(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर

    कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी झाला. माडखोलकर यांचे वडील त्र्यंबकराव मुंबईत भिक्षुकी करीत. त्यांच्या आई पार्वतीबाई या त्याकाळी शिक्षित असलेल्या स्त्रियांपैकी एक होत्या. आईने केलेल्या संस्कारामुळे लहानपणीच माडखोलकरांनी मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचे सर्व शिक्षण झाले होते.

    राष्ट्रसभेच्या अधिवेशना- पासून स्फूर्ती घेऊन त्यांनी जागृती नावाचे हस्तलिखित सुरू केले. त्याचे संपादन माडखोलकर करीत असत. नवयुग, विविध ज्ञान विस्तार इ. मासिकातून त्यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली. केशवसुतांचा संप्रदाय या नवयुगमध्ये लिहिलेल्या टीकालेखामुळे माडखोलकर एकदम प्रसिद्धीस आले. त्यानंतर केसरीत त्यांचे लेख छापून आले. त्यावेळी रविकिरण मंडळाशी त्यांचा संबंध आला. तेथे अनेक साहित्यिकांशी त्यांचा स्नेह जडला.

    १९२२ साली माडखोलकर पुण्याला आले. त्यावेळेस रेव्हरंड टिळक, केशवसुत, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी यांच्या काव्याची मीमांसा करणारे आधुनिक कवी पंचक हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. १९३३ नंतर नागपूरला आल्यावर त्यांच्या कादंबरी लेखनाला सुरुवात झाली. मुक्तात्मा, भंगलेले देऊळ, शाप, कांता, दुहेरी जीवन, मुखवटे, नवे संसार या त्यांच्या गाजलेल्या कादंब-या. शुक्राचे चांदणे, रातराणीची फुले हे कथासंग्रह तर वाङ्मयविलास, स्वैरविचार, परामर्श हे समीक्षात्मक लेखनही त्यांनी केले. १९४४ पासून माडखोलकर तरुण भारत चे संपादक म्हणून काम पाहू लागले. १९४६ साली महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले.

    बेळगाव येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्ष पदावर संयुक्त महाराष्ट्राचा ठराव सर्व प्रथम माडखोलकरांनी मांडला. याशिवाय पुढील काळात काही नाटकं आणखी काही कादंब-या, साहित्य समस्यांवरील लेख व्यक्ति तितक्या प्रकृती, मी आणि माझे वाचक इ. विविधपूर्ण लेखन माडखोलकरांनी केले. त्यातून वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे त्यांचे विविधांगी लेखन प्रतिबिंबित झाले आहे. मा.गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे २७ नोव्हेंबर १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 28, 2018


  • आद्य विज्ञान प्रसारक बाळाजी प्रभाकर मोडक

    मराठीतून उच्च शास्त्रीय विषय शिकवण्याची त्यांना मोठी तळमळ होती. त्यांना कालाजंत्रीकार म्हणून ओळखत असत. मोडक यांनी रसायनशास्त्राबरोबरच पदार्थविज्ञानशास्त्र, यंत्रशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणिशास्त्र अशा शास्त्रीय विषयांवरील पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली.

      December 2, 2021


  • सुविनय दामले

    वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

      July 16, 2017


  • अभिनेत्री श्रद्धा कपूर

    बॉलिवूडमधील व्हिलन शक्ती कपूर यांची मुलगी असलेल्या श्रद्धा कपूरने आज बॉलिवूडमध्ये आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुपरहिट सिनेमा ‘आशिकी-2’ मुळे श्रद्धाची हटके अशी ओळख निर्माण झाली.

      April 27, 2024


  • ज्येष्ठ अभिनेते रवि पटवर्धन

    ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाच्या जमान्यात रवी पटवर्धन यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेत नोकरी करून अभिनय श्रेत्रात पाऊल ठेवले.

      September 6, 2023


  • कॅप्टन दिलीप दोंदे

    ज्यांना भारतीय कोलंबस म्हटलं जातं असे कॅप्टन दिलीप दोंदे यांचा जन्म २६ सप्टेंबर, १९६७ रोजी झाला.

    शिडाच्या नौकेवर एकट्याने २१हजार ६०० सागरी मैलांची विश्व सागर परिक्रमा पूर्ण करणारे कमांडर दोंदे हे पहिले भारतीय!

    या परिक्रमेने जभरातील त्या वेळच्या १७५ विश्वयात्री दर्यावर्दींच्या पंगतीत प्रथमच एका भारतीयाचे नाव कोरले गेले. निवृत्त व्हाइस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी यांच्या प्रेरणेतूनच कमांडर दोंदे या आव्हानात्मक कामगिरीसाठी उतरले.

    कमांडर दोंदे यांनी ५६ फूट लांबीच्या म्हादेईतून पहिली सागरपरिक्रमा ऑगस्ट २००९ रोजी सुरू करून एप्रिल २०१० मध्ये पूर्ण केली. पण नौकेची दुरुस्ती, शिधा साठवणे आणि विविध देशांतील लोकांच्या भेटी घेणे यासाठी चार वेळा थांबे घेतल्यामुळे ही परिक्रमा १५७ दिवसांत पूर्ण झाली होती.२३ हजार समुद्र मैल अंतर पार करताना त्यांनी चार थांबे घेतले.

    कमांडर दोंदे यांनी एनडीएत दाखल झाल्यापासूनच साहसी छंदांची आवड जोपासली होती आणि त्यांची मशागत करण्याची संधीही नौदलात मिळत असतेच. एनडीएमध्ये असताना ते घोड्याच्या पाठीवर स्वार होऊन खेळायच्या पोलो या खेळात रमले. नंतर स्कीईंगच्या राष्ट्रीय स्पधेर्तही उतरले आणि नौदलाच्या सेवेत असताना डायव्हिंगचा थरारही त्यांनी आपलासा केला. मुंबई-कोची नौका सफारीत ते सहभागी होतेच...त्यामुळे आता हे नवं चॅलेन्ज...पण एकदा ते मनावर घेतल्यावर त्यांनी कुठलीही कसर सोडली नाही.

    भारताला एवढा विस्तीर्ण सागरकिनारा आणि इतक्या वर्षांची दर्यावर्दींची परंपरा असूनही विश्वपरिक्रमेत आपण मागे का राहिलो, याची रुखरुख कमांडर दोंदे यांनाही भेडसावू लागलीच. त्याचवेळी त्यांनी यासंबंधीची माहिती काढली, तेव्हा काही रंजक नोंदी सापडल्या. सर अ‍ॅलेक रोज यांनी १९६० साली केलेल्या विश्वपरिक्रमेच्या वेळी वापरलेली नौका कोलकात्यात तयार करण्यात आली होती. तर त्यानंतर सर रॉबिननॉक्स जॉन्स्टन हे तर विश्वपरिक्रमेकरिता मुंबईतच बनलेल्या 'सुहेली' या नौकेवर स्वार झाले होते. कुठेही न थांबता सागरपरिक्रमा करणारे पहिले दर्यावदीर् आणि जूल्स व्हेर्न ट्रॉफीचे दुसरे विजेते तसंच २००६ मध्ये ६७ व्या वषीर् सागर परिक्रमा पूर्ण करणारे सर्वात वयस्क (?) सदस्य असे किताब नावावर असलेले जॉन्स्टन यांच्यापर्यंत कमांडर दोंदे जाऊन धडकले. अगदी रीतसर त्यांची शिकवणीच म्हणाना. सर जॉन्स्टन यांच्यासह त्यांनी ब्रिटनमध्ये तीन आठवडे घालवले आणि त्यांच्यासह त्यांच्या बोटीवर डागडुजीपासून सर्व कामे कमांडर दोंदे यांनी केली. सदुसष्टाव्या वषीर्चा जॉन्स्टन यांचा उत्साह पाहून दोंदे थक्क झाले. जॉन्स्टन दोंदे यांच्या नौकेची बांधणी पाहण्यासाठी गोव्यात दाखल झाले, तेव्हा तर शिडाच्या काठीवर चढून नौकेची मजबुती पाहण्याचा काटेकोरपणाही दाखवत होते. मुंबईत लकडाबाजारात कुठे सामान मिळते, याच्या टीप्सही जॉन्स्टन द्यायचे. अॅडमिरल आवटी यांचं तर आपल्या विंचुणीर्तून या सर्व घडामोडींवर लक्ष होतंच. पण गोव्यातल्या मांडवी नदीचं मूळ नाव धारण करणारी म्हादेई, त्या गोव्यातल्या मातीतच बनत होती. तिचं बाळंतपण करणारे रत्नाकर दांडेकरांचे हातही असंच काटेकोर लक्ष ठेवून होते. वर्षभरात 'म्हादेई'चं काम पूर्ण झालंच पाहिजे, अशी अटच नौदलाने कंत्राटात घातली होती. शेवटच्या तीन महिन्यात तर आपलं ऑफिस विसरून म्हादेईच्या सेवेतच ते होते. या सर्वांचा परिक्रमेत मोठा वाटा आहे, हे दोंदे वारंवार सांगतात.

    'म्हादेई' तयार झाल्यानंतर दोंदे यांनी त्यांचा सपोर्ट ऑफिसर अभिलाष याच्या साथीने मॉरिशसपर्यंत पहिली सागरी सफर केली. त्यानंतर ते एकटे २३०० सागरी मैल अंतर कापत म्हादेईच्या साथीने मुंबईत परतले, हीसुद्धा भारतीयाने केलेली पहिलीच लांब सफर ठरली. सागर परिक्रमेच्या अंतराच्या तुलनेत ते कमी असलं, तरी त्यातून नौकेची कसोटी पार पडली आणि अनुभवही मिळाला. एवढं सगळं झाल्यावर गेल्या वषीर् ऑगस्ट महिन्यात भर मान्सूनमध्ये दोंदेंची म्हादेई मुंबई बंदरातून निघाली, तेव्हा खरं तर मान्सूनचा काळ...म्हणजे वारे नैऋर्त्येकडून यायला हवेत, पण प्रत्यक्षात वारा वायव्येकडून येत होता...थोडक्यात काय, तर अथांग सागरात गेल्यावर वारा आणि लाटांबाबतचे आडाखे कसे चुकतील, याचा नेम नाही. विषुववृत्ताच्या जवळ गेल्यावरही त्यांना हाच अनुभव आला...अशा वेळी दोंदे सांगतात की, पर्याय काहीच नसतो, तुम्हाला तर पुढे जावंच लागतं, फार तर कधी ऑस्ट्रेलियाच्या ऐवजी तुम्ही मॉरिशसच्या दिशेने जाता...दिशा थोडी बदलावी लागली, तर डेस्टिनेशन तेच आणि पुढे तर जावंच लागतं...दोंदे सांगतात.

    सारखं नौकेच्या मर्यादित जागेत राहून खुडकायला होत नाही का, या 'बालसुलभ' प्रश्नावर दोंदे सांगतात, जागा कमी असल्याने पायाला व्यायाम होत नाही, हे खरंय, पण बाकी शरीराला, स्नायूंना नेहमीच्या वर्क आऊटपेक्षाही अधिकच व्यायाम मिळतो. शीड बांधायाची चढ-उतार करण्यात भरपूर मेहेनत असते. रात्री सलग सहा-आठ तास झोप मिळाली, असंही क्वचितच घडलं. झोपलं, तरी नौका पुढे जात असतेच, तेव्हा सावध राहावंच लागतं. जेवणासाठी कुकर, गॅस सगळं होतं, कधी वरणभातही करायचो, पण एकटे असताना साग्रसंगीत जेवण करण्याची हौस वाटत नाही. चार बंदरांमध्ये थांबलो, तेव्हाही नौकेची डागडुजी आणि इतर कामांमध्येच वेळ गेला. नऊ मीटरच्या लाटा आणि ताशी शंभर किलोमीटर वेगाचे वारे अशा परिस्थितीत नौकेचं स्टिअरिंग व्हील तुटलं... असा तांत्रिक पेच उभा राहील, हे अजिबातच अपेक्षित नव्हतं. त्यात दिवस गेला, पण त्यातून सावरता आलं. असे अनेक प्रसंग होते... माझ्या मनात एकच होतं, मी परिक्रमा पूर्ण करणार, हे नौदलाला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करायचंय...त्याच बळावर मी परिक्रमा पूर्ण करू शकलो. आता 'म्हादेई'चा वापर इतरही भावी दर्यावर्दीनी करावा, असं मला वाटतं...दोंदे समुदाकडे पाहत सांगत असतात..

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #CaptainDilipDonde

      November 26, 2021


  • यदुनाथ दत्तात्रय थत्ते

    ‘साधना’ला मराठी वृत्तपत्रसृष्टीत वैचारिक प्रतिष्ठा मिळवून देणारे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.

      May 10, 2019


  • प्रेमानंद गज्वी

    प्रेमानंद गज्वी हे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेमानंद गज्वी यांचे ‘घोटभर पाणी’ अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालं. ‘श्रेष्ठ भारतीय एकांकी’ या द्विखंडीय ग्रंथात प्रसिद्धही झालं.

      July 9, 2022


  • लेखक वि . स . वाळिंबे

    १९५० ते १९५४ या काळामध्ये ते ज्ञानप्रकाश , प्रभात , लोकशक्ती या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी नोकरी केली. त्यांनी १९६२ पर्यंत अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. १९६२ मध्ये ते पहिल्यांदा उपसंपादक म्हणून आणि त्यानंतर रविवार आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी केसरी मध्ये काम केले.

      August 30, 2021


  • हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा

    १९९४ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘त्यागी’ या पहिल्याच भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधणारा अभिनेता आशुतोष राणा पुढे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’सारख्या चित्रपटांतून दज्रेदार आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेत दमदारपणे उभा राहिला. दुश्मन सिनेमातील दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

      April 15, 2019