जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अनुप जलोटा यांनी आकाशवाणी वर कोरस गायक म्हणून करियरला सुरवात केली. मुंबईत आल्यावर त्यांची गाणी हिट झाली आणि त्यांना म्युझिक कंपन्यांकडून गाण्यांची ऑफर मिळाली.
July 29, 2021
आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला.
अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅीव्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला.
नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते. मा.विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते.
महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती. ‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अॅनन्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’मधील त्यांची बाबाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.
‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. ‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. मा.विनय आपटे यांचे ७ डिसेंबर रोजी २०१३ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांची गाजलेली नाटके
रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.
गाजलेले चित्रपट
एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.
December 7, 2017
तेजस्विनी पंडीत ही रणजित पंडित आणि जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या... तिचा जन्म २३ मे १९८६ रोजी झाला. तेजस्विनी पंडित ने 'अग बाई अरेच्चा ' मधील निगेटिव्ह शेडमधील भूमिकेतून तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर सुरु झालेला तिचा प्रवास जाहिरात, चित्रपट,मालिका,नाटक अशा चारही माध्यमात सुरु आहे. भूमिका ग्लॅमरस असो कि सोज्वळ त्या भूमिकेत शिरून त्यावर आपली छाप पाडण्याचे कसब तिला उत्तम जमलंय.
‘रानभूल’, ‘गैर’ आणि ‘अगबाई अरेच्चा’ या चित्रपटांमध्ये आणि ‘कालाय तस्मै नम:, ‘एकाच या जन्मी’, ‘घर श्रीमंताचं’ अशा टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहचणाऱ्या तेजस्विनी पंडीतला ‘मी सिंधूताई सपकाळ’ मधील भूमिकामुळे तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाला. तेजस्विनी पंडितने एक अभिनेत्रीची उद्योजिका बनून ‘तेजाज्ञा’ नावाचा साड्यांचा ब्रँड उभा केला आहे. तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांच्या ‘तेजाज्ञा’ या ब्रॅण्ड अंतर्गत साड्या तयार करण्यात येतात. ‘एक महिला एक साडी’ अशी त्यांच्या ब्रॅण्डची टॅगलाइन आहे.
#TejaswiniPandit
May 4, 2022
अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. त्यांचा जन्म २२ एप्रिल १८८३ रोजी झाला. अंजनीबाई मालपेकर यांनी नजीरखाँ व खादिमा, हुसेनखाँ या तीन भावांच्या कडून संगीताचे शिक्षण घेतले. राग `यमन’ हा भेंडीबाजार घराण्याच्या उस्ताद नजीरखाँनी अंजनीबाईंना शिकवलेला पहिला राग. त्याची तालीम साडेतीन वर्ष चालली होती. अंजनीबाईंचा `मध्यम’ स्वर एखाद्या ज्योतीसारखा कसा प्रज्वलित व्हायचा याचं वर्णन खुद्द कुमार गंधर्वांनी करून ठेवलं आहे.
कुमार गंधर्व म्हणत असत, “देवधर मास्तरांच्या सांगण्यावरून अंजनीबाई मला शिकवायला तयार झाल्या. त्यावेळी त्यांचा प्रत्येक सूर चैतन्यानं पुलकित होऊन समोर येई. सुरांचं हे सामर्थ्य मी यापूर्वी कधी बघितलं नव्हतं.” मा.अंजनीबाई मालपेकर ह्याचे शब्दलालित्य, सुंदर सांगीतिक आशय आणि लयीची गंमत यासाठी या घराण्यातील चिजा प्रसिद्ध होते. त्या बंदिश धृपद अंगाने म्हणत.
खानेपुरी, मुखविलास, आलापी, बोल भरणे, खुलाबंद बोल, उचकसमेट, मींड, कणस्वर, लयीच्या अंगाने सुंदर सरगम करणे इ. त्यांचे गानविशेष म्हणता येतील. हेमराज नावाच्या कर्नाटकातील विख्यात वाद्यनिर्मात्यानं संपूर्ण आयुष्यात बारा-तेराच तंबोरे केले. पैकी एक तंबोरा त्यांनी अब्दुल करीम खाँना भेट दिला आणि दुसरा अंजनीबाईंना. अंजनीबाईंना कोणी भेटायला आलं की यमन रागातील चिज गुणगुणून त्या पाहुण्यांचं स्वागत करीत.
भेंडीबाजार घराण्याचा खरा उत्कर्ष झाला तो अंजनीबाई मालपेकर आणि उस्ताद अमान अली खाँ यांच्या काळात. मा.अंजनीबाईकडे बेगम अख्तर, नैनादेवी, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी संगीताचे धडे घेतले. विदुषी अंजनीबाई मालपेकर यांनी आपल्या अतीव सुरेल स्वरलगावाने आणि लयीच्या समझदारीतून ही गायकी पेश केली. विदुषी अंजनीबाई यांची आग्रा-परंतु मुलायम गमक असलेल्या अशा-गायकीची दुर्दैवाने कुणीच दखल घेतली नाही.मा.अंजनीबाई मालपेकर यांचे ७ ऑगस्ट १९७४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ नवशक्ती
August 7, 2017
पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांनी ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता.
September 25, 2020
व्ही शांताराम यांनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडल्यावर दामले-फत्तेलाल यांचे सहकारी दिग्दर्शक राजा नेने यांनी रामशास्त्री चित्रपट हा हिंदी-मराठी दिग्दर्शित केला.
June 25, 2022
पीटर सेलर्स यांनी आपल्या करीयरची सुरुवात स्टेज कलाकार म्हणून किंग्स थिएटर, साउथसी पासून केली.
July 24, 2021
नायगाव चाळीतच दादा कोंडके यांचे बालपण गेले. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. तरुणपणी पैशांची गरज भागवण्यासाठी अपना बाजार मध्ये त्यांना नोकरी करावी लागली. त्या काळात काही कारणांमुळे त्याचे स्वकीय व कुटूबीय त्यांच्या पासून दूर झाले, व दादा एकटे पडले. तेव्हा समाजात दु:खी असलेल्या लोकांना हसवण्याचा पण दादांनी केला. आणि हाच उद्देश धरून त्यांनी त्यांच्या भागतील बँड पथकात सहभाग घेतला. कोतुकाने त्यांना बडवाले दादा पुकारले जायचे.
बँड मध्ये कार्यरत असताना , सेवा दलाच्या कार्यातून दादा सांस्कृतीक कार्यात सहभागी व्हायचे. त्यातून त्यांनी छोट्या - मोठ्या नाटकांत भाग घेण्यास सुरुवात केली. तेथे कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले.
पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टाईमिंगवर हशा उसळवणा-या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवले नाही. 'खणखणपुरचा राजा' मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादांनी स्वतःचा फड उभारला. आता दादा कोंडके वसंत सबनिसांच्या 'विच्छा माझी पुरी करा' नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. 'विच्छा'चे १५०० हून अधिक प्रयोग झाले. आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारकरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले.
विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. मा.दादा कोंडके यांनी 'भामाक्षी पीचर्स संस्थेची निर्मिती' केली. प्रमुख नायिका - उषा चव्हाण , संगीतकार - राम लक्ष्मण, गायक - जयवंत कुलकर्णी आणि महेंद्र कपूर, सहायक दिग्दर्शक - बाळ मोहिते यांनी या रुपात संस्थेचे काम पहिले होते. त्यांना चित्रपटासाठी सेन्सॉर मान्यता मिळण्यापासून ते राजकीय नेत्यांच्या संबंधीत अनेक अडचणी येत होत्या. दादा कोंडके यांची वादग्रस्त विषयात चर्चा असायची.
प्रत्यक्ष आयुष्यात ते विवाहबद्ध होते, पण सिनेसृष्टीत एकटा जीव सदाशिव पणे वावरत असायचे. सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. दादांचे पितासमान गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट. 'सोंगाड्या' ही दादांची पहिली निर्मिती. हा चित्रपट खुप गाजला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले.
अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. अनेक रजत्/सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले. खरे तर दादा कोंडके यांच्यासारखा सारखा कलाकार पुन्हा झाला नाहीच मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक आणि सुवर्णकाळ म्हणजे दादा कोंडके यांची कारकीर्द, दादांनी प्रेक्षकांना हसवले आणि प्रसंगी अगदी अलगद टचकन रडवले देखील … त्यांच्या काळातील सिनेसृष्टी आणि सध्याच्या काळातील सृष्टी यात प्रचंड तफावत आहे खूप अत्याधुनिक तंत्र आता उपलब्ध आहे.
दादा कोंडके यांचे एकटा जीव सदाशिव, सोंगाड्या, रामराम गंगाराम , पांडू हवालदार असे गाजलेले चित्रपट कुठे टी व्ही वर दिसत नाहीत ,जुन्या तंत्रात असलेल्या या चित्रपटांचे कोणी पुनरुज्जीवन केले नाही अनेक जुने चित्रपट, गाणी वारंवार टी व्ही वर दिसतात पण जणू दादा कोंडके यांचे चित्रपट रसिकांना बघायला मिळत नाहीत. मा. दादा कोंडके यांचे १४ मार्च १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
August 8, 2017
कमला म्हणजे दिल्लीच्या मध्यम वर्गीय काश्मिरी पंडितांच्या कुटुंबातील जवाहरमल कौल यांची सर्वात धाकटी मुलगी, कमला म्हणजे काश्मिरी सौंदर्याचे अस्सल प्रतिक ! पृकृती अतिशय नाजूक. अलाहाबादच्या नेहरू म्हणजे पूर्वीच्या कौल घराण्यातील मोतीलाल नेहरू यांचे सर्वात थोरले अपत्य म्हणजे जवाहरलाल ! यांचा विवाह दिल्लीतल्या हक्सर हवेलीत ८ फेब्रुवारी १९१६ रोजी संपन्न झाला.
March 1, 2024
‘कुलवधू’ या गाजलेल्या मालिकेतून सुप्रिया पाठारे यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली. या मालिकेत त्या खलनायिकेच्या रुपात दिसल्या होत्या त्यानंतर जागो मोहन प्यारे या मालिकेतही त्यांची मुख्य भूमिका होती.
April 8, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti