(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुधीर ठाकरे

    गरिबांच्या मुळावर उठलेला चर्मोद्योग घोटाळा उघड करणे असेल, गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, कापूस विक्रीतून सरकारला नफा मिळवून देणे असेल..अशी विविध सरकारी कामं कर्तबगारीने पार पाडणारे अधिकारी ही सुधीर ठाकरे यांची ओळख.

    नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून एम.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स) केल्यानंतर त्यांनी प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. यानंतर त्यांनी प्रशासनात एम.ए. पदवी मिळवली. एलएलबीही पूर्ण केले. अभ्यास सुरू असतानाच त्यांनी भरती परीक्षा देऊन १९७५मध्ये विक्रीकर अधिकारी म्हणून पहिले प्रशासकीय पद स्वीकारले.

    १९७८ मध्ये त्यांची सहकार खात्यात नियुक्ती झाली. याच खात्यात ते जॉईंट रजिस्टार झाले. यावेळी त्यांनी चमोर्द्योग घोटाळा उघड केला. राज्यातील अनेक बड्या घोटाळ्यांपैकी हा एक घोटाळा मानला जातो. यामध्ये मुंबईचे तत्कालीन नगरपालांपासून ते अनेक राजकीय नेत्यांना कोर्टाच्या पायर्‍या चढाव्या लागल्या. त्यांच्या या कामात तत्कालीन आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी त्यांना खूप मदत केली.

    यानंतर ते कापूस महामंडळात जॉईंट एम.डी. म्हणून रूजू झाले. त्यावेळेस सरकार शेतकर्‍यांचा कापूस विकत घ्यायचे आणि तो चढ्या भावाने विकायचे. मात्र यामध्ये म्हणावी तितकी सुसूत्रता नव्हती. सरकारला नफा मिळवणंही अवघड होत होतं. पण त्यांनी विभागीय कामात सुसूत्रता आणून सरकारला नफा मिळवून दिला. ठाकरे यांनी त्यांच्या कारकीदीर्त एका वर्षी सरकारला ७०, तर दुसर्‍या वर्षी ५० कोटींचा नफा मिळवून दिला. त्यांच्यानंतर हा नफा मिळवणे अद्याप कोणाला शक्य झाले नाही. यानंतर ते ग्राहक हित विभागात जॉईंट एम.डी. झाले.

    १९९१ मध्ये ते आयएएस झाले. यानंतर त्यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीईओपदाची सूत्रे स्वीकारली. लगेच त्यांना जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेथेही त्यांनी विविध प्रयोग केले.

    यानंतर मंत्रालयात विविध विभागांत काम करताना त्यांनी गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान अशा योजनांना चालना दिली. ग्राम विकास विभागात सचिव असताना त्यांनी राज्यातील सर्व गावे कम्प्युटरने जोडण्याचा 'संग्राम' हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविला.

    त्यांची ग्रामविकास खात्याच्या सचिवपदावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. दोन वर्षांच्या या काळात एमपीएससीचा दर्जा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दर्जापर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे. आता नव्या विभागातील आव्हानांना सामोरे जाताना या विभागाचा कायापालट करण्याचे त्यांचे ध्येय आहे. आम्ही समाजाचे सेवक आहोत राजे नाही, अशी भावना जपणारा हा अधिकारी याही कामात यशस्वी होईल, यात शंका नाही.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017


  • संगीतकार अवधूत गुप्ते

    नादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते गाजले.

      June 8, 2017


  • ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम

    एक शून्य शून्य या मालिकेने त्यांना ओळख दिली. मराठी नाटक, मालिका, काही चित्रपट असा प्रवास सुरु असताना १९९८ मध्ये सीआयडी या मालिकेसाठी बोलावणे आले. ‘एक शून्य शून्य’ पासून ते बी. पी. सिंह यांच्याकडं काम करीत त्यांची टीव्हीवरची नव्वद टक्के कारकीर्द बी. पी. सिंहांच्यासोबत घडलीय. पाच मराठी सिरियल्स त्यांनी दिग्दर्शित केल्या. त्या सगळ्या सिरियल्स मध्ये शिवाजी साटम यांनी काम केले आहे. अगदी ‘आहट’पासून ते ‘सीआयडी’पर्यंत.

      April 22, 2022


  • माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

    इंग्रजांच्या जोखडातून भारताची मुक्तता झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अशी त्यांची प्रमुख ओळख आहे. अनेक चळवळीतील त्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला.

      July 13, 2025


  • भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगली वेंकय्या

    पिंगाली वेंकय्या.. हे नाव फारसे कुणाला माहीत नाही. भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली ती याच पिंगाली वेंकय्या यांनी. त्यांचा जन्म २ ऑगस्ट, १८७६ रोजी झाला. ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते.चिल्लापल्ली येथे प्राथमिक, तर मासुलीपटनम येथील हिंदू हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते कोलंबोला रवाना झाले.

    देशभक्तीने भारावलेल्या पिंगाली यांनी वयाच्या १९ व्या वर्षी बोअर युद्धासाठी आपले नाव नोंदवले आणि ते सैन्यात भरती झाले. त्यानंतर आफ्रिकेत असताना त्यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली आणि त्यांचे ऋणानुबंध जुळले. ते पुढे ५० वर्षे टिकून होते. भारतात परतल्यावर बंगलोर आणि मद्रास येथे त्यांनी रेल्वे गार्ड म्हणून काम केले आणि मग बेल्लारी येथील शासकीय सेवेत प्लेग अधिकारी म्हणून ते रुजू झाले. पण त्यांची देशभक्तीची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी थेट लोहरमधील अँग्लोवेदिक महाविद्यालय गाठले आणि प्राध्यापक गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषा आणि इतिहासाचे शिक्षण घेतले.

    उत्तर भारतातील पाच वर्षांच्या वास्तव्यात ते राजकारणात सक्रिय झाले. ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी क्रांतिकारकांच्या मदतीने ते योजना आखू लागले. १९०६ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत पिंगालींमध्ये दडलेला क्रांतिकारक दादाभाई नौरोजी यांनी हेरला. या ठिकाणीच पिंगाली यांची मुनगलाच्या राजाशी भेट झाली. त्यानंतर १९०६ ते १९११ ही पाच वर्षे मुनगला या ठिकाणी त्यांनी शेतीविषयक संशोधन केले. त्यांच्या या संशोधनामुळे आणि कंबोडिया कॉटनच्या शोधामुळे ते पट्टी वेंकय्या म्हणून ओळखले जाऊ लागले. ब्रिटिशांनाही त्यांच्या या संशोधनाचे कौतुक वाटले आणि त्यामुळेच पिंगाली यांना रॉयल अॅग्रिकल्चरल सोसायटी ऑफ ब्रिटनचे सन्माननीय सदस्यत्व देऊ केले.

    सरतेशेवटी पिंगाली मासुलीपट्टममध्ये परतले आणि त्यांनी स्वत:ला नॅशनल स्कूलच्या विकासासाठी वाहून घेतले. या ठिकाणी प्राथमिक सैन्यप्रशिक्षण, घोडेस्वारी, इतिहास आणि शेतीविषयी प्रशिक्षण देण्यात येत असे. ते केवळ पुस्तकी ज्ञानाने समाधानी होणारे नव्हते. त्यांच्या दैनंदिन आचरणातून त्यांचा उदारमतवादीपणा दिसत असे. १९१४ मध्ये आपल्या शेतावर ‘स्वेच्छापुरम’ ही संस्था स्थापन केली.
    १९१६-१९२१ या कालावधीत पिंगाली यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक आगळा पैलू सर्वाच्या दृष्टीस पडला. सुमारे ३० ध्वजांचा अभ्यास करून पिंगाली यांनी भारतीय ध्वजाची कल्पना मांडली. आपल्या तिरंग्याच्या सध्याच्या रूपाचे डिझाईन तयार करण्याचे श्रेय पिंगाली यांना दिले जात असले तरी भारतीय ध्वजाची पाळेपुळे ‘वंदे मातरम्’ चळवळीपर्यंत जातात. १ ऑगस्ट १९०६ रोजी कलकत्त्यातील पारसी बगान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे पहिले ध्वजारोहण झाले. हा ध्वजही तीन रंगांत होता. वरील भागात लाल, मध्ये पिवळा आणि खालच्या बाजूला हिरवा, अशी या झेंडय़ाची रंगसंगती होती. लाल भागात पांढऱ्या रंगाची आठ कमळाची फुले कोरलेली होती. पिवळ्या भागात निळ्या रंगाने देवनागरी लिपीत ‘बंदे मातरम्’ असे लिहिले होते. मदाम कामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०७ मध्ये पॅरिसमध्ये ध्वजारोहण केले होते. या झेंडय़ाची रंगसंगतीही पहिल्या ध्वजाप्रमाणेच होती. फरक एवढाच की, पहिल्या पट्टीमध्ये केवळ एकच कमळ होते आणि सप्तर्षी दर्शविणारे सात तारे होते.

    बर्लिनच्या समाजवादी बैठकीत हा ध्वज फडकविण्यात आला. १९१७ मध्ये जेव्हा राजकीय चळवळीने वेग घेतला, त्यावेळी अॅनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ध्वजारोहण केले होते. या ध्वजाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात युनियन जॅकचा शिक्का होता. त्याचप्रमाणे पांढऱ्या आकाराचे अर्धवर्तुळ आणि ताऱ्याचे चिन्ह होते. त्यावेळच्या जनतेचे उद्दिष्ट दाखविणे हा त्यामागचा संकेत होता आणि सत्ता मिळविण्याची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी युनियन जॅकचा शिक्का होता. पण त्या ध्वजावरील युनियन जॅकचे अस्तित्त्व ही राजकीय तडजोड असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या ध्वजाचा स्वीकार करण्यात आला नाही. १९२१ मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आले आणि त्याचवेळी तिरंग्याचे पहिले रूप जनतेसमोर आले.

    १९२१ ते १९३१ ही दहा वर्षे पिंगाली यांच्यादृष्टीनेच नव्हे तर आंध्र प्रदेशमधील स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा कालावधी ठरला. ३१ मार्च आणि १ एप्रिल १९२१ या दोन दिवशी बेझवाडा येथे एआयसीसीच्या (ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने) ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी पिंगाली वेंकय्या ध्वज घेऊन गांधीजींकडे गेले. भारतातील दोन प्रमुख धर्म दर्शविणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग यात होते. अशाप्रकारे राष्ट्रध्वज अस्तित्वात आला, पण ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने तो अधिकृतपणे स्वीकारला नव्हता.

    गांधीजींनी तो स्वीकारल्यानंतर पुढील प्रत्येक कॉँग्रेस बैठकीमध्ये हा ध्वज फडकविण्यात येत असे. सामान्य माणसाच्या प्रगतीचे प्रतीक असलेल्या चरख्याचा या ध्वजामध्ये अंतर्भाव करण्यात यावा, अशी सूचना जालंधरचे हंसराज यांनी केली. त्यानंतर गांधीजींनी इतर अल्पसंख्यांकांचे अस्तित्व दर्शविणारी पांढरी पट्टी या ध्वजात समाविष्ट केली. १९३१ पर्यंत त्याला लोकमान्यता मिळाली नव्हती. ध्वजामधील रंगांचा अर्थ समजण्यावरूनही त्यावेळी जातीय तणाव निर्माण झाला होता. १९३१ मध्ये कराची येथे भरलेल्या कॉँग्रेसमध्ये यावरील अंतिम तोडगा काढण्यात आला. शौर्य दर्शविणारा भगवा, सत्य आणि शांती दर्शविणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शविणारा हिरवा असा या तीन रंगी ध्वजाचा अर्थ लावण्यात आला. चरखा आणि सूत यांच्याऐवजी ध्वजाच्या मध्यभागी अशोकचक्राचा समावेश करण्यात आला.

    राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ समजावताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले की, राजकीय नेत्यांनी व्यावहारीक सुखांचा त्याग करणे हे भगवा रंग दर्शवतो, सत्याची वाट दाखवणे हे पांढरा रंग सांगतो तर हिरवा रंग आपले जमिनीशी असलेले नाते दर्शवितो आणि अशोकचक्र हे धर्माचे प्रतीक आहे.
    पिंगाली वेंकय्या यांचे ४ जुलै, १९६३ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / संजय पेठे

      August 2, 2017


  • ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा

    सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. शंकर सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते.

      January 28, 2022


  • महान मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल

    देवलानीं एकंदर संगीत व गद्य मिळून सात नाटकें लिहिलीं आहेत. दुर्गा, मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय, झुंजारराव, शापसंभ्रम, संगीत शारदा, आणि संशयकल्लोळ. पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.

      April 1, 2019


  • प्रभावी वक्ते व उत्तम लेखक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर

    सुमारे ४०० वर्षांपूर्वी गोव्यातील सक्तीने ख्रिश्चन केलेल्या हजारो गावकऱ्यांचे शुद्धीकरण केले. या शुद्धीकरण आंदोलनात मामांचा सिंहाचा सहभाग होता. या घटनेचे सांगोपांग विवेचन करणारा ‘गोमंतक शुद्धीचा इतिहास’ हा ४०० पानांचा स्वतंत्र विस्तृत ग्रंथ मामांनी लिहिला. विशेष म्हणजे या ग्रंथाला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुंदर प्रस्तावना लाभली.

      April 6, 2022


  • मोहन वाघ

    मोहन वाघांनी तब्बल ८३ नाटकांची निर्मिती केली. त्यांचे १५,६४७ एवढे प्रयोग केले, पण त्यांची फक्त १५ नाटकंच व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी ठरली. तरीही प्रत्येक कलाकाराला प्रयोगानंतर पाकीट द्यायलाच हवं, आजचं पाकीट उद्या द्यायचं नाही, हा त्यांचा नियम होता.

      July 19, 2022


  • मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस

    माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलाने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री. त्यांचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस.

      July 22, 2017