(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुप्रसिद्ध रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर

    भालचंद्र पेंढारकर शिस्तीचे भोक्ते होतेच परंतु त्यांची रंगभूमीवर अमाप श्रद्धा होती. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच होणार आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरु करणारा एकमेव निर्माता आणि अभिनेते ते होते. मुबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवली आहेत.

      December 9, 2021


  • अनुताई बाळकृष्ण वाघ

    अनुताई वाघ ह्या आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ञ अशी ख्याती असलेल्या समाजसेविका.

    त्या पुण्यातील हुजूरपागा शाळेत १३ वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. महात्मा गांधीजींच्या “खेडयाकडे चला” या आदेशाने प्रेरित होऊन १९४५ साली ग्रामसेविकांच्या शिबिरात दाखल झाल्या. तेथे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली. बोर्डी येथे बालवाडीत शिक्षिका म्हणून अनुताईंनी काम केले. त्याकाळात बालवाडीत मुले येत नसल्यामुळे अनुताईंनीच मुलांच्या अंगणात जायचे ठरवले. त्यातूनच आंगणवाडी या संकल्पनेचा जन्म झाला.

    १९५६ पासून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शिक्षणकार्य केले. विशेष म्हणजे आजूबाजूच्या परिसराला जुळतील अशी बडबड गीते त्याचबरोबर “कोसबाडच्या टेकडीवरून” , “कुरणशाळा” , “टिल्लूची करामत”, अशी पुस्तके लिहिली. तसंच शिक्षण पत्रिका या मासिकाचे संपादन देखील केले.

    अनुताई वाघ यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार, दलित मित्र, आदर्श माता, सावित्रीबाई फुले बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आशा भोसले पुरस्कार, रमाबाई केशव ठाकरे या पुरस्कारांसोबतच भारत सरकारच्या “पद्मश्री” या किताबाने देखील सनमानित करण्यात आले होते.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      January 3, 2015


  • संगीतकार सी.अर्जून

    अर्जुन चंदीरामानी हे सी. अर्जून यांचे नाव. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. सी.अर्जुन म्हणजे बुलो सी रानी या सिंधी संगीतकाराचा सहायक. वडील गायक त्यामुळे घरचं वातावरण संगीताला पोषक. सी. अर्जून १९६० सालापासुन चित्रपट सृष्टीत कार्यरत होते. १९६० साली रोड नं. ३०३ या चित्रपटाने त्यांची सुरुवात झाली. ‘पास बैठो तबीयत मचलं जायेगी’ १९६४ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुनर्मिलन’ चित्रपटातील हे त्यांचे सर्वात गाजलेले गाणे. पुनर्मिलन मधील तशी सर्वच गाणी उत्तम होती. परंतु बी ग्रेड चित्रपटामुळे या चित्रपटाला मर्यादित लोकप्रियता लाभली. त्यानंतर त्यांचा आला ‘सुशीला’ नावाचा चित्रपट १९६६ साली. यातील रफी व तलतच्याही आवाजातील गीत ‘गमकी अंधेरी रात में दिलको न बेकरार कर सुबह जरुर आयेगी सुबह का इंतजार कर’ ऐकताना निराश मनाला उभारी कशी येते ते आपण अनुभवले असेलच.

    सी. अर्जुन यांनी उत्तरार्धात ‘जय संतोषी मॉं’ चित्रपटातील आरती, ‘मैं तो आरती उतारूँ रे’ हे गाणे अजरामर केले. सी. अर्जुन त्या चित्रपटाचे संगीतकार होते. ‘मैं अभी गैर हूं, मुझको अभी अपना ना कहो..’ हे मुकेश-आशाचं, ‘मैं और मेरा भाई’ मधील ही पण गाणी गाजली. हिंदी चित्रपटांबरोबर त्यांनी काही गुजराथी व एका सिंधी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले होते. मा. सी. अर्जून यांचे ३० एप्रिल १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    सी. अर्जून यांची काही गाणी
    आये हो तो जाना का
    मैं तो आरती उतारूँ रे
    पास बैठो तबीयत बहेल जायेगी
    ग़म की अंधेरी रात में

      April 30, 2017


  • अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर

    महेश मांजरेकर यांनी लेखन व भुमिका केलेला ’मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ हा मराठी चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर त्यांनी ”शिक्षणाच्या आईचा घो”, ”लालबाग परळ”, ”फक्त लढ म्हणा”, ”काकस्पर्श” आणि ”कोकणस्थ” या चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याची महत्वाची कामगिरी केली.

      August 17, 2017


  • श्रीकांत खाडे (बाळू)

    श्रीकांत खाडे (बाळू)

    श्रीकांत खाडे (बाळू) यांना २०१३ या वर्षाचा राज्य शासनाच्या विठाबाई नारायणगावकर पुरस्काराने तसेच वाई येथील लालासाहेब खुडे राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर काळू-बाळू जोडीला तमाशाकलेतील योगदानासाठी १९९९-२००० सालांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार संयुक्तपणे देऊन सन्मानित करण्यात आले होते.

      May 24, 2014


  • माझी माणसं – तात्या सोमण

    आपल्या आयुष्यात कोण याव हे बहुदा नियतीच्या हाती असाव . ते आपल्या हाती जरी असते तरी आपण , जी माणसे नियतीने आपल्या पदरात टाकलीत त्या पेक्षा उत्तम आपल्याला निवडता आली असती का नाही कोणास ठाऊक ?

      December 23, 2017


  • चित्रकार रायबा

    रायबा यांची जुन्या मुबईचे चित्रण असलेली चित्रमालिका खूप लोकप्रिय झाली. त्यांनी कॅनवासच्या ऐवजी ज्यूट म्हणजे पोत्याचा वापर केला. त्यांनी काहीसे भडक रंग वापरून ती चित्रे रंगवली होती. त्यातून मुबईचे बहुरंगी स्वरूप प्रकट होत असे. ज्यूट आणि कॅनव्हासवर चित्रे काढता काढता त्यांनी म्युरल्स म्हणजे काचेवरील चित्रे काढायला सुरवात केली. त्यांची अनेक म्युरल्स एअर इंडिया , सिडनी विमातळावर , अशा अनेक ठिकाणी आहेत . इजिप्तच्या म्युझियममध्ये रायबांची चित्रे जशी पाहायला मिळतात तशी ती नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक संग्रहालयात आणि महाराष्ट्रात नागपूर येथेही आहेत.

      April 5, 2021


  • अमेरिकेतील लोकप्रिय गायक एल्व्हिस प्रिस्टले

    गिटारवादक, अभिनेता आणि 'किंग ऑफ द रॉक अँड रोल' एल्व्हिस प्रिस्टले यांचा जन्म ८ जानेवारी १९३५ रोजी झाला. कॉलेज शिक्षणासाठी ट्रक चालकाचं काम करण्याऱ्या एल्व्हिस यांनी एका ठिकाणी गायक म्हणून 'ऑडिशन' दिली पण त्यात तो नापास झाला. परीक्षकाने त्याला तुझ्यासाठी ट्रक ड्रायव्हरचीच जागा योग्य आहे असा अनाहूत सल्लाही दिला. यानंतर काही महिन्यातच हा मुलगा आणखी एका ऑडिशनसाठी गेला. यावेळी ही त्याची भट्टी काही जमत नव्हती. दिवसभर प्रयत्न करून थकलेला हा मुलगा शेवटी शेवटी पार कंटाळला पण इतर वादकांनी ब्रेक घेतला असताना आपल्या गिटारवर एकटाच गाऊ लागला. 'आर्थर कृडूप'चं ते मूळ गाणं हा मुलगा पार वेगळ्या ढंगात आणि जलद लयीत गाऊ लागला नि म्युझिक रूम मध्ये जणू विजेचा झटका बसल्यासारखं होऊन एक उत्फुल्ल वातावरण निर्माण झालं. इतर वादकांनी क्षणात याला साथ द्यायला सुरुवात केली आणि हे मूळचं संथ गाणं निराळ्याच आवेशात रेकोर्ड झालं. हे गाणं पहिल्यांदा 'रेडिओ'वर वाजवलं जाताच लोकांनी 'रेडिओ स्टेशन'वर फोन करून गायकाची चौकशी करायला सुरुवात केली. सर्वांना उत्सुकता होती की हा कोण नवा कृष्णवर्णी गायक आलाय. आणि जेव्हा त्यांना कळलं की नवीन गायक गौरवर्णी आहे पण याचं संगीत नि गायन मात्र 'ब्लूज-गोस्पेल' ढंगातलं आहे, त्यांचा विश्वासच बसेना.

    रेडिओवर या मुलाच्या मुलाखती प्रसारित होऊ लागल्या आणि त्यात मुख्यत्वाने त्याच्या शाळा आणि कॉलेजबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ लागले की ज्यातून त्याचं गौरवर्णत्व सिद्ध व्हावं. गौर आणि कृष्ण दोन्ही वर्णीयांमध्ये हा मुलगा प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या सांगीतिक आणि गायकी ढंगालाच पुढे 'रॉक एन रोल' अशी संज्ञा मिळाली. हा मुलगा होता 'द किंग' या नावाने नंतर ओळखला गेलेला 'एल्व्हिस प्रेस्ले' आणि ते गाणं होतं "That's All Right, Mama".

    १९६० च्या दशकात अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये पुकारलेल्या युद्धावर जाण्यासाठी 'एल्व्हीस'चे नावही लष्करात दाखल होण्यासाठी पुढे आले. यावेळी तो चांगलाच लोकप्रिय होता. आपल्या लोकप्रियतेच्या आश्रयाने तो स्वत:ला अपवाद म्हणून लष्कराच्या सेवेतून स्वत:ची सुटका करून घेऊ शकला असता पण त्याऐवजी त्याने सैन्यात दाखल होणे मान्य केले. सैन्यात २ वर्ष सेवा करून तो परत अमेरिकेत दाखल झाला. या २ वर्षांच्या काळातच फ्रायबर्ग, जर्मनी इथे त्याची भेट 'प्रिसिला बिलिव'शी झाली आणि तिच्याशी त्याने ७ वर्षांनंतर लग्न केलं. एल्व्हिस प्रिस्लेची मुलगी लिसा मेरी हिच्याशी मायकेल जॅक्सननं मे १९९४ मध्ये विवाह केला. 'एल्व्हिस' यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाणी या 'रॉक एण्ड रोल' संगीतात दिली किंबहुना त्याच्यासाठीच गीतकारांनी लिहिलेली गाणी आता खास त्याचीच म्हणून गणली जातात. यातलं संगीत, गायन आणि सादरीकरण हे 'एल्व्हिस' स्टाईलचंच आहे.

    मूळ 'जॉर्ज वाईस', 'ह्युगो पेरेत्ती' आणि 'लुइगी क्रियेटर' यांनी लिहिलेलं गाणं १९६१ साली 'एल्विस'ने गायलं आणि काही दिवसातच लोकप्रियतेच्या कळसाला पोहोचलं. या गाण्यातला 'एल्विस'चा आवाज, त्याची गायकी, हे गाणं म्हणताना त्याचा स्टेज वरचा वावर, त्याचे झ्याक प्याक कपडे, त्याचं ते पार डोळ्यात बघण सारं सारं जबरदस्त होतं. पुढे अनेक वर्ष तो आपल्या कार्यक्रमाची सांगता या गाण्याने करायचा. 'एल्विस' यांचे एक गाणं आहे, "Jailhouse Rock".

    'जेरी लिबर' आणि 'माईक स्टोलर' यांनी लिहिलेलं हे परफेक्ट 'रॉक एन रोल' गाणं 'एल्विस'ने झकास गायलेलं आहेच पण याच नावाच्या त्याच्या चित्रपटात त्याने हे त्याच्या स्वत:च्या नृत्यशैलीत सादरही केलेलं आहे. 'लष्करी सेवेनंतर 'एल्व्हिस' यांनी आपलं करीअर पुन्हा सुरु केलं. संगीत, काव्य याबरोबरच त्यांनी अनेक सिनेमांमध्येही कामं केली. व्हिएतनाम युद्धापूर्वीपेक्षाही नंतर त्यांची लोकप्रियता कैक पटीने वाढली. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेकदा सलग दीड-दोन वर्षांचे संगीत दौरे त्याने केले. याच दरम्यान सिनेमातील कामंही होतीच. मा.एल्व्हिस प्रिस्टले यांचे १६ ऑगस्ट १९७७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    'द किंग' एल्व्हिस प्रिस्लेची काही गाणी.
    http://www.youtube.com/watch?v=zRu3tw9fYxE&feature=related
    http://www.youtube.com/watch?v=-rS55BtfNtI&feature=related
    http://www.youtube.com/watch?v=e1s-E1WWipc

      January 8, 2018


  • जेष्ठ संगीतकार वसंत देसाई

    वसंत देसाई यांचे बालपण कोकणात गेले. त्यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सोनवाड, सावंतवाडी येथे झाला. काही तरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना कोल्हापुरात घेऊन आली. कोल्हापुरात प्रभातमध्ये असतांना पडेल ते काम करीत असत. त्यांचे आयुष्य घडण्याला येथेच सुरुवात झाली. देवल क्लबमधे असतांना अल्लादियां खॉं व मंजी खॉं यांसारख्याचे गाणे ऐकून त्यांचे कान तयार झाले. अयोध्येचा राजा तील पहिली नांदी ही नाटकातल्या नांदीप्रमाणे होती. या नांदीमध्ये वसंत देसाईंचा आवाज होता. म्हणजेच बोलपटांची सुरुवात देसाईंच्या आवाजाने झाली असे म्हणता येईल. त्यांनी सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गीते गायली.

    प्रभातमध्ये संगीत, पार्श्र्वसंगीत देण्यास सुरुवात झाली होती. संत ज्ञानेश्र्वरमधील गाडीवानाची भूमिका, संगीतासाठी बैलांचे खूर व बैलगाडीचा आवाज, विविध पक्ष्यांचे आवाज, ग्रामीण वाद्यांचा सुयोग्य वापर... वसंत देसाई यांच्या कारकीर्दीतील अशा अनेक गोष्टी सांगता येतील. केशवराव भोळे, गोविंदराव टेंबे, कृष्णराव हे प्रभातचे सुरुवातीचे संगीत दिग्दर्शक. त्यांच्या हाताखाली वसंत देसाई तयार झाले. पुढे ते शांतारामबापूंबरोबर राजकमलमध्ये आले. त्यांच्या पहिला स्वतंत्रपणे संगीत दिलेला चित्रपट होता नायिका जयश्रीचा शकुंतला(हिंदी).

    राजकमलच्या ह्या शकुंतलाने उत्पन्नांचे सर्व रेकॉर्डस् मोडले. पहिला तमाशाप्रधान चित्रपट राम जोशी मधील ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या लावण्यांना वसंतरावांनी फक्कड चाली दिल्या. कवी होनाजी बाळा यांच्या जीवनावर काढलेल्या `अमरभूपाळी' ह्या चित्रपटातील घन:श्याम सुंदरा ही भूपाळी अप्रतिम स्वररचनेमुळे खरोखरच अमर झाली आहे.

    अभिजाततनेने ओतप्रोत भरलेल्या नृत्यांवर आधारित झनक झनक पायल बाजे चे संगीत वसंत देसाईंनी अजरामर केले आहे. त्यांनी त्यासाठी भारतांतील वेगवेगळ्या प्रांतांमधे प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा अभ्यास केला. पं. शिवकुमार शर्मा, पं. सामताप्रसाद, सुदर्शन, गोपीकृष्ण व मृदुंगवादक रामदास या सर्वांना त्यांनी राजकमलमध्ये पाचारण केले. झनक झनकने अफाट यश संपादन केले. त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. आचार्य अत्रे यांनी १९५६ मध्ये काढलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे संगीत वसंत देसाईंचे होते. कवी यशवंत यांची आई ही अतिशय भावूक, करुण कविता त्यांनी स्वरबद्ध केली. श्यामची आई मध्ये ६ गाणी होती. मराठमोळे वातावरण निर्माण करणारे अप्रतिम पार्श्र्वसंगीत त्यांनी या चित्रपटास दिले. म्हणूनच या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा वसंतरावांकडे जातो.

    वसंत देसाईंनी एकूण २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. छोटा जवान मधील माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू हे गाणे किंवा मोलकरीण मधील देव जरी मज, दैव जाणिले कुणी ही गाणी सर्वश्रृत आहेत. इये मराठीचिये नगरीतील गीतांसाठीचे संगीतही प्रसंगानुरूप होते. त्यांनी पाठ्यपुस्तकांतील अनेक कवितांना या बाई या, देवा तुझे किती, माझ्या मामाची रंगीत गाडी, लेझिम चाले जोरात, घाल घाल पिंगा वार्या, आनंदी आनंद गडे इत्यादी कवितांना - सोप्या, सुंदर चाली दिल्या. शास्त्रीय रागांवर आधारीत असंख्य गाणी त्यांनी हिंदी -मराठीतून दिली. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी चित्रपट माध्यमात आणले.

    वसंत देसाई यांनी ‘गुड्डी’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं ‘हमको मनकी शक्ती देना’ हे प्रार्थना गीत गेली अनेक वर्षे देशभरातल्या शाळांमधून गायले जाते. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये वाणी जयराम प्रसिद्ध झाल्या. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची आहे.

    ‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ’जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. १९४२ ते १९७६ या कालावधीत मा.वसंत देसाई यांनी एकूण ४६ चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. वसंत देसाई हे १९७३ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. हिंदी व मराठी चित्रपटांमधे स्वत: गायलेली उत्तम गाणी त्यांनी दिली.

    १९६० ते १९७५ मध्ये संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून त्यांना संगीत दिले. त्यांनी १३ लघुपटांनाही संगीत दिले. वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’ या नावाने पुस्तक लिहून श्री.विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. www.vasntdesai.com या वेब साईटवर वसंत देसाई यांची गाणी,माहिती व फोटो आहेत.

    वसंत देसाई यांचे २२ डिसेंबर १९७५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 26, 2017


  • दादा गावकर

    गावकर, दादा
    लोकसंस्कृतीमध्ये अश्वत्थाचा पट नावाचं एक व्रत आहे. पिंपळाच्या पाच प्रकारच्या पानांचं पूजन या व्रतात केलं जातं. त्यातलं हिरवं पान असतं सौंदर्यासाठी, कोवळं पान असतं नवजात पुत्रासाठी, पिकलेलं पान असतं पतीच्या दीर्घायुष्यासाठी, वाळलेलं पान असतं सुख-समृद्धीच्या वृद्धीसाठी आणि फाटलेलं पान असतं अमर्याद संपत्तीसाठी. आपल्या कार्याप्रती अविचल निष्ठा असणाऱ्या आणि संघसंस्कारांनी भारल्या गेलेल्या भिवा केशव तथा दादा गावकर नावाच्या गिरणगाववासीयानं गेल्या साठ-पासष्ट वर्षांत हे व्रत कधी केलं असावं अशी शक्यताच नाही,

    पण त्यानं ऐकलेली ‘पिंपळपानांची सळसळ’ मात्र आयुष्याच्या प्रवासाची धगधगती आणि रोमांचकारी कथानकं रेखाटती ठरली. कोकणच्या लाल मातीत जन्माला आलेला हा मुलगा आपल्या वाटय़ाला आलेलं आयुष्य जगत असताना दुसऱ्याच्या आयुष्याचाच विचार करीत राहिला, त्याला जगण्याची दिशा आणि बळही देत राहिला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीनं म्हणूूनच गोखले न्यासाच्या वतीनं दिला जाणारा एक लाख रुपयांचा अंत्योदय पुरस्कार देऊन गावकरांच्या कार्याला समुचित अभिवादन केलं आहे. दादा गावकर वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी शिक्षणासाठी मुंबईत आले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी त्यांची नाळ जुळली आणि आयुष्याला नवी दिशाच मिळाली. गिरणगावातलं तेव्हाचं वातावरण पोरांच्या टवाळखोऱ्या, गुंडांच्या मारामाऱ्या यासाठी प्रसिद्ध होतं, संघ जीवनात आला नसता तर माझ्या हातात कदाचित पत्ते आले असते, दारूची बाटली आली असती, खिशात रामपुरी आला असता आणि मीही सातरस्त्यावरच्या पोरांसारखा भाईगिरी करताना दिसलो असतो हे ‘पिंपळपानांची सळसळ’मधलं गावकरांचं वाक्य त्यांच्या आयुष्याला मिळालेली दिशा दर्शविणारं आहे. गिरणगावातील विद्यार्थ्यांभोवतीचीप्रतिकूल परिस्थिती त्यांना अस्वस्थ करीत होतीच. त्यांच्याच उत्कर्षांसाठी त्यांनी अवघ्या विसाव्या वर्षी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ स्थापन केलं. गेली पंचावन्न र्वष ते अविरत कार्यरत आहे. या मंडळानं सुरू केलेली विवेकानंद व्याख्यानमाला महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, नव्हे एक ज्ञानतीर्थ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तिकिटं लावून व्याख्यानमाला आयोजित करण्याचा धाडसी उपक्रम मंडळानं मुंबईतल्या गिरणगावासारख्या वस्तीत प्रथमच सुरू केला आणि त्याचा सुवर्णमहोत्सवही गेल्या वर्षी पार पडला. गावकरांनी विद्यार्थी क्षेत्रात तर डोंगराएवढं काम केलंच, पण त्याशिवाय सामाजिक, धार्मिक आणि काही अंशी राजकीय क्षेत्रातही त्यांनी काम केलं. त्यांच्या एकसष्टीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांना जो निधी अर्पण करण्यात आला, त्यात तेवढीच स्वत:ची रक्कम घालून गावकरांनी एक प्रतिष्ठान स्थापन केलं. समाजात काम करणाऱ्या आणि प्रसिद्धीपासून चार हात दूर राहणाऱ्या गुणवंत कार्यकर्त्यांचा सत्कार आणि गिरणगावातील महापालिका शाळांतील तसंच खाजगी शाळांमधील हुशार विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याचा या प्रतिष्ठानचा उपक्रम वाखाणला गेला आहे. गावकर फारसे शिकले नाहीत, पण त्यांनी जो सहकाऱ्यांचा-सोबत्यांचा परिवार उभा केला त्याचं वर्णन करताना डॉ. शिवाजीराव भोसले यांनाही गावकर हे चालतंबोलतं विद्यापीठच आहे, समाजसेवेची ती एक सांस्कृतिक मुद्रा आहे असं म्हणावंसं वाटलं. गावकरांनी सव्‍‌र्हेलन्स इन्स्पेक्टर म्हणून सातपुडय़ासारख्या आदिवासी भागात तीन र्वष नोकरीही केली. आदिवासी जनजीवन, त्यांच्या चालीरीती, त्यांच्यात वावरताना आलेले प्रत्ययकारी अनुभव याचं वर्णन ‘पिंपळपानांची सळसळ’मध्ये आलं आहे. त्याचा मोठा वाटा त्यांच्या जीवनातील यशाच्या आरेखनात आहे. यश काही सहजासहजी प्रत्येकाच्या वाटय़ाला येत नाही, त्यासाठी परिस्थितीशी झुंजावं लागतं, परीक्षांचे पत्थर फोडावे लागतात. शून्यातून विश्व उभं करण्याची महत्वाकांक्षा उरी बाळगावी लागते. गावकर हा असा एक समाज-विश्व उभा करणारा शिल्पी आहे, कोकणी काव्‍‌र्हर आहे. सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांसाठीचं चालतंबोलतं पाठय़पुस्तक आहे. पिंपळ हा पुण्यवृक्ष मानला जातो. आदिवासी समाज तर याला राज्याचा द्वाररक्षक मानतात. गावकर हा असा पिंपळवृक्ष आहे, त्याला मिळालेल्या पुरस्कारासाठी मन:पूर्वक अभिनंदन.

      August 5, 2017