्रूंना वाट मोकळी करून देतात. हीच खऱ्या अर्थानं सागरमधील अभिनेत्याला मिळालेली दाद आहे…
January 1, 2022
क्रिकेट जगतात एक वेळ अशी होती की या व्हेरी व्हेरी स्पेशल फलंदाजाला ऑस्ट्रेलिया संघ घाबरत होता. लक्ष्मणने आपल्या करिअरमध्ये सर्वात अधिक धावा ऑस्ट्रेलियाविरूद्ध २,४३४ इतक्या धावा काढल्या आहेत. त्याने कसोटीत कंगारू विरूद्ध ६ शतके तर १२ अर्धशतके ठोकले आहेत.
November 1, 2019
महाराष्ट्रातील अत्यंत आक्रमक आणि सर्वाधिक लोकाधार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख
March 26, 2013
राधाबाई,.........
यवतमाळ च्या रस्त्यावर भाजी विकणारी एक निरक्षर विधवा महिला. ५ मुली पदरात आणि अठराविश्व दारीर्द्र्य घरात. अचानक एक दिवस इंग्लन्दाहून तिच्याच समाजातील एक माणूस उगवला. त्याची बायको हि नुकतीच देवाघरी गेली होती. समाजातील प्रथे प्रमाणे दुसरे लग्न करणे भाग होते. मग कोणा मध्यस्थाने दिला या दोघांचा पाट लावून.
नवीन नवरा हिला घेऊन बोटीने लंडनला गेला. बरोबर पाचातल्या दोन मुली घेतल्या. बाकीच्यांना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच ठेवले.तिथे त्याच्या मुलांनी हिला ठेऊन घ्यायला नकार दिला. मग कसाबसा हा अजब संसार चालू राहिला. एक दिवस आकाश कोसळले. थोड्या आजाराचे निमित्त होऊन नवर्याचा मृत्यू झाला. नंतर काही दिवसातच घरातल्यांनी ह्या बाईच्या हातात बोटीची ३ तिकिटे आणि ५० पौंड ठेवले आणि घरा बाहेर काढले. ते हि ऐन हिवाळ्यात.
बाईच्या हाताल धरून दोन लहानग्या मुली, एक वळकटी आणि जेमतेम चार इंग्रजी शब्द .यावर हि अशिक्षित ९ वारी नेसलेली बाई लंडन च्या बर्फात सुन्न होऊन उभी होती. एका जवळ राहणार्या भल्या ज्यू माणसाने तिला घरी नेले आणि कसाबसा संवाद साधत तुला काय येते विचारले. हि म्हणाली "स्वयंपाक". त्याने हिला आपल्या घरातील मोकळी जागा दिली आणि म्हणाला मग कर स्वयंपाक. तुझ्या देशातले लोक येतील बघ खायला.आणि असा "आजीबाई वनारसे खानावळ " या लंडन मधल्या खानावळीचा जन्म झाला.
लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही.
पुल, अत्रे, यांपासून अनेक मराठी दिग्गज त्यांच्याकडे राहून, जेऊन गेले.
बाई ९ वारी साडी नेसून लंडन च्या मेट्रोने एकट्या प्रवास करीत (शेवट पर्यंत त्या ९ वारी साडीच नेसत होत्या) स्टेशन ची नावे वाचता येत नसत म्हणून कितवे स्टेशन ते विचारून घेत आणि मोजून उतरत.बाई वारल्या तेव्हा त्यांच्या मालकीची लंडन मध्ये ५ घरे होती. लंडन मधला गणेशोत्सव त्यांनी चालू केला. तिथले पहिले देऊळहि त्यांनीच बांधले.त्यांच्या अंतयात्रेला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडन चा मेयर हजर होता. आणि सगळ्यात गम्मत म्हणजे त्या शेवटपर्यंत अशिक्षितच राहिल्या. जेमतेम RADHABAI अशी सही करीत.
*तात्पर्य: फक्त शिक्षण व पैसे ह्या बाबी व्यवसाय करण्यासाठी इतक्या महत्वाच्या नाहीत. सर्वात महत्त्वाचे आहेत ते चिकाटीने प्रयत्न करणे, मेहनत घेणे व काहीतरी करून दाखवण्याची जिद्द.*
सलाम राधाबाई !!!
August 19, 2016
पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. पत्रकारितेतील ऑस्किर समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार हा पहिल्यांदा १९१७ मध्ये देण्यात आला. हा पत्रकारितेतील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कारही मानला जातो. पुलित्झर पुरस्कार २१ श्रेणींमध्ये दिला जातो. प्रत्येक श्रेणीतील विजेत्याला $ 15,000 रोख दिले जातात.
April 11, 2022
फिअरलेस नाडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाडियाचे खरे नाव ‘मेरी इवान्स’ असे होते. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९०८ रोजी पर्थ येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील फिअरलेस नाडिया ही एक दिग्गज अभिनेत्री होती. जे बी एच आणि होमी वाडिया यांनी १९३० साली वाडिया मुव्हिटोन स्टुडिओची स्थापना केली होती. त्यांनीच ‘स्टंट क्वीन’ असलेल्या फिअरलेस नाडियाला लाँच केले होते.
मूळची ऑस्ट्रेलियन असलेल्या नाडियाने भारतात अनेक अॅक्शन चित्रपट केले आणि अल्पावधीतच ती स्टार झाली. ती तिच्या बहारदार नृत्यासाठी, अॅक्शन्ससाठी प्रसिद्ध होतीच. शिवाय तिला चाबूकवाली म्हणूनही ओळखले जायचे. नाडियाने होमी वाडियाशी लग्न केले. नाडिया लहान असतानाच तिच्या आई-वडिलांसह भारतात आली. तिचे वडील ब्रिटीश आर्मीमध्ये सैनिक होते. पेशावरमध्ये मोठी झालेली नाडिया तेथेच घोडेस्वारी शिकली.
लहानपणीच त्यांनी घोडेस्वारी, जिमनॅस्टिक, बॅले डान्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सर्कशीत प्रवेश केला व यानिमित्ताने त्या भारतभर फिरल्या. पहिल्या महायुद्धात तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ती आणि तिची आई मुंबईत स्थलांतरित झाल्या. त्यानंतर उत्तम नोकरी मिळावी याकरिता मेरीने (नाडिया) शॉर्टहॅण्ड टायपिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जाड असलेल्या मेरीने वजन कमी करण्याचाही निर्णय घेतला होता, त्यासाठी तिने रशियन नृत्य प्रशिक्षक मदाम अस्त्रोवा यांच्या नृत्यकला शाळेत नाव नोंदवले. त्यावेळी मदामनेच मेरीमध्ये असलेले कलागुण जाणले आणि भारतभर फिरण्या-या त्याच्या नृत्य/थेएटर ग्रुपमध्ये तिला सहभागी करून घेतले. त्याच्याच सांगण्यावरून तिने आपले नाव मेरीवरून नाडिया असे ठेवले.
नाडियाच्या एकाही चित्रपटाची डीव्हीडी सध्या उपलब्ध नाही. पण जे बी एच वाडिया यांचे नातू रियाद विन्सी वाडिया यांनी तिच्यावर १९९३ साली एक सुंदर माहितीपट तयार केला होता. त्याचे नाव ‘फिअरलेस : द हंटरवाली स्टोरी’ असे आहे. यात नाडियाच्या काही छायाचित्र आणि व्हिडिओंच्या माध्यमातून तिचे आयुष्य आणि करिअर दाखविण्यात आले आहे.
द हंटरवाली उर्फ मेरी इवान्स यांचे ९ जानेवारी १९९६ रोजी निधन झाले.
भारतातील पहिल्या महिला 'स्टंटवुमन' म्हणून ओखळल्या जाणाऱ्या 'फिअरलेस नाडीया' यांना गुगलने डूडलद्वारे आज त्यांच्या जन्मदिनी श्रद्धांजली वाहिली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://youtu.be/Y0A6a09C7hM
https://youtu.be/dcZ_ab5LcuQ
January 8, 2018
December 15, 2010
सौंदर्याचं दुसरं नाव ऐश्वर्या राय आहे. अनेकांकडे सौंदर्य असतं आणि वरचा मजला रिकामा असतो. ऐश्वर्या त्याही बाबतीतही ऐश्वर्यसंपन्न आहे. तिच्या व्यक्तीमत्वात नैसर्गिक कलागुण व बुद्धिमत्तेचा सुयोग्य मिलाफ झालेला आहे. तिचा जन्म १ नोव्हेबर १९७३ रोजी झाला. हे सौंदर्याचं ऐश्वर्य जन्माला आलं तेही एका दाक्षिणात्य कुटुंबातच. मूळची ती मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. तिच्या जन्मानंतर राय कुटुंबीय मुंबईत आलं. तिचं बालपण मुंबईतंच गेलं. लहानपणापासून बहुभाषिक, बहुसांस्कृतिक वातावरणाचा संस्कार झालेल्या ऐश्वर्याचे व्यक्तिमत्वही म्हणूनच कॉस्मोपॉलिटिन वाटतं. दाक्षिणात्य ठसा तिच्यात नाही. त्याचप्रकारे ती कुठल्याही एका प्रांताची वाटत नाही. म्हणून जगातल्या दहा ऐश्वर्यवतींमध्ये ती शोभून दिसते. टाईमच्या मुखपृष्ठावरही झळकते. आणि कान्सच्या चित्रपट महोत्सवातही कॅमेऱ्याचे झोत आपल्यावर आकर्षून घेते. ऐश्वर्याची आई वृंदा राय या लेखिका आहेत आणि वडील कृष्णराज चक्क समुद्र जीवशास्त्रज्ञ. तिचा धाकटा भाऊ मर्चंट नेव्हीत आहे. थोडक्यात तिची पार्श्वभूमी अगदी उच्चशिक्षित कुटुंबाची आहे.शिक्षण, संशोधन व साहित्य अशा संगतीत वाढलेल्या ऐश्वर्यावर हे संस्कार होणे अगदी सहाजिक होते.
व्यक्तिमत्वातल्या सौंदर्याने ऐश्वर्याला जगाकडे बघण्याची सुंदर नजर दिली. म्हणूनच वास्तूत सौंदर्य कसे असावे हे सांगणाऱ्या आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला तिने प्रवेश घेतला. माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजात शिक्षण घेणारी ऐश्वर्या पुढे आपसूकच मॉडेलिंगच्या क्षेत्रात कशी ओढली गेली ते तिला कळलेही नाही. मॉ़डेलिंगकडे वळविण्यासाठी तिला काही करण्याची गरजही कधी पडलीच नाही. कारण या मॉडेलिंग जगालाच या लोभस चेहऱ्याची गरज होती. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर पुढे सौंदर्यस्पर्धामध्ये भाग घेणंही आलंच. मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेतला. पण सुश्मिता सेनच्या स्पर्धेत तिला दुसरा क्रमांक मिळाला. पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतल्यानंतर जगतसुंदरीचा मुकूटही तिच्या डोक्यावर चढला. या स्पर्धेत केवळ सौंदर्यच नव्हे तर तिची बुद्धिमत्ताही पणाला लागली होती. तिच्या चटपटीत, हजरजबाबी आणि बौद्धिक चातुर्याच्या उत्तरांनी परीक्षकांचंही मन जिंकलं.
ऐश्वर्याने जगावर राज्य करायला सुरवात केली तो क्षण हाच. मिस इंडिया, मिस वर्ल्ड या स्पर्धांनंतर बॉलीवूडची वाट चालण्याची पूर्वापार प्रथा ऐश्वर्यानेही जपली. पण यापूर्वी आलेल्या ग्लॅमरस मॉडेल या चांगल्या अभिनेत्री कधी झाल्याच नाहीत. पण हे केवळं सौंदर्याचंच ऐश्वर्य नाही, अभिनयाचंही आहे, हे ऐश्वर्याने खर्याउ अर्थाने दाखवून दिलं. ज्याच्या चित्रपटात काम मिळते याचा कलावंतांना अभिमान वाटतो, अशा मणिरत्नम यांच्या 'इरूवर' चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवल सोबतचा 'और प्यार हो गया' हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा 'जीन्स' या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला.तिच्या सौंदर्यापेक्षाही अभिनयासाठी लक्षात राहिलेले चित्रपट आठवा. हम दिल दे चुके सनममध्ये ती अप्रतिम दिसली होतीच. पण अभिनयाच्या बाबतीतही कमालीची समज पहिल्यांदा दिसून आली. मग देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट हे चित्रपट खास तिच्या अभिनयासाठी ओळखले जातात. याशिवाय अनेक टुकार चित्रपटही तिने केले. पण चांगले काय नि वाईट काय हे समजण्यासाठी अखेर काही चित्रपटांचे दान हे द्यावेच लागते. तिचा जोधा अकबर, सरकार राज हे महत्त्वाचे चित्रपट आहेत.
मिसेस ऑफ स्पाईसेस, ब्राईड अँड प्रिजुडाईस, प्रोव्होक्ड, द लास्ट लिजन ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही तिने अभिनयगुणाची छाप सोडली. आर्थिक उदारीकरणाचा काळात भारत जागतिक पातळीवर जात असताना ऐश्वर्या हा भारताचा ब्रॅंड आहे हेही ठसायला सुरवात झाली आहे. म्हणूनच कान्सच्या चित्रपट महोत्सवात म्हणूनच 'ज्युरी' बनण्याचा मान मिळालेली ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. 'टाइम' मॅगझिनने तिच्या कर्तृत्वाची दखल घेत आशिया खंडातील प्रभावशाली शंभर व्यक्तीमध्ये तिचा समावेश केला आहे. जगातील दहा सौंदर्यवतींमध्ये ती आहे.कॅमलिन पेन्सिलपासून सुरु झालेला मॉडेलिंगचा ऐश्वर्याचा प्रवास आजही यशस्वीपणे सुरु आहे. टाइटन वॉचेज, लॉन्जिस वॉचेज, लॉरियल, कोका-कोला, लॅक्मे कॉस्मेटिक्स, फिलिप्स, पामोलिव, लक्स, फूजी फिल्म्स, नक्षत्र डायमंड्स, कल्याण ज्वेलर्स, प्रेस्टीज यांसारख्या नावाजलेल्या ब्रॅण्ड्ससाठी ऐश्वर्याने काम केले आहे.
लंडनमधील 'वॅक्स म्युझियम'मध्ये तिचा मेणाचा पुतळा आहे. एकीकडे दिसामासी तिची कीर्ती वृद्धिंगत होत असताना दुसरीकडे बॉलीवूडमध्ये तिच्याविषयीची चर्चाही रंगात आली होती. गॉसिप तिला कधी चुकली नाहीत. सलमान खानबरोबर तिचे अफेअर हम दिल दे चुके सनमपासूनच जोडले गेले होते. पण दोघांमधील मतभेद व सलमानच्या विचित्र वागण्याच्या बातम्या एकामागोमाग आल्या. मधल्या काळात विवेक ओबेरॉयबरोबरही तिचे नाव जोडले गेले. नंतर मात्र अभिषेक बच्चनबरोबर तिचे नाव आले आणि अखेर तिचे लग्नही त्याचाशीच झाले. या सगळ्या प्रवासात सतत समोर दिसतो तो तिचा कामातला प्रामाणिकपणा, उत्साह, जिद्द आणि निरागसता. ‘आखोंकी गुस्ताकिया माफ हो’ गाण्यातून सौंदर्याचीही व्याख्या बदलायला लावणारी ऐश्वर्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 10, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti