जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ना.घ. देशपांडे यांचे पूर्ण नाव नागोराव घन:श्याम देशपांडे. त्यांचा जन्म नागपंचमी च्या दिवशी झाला म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले असे म्हणतात. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९०९ रोजी झाला.
ना.घ.देशपांडे मराठी काव्यसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव. एक प्रतिभाशाली कवी म्हणून त्यांची दखल मराठी साहित्य वर्तुळात घेतली गेली. ‘नाघं’च्या घरातील वातावरण धार्मिक होते. त्यांचे सख्खे भाऊ वि. घ. देशपांडे हे हिंदुमहासभेचे नेते होते. मध्य प्रदेशातून खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांचे राहणे परंपरा जपणाऱ्या खेडय़ामध्ये होते. पण ‘नाघं’नी प्रेमाची धीट अभिव्यक्ती करणाऱ्या कविता लिहिल्या- ज्या त्या काळाच्या पुढच्या होत्या.
१९२९ मध्ये लिहिलेला ''शीळ'' या कवितेमुळे ते नावारूपाला आले. १९५४ साली '' शीळ '' या नावाने त्यांचा काव्यसग्रह प्रसिद्ध झाला. १९६३ साली ‘अभिसार’. नंतर ‘खूणगाठी’, ‘गुंफण’, ‘कंचनीचा महाल’.. ‘खूणगाठी’ला साहित्य अकादमीचे पारितोषिकही मिळाले. रानारानांत गेली बाई, खरे तर निसर्ग आणि प्रेमाची महती याचे वर्णन करणारे हे स्त्री गीत, पण ते गायले एका पुरुषाने.. जी. एन. जोशी यांनी. हे मराठीतील पहिले भावगीत समजले जाते. ना. घ. देशपांडे यांची ‘नदीकिनारी, नदीकिनारी गं’ व ‘फार नको वाकू उंच जरी बांधा’ ही गाणी सुद्धा जी. एन. जोशी यांनी गाजविली. ‘डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको’ हे ना. घ. यांचे आणखी एक प्रसिध्द गाणे, पण ते नंतर पुढे सुधीर फडके यांच्या आवाजात लोकप्रिय झाले.
‘बकुळफुला, धुंडिते तुला धुंडिते वनात’ अशी आणखी चार-दोन कवितांची गाणी झाली. आचार्य अत्रे यांनी सुचवूनसुद्धा ‘नाघं’नी मराठी सिनेमासाठी गाणी लिहिली नाहीत. ‘नाघं’नी महात्मा गांधींवर कविता लिहिल्या आणि त्यांची तुलना बुद्ध आणि येशू यांच्याशी केली, तेवढे महत्त्वाचे स्थान विश्वेतिहासात दिले. नेहरूंना ‘उदयाचा यात्रिक’ म्हणून गौरव करणारी कविता त्यांनी लिहिली. ना.घ. देशपांडे यांचे निधन १० मे २००० रोजी झाले.
ना.घ. देशपांडे यांची काही गाणी
अंतरीच्या गूढ गर्भी, काळ्या गढीच्या जुन्या ,घरदिव्यांत मंद तरी , डाव मांडून भांडून , तुझ्याचसाठी कितीदां , नदीकिनारीं नदीकिनारीं, फार नको वाकू जरी, बकुळफुला कधीची तुला, मन पिसाट माझे अडले रे, रानारानांत गेली बाई.
अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा
कवी ना. घ. देशपांडे (नागोराव घन:श्याम देशपांडे)
#NagoravGhanashyamDeshpande
April 27, 2022
पुस्तकांच्या दुनियेत सगळय़ात महत्त्व मिळते ते लेखकाला! त्याच्या प्रतिभेतून एखादी कलाकृती निर्माण होते तेव्हा त्याचे सारे श्रेय त्या निर्मिती करणाऱ्या लेखकालाच मिळते. त्या लेखकाने लिहिलेले शब्द पूर्वी लोखंडी खिळय़ांत आणि आता संगणकावर जुळवणाऱ्या ‘कंपोझिटर’चे किंवा जुळवलेले शब्द तपासणाऱ्या मुद्रितशोधकाचे किंवा पुस्तकाची छपाई करणाऱ्या आणि त्याचे बाइंडिंग करणाऱ्या कुणाचे नावही सहसा कधी प्रकाशात येत नाही.
(कायद्याने मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिद्ध करणे आवश्यक असते, त्यामुळे ते छापले जाते, एवढेच!) एवढे सगळे झाल्यानंतर त्या पुस्तकाचे वाचकांपर्यंत जाणे ही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट! त्यासाठी असणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांना तर कुणी ओळखतही नाही. पुस्तकांची भव्य दालने उभारणाऱ्यांची ही गत, तर रस्त्यावर बसून अल्प दरात ज्ञानदान करणाऱ्याला कोण कशाला पुसतो? पुण्यात भरलेल्या ८३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाने मात्र रस्त्यावर पुस्तक विक्री करणाऱ्या पुण्यातल्या एका ज्ञानभक्ताच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करून एक औचित्यपूर्ण पायंडा पाडला असेच म्हणावे लागेल. पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिराच्या बाहेरच्या कट्टय़ावर गेली ४० वर्षे जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसाय करणारे वसंत आठवले यांच्या मनात उद्घाटन करत असताना कोणत्या भावना उचंबळून आल्या असतील? त्यांच्या दृष्टीने साहित्याच्या पंढरीत आपण वारकरी म्हणून सहभागी झाल्याचा कृतार्थ भाव असणे स्वाभाविक असले, तरी पुस्तकांच्या दुनियेतील सर्वात शेवटच्या पायरीवरचा हा पालखीचा भोई किती महत्त्वाचा आहे, याचे भान यानिमित्ताने साहित्य व्यवहारातल्या सगळय़ांनाच आले, हे फार चांगले झाले. आपले वडील यशवंत नारायण आठवले यांनाश्रेय देताना वसंत आठवले यांना त्यांचा जुनी पुस्तके जमविण्याचा छंद आठवतो. वडील रंगभूमीवर छोटय़ा-मोठय़ा भूमिका करत होते आणि त्यांचा गंधर्व संगीत नाटक मंडळींशी जवळचा संबंध होता. (‘एकच प्याला’च्या शेवटच्या प्रयोगात त्यांनी बालगंधर्वाबरोबर ‘सुधाकर’ची भूमिका केली होती!) चित्रपटांच्या आगमनानंतर मराठी रंगभूमीची जवळजवळ वाताहत झाली आणि यशवंतरावांना त्यांचा छंद उपयोगी पडला. तेव्हा वसंतराव तारुण्यात पदार्पण करत होते. बालगंधर्व हे वसंतरावांचेही दैवतच! बालगंधर्वावरील पुस्तकाच्या किमान पंधराशे प्रती विकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो. किलरेस्कर ऑईल इंजिन्समधील ग्रंथालयातल्या नोकरीतून त्यांनी १९८५मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यापूर्वीपासूनच म्हणजे ७१पासून त्यांनी जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसायही सुरू केला होता. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या अनेक संशोधकांचे सोबती म्हणून आठवले यांनी फार मोठी कामगिरी बजावली आहे. जुनी पुस्तके ही केवळ त्यातील साहित्यमूल्यांमुळेच विक्रीयोग्य होतात, याचे उत्तम भान वसंतरावांकडे आहे. त्यामुळे उत्तम पुस्तके मिळवणे आणि ती योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे यातील जो अपूर्व आनंदाचा भाग आहे, तो वसंतरावांना अनेक वेळा मिळाला आहे. जरी त्या पुस्तकांच्या विक्रीतून मिळणारा पैसा यथातथाच असला, तरी त्यांना पुस्तकाचे मूल्य फार उत्तम रीतीने जाणवते, असा निर्वाळा अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी आणि संशोधकांनी दिला आहे. अनेक साहित्यिकांशी जवळची ओळख किंवा मैत्री असली, तरी वसंतरावांच्या चेहऱ्यावर त्याचे जराही प्रदर्शन कधी होत नाही. त्यांच्या दृष्टीने पुस्तकांचे प्रेम हेच खरे आणि टिकाऊ! गेली अनेक वर्षे सरस्वती मंदिराच्या कट्टय़ावर पुस्तके विकणाऱ्या या पुस्तक विक्रेत्याला रद्दीवाला म्हणून संबोधण्याची कुणाची हिंमतही होणार नाही, असे कार्य या व्यक्तीने केले आहे. शनिवारवाडय़ाचा १८१८ (म्हणजे ज्या वर्षी ब्रिटिशांनी याच वाडय़ावर युनियन जॅक फडकवला.) आणि १८२८ मधील नकाशा पुणे महानगरपालिकेला मिळाला, तो केवळ वसंतराव आठवले यांच्यामुळेच! जुन्या पुस्तकांमधील ज्ञानाचे अचूक निदान करता येण्यासाठी आवश्यक अभ्यास असणारा हा ज्ञानसाधक साहित्य संमेलनामुळे रस्त्यावरून साहित्याच्या व्यासपीठावर विराजमान झाला, हीच महत्त्वाची गोष्ट!
August 5, 2017
छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे अभ्यासक अशी ख्याती होती. त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४९ रोजी पुणे येथे झाला.
May 10, 2019
डॉ. हेडगेवार यांनी तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी – व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते.
June 9, 2022
जुन्या काळातील एक मराठी कवी.
November 4, 2016
अँजेलो मॅथ्यूजचा फलंदाज म्हणून ठसा असला तरी त्याने सर्वोत्तम गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली. अँजेलो मॅथ्यूजने २००९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. काँपॅक कपमधील (२००९) तिसऱ्या लढतीत यजमानांच्या ३०८ धावांच्या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १६८ धावांत संपला.
June 2, 2021
‘सराई’, ‘पाणकळा’, ‘पड रे पाण्या’, ‘सोनकी’ आदी कांदब-यांतून शेतक-यांची, आदिवासींची दु:ख ज्यांनी समाजाभिमुख आणली. स्वत:ला ज्यांनी ‘शेतकी कादंबरीकार’ मानले ते ज्येष्ठ कादंबरीकार श्री. र. वा. दिघे हे खोपोलीचे सुपुत्र. त्यांचा जन्म २४ एप्रिल १८९६ रोजी कल्याण येथे झाला. रघुनाथ वामन दिघे यांच्या पुष्कळशा कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमीचे चित्रण करणाऱ्या आहेत. त्यांच्या लिखाणातील नायक हा बहुधा वारकरी आणि शेतकरी असायचा. हा नायक शेतकरी वारकरी संप्रदायाची मूल्ये जपतो आणि निसर्गाच्या आपत्तीशी त्यानुसार झगडा देतो. संतांच्या शिकवणीतून हा मुकाबला तो कसा करतो, याची त्या कादंबऱ्यांमध्ये उत्तम वर्णने वाचायला मिळतात. विशेषत: त्यांच्या पाणकळा आणि पड रे पाण्या या दोन कादंबऱ्यांतून भीमा नदीच्या खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचे जीवन समर्थपणे उभे केलेले दिसते. आजही खोपोलीला ‘दिघ्यांची खोपोली’म्हटलं की, अभिमानाने उर भरून येतो. खोपोलीतल्या, विहिरीकडे जाणा-या रस्त्याला र. वा. दिघे मार्ग नाव दिलं, तसेच खोपोली नगरपरिषदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी त्यांचे स्मारक उभे केले आहे. मा.रघुनाथ वामन दिघे यांच्या साहित्यिक कारकिर्दीचे विश्लेषण व मूल्यमापन करणारा कादंबरीकार र.वा.दिघे नावाचा समीक्षाग्रंथ रवींद्र ठाकूर ह्यांनी लिहिला आहे.रघुनाथ वामन दिघे यांचे ४ जुलै १९८० रोजी निधन झाले.
रघुनाथ वामन दिघे यांची साहित्यसंपदा
कादंबरी : पाणकळा, वसंतराव व चाळीसचोर, निसर्गकन्या : रानजाई, गानकुब्धा मृगनयना, आई आहे शेतात, पड रे पाण्या, कार्तिकी, सोनकी, हिरवा सण
कथासंग्रह : पूर्तता, पावसाचं पाखरू, पांडुरंग कांती , लक्ष्मीपूजन, आसरा
नाटक : माझा सबुद (मराठी)
द ड्रिम दॅट व्हॅनिश्ड् (इंग्रजी)
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 25, 2017
“सिंहासन” मधील “माणिकराव” यांची दत्ता भट यांची एक अजरामर भूमिका. हा जब्बार पटेलांचा सिनेमा अप्रतिमच आहे. या चित्रपटातील दत्ता भट हे सत्यनारायणासमोर साष्टांग दंडवत घालून मनातील विचार तो बोलतात, त्यावेळचा मुद्राभिनय आणि आवाजाचा बाज व फेक जबरदस्त होती.
June 29, 2022
आकाश दर्शनाचे संस्कार जर शालेय वयात झाले तर या कुतुहलाचे रुपांतर जिज्ञासात होऊ शकते. तसे झाले तर खगोल शास्त्राचा अभ्यास करण्याचा ध्यास त्या विद्यार्थांना शालेय वर्षातच लागतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सरस्वती सेकंडरी स्कूलचा माजी विद्यार्थी डॉ. गुरुराज वागळे.
October 14, 2018
सवड मिळताच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन ते वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण करत. आवश्यकता वाटल्यास त्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत घेऊन येत. त्यांच्या या छंदामुळे पश्चिम घाटातील नद्या आणि पाणवठे यात लिम्नॉक्निडा इण्डिका या जलव्याल प्राणीसंघातील जलपुष्प गणातील प्राण्यांचे अस्तित्व असल्याचे आढळून आले. त्यापूर्वी पश्चिघम घाटात या जलपुष्पाचे अस्तित्व कोणासही ठाऊक नव्हते. तांबी, वेण्णा, धोम येथील धरणांमध्येही हे प्राणी आढळून आले. त्यावर ‘नेचर’ या प्रख्यात नियतकालिकात त्यांचा संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाला.
November 18, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti