जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
शिवसेना, भाजप, आणि लोकभारती पक्षाच्या आघाडीने उल्हासनगर महानगरपालिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर शहराच्या विकासाला गती देण्याची यशस्वी कामगिरी राजश्री शिंदे यांनी केली. त्यांनी महापौरपद स्वीकारल्यापासून शहराचा विकास झपाटयाने होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
शहराच्या विकासासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. यात शहराच्या विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करून त्यात इमारतीची उंची वाढविणे, आरक्षण स्थलांतर, अंतर्गत बदल आणि चटई क्षेत्राच्या लगतच्या जागेत बदल करणे बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शहराच्या विविध ठिकाणी वाहतुक समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या. त्यापैकी उल्हासनगर स्टेशनला सॅटिस, पादचारी पुल, रिक्षा स्टँड, वाहनतळ, भाजी मार्केट, व्यापारी संकुल, गणेश विसर्जन घाट असे महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले. शहरातील महत्वाच्या रस्त्यांचे त्यांनी सिमेंट काँक्रिटीकरण केले.
गोरगरिबांसाठी त्यांनी समाजमंदिरे बांधून दिली. त्यांच्या कारकिर्दित ४० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
January 12, 2015
मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणार नाव म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर.
August 17, 2017
भक्ती बर्वे केवळ अभिनेत्री नाही, तर उत्तम निवेदिकाही होत्या. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १९४८ रोजी झाला. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांच्या अभिनयाला सुरवात झाली, असे म्हणावे लागेल.
त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. त्या दूरदर्शनवर निवेदन करीत होत्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपर हिट ठरली. नाटक आणि भक्ती बर्वे हे समीकरणच तयार झाले. त्याकाळी नाटकांना वन्स मोअर मिळत असे. त्यामुळेच मराठी रंगभूमीतील भक्ती बर्वे या एकमेव स्त्री स्टार म्हणावे लागेल.‘‘ आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या 'माणिकमोती' या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.
पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी हे नाटक म्हणजे भक्ती बर्वे यांच्या भूमिकेतील अतुच्य क्षण. ती फुलराणी चे ११११ हून अधिक प्रयोग झाले. आई रिटायर होतेय या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हिंदी चित्रपटांतील सहअभिनेते मा. शफी इनामदार यांच्याशी विवाह झाला होता. अशोक हांडे यांच्या माणिकमोती या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.
रजनीश जोशी यांनी लिहिलेलं एक होती फुलराणी हे पुस्तक भक्ती बर्वे यांच्या बद्दलच्या खूप छान छान गोष्टींची आठवण करून देते.
भक्ती बर्वे यांचे १२ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.
भक्ती बर्वे यांनी काम केलेली नाटके.
अखेरचा सवाल, अल्लाउद्दीन व जादूचा दिवा (बालनाट्य), अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर होतेय (मराठी आणि गुजरातीत-बा रिटायर थाय छे), आधे अधुरे(हिंदी आणि मराठी), आले देवाजीच्या मना, कळलाव्या कांद्याची कहाणी (बालनाट्य), गांधी आणि आंबेडकर, घरकुल, चिनी बदाम (बालनाट्य), जादूची वेल (बालनाट्य), टिळक आणि आगरकर, ती फुलराणी, दंबद्वीपचा मुकाबला, पपा सांगा कुणाचे, पळा पळा कोण पुढे पळे तो, पुरुष, पुलं, फुलराणी आणि मी, बाई खुळाबाई, बूटपोलिश, माणसाला डंख मातीचा, मिठीतून मुठीत, रंग माझा वेगळा, रातराणी (मराठी, हिंदी आणि गुजराती), वयं मोठं खोटम् (बालनाट्य), शॉर्टकट, सखी प्रिय सखी, हँड्स अप.
प्रमुख चित्रपट - जाने भी दो यारों (हिंदी) इ.स. १९८३,बहिणाबाई, ‘हजार चौरासी की माँ’ (हिंदी) इ.स. १९९८
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 10, 2017
आम म्हटल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी रागांत रचना करणे, रोशन यांचे मनपसंद काम होते. “कव्वाली” हा गीतप्रकार रोशन यांनी प्रतिष्ठित केला. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना “बांध” घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे.
August 10, 2018
आपल्या घरच्या पारंपरिक वाद्यनिर्मिती व्यवसायात काम करता करता, वयाच्या चोविसाव्या वर्षी बेस क्लॅरिनेटची निर्मिती केली. पॅरिसमध्ये स्थलांतरीत झाल्यानंतर प्रयोग करता करता सॅक्सोफोन, सॅक्सट्रोम्बा, सॅक्सहॉर्न, सॅक्सट्यूबा अशा वाद्यांचा शोध लावला.
November 7, 2021
मिशी ठेवणार्या एका कालाकराने हॉलीवूडमधे प्रवेश केला. तीन वर्षात ऑस्कर नामांकन व तीन गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळवले. पहिल्या हॉलीवुडपटात उत्कृष्ट दिग्दर्शकाबरोबर व प्रसिद्द नटासोबत काम करून त्याने आपली भूमिका अजरामर केली. हाताने पत्र लिहीण्याच्या व पोस्टमने पत्र पोचवण्याच्या काळात, त्याला आलेल्या प्रेमपत्रांची व मागण्यांची संख्या होती एक महिन्यात ३०००! सुरुवातीची कारकीर्द इजिप्त मधे अरेबिक चित्रपटात घडवलेला व पुढे इंग्रजी येत असल्याच्या गुणावर हॉलिवुड्चा झालेला हा थोर कलाकार म्हणजे ‘ओमर शरीफ’. तरुणींच्या दिलाची धडकन ‘ओमर शरीफ’.
February 11, 2020
भास्कर काशीनाथ चांदूरकर हे “काव्यशेखर” या टोपण नावाने कविता लिहित असत.
January 4, 2021
क्षिती जोगचा जन्म १ जानेवारी १९८३ रोजी झाला. क्षितीची ‘दामिनी’ आणि ‘वादळवाट’ या मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच तिने ‘ये रिश्ता क्या कहलता है’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अशा हिंदी मालिकेतूनदेखील आपल्या अभिनयाची छबी उमटविली आहे. त्याचबरोबर क्षितीने ‘संशय कल्लोळ’, ‘माई’ असे चित्रपटदेखील केले आहेत. तर ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातल्या तिच्या अभिनयाचेही अनेकांनी कौतूक केले. नाटक, मालिका, चित्रपट यांमुळे क्षितीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. जेष्ठ अभिनेते अनंत जोग हे क्षिती जोगचे वडिल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 1, 2017
अनंत गंगाराम गीते हे एक राजकारणी आहेत. ते शिवसेना पक्षाचे सदस्य आहेत. अनंत गीते हे २०१४ – २०१९ ह्या काळात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रांतील उद्योगांचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री होते , तसेच ऑगस्ट २००२ – मे २००४ पर्यंत ते केंद्रीय ऊर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.
October 31, 2020
"हृदयी वसंत फुलताना' यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी मा.शांताराम नांदगावकर यांची ओळख होती.
सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर हे मूळचे कोकणातील नांदगावचे. त्यांचा जन्म १९ आक्टोबर १९३६ रोजी झाला. शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले.
'पाहिले न मी तुला', 'प्रथम तुला वंदितो', 'ही नव्हे चांदणी', 'दाटून कंठ येतो', आदी त्यांची गीते विशेष गाजली. अष्टविनायक,'नवरी मिळे नवर्याीला', 'बनवा बनवी', पैजेचा विडा आदी मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. श्रोत्यांच्या ओठावर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
चित्रपटगीतांबरोबरच बालगीते, भावगीते व लोकगीतेही आणि भक्तीगीतेही लिहिली. 'ससा तो ससा' हे बालगीत आजही मुलांना वेड लावते.
क्रिकेटपटू मा.सुनील गावसकर यांनी म्हटलेले, 'या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला...?' हे गीतही त्यांचेच. चित्रपटसृष्टीत 'डॅडी' या नावाने परिचित असलेले शांताराम नांदगावकर १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर निवडून गेले होते.
शांताराम नांदगावकर यांचे ११ जुलै, २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
July 14, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti