(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नंदकिशोर कलगुटकर

    नंदकिशोर कलगुटकर हे अनेक मराठी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख होते. कलगुटकर यांनी विशेषतः दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम, मुका घ्या मुका, सासरचं धोतर आदी मराठी आणि तेरे मेरे बीच में, आगे की सोच अशा हिंदी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम पाहिले.

      August 25, 2019


  • जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस

    लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी झाला होता. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता.

    लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी प्रदीर्घ , तशीच ती धाडसीही म्हणावी लागेल. नाटकांत किंवा चित्रपटांत कामे करणे म्हणजे अतिशय लाजिरवाणे व निषिद्ध मानले जायचे , त्या काळात लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. काहीशा बुजऱ्या व बावळट अशोककुमारचा आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. आपण नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी ' शहीद' मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली.

    दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. त्यांच्या डोळ्यांतील कारुण्य, चेहऱ्यावरील भावुकता, कृश शरीरयष्टीतील सहज दिसणारी लवचीकता व संवादफेकीतील स्पष्टता यामुळे लीला चिटणीस कोणत्याही शॉटमध्ये भाव खाऊन जात. त्या कधीच सुलोचना, कामिनी कौशल किंवा अचला सचदेवप्रमाणे रडक्या आई झाल्या नाहीत, किंवा ललिता पवारसारख्या खाष्ट आईही झाल्या नाहीत.

    वात्सल्यसिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील. त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नाचायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून वेडावून जायचे. ' झूला ' मधल्या ' हिंडोले कैसे झूलू..' व ' झूलो के संग..' या दोन गाण्यांवर त्या अगदी धमाल नाचल्या होत्या. त्यांच्या नृत्यावर अनेक जण अगदी जीव ओवाळून टाकायला तयार असायचे.

    लीला चिटणीस यांनी त्यांचे आत्मचरित्रही लिहिले आहे. मा.लीला चिटणीस यांचे १४ जुलै २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      September 9, 2018


  • मराठी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवणारे दिग्दर्शक अनंत माने

    आज २२ सप्टेंबर. पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक अनंत माने यांची जयंती

    अनंत माने यांचा जन्म २२ सप्टेंबर १९१५ रोजी झाला.

    ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास,साठ आणि सत्तरचे दशक असून या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर चित्रपट रसिकांसमोर सादर केले. अवघ्या ६० हजारांत चित्रपट निर्माण करून अनंत मानेंनी मराठी चित्रपट जगवला. याचे श्रेय त्यांच्या ‘सांगते ऐका’ या तमाशापटाला द्यावे लागेल. तमाशापट हा मराठी चित्रपटांचा नवा चेहरा होता. तो मानेंनी मराठी चित्रपटांना दिला.

    वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक अनंत माने यांनीच निर्मित केलेल्या "सांगत्ये ऐका, या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवला होता, नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. त्या चित्रपटाला 'चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान' असे मानतात. तमाशापट काढणारे अनंत माने असा शिक्का त्यांना बसला. त्यांनी उत्कृष्ट तमाशापट तर दिलेच पण मराठमोळा तमाशा रजतपटावर आणून त्यांनी या अस्सल मराठी मनोरंजनाला एक दर्जा प्राप्त करुन दिला. आज राजकीय पार्श्वयभूमीवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट आपण पाहतो. या चित्रपटांची सुरुवातही त्यांनीच ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटात प्रथम केली. निळू फुले या चित्रपटातून सर्वप्रथम चित्रपटात आले आणि पुढार्या‘च्या भूमिकेचा चेहरा या चित्रपटाने दिला. त्यानंतर गल्ली ते दिल्लीपर्यंत राजकीय पार्श्वटभूमीवरील अनेक चित्रपट त्यांनी दिले.

    सत्यकथेवरील आधारित मराठी चित्रपटही माने यांनी दिले. ‘चिमणी पाखरं’ची कथा ते राहत असलेल्या भगीरथ सदनमध्ये घडलेली कथा होती. ती त्यांनी धर्माधिकारी यांना सुचवली आणि त्यानंतर माने यांनी सत्यकथेवरील आधारित काही कथा चित्रपटात आणल्या. त्यांचा ‘सुशीला’ हा चित्रपटदेखील त्यापैकी एक. त्या काळात कोल्हापुरात पद्मा, रॉयल, प्रभात, शाहू या चित्रपटगृहांच्या परिसरात तिकिटांचा काळाबाजार करणारी एक तरुणी दिसायची. तिची कथाच आपल्या चित्रपटाची कथा बनवून मानेंनी तो चित्रपट पडद्यावर आणला. ‘एक गाव बारा भानगडी’ हा त्यांचा चित्रपट राजकीय पार्श्वकभूमीचा होता. याची कथा माझा मित्र अमृत गोरे याला वर्तमानपत्रातील एका बातमीतून सुचली होती. तीच त्याने चित्रपटात आणल्यानंतर वृत्तपत्रातील बातम्यांचा आधार घेऊन तयार होणार्याा पेपर कटिंग चित्रपटांचा ट्रेंड मराठी व हिंदी चित्रपटात आला.

    हिंदी चित्रपटात फ्लॅशबॅकने सुरुवात होणारे अनेक चित्रपट आपण पाहतो. नंतर सेमी फ्लॅशबॅक कथांवरील चित्रपटांचा नवा ट्रेंड चित्रपटात आला. गुलजार यांच्या ‘कोशिश’ या चित्रपटाच्या सेमी फ्लॅशबॅकसाठीच अनेकांनी कौतुक केले होते. परंतु गुलजार यांचा उदयही चित्रपटात झाला नव्हता, तेव्हा अनंत मानेंनी ५0 च्या दशकात आपल्या ‘पुनवेची रात’ या चित्रपटात सेमी फ्लॅशबॅकचा प्रयोग सर्वप्रथम केला.

    ‘एक गाव बारा भानगडी’मधून मानेंनी निळू फुले यांना चित्रपटात पहिला ब्रेक दिलाच; पण अशा कित्येक कलावंतांना त्यांनी चित्रपटात पहिला ब्रेक दिला. राजा गोसावी, राजा परांजपे यांच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटापासून लोकांना माहीत झाला असला, तरी त्याआधी दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या चित्रपटात सर्वप्रथम दिसला. या चित्रपटासाठी मानेंनीच त्यांना हेरलं होतं. त्यांच्याबरोबर शरद तळवळकरांच्या रुपेरी जीवनाची सुरुवातही या चित्रपटातून झाली. मराठीत राजा गोसावी व शरद तळवळकर यांची जोडी जमली होती. ही जोडी मानेंनी त्यांच्या ‘दोन घडीचा डाव’ या चित्रपटातच सर्वप्रथम जमवलेली. जयश्री गडकर या ‘दिसतं तसं नसतं’ चित्रपटापासून दिसत असल्या तरी त्यांचं युग खर्याय अर्थाने मानेंच्या ‘सांगते ऐका’ चित्रपटापासून सुरू झाले. ‘सांगते ऐका’ आणि ‘मानिनी’ म्हणजे जयश्रीबाईंच्या रुपेरी जीवनाची हाईट होती. या हाईटला अनंत मानेंनीच त्यांना पोचवले.

    लीला गांधी (प्रीतीसंगम), उषा चव्हाण (केला इशारा जाता जाता), उषा नाईक (पाच रंगाची पाच पाखरं) यांसारख्या अनेक नायिका त्यांनी मराठी चित्रपटाला दिल्या. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

    अनंत माने यांचे निधन ९ मे १९९५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इसाक मुजावर/ विकिपीडिया

      September 22, 2016


  • विजय हजारे

    विजय हजारे हे सी. के. नृायडू यांचे शिष्य होते. १९५१ ते १९५३ ते भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान राहिले होते. ॲ‍डीलेड येथे १९४८ मध्ये डॉन ब्रॅडमन यांच्या संघासमोर त्यांनी दोन्ही डावांत शतके झळकवण्याचा पराक्रम केला.

      May 10, 2010


  • खासदार विनय सहस्रबुध्दे

    शिक्षण संपवून तब्बल पाच वर्षे अ.भा.वि.प. चे पूर्ण वेळ कार्यकर्ते बनले. त्या काळातले त्यांचे गुरू व मार्गदर्शक प्रा.यशवंतराव केळकर, ह्यांना ते कधी विसरू शकणार नाहीत. ‘कार्यकर्ता म्हणून मी जो काही आहे त्याचे सगळे श्रेय केळकर ह्यांना आहे’ असे ते म्हणतात.

      November 10, 2021


  • ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ

    एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती.

      January 5, 2022


  • ज्येष्ठ अभिनेत्री इंदिरा चिटणीस

    आपल्याच तोऱ्यात मिरवणारी खाष्ट सासू आठवली की इंदिरा चिटणीस यांचा ठसका आपल्या मनात उभा राहतो. नऊवारी साडी, अस्ताव्यस्त सुटलेले केस, ठेंगणी-ठुसकी अंगकाठी आणि अचूक संवादफेक यामुळे इंदिरा चिटणीस यांच्या अनेक व्यक्तिरेखा मराठी चित्रपटातून चांगल्याच उठून दिसल्या.

      September 17, 2021


  • गीतकार, संगीतकार विवेक आपटे

    विवेक आपटे यांनी गेली तीस हून अधिक वर्षे चित्रपट, जाहीराती, जिंगल्स पबल्सीटी कँम्पेन, एकांकिका, नाटके, मालीकांची शिर्षक गीते, चित्रपट गीते असे भरपुर लेखन केले आहे.

      December 24, 2021


  • बाळशास्त्री जांभेकर

    बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतले आद्य पत्रकार होते. त्यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र जानेवारी ६, १८३२ रोजी सुरू केले. त्यांचा जन्म राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले गांवी झाला होता. इंग्रजी राजवटीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही हे त्यांच्या लक्षात आले होते.

      December 15, 2010


  • चित्रपटसृष्टीतील एकेकाळचा चॉकलेट हिरो ऋषी कपूर

    बॉलिवूडचे मोठे घराणे म्हणून ओळखल्या जाणा-या कपूर घराण्यातील राज कपूर यांचे पुत्र ऋषी कपूर. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी झाला. आपल्या पहिल्याच चित्रपटात एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत, आपल्या वडिलांच्या लहानपणची भूमिका करताना तो निळ्या डोळ्यांचा, गोंडस मुलगा ,गोल चेहरा आणि चेहऱ्यावरचे स्मितहास्य .... दिलेली भूमिका त्याने फक्त व्यवस्थितपणे पार पडलीच नाही तर त्यात आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली. त्या भूमिकेबद्दल त्याला उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि लगेच ३ वर्षानंतर आपल्या अभिनेता म्हणून आलेल्या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेताचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. चित्रपटातील प्रतिष्ठीत कुटुंबात जन्म घेतल्यामुळे अभिनयाचे संस्कार बालपणापासूनच होते पण त्या चित्रपटसृष्टीत जर यशस्वी होण्यासाठी स्वताच्या अभिनयाची क्षमता लागते हे ऋषीकपूर यांनी सुरवातीलाच ओळखले होते. आपल्या पहिल्या चित्रपटात ‘बॉबी’ मध्ये डिम्पल कपाडिया सोबत पदार्पण केल्याबरोबरच कितीतरी महिलांच्या गळ्यातला ताईत झालेला हा अभिनेता कायम ‘लवर बॉय’ म्हणून प्रस्थापीत झाला.

    आपल्या सुरवातीच्या काळात रोमांटिक हीरो म्हणून लोकांच्या हृदयात जागा बनविणाऱ्या या अभिनेत्याने त्याचा नंतरच्या काळात विविध प्रकारच्या भूमिका करून स्वताला अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रस्थापित केले. ते , रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्यापेक्षा यशस्वी झाले. ‘बॉबी’ बद्दल बोलताना ऋषीकपूर सांगतात कि बऱ्याच लोकांना आजपर्यंत असेच वाटायचे कि ऋषीकपूरला पदार्पण करण्यासाठी हा चित्रपट बनविण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात ‘मेरा नाम जोकर’ च्या अपयशामुळे खचून गेलेल्या राजकपूर यांना एका नवीन प्रेमकहाणी वर चित्रपट बनविण्याचा होता पण त्यावेळेचा रोमांटीक हिरो राजेश खन्ना यांना चित्रपटासाठी निवड करण्यासाठी त्यांच्या जवळ पुरेसा निधी नव्हता. मग पैसे वाचविण्यासाठी त्यांनी घरचाच कलाकार निवडला आणि नंतर आपण सर्व जाणतोच कि मेरा नाम जोकर चा गेलेला पैसा वसूल करणारा हा सिनेमा ठरला. या चित्रपटासाठी पहिल्यांदा राजकपूर यांनी आपले सुरवातीपासुनाचे संगीतकार शंकर जयकिशन यांना डावलून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना अनुबंधित केले होते. तो विषय वेगळा कधी त्या विषयावर पण पोस्ट करेल.

    १९७३ च्या बॉबी पासून २००० पर्यंत ऋषीकपूर हे नायकाची रोमांटिक भूमीका करीत होते. या दरम्यान त्यांनी ९२ चित्रपटात काम केले, त्यापैकी ५१ चित्रपटात ते एकटेच नायक होते तर ४१ बहुनायक चित्रपट होते. या दरम्यान त्यांनी जवळपास सर्वच अभिनेत्रीसोबत नायक म्हणून काम केले होते. १२ चित्रपटात एकत्र काम करणाऱ्या अभिनेत्री नीतू सिंग यांच्यासोबत त्यांनी विवाह केला. २००० पर्यंत रोमांटिक भूमिका केल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका साकारायला सुरुवात केली तर त्याच्या अभिनयाचे वैविध्य दिसून आले. मग ती ‘नमस्ते लंडन’ चि वडिलांची भूमिका, ‘औरंगझेब’ मधील लाचखाऊ पोलीस अधिकारी, ‘हाउसफुल्ल 2’ मधील विनोदी, स्टूडेंट ऑफ द ईयर मधील डीन, अग्निपथ मधील ‘रौफ लाला’ किंवा ‘D-Day’ मधील डॉन. या वरूनच दिसून येते कि आपल्या अभिनयासाठी समर्पित ऋषीकपूर यांनी आपल्या सुरवातीच्या काळा प्रमाणेच आपल्या दुसर्या डावात सुद्धा तेवढीच मेहनत घेतली. इतक्या सर्व यशस्वी चित्रपटातून भूमिका करीत असताना पण त्यांनी आपल्या कुटुंबीयांकडे तेवढेच लक्ष दिले. ते कधीही सायंकाळी ६ नंतर शूटिंग करीत नाही. ऋषी कपूर यांची बहुतांश गाणी सुपरहिट झाली होती.

    प्रत्येकाच्या तोंडात त्यांची गाणी असायची. त्यांच्या साठी आघाडीच्या सर्व गायकांनी पार्श्वगायन केले होते पण शैलेंद्र सिंग यांचा आवाज त्यांना सर्वात जवळचा वाटायचा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    ऋषीकपूर यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=buak7IIvWxY
    https://www.youtube.com/watch?v=1ldwcYP4PjQ
    https://www.youtube.com/watch?v=VLmVJmi3CtA

      September 4, 2017