जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भारतकुमार राऊत हे पत्रकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच वृत्तपत्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे मुंबई सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दी इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, दी इंडियन पोस्ट, दी इंडिपेंडंट, दी मेट्रोपोलिस ऑन सॅटर्डे, दी पायोनियर अशा मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या.
April 6, 2022
चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी झाला. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एक प्रकारे संदेशच त्यांनी दिला. सुरूवातीस त्यांनी छोट्या भूमिका केल्या आणि लवकरच त्यांना नायिकेची भूमिका मिळाली.
प्रभात फिल्म्सचा १९३२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अयोध्येचा राजा या चित्रपटाने तर त्यांना ओळख करून दिली. मराठी आणि हिंदीमध्ये बनलेल्या या चित्रपटात त्यांनी राणी तारामतीची भूमिका केली.त्यावेळी स्टूडियो सिस्टमचा जमाना होता त्यावेळचे कलाकार ठरावीक पगारावर स्टूडियोमध्ये काम करायाचे. पण, आत्मविश्वासच्या जोरावर त्यांनी फ्रीलांस काम करण्यास सुरूवात करून ही पध्दत माडीत काढली. न्यू थियेटर्स, ईस्ट इंडिया फिल्म कंपनी, प्रकाश पिक्चर्स आदींसाठी त्यांनी काम केले.
१९३० च्या शतकाच्या अखेरीस त्या निर्माता आणि दिग्दर्शक बनल्या आणि त्यांनी चरणों की दासी, भरत मिलाप अशा एकावर एक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांनी त्यांचा गौरव केला.चित्रपटांबरोबरच दुर्गा खोटे यांनी मराठी रंगभूमीवरही आपली कारकिर्द गाजवली. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन च्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीसाठी भरीव कार्य केले.
मुंबई मराठी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. शेक्सपीयर यांच्या मॅकबेथवर आधारीत राजमुकूट या नाटकातील त्यांचा अभिनय वाखणण्या्जोगा होता. या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मा.दुर्गा खोटे यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्याीत आले. मुगले आजम, बॉबी, बावर्ची अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात आहेत. त्यांनी लिहलेल्या आत्मकथेचा इंग्रजी अनुवाद 'दुर्गा खोटे' या नावाने प्रकाशित झाला आहे. दुर्गा खोटे यांचे २२ सप्टेंबर १९९१ मध्ये निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 15, 2018
खंडेराव त्र्यंबक सुळे हे त्यांच्या प्रखर देशभक्तीला व समाजवादी विचारसरणीला, आपल्या दर्जेदार लिखाणाद्वारे वाट करून देणारे प्रतिभावंत लेखक व स्वातंत्र्य सेनानी होते. स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेल्यायाखंडेराव सुळे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव होता. त्यामुळेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यत व सत्याग्रहांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. आपल्या जाज्वल्य देशाभिमानामुळे व समाजवादी मागण्यांसाठी त्यांना अनेकदा तुरूंगात देखील पाठवण्यात आले होते. खंडेराव सुळे यांचे प्राथमिक शिक्षण बी.जे. हायस्कुल ठाणे येथे झाले. पुढे म्हणजेच १९१८ साली उच्च शिक्षणासाठी त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश मिळविला. १९२१ साली महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या गुजरात विद्यापीठामधून त्यांनी विज्ञानविशारद ही पदवी संपादन केली. त्यानंतर “महर्षी अरविंदां”नी सांगितलेल्या आध्यात्मिक मार्गाचा काही काळ मार्गक्रमणा केली. १९३० साली त्यांना केवळ स्वातंत्र्य व समानतेच्या तत्त्वांवर उभा असलेला भारतीय समाज पाहण्याची, त्यासोबतच आपण देशासाठी पाहिलेली स्वप्ने साकार करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला. सुळे यांच्या प्रखर देशभक्तीची समाजाच्या विविध स्तरांतून ज्याप्रमाणे कौतुक झाले, त्याचप्रमाणे ज्ञान व कला क्षेत्रांमधील त्यांचा व्यासंग व योगदान देखील कधीही न विसरता येण्याजोगे आहे. त्यांना अनेक ज्ञानशाखांत रस होता. संस्कृत, व साहित्य हे त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचे विषय होते. भेदक, चिकित्सक, डौलदार परंतु वास्तवाची धार असलेली परिणामकारक लेखनशैली ही त्यांना मिळालेली नैसर्गिक देणगीच होती. खंडेराव सुळेंनी “शेष” या नावाने ललित लेखन केले, तर “स्कंद” नावाने राजकीय स्वरूपाचे मार्मिक लेखन केले. वीणा मासिकामधून त्यांनी प्रकाशित केलेल्या अनेक लेखांनी गुलामगिरीची झापडे लावलेल्या, भारतामध्ये एकच खळबळ माजवून दिली होती. "ज्योत्स्ना" मासिकातून व इतर नियतकालिकांमधून देखील त्यांच्या अनेक कथा प्रकाशित झाल्या. लेखनासोबतच समीक्षा, हे त्यालाच समांतर असलेले परंतु मनाच्या एका वेगळ्याच विचारशील व संवेदनशील कप्प्याची परीक्षा पाहणारे क्षेत्रदेखील त्यांनी आजन्म आपलेसे केले होते. सुळेंचे कित्येक टीकालेख हे आजही, शुध्द पक्षपातीपणाचे व आभ्यासपुर्ण उत्खननाचे द्योतक मानले जातात. त्यांच्या समीक्षालेखांवर प्रखर मार्क्सवादी तत्व प्रणालीचा प्रभाव दिसून येतो. ख्रिस्तोफर कॉडवेलची सौंदर्य मीमांसा, जनतेचा कवी, बोरिस पॅस्टर नॅक आणि त्याची झिवॅगो इत्यादी प्रसिध्द लेख त्यांच्या मार्मिक व अष्टपैलू वाड्.मयदृष्टीची ग्वाही देतात. १९३८ साली झालेल्या ठाणे जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद खंडेराव सुळेंनी भुषविले होते .
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
शालेय वर्षांपासून अभ्यासू म्हणून ओळख असलेल्या प्रियाचा संवेदेनशीलता हा स्थायी स्वभाव. जिज्ञासा संस्था गेली एकवीस वर्षे प्रकशित करत असलेल्या शालेय जिज्ञासा या नियतकालिकाची प्रिया ही प्रथम संपादिका. सरस्वती सेकंडरी स्कूलमधील ही हुषार विद्यार्थ्यांनी १९९५ साली शालांत परीक्षेत मुंबई विभागात गुणवत्ता यादीत आली होती.
October 12, 2018
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मलेशियाचा प्रतिष्ठेचा ‘द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड’ प्रदान करण्यात आला.
ब्रँड लॉरीअटकडून दिले जाणारे पुरस्कार हे जगभारातील नावाजलेल्या व्यक्तिंना दिले जातात. ८७ वर्षीय लतादीदींनी सोशल मीडियावर ट्विट करत पुरस्काराचा एक फोटो शेअर केला आहे.
ट्विटरवर फोटो शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, मला लिजेंडरी अॅवार्ड २०१७ देऊन सन्मानित केल्याबद्दल लॉरीअटचे खूप आभार. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल शाहरुख खानलाही २०१२ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. याआधी दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत राष्ट्रपती नेल्सन मंडेला, नोबल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस, रतन टाटा, स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि मायकल शूमाकरला ‘द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.
आतापर्यंत ३०,००० हूनही अधिक गाणी गायलेल्या दीदींनी त्यांच्या नंतरच्या ट्विटमध्ये त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले. माझ्या कामावर मी समाधानी आहे. यासाठी मी माझ्या चाहत्यांची आणि हितचिंतकांची आभारी आहे.
February 20, 2017
दक्षिणेचे सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेले कमल हासन यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी `कलतूर कन्नम्मा’ या तमिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये त्यांनी ‘एक दुजे के लिए’ या सिनेमाद्वारे पदार्पण केले होते. कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
March 19, 2019
सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. शंकर सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते.
January 28, 2022
अतुल कुलकर्णी हे मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते आहेत. त्यांना हे राम चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर या व्यक्तिरेखेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्री व रंग दे बसंती व नटरंग या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांनाही चिकित्सकांकडून दाद मिळाली. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.
April 13, 2010
शूर आम्ही सरदार, हे खेळ नशिबाचे, आधार, वैभव लक्ष्मी, सून लाडकी सासरची, सासर माझे मंदिर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच चंचल, वक्त से पहेले, हो सकता है यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये मिलिंद गवळी झळकले आहेत. मिलिंद आणि अलका कुबल यांनी तर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
June 17, 2022
साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व
June 10, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti