जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
वासुदेवांनी ब्रिटिश सत्तेला उलथून टाकण्यासाठी सशस्त्र सैन्य उभारण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी काही सहकारी तयार केले. त्यात दौलतराव, गोपाळराव, गणपतराव घोटवडेकर, अप्पा वैद्य, अण्णासाहेब पटवर्धन, परशुराम पाटनकर, भिकाजी पंथ हर्डीकर, माधवराव नामजोशी, सितारामपंत गोडबोले, विष्णु खरे ,बाबु जोशी आदि तरुण होते.
February 17, 2022
‘ॲन ईव्हनिंग वॉक’ आणि ‘डिस्क्रिप्टिव्ह स्केचिस’ ह्या वर्ड्स्वर्थच्या आरंभीच्या कवितांवर अठराव्या शतकातील इंग्रज कवींचा प्रभाव दिसून येतो. ‘हिरोइक कप्लेट’ आणि ‘स्पेन्सरिअन स्टँझा’ हे अठराव्या शतकातील लोकप्रिय वृत्तप्रकार होते. वरील दोन्ही कविता ‘हिरोइक कप्लेट’ मध्ये रचिलेल्या आहेत, तर ‘गिल्ट अँड सॉरो ऑर इन्सिडंट्स अपॉन सॉल्झबरी प्लेन’ ह्या आपल्या कवितेसाठी त्यांनी ‘स्पेन्सरिअन स्टँझा’चा वापर केला आहे. शीर्षके, शब्दकळा, वर्णने अशा संदर्भातही वर्ड्स्वर्थच्या आरंभीच्या कविता अठराव्या शतकातील इंग्रजी काव्याच्या संकेतांना अनुसरताना दिसतात; पण अशा कवितांतही आत्मनिष्ठेचा एक समर्थ सूर दिसून येतो.
April 7, 2022
सलमान खान हा प्रसिध्द चित्रपटलेखक सलीम खान यांचा मुलगा. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला. सलमान यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याच्याकडे आजच्यासारखी शरीरयष्टी नव्हती. सडपातळ शरीरयष्टीचा हा मुलगा उद्याचा मोठा स्टार होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. 'बिवी हो तो ऐसी' या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणा-या सलमान यांचा दुसराच चित्रपट 'मैंने प्यार किया' सुपरडूपर हिट झाला. या चित्रपटाच्या गाण्यांबरोबरच सलमान यांनी या चित्रपटातून आपले अभिनयाचे नाणेही खणखणीत वाजवून दाखवले आणि बॉलिवुडला एक नवा स्टार मिळाला. बॉलिवूडमध्ये दबंगची ओळख याच चित्रपटातून चाहत्यांना झाली. सलमान यांचा वॉंटेड, दबंग, दबंग-२ आणि एक था टाइगर या सर्व चित्रपटानी बॉक्स ऑफिसवर १०० कोटी पेक्षा ही जास्तीचा गल्ला केला.
या चित्रपटाच्या व्यतिरिक्त सलमान खान यांनी साजन, हम आपके हैं कौन, तेरे नाम आणि हम दिल दे चुके सनम या सारख्या चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तसेच सलमानने रियलिटी शो ‘दस का दम’ आणि ‘बिग बॉस’ द्वारे टी.व्हीवर आपली हजेरी लावून चाहत्याना भुरळ घातली. तसेच बॉलिवूडच्या दबंगला दुसऱ्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी निर्मात्यांना तब्बल ५० कोटी रुपये मोजावे लागतात. सलमान खान यांचे ‘एस.के.बी.एच’ प्रॉडक्शन म्हणजेच सलमान खान बिंग ह्यूमन प्रॉडक्शन या नावाने त्याची स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी आहे. या प्रॉडक्शन कपंनीची सुरुवात सलमानने २०११ मध्ये केली होती. या प्रॉडक्शन कपंनी द्वारे पहिला चित्रपट ‘चिल्लर पार्टी’ बनवण्यात आला या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. सलमान खान बिंग ह्यूमन नावाने सामाजिक संस्था देखील चालवतो. त्याच प्रमाणे बॉलिवूडचा दबंग गणपती बाप्पाचा भक्त आहे. सलमान चे चाहते त्याला सोशल नेटवर्किंग साईट द्वारे शुभेच्छा देत आहे.
सलमान आजचा सुपरस्टार असला तरी, तो इतक्या सहजतेने इथपर्यंत पोहोचलेला नाही. सलमान यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले, खस्ता खालल्ल्या. काळवीट शिकार प्रकरण, हिट अँण्ड रन प्रकरणामुळे त्याच्या डोक्यावर नेहमीच अटकेची टांगती तलवार राहिली.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
December 28, 2017
शाळकरी वयात दिवसा शाळा व संध्याकाळी गायनशाळा हा नित्यक्रम अनेक वर्षे अगदी कसोशीने पाळल्या गेला. पं. विष्णू दिगंबर पलुस्करांच्या पुण्यतिथीचे वेध लागले की कार्यक्रमाच्या तयारीसाठी आम्हा विद्यार्थ्यांची लगबग सुरु होत असे. वय काहीही असो, पण प्रत्येक विद्यार्थ्याने पंडितजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी काही ना काही सादर केलेच पाहिजे अशी आमच्या गुरुजींची आज्ञा होती व ती मोडण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. पुण्यतिथीचे कार्यक्रम कमीत कमी तीन दिवस चालत व त्या काळातील अनेक प्रतिथयश गायक त्यांची सेवा अर्पण करण्यासाठी आवर्जून हजेरी लावत. त्यांची सरबराई करण्याचं काम आम्हा विद्यार्थ्यांकडे असायचं.
गायनशाळेच्या प्रवेशद्वारावर तोरण लावण्याची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी सुतळीची शोधाशोध सुरु केली, पण शाळेत ती कुठेही न सापडल्यामुळे गुरुजींच्या घरी जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. गायनशाळेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरुजींच्या घरी मी पोहोचलो तेव्हा मला जे दृश्य दिसलं ते इतक्या वर्षांनंतर आजही पूर्ण तपशिलासह माझ्या डोळ्यासमोर तरळतं आहे. पांढरा पायजामा, पांढरा पूर्ण बाह्यांचा शर्ट व पायात चामड्याच्या अगदी साध्या चपला असा वेश धारण केलेल्या दोन व्यक्ती एका बेंचवर खाली मान घालून बसल्या होत्या आणि गुरुजी त्या दोघांवर खूप चिडले होते. त्यांच्या चिडण्यामागचं कारण कळण्याचं माझं वय नव्हतं. ते दृश्य बघून गुरुजींना सुतळी मागण्याची माझी काही हिम्मत झाली नाही आणि मी आल्या पावली परतलो.
मित्रांनो, नागपुरातील सीताबर्डी मेन रोडवर असलेल्या त्या गायनशाळेचं नाव होतं श्रीराम संगीत विद्यालय. शिस्तीचे भोक्ते असलेले आमचे आदरणीय गुरुजी होते पं. शंकरराव सप्रे आणि ज्यांना गुरुजी अधिकारवाणीने रागावत होते त्या दोन व्यक्ती होत्या पं. भीमसेन जोशी व डॉ. वसंतराव देशपांडे !
-- श्रीकांत पोहनकर
९८२२६ ९८१००
October 22, 2016
चेतन आनंद हे देव आनंद आणि विजय आनंद यांचे जेष्ठ बंधू. त्यांचा जन्म ३ जानेवारी १९२१ रोजी लाहोर येथे झाला. देव आनंद आणि त्यांचे बंधू यांनी अनेक संस्मरणीय चित्रपट निर्माण करून ठेवले आहेत. अॅडव्होकेट पिसोरिलाल आनंद घराण्यात जन्मलेला चेतन आनंद यांनी लाहोर शासकीय महाविद्यालातून शिक्षण पूर्ण केल्यावर ते डेहराडूनचा डून स्कूलमधे शिकवू लागले. कथालेखनाची आवडच असल्याने त्यांना त्यांच्या कथेवर चित्रपट बनवण्याचा ध्येयाने मुंबईत घेऊन आली. त्यांची सम्राट अशोकवरील कथा ऐकून त्यावर चित्रपट बनण्याऐवजी दिग्दर्शक फणी मुजुमदार यांनी या देखणा, शार्प तरुणाला त्यांचा राजकुमार चित्रपटात नायकाची भूमिका ऑफर केली. अन अशाप्रकारे लेखक बनण्यास आलेले चेतन आनंद १९४४ साली राजकुमार या चित्रपटाचे नायक बनले. हा चित्रपट जरी तिकिटाचा खिडकीवर क्लीक झाला नाही तरी निराश न होता त्यांनी आता पटकथा लेखनाबरोबर दिग्दर्शनही करायचे ठरवले अन त्यातूनच ’नीचानगर’ या चित्रपटाची निर्मिती झाली. ज्यामुळे अभिनेत्री कामिनी कौशल पुढे आल्या. १९४६ मधील चेतन आनंद यांचा या चित्रपटाला आंतरराट्रीय कान्स चित्रपटमहोत्सवात सर्वोत्कृट चित्रपटाचा जागतिक सन्मान मिळाला. ज्याला प्रख्यात सतारवादक पं.रवीशंकर यांचे चे संगीत होते. आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपटमहोत्सवाचे नामकरण पुढे ग्रॅण्ड प्रिंक्स असे झाले. चेतन आनंद हे हाडाचा दिग्दर्शक होते. पुढे चित्रपटात काम करण्याच्या इराद्याने आलेला देव आनंदने आपला थोरला भावाच्या मदतीने १९४९ साली निर्मिती क्षेत्रात पर्दापण करुन नवकेतन चित्रसंस्थेची रीतसर स्थापना करुन या बॅनरतर्फे आपला ’अफसर’ याचित्रपटाची निर्मिती केली. ज्यात त्याच्याबरोबर सुरैया नायिका होती व चेतन आनंदचे दिग्दर्शन होते. हा चित्रपट चांगला चालला. ज्यामुळे प्रोत्साहित होऊन चेतन आनंद यांनीच नंतर नवकेतनचा ’टॅक्सी ड्रायव्हर’ आणि ’आँधिया' या चित्रपटाची निर्मिती केली. या दोन्ही चित्रपटांपैकी ’टॅक्सी ड्रायव्हर’ला चांगले यश मिळाले. नंतर मग गीताबालीसह नवकेतनचाच फंटुश हा देव आनंदचा चित्रपटही चेतन आनंद यांनीच दिग्दर्शित केला.
आपल्या कथाकल्पनेशी विचारांशी एवढेच नव्हे तर जीवनविषक तत्वज्ञानाशी एकनिष्ठ अन प्रामाणिक राहणाऱ्या चेतन आनंद यांचे पुढे नवकेतनशी जमू शकले नाही. कारण त्याच्याकडे देवआनंद सारखा पूर्णत: व्यावसायिक दृटिकोन नव्हता. तिकिटाचा खिडकीशी तडजोड ते कधीच करत नसल्याने अल्पावधीतच ते नवकेतनशी फारकत घेउन ते वेगळे झाले. एक उत्तम प्रतिभा शाली विचारवंत व सृजनशील दिग्दर्शकाचे त्याच्या विचारसरणीच्या आग्रहीपणामुळे कुणाशीच तसे पटणे अवघड होते. त्यांनी स्वत:ची स्वतंत्र चित्रसंस्था निर्माण केली. अन त्यांनी निर्मिलेला आणि दिग्दर्शित केलेला त्यांचा गाजलेला व नावाजलेला पुरस्कारप्राप्त चित्रपट म्हणजे १९६२ चा चिनी आक्रमणावर बेतलेला "हकीकत " हा चित्रपट होय आजच्या भाषेत त्यात तत्कालीन सर्व आघाडीचे व नवोदित कलाकार असल्याने तो मल्टीस्टार असूनही त्यात कलाकारांपेक्षा परिस्थितीला महत्व होते. बलराज सहानी, संजय, धम्रेद्र, जयंत, प्रिया राजवंश, विजय आनंद सारखे कलाकार व मदनमोहन यांची एकसे बढके एक सुरेल सुमधुर अजरामर गाणी. ज्यात 'कर चले हम फिदा जानेमन साथियो" या गाणाचा राट्रीय गीतांचा सन्मान मिळाला. या चित्रपटासाठी ते कितीतरी दिवस तयारी करत होते. याच दरम्यान देव आनंद "गाईड" चित्रपटाची तयारी करत होते अन या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा थोरला भावाने चेतन आनंद यांनी करावे अशी देवसाहेबांची उत्कट इच्छा होती. पण हकिकत चित्रपटाचे लडाख लेह भागात चित्रिकरणास नेमकी त्याच वेळेस संरक्षण खाताने परवानगी दिली. अन चेतन यांनी आपला "हकिकत" या ड्रीम प्रोजेक्टला सर्वोच्च प्राधान देत गाईड दिग्दर्शित करणास नकार दिला. पण "हकिकत" हा भव्य कृष्ण धवल चित्रपट सुरु करणापूर्वी त्यांनी "किनारे किनारे "हा जयदेव यांचा फक्त संगीतामुळे स्मरणात राहिलेला देवआनंद मिनाकुमारीचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यांच्या हिमालय प्रॉडक्शन हाउसतर्फे त्यांनी 'हकिकत'नंतर "आखरी खत",हसते जख्म, हिररांझा, हिंदुस्थानकी कसम, कुदरत, हाथोकी लकिर आदि चित्रपट निर्माण केले ज्यामध्ये केवळ प्रिया राजवंश हीच नायिका असायची. चेतन आनंद यांनी त्यानंतर जवळपास दशकभरानंतर ‘हिंदुस्थान की कसम’ या युद्धपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले. पण मदन मोहन यांचे संगीत वगळता त्या चित्रपटात फारसा थरार नव्हता. त्यांच्या अखेरच्या पर्वात त्यांनी "जानेमन व साहेबबहादूर हे त्यांच्या नावलौकिकाला न शोभणारे चित्रपट दिले. "परमवीर चक्र" ही त्यांची दूरदर्शन मालिकाही याच काळात त्याना चांगले यश देउन गेली.
नवकेतनचा "कालाबाजार"मधे प्रथमच चेतन आनंद, विजय आनंद व देव आनंद हे तिघे बंधू एकत्र चमकले. ज्यात चेतन आनंद यांनी एका निष्णांत वकिलाची भूमिका केली होती. तर गोल्डीने एका पळपुट्या प्रियकराची ..
चेतन आनंद हे त्यांच्या’ हकीकत’ या सिनेमासाठी या कथेला सूट होईल अशी नायिका ते शोधत होता. योगायोगाने गाठ पडलेल्या प्रिया राजवंश यांचे व्यक्तीमत्व त्याला खूप भावलं. त्यांनी थेट तिच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या सिनेमासाठी साईन केले. याचकाळाच चेतन आनंदच्या विवाहित आयुष्यात ब-याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याची पत्नी उमा पासून ते विभक्त झाला होते. प्रिया राजवंश यांनी केवळ अभिनयच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद आणि संकलन या सर्व कामात चेतन आनंद यांना मदत केली. त्यामुळे हकीकतच्या चित्रीकरणादरम्यान या दोहोंत जवळीक वाढली. त्या दोघांच्या वयात बावीस वर्षांचे अंतर असूनही त्यांचे एकमेकावर निस्सीम प्रेम केले. वयातले अंतर त्यांच्या प्रेमात अडसर ठरले नाही. चेतनचे तिच्यावर प्रेम असले तरी इंडस्ट्रीत त्यांच्या नात्यास त्याने चर्चेचा विषय होऊ दिले नाही. त्या दोघांचाही लुक काहीसा ऑफबीट असल्याने त्यांच्या जोडीत विजोडपणा कधी वाटला नाही. ‘हकीकत’नंतर प्रिया आणि चेतन एकत्र राहू लागले होते. या दोघांनी लग्न केले नाही. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांना पती-पत्नी म्हणूनच ओळखले जात होते. ‘हकीकत’नंतर प्रिया राजवंश यांना अनेक ऑफर आल्या. चेतन आनंद यांनी हयात असेपर्यंत त्याच्या प्रत्येक चित्रपटात प्रिया राजवंश यांना रोल दिले. चेतन आनंद यांनी हकीकत, आखरी खत, हीर राँझा, हसते जख्म असे चित्रपट दिले. चेतन आनंद यांचे चिरंजीव केतन आनंद यांनी टूटे खिलौने हा चित्रपट आणि काही लघुपट तयार केले. चेतन आनंद यांच्या सर्व चित्रपटाना मदनमोहन यांचे संगीत व कैफी आझमी यांची गीतरचना असे. त्यांचे चित्रपट अत्यंत तरल,भावदर्शी व वास्तवाचे भान न हरपू देताही विलक्षण काव्यात्मक असत. मग तो "हिर रांझा"असेल वा "हसते जख्म..नीचानगर त्यांच्या "हकिकत"या चित्रपटाला १९६५ मधे सर्वोत्कृट चित्रपटाचा व्दितीय क्रमांकाचा राट्रीय सन्मान मिळाला. चेतन आनंद यांचे ६ जुलै १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ दिलीप कुकडे
January 4, 2018
आज ८ ऑक्टोबर. देवरुख येथील 'मातृमंदिरच्या मावशी ऊर्फ मा.इंदिराबाई हळबे यांची पुण्यतिथी.
इंदिराबाई हळबे या समाजसेविका होत्या. इंदिराबाई रघुनाथ तथा मावशी हळबे मूळच्या रत्नागिरीतील केळय़े-मजगावच्या, पूर्वाश्रमीच्या चंपावती वासुदेव खेर-कुलकर्णी. प्रचंड गरीबीमुळे अवघ्या ४ इयत्तेपर्यंतचेच शिक्षण झालेल्या मावशींचे वयाच्या १३ वर्षीच लग्न झाले. लग्नानंतरचा काही काळ सुखात जात असतानाच त्यांना दुदैवाने वेढले. लग्नानंतर अवघ्या १० वर्षात त्यांना वैधव्य आले, त्यातून सावरत असतानाच त्यांना अपत्य वियोगाचे दुखही पेलावे लागले. मात्र या धक्क्यातून खचून न जाता आपली मुलगी मीनाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्यांनी नर्सिंग शिकण्याचा निर्णय घेतला. आपल्या एकाकी आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी वाहून घेतले. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात इंदिराबाई हळबे यांनी देवरूखसारख्या ग्रामीण भागात राहून रूग्णसेविकेसारखा खडतर कोर्स पूर्ण केला.
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख गावी १९५४ साली त्यांनी 'मातृमंदिर' ही संस्था स्थापली. समाजसेवेसाठी आणि गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरविता याव्यात यासाठी दोन खाटांच्या प्रसूतिगृहाने मातृमंदिरची सुरवात केली. मावशींच्या धडाडीने प्रभावित होऊन देवरुखच्या लक्ष्मणराव राजवाडेंनी आपली २४ एकर जागा मावशींना सामाजिक कार्यासाठी मोफत दिली. या जागेतच मातृमंदिररुपी रोपटयाचा महाकाय वृक्ष आज विस्तारला आहे. ग्रामीण दुर्गम भागात कार्यरत असताना अनाथ मुलांची होणारी परवड नजरेत आल्यावर त्यांनी गोकुळ या अनाथालयाची स्थापना केली. मुलांवर चांगले संस्कार रुजविण्यासाठी वाचनालयासह होतकरुंना चांगले शिक्षण घेता येण्यासाठी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. शिक्षणाचे महत्व तळागाळात पोहोचवण्यासाठी बालवाडय़ांची निर्मिती झाली. ग्रामीण भागातील वीज-रहदारीचे प्रश्न विचारात घेऊन ग्रामविकास हा व्यापक दृष्टीकोन विचारात घेऊन त्यांनी शेती, मृदसंधारण, वनीकरण व पाणलोटक्षेत्र विकासाचे कार्य उभारले. तालुक्यातील महिलांच्या व शेतकऱयांच्या आजच्या प्रगतीचे सार या प्रयत्नांमध्ये सामावले आहे. तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञानाने होणारी शेती, शेतकऱयांचे उंचावलेले जीवनमान, आरोग्य-पाणी-स्वच्छतेविषयी झालेली जाणीवजागृती, महिलांमध्ये नेतृत्वासाठी निर्माण झालेला आत्मविश्वास यासर्वासाठी मातृमंदिरचे योगदान निश्चितच मोठे राहिले आहे.
बचत-पाणी-शेती-वनीकरणाचे ६० वर्षांत हजारो प्रयोग संस्थेने यशस्वी केले आहेत. विविध परदेशी संस्थांशी तांत्रिक सहकार्य करत येथील शेतकऱयाला अधिकाधिक ज्ञानाने समृध्द बनवून त्यांचे जीवनमान उंचावले आहे. श्रमप्रतिष्ठेचे मर्म समजावून देत नैसर्गिक जाद्धूद्बूरह्नर्द्ब व छोटय़ा नळपाणी पुरवठा योजना आखून तालुक्यातील मोठा पाणी प्रश्न संस्थेने हलका करुन आपला लोकचळवळीचा विशेष पर्टनच तयार केला आहे. त्यामुळेच संस्थेचा उल्लेख आज ग्रामविकासाचे विद्यापीठ या आदराने होताना दिसतो. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र, उद्यानपंडीत या मानांच्या पुरस्कारांसह महाराष्ट्र राज्य सिंचन परिषदेचा विशेष सन्मानही संस्थेने मिळवला आहे.
गेल्या ५६ वर्षांत देवरूख येथील मातृमंदिर संस्थेचा विस्तार विविध क्षेत्रात झाला. रुग्णालयाच्या बरोबरीने शेती, बचत गट, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अनाथालय, पाणीपुरवठा, ग्रामीण विकास आणि शेती विद्यालय अशा क्षेत्रांत संस्थेने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. मा.इंदिराबाई हळबे ८ ऑक्टोबर १९९८ यांचे निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
संपर्क :- 02354-241056
विजय नारकर, मातृमंदिर संस्था
October 8, 2016
प्रामुख्याने विज्ञान विषयावर लिहिणाऱ्या घाटे यांनी एकीकडे स्त्री-पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध घेणाऱ्या ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’ किंवा सेक्सबद्दल गैरसमज दूर करणाऱ्या ‘सेक्सायन’सारख्या पुस्तकांबरोबरच, दुसरीकडे युद्धकथा सांगणाऱ्या ‘रणझुंजार’ आणि लोकप्रिय लेखकांच्या आत दडलेल्या काही विक्षिप्त आणि विचित्र स्वभावाच्या माणसांवर प्रकाश टाकणारं ‘लोकप्रिय साहित्यिक’ सारखी पुस्तकंही लिहिली आहेत.
July 1, 2022
भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त भागीदारीतून फिनोलेक्स प्लॅसन लि. ही कंपनी त्यांनी स्थापन केली. इस्रायलबरोबर उद्योगाची भागीदारी करणारी फिनोलेक्स ही देशातील पहिली कंपनी ठरली.
March 12, 2022
आत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी – १० चरणांची कविता – हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.
June 8, 2011
(1884 - 1937)
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचं अवजड -अवघड कार्य केतकरांनी पूर्ण केलं, हे त्यांचं ठळक योगदान म्हणायला हवं. पण याशिवाय केतकर समाजशास्त्रज्ञ, इतिहाससंशोधक आणि कादंबरीकार होते.
इ.स. 1911 साली अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठांची पदवी त्यांनी मिळवली. `द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया` ही त्याची पदवी त्यांनी मिळवली. `द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया हा त्यांचा विषय होता. यात या विषयावरचे अनेक मूलभूत विचार त्यांनी मांडले आहेत. भारतीय सर्थशास्त्र आणि कायदा याचाही त्यांचा अभ्यास होता.
1915 साली तेवीस भागांच्या ज्ञानकोशाचं काम त्यांनी हाती घेतलं विशेष आर्थिक पाठबळ नसताना, आणि इतर संशोधकलेखकांची मदत नसतानाही हे मोठं कार्य त्यांनी चौदा वर्षात पूर्ण केलं. या कोशाच्या लिखाणापासून ते छापून घेण्यापर्यंत अनेक अडथळे आले. अखेरीस स्वतचाच छापखाना काढून त्यांनी ज्ञानकोश छापून घेतला. छापखान्यासाठी `लिमिटेड कंपनी`चा अभिनव प्रयोग केतकरांनी केला. या सार्या खटाटोपांचं वर्णन `माझे बारा वर्षाचे काम ऊर्फ ज्ञानकोश मंडळांचा इतिहास` यात त्यांनी केलं आहे.
`गोंडवनातील प्रियंवदा`, `ब्राम्हणकन्या` या त्यांच्या काही कादंबर्या आहेत. `महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण` यात वाड्गमयीन तर निशस्त्रांचे राजकारण`, `व्हिक्टोरिअस इंडिया` या दोन गंथांत राजकीय मतं प्रगट केली आहेत.
साहित्यातून त्यांनी सुधारणावादी विचार मांडला. त्यांचं वैयक्तिक जीवनही इतर चारचौघांपेक्षा निरांळ होतं. एका जर्मन ज्यू स्त्रीला विधिवत हिंदू धर्मात आणून तिच्याशी केतकरांनी विवाह केला होता. अपत्य नसल्यामुळे दोन अनाथ मुलांनाही सांभाळलं.
कोणतीही अत्याधुनिक साधनं. मदत हाताशी नसताना फक्त चौदा वर्षात ज्ञानकोश पूर्ण करणारे केतकर `ज्ञानकोशकार` म्हणूनच प्रामुख्याने प्रसिध्द आहेत.
March 11, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti