जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात. ते मराठीसृष्टीचे प्रमुख लेखक आहेत.
July 16, 2017
युनिसेफ आणि इतर काही सामाजिक संस्थांसोबत काम करताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांना भेट दिली आहे.
July 26, 2022
अगाथा ख्रिस्तीच्या कथा-कादंबऱ्यांतील रहस्याची उकल जशी शेवटपर्यंत होत नसे, तसेच त्यांच्यातील खुनाचे तपशील विलक्षण जिवंत, वास्तवाधिष्ठित असत. हाणामारी वा पिस्तुलबाजी टाळून, तिच्या कादंबऱ्यांतील अनेक मृत्यू विषप्रयोगाने होत. १९६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिच्या ‘पेल हॉर्स’मध्ये खून ‘थेलियम’ या विषाद्वारे झाल्याचे दाखविण्यात आले होते.
January 12, 2022
श्री संजय केळकर हे ठाणे शहराचे आमदार आहेत. ते २०१४ च्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. १९८५ पासून सतत शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ केळकर यांनी २०१४ मध्ये काबिज करुन शिवसेनेला धक्का दिला.
ते राजकारणासोबतच विविध सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत.
# Sanjay Mukund Kelkar
BJP MLA - Thane Constituency
August 21, 2017
माने, श्रीकांत
सार्वजनिक क्षेत्रामध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक भान आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार यांचे प्रमाण कमी होत चालले असताना आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि प्रामाणिक सेवेच्या जोरावर कर्तृत्वाचा मोठा आलेख निर्माण करणारे वीजमंडळातील अभियंत्यांचे नेते श्रीकांत माने यांचे निधन संवेदनशील मनांना चटका लावून जाणारे आहे.
त्यांच्या निधनाने वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे स्थान मिळवून देणारे एक कुशल नेतृत्व केवळ काळाच्या पडद्याआड गेले असे नाही तर भ्रष्टाचाराने पोखरलेल्या राज्य वीज मंडळातील हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार निर्भीडपणे बाहेर काढणाऱ्या एका समर्पित अभियंत्याला देश मुकला आहे. माने हे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील संकेश्वरचे. गुलबर्गा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी या शाखेत प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीजमंडळात १९७६ साली ते कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीत रुजू झाले. सलग ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता या पदापर्यंत झेप घेतली. या प्रवासात त्यांनी वीजमंडळाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अभियंत्यांच्या संघटनांसाठी जे योगदान दिले, ते विसरता येणार नाही. ते जेव्हा वीजमंडळाच्या सेवेत दाखल झाले, तेव्हा मंडळाच्या अभियंत्यांचे साध्या सन्मानाच्या वागणुकीपासून ते वेतनश्रेणीपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित होते. मंडळातील सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन या संघटनेला माने यांचे कुशल नेतृत्व मिळाले आणि मंडळाच्या इतिहासात १९८२ मध्ये न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा २७ दिवसांचा संप झाला. कधी भूमिगत राहून तर कधी हजारो अभियंत्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करीत माने यांनी लढा दिला, त्यामुळेच कदाचित पुढे वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे दिवस पाहता आले. माने यांनी वीज मंडळातील सिंगल फेज या अव्यवहार्य प्रकल्पाविरुद्ध दिलेल्या लढय़ामुळे मंडळाला आपले धोरण बदलणे भाग पडले. त्याहीपेक्षा त्यांनी मंडळात खरेदी केल्या जाणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या ट्रान्सफॉर्मर्स, कपॅसिटर्स, केबल्स यांच्या दर्जाविषयी जो लढा दिला, त्याचे मोलही नाकारता येणार नाही. निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री पुरविणाऱ्या ठेकेदारांनी राज्य वीजमंडळात काही बगलबच्च्यांना हाताशी धरून मंडळाला हजारो कोटी रुपयांचा चुना लावण्याचा धंदा वर्षांनुवर्षे सुरू ठेवला होता, त्याला कुलूप लावण्याचे काम माने यांनी केले. एका ट्रान्सफॉर्मरची चाचणी घेऊन शेकडो निकृष्ट दर्जाचे ट्रान्सफॉर्मर मंडळात दाखल करून घेण्याचे एक मोठे रॅकेटच त्यांनी जिवाची तमा न बाळगता उघडकीस आणले. त्यांनी या प्रकरणातून अंग बाहेर काढावे यासाठी भल्या मोठय़ा कंपन्यांनी कोटय़वधी रुपये कोऱ्या चेकद्वारे त्यांना देऊ केले. पण या नि:स्वार्थी अभियंत्याने त्याला लाथ मारून सर्वसामान्यांशी असणाऱ्या आपल्या निष्ठेला अधिक प्राधान्य दिले. या कार्याबद्दल त्यांच्या गळ्यात राष्ट्रीय सन्मान पडणे आवश्यक होते. तो मिळाला नसला तरी पुढे मंडळाला उपकरणांच्या दर्जानिश्चितीसाठी आपली पद्धत बदलावी लागली, ही मोठी देणगी त्यांनी सर्वसामान्यांना दिली आहे.
August 5, 2017
उषाकिरण यांचे खरे नाव उषा मराठे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उषाकिरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९२९ रोजी झाला. वयाच्या बाराव्या वर्षी उषाकिरण यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. लवकरच त्यांना कुबेर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली. नंतर उषा किरण यांना ’सीता स्वयंवर’ हा सिनेमा मिळाला. त्यातही त्यांची छोटी भूमिका होती. पण ’मायाबाजार’ मध्ये त्यांना रुक्मिणीची मोठी भूमिका मिळाली. मंगल पिक्चर्सचा ’जशास तसे’ आणि विश्राम बेडेकर दिग्दर्शित ’क्रांतीवीर वासुदेव बळवंत’ यांत केलेल्या त्यांच्या भूमिकांमुळे उषाकिरण यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली.
१९५० मध्ये ’श्रीकृष्ण दर्शन’ मध्ये काम करत असतानाच स्वतःचे उषा मराठे हे नाव बदलून त्यांनी ते उषाकिरण असे केले. पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या. उषाकिरण यांनी ’जशास तसे’ मध्ये डोंबारीण आणि ’पुनवेची रात’ मध्ये तमासगिरीण तर ’बाळा जो जो रे’मध्ये ’सोशिक स्त्री’ अशा लक्षवेधी भूमिका अप्रतिम साकारल्या. माधव शिंदेंच्या ’शिकलेली बायको’ आणि ’कन्यादान’मध्ये त्यांच्यातले अद्भुत अभिनय सामर्थ्य पाहण्याची संधी सिनेरसिकांना लाभली. ’पतित’मध्ये देव आनंद, ’दाग’ मध्ये दिलीपकुमार, ’काबुलीवाला’मध्ये बलराज साहनी तर ’नजराना’मध्ये राज कपूर या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. सिनेमातून संन्यास घेतल्यावर त्यांनी समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले. मुंबईच्या लोकपाल (शेरीफ) होण्याचा मान त्यांना मिळाला. उषाकिरण यांचे ९ मार्च २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 22, 2017
इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा जन्म १५ एप्रिल १८९३ सालचा. कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले.
January 30, 2010
आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून पाटील यांनी गावरान विषय, सामाजिक प्रश्न तसंच वास्तवता मांडली. ‘सावरखेड-एक गाव’ , ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘पांगिरा’, ‘सनई चौघडे’, ‘ऑक्सिजन’, ‘ब्लाईंड गेम’; असे वैविध्यपूर्ण विषय दिग्दर्शित करुन प्रेषकाचं पुरेपूर मनोरंजन होईल याची खात्री घेतली.
March 13, 2014
समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे.
September 25, 2019
अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने ‘गीतरामायणा’सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी!
August 25, 2009
Copyright © 2025 | Marathisrushti