(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ सतार वादक अब्दुल हलीम जाफर खान

    भारतीय चित्रपट सृष्टीतील गाणी आपल्या सतार वादनाने अजरामर करणारे सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणजेच ज्येष्ठ पार्श्वगायक व सतारवादक उस्ताद अब्दुल हालीम जाफर खान. त्यांचे वडील जाफर खान हे स्वतः एक अष्टपैलू कलाकार व गायक होते. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. त्यामुळे लहानपणापासूनच उस्ताद अब्दुल खान यांच्यावर संगीत व गायनाचे संस्कार झाले होते. अब्दुल खान यांना संगीत आणि वाद्य वादनाची प्रचंड आवड होती. अब्दुल खान यांनी सतार वादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली व रागांवर आधारीत एका कार्यक्रमात अब्दुल खान यांच्या सतारवादनाचे प्रसिद्ध भारतीय संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी कौतुक केले होते. उस्ताद खान यांनी सतारवादनात स्वतःचा `जाफरखानी’ बाज निर्माण केला होता. तसेच त्यांनी संगीत जगतात स्वतःची एक स्वतंत्र सतारवादनाची शैलीही त्यांनी निर्माण केली होती. हिंदी सिनेसृष्टीतील फिरोज निजामी, अनिल-विश्वास, शंकर-जयकिशन, मदनमोहन, सी. रामचंद्र, नौशाद, वसंत देसाई आदी दिग्गज संगीतकारांसोबत काम केले. `मधुबन मे राधिका नाचे रे’, `ये जिंदगी उसी की हैं’, या चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यातील सतार वादन उस्ताद अब्दुल खान यांनी केले.

    तसेच `मुगल-ए-आझम’, `झनक झनक पायल बाजे’ या भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपटांच्या गाण्यातील त्यांच्या सतार वादनाने गाण्यांना एक उंची मिळाली. मा.अब्दुल खान यांच्या सतार वादनाच्या दिलखेच शैलीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले. सतारवादनाच्या क्षेत्रातली त्रिमूर्ती म्हणजे रविशंकर, विलायत खान आणि अब्दुल हलीम जाफर खान. पं.रवीशंकर, उस्ताद विलायतखान आदी दिग्गज व प्रसिद्ध सतारवादकांच्या बैठकीत अब्दुल हालीम जाफर खान यांना मानाचे स्थान मिळाले. तसेच त्यांच्या बरोबरीने उस्ताद अब्दुल खान यांचे नाव घेतले जाऊ लागले. तसेच भारतीय सिनेसृष्टीसाठी उस्ताद खान यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. उस्ताद अब्दुल खान यांना संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, जीवन गौरव,`पद्मश्री’, `पद्मभूषण’ यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अब्दुल हलीम जाफर खान यांनी लहान वयात यश आणि कीर्ती संपादित केली. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे अथक परिश्रम आणि अचाट कल्पनाशक्ती. सतारवादन ध्रुपदाच्या अंगाने करणारी एक शैली आहे. रविशंकर या अंगाने वाजवत. विलायत खान गायकी अंगाने वाजविण्याचा दावा करीत.

    त्यांची शैली ही मध्यसप्तकप्रधान आहे. हलीम खान यांनी आपली स्वतंत्र शैलीच निर्माण केली. सतारीतून वेगवेगळे नाद निर्माण करणारी, सतारीची भाषा समृद्ध करणारी आणि अधिकाधिक सांगू पाहणारी. पुढे त्यांनी त्याला ‘जाफरखानी बाज’ असे नाव दिले. मा.हलीम खान यांनी दक्षिण भारतीय संगीतातील अनेक राग हिंदुस्तानी पद्धतीत आणले. ‘किरवाणी’, ‘लतांगी’, ‘कनकांगी’ वगैरे राग यापूर्वी आपल्याला अपरिचित होते. त्यांची चित्रपट संगीताच्या क्षेत्रातली कामगिरी अतुलनीय आहे. सर्व प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले आणि गाण्यांचे माधुर्य वाढविले. सतारवादनाची कला त्यांनी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता १९७६ ला मुंबईत `हलिम अकादमी ऑफ म्युझिक’ या संस्थेची स्थापना केली व या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना सतारवादन शिकविले. जुनेन खान, राजेंद्र वर्मन, हरीशंकर भट्टाचार्य, रवींद्र चारी, झुबेर शेख आदी शिष्य परिवारातील काही ठळक नावे आहेत.

    उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांच्यासाठी सतार ही त्यांची सखी होती, प्रेयसी होती आणि प्रेयसही होती. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही ते अगदी सामान्य जीवन जगले. तसेच पुरस्कार व प्रसिद्धीपेक्षा त्यांनी कलेलाच अधिक महत्त्व दिले. ते अखेरपर्यंत कलेची निष्ठेने सेवा करत राहिले. अब्दुल हलीम जाफर खान यांचे ४ जानेवारी २०१७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    अब्दुल हलीम जाफर खान यांचे सतार वादन.
    https://www.youtube.com/watch?v=JDJpFrXbY-M
    https://www.youtube.com/watch?v=5kjG_NSAmGA

      January 4, 2018


  • आकाशवाणी कलावंत नीलम प्रभू अर्थात करुणा देव

    नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.त्यांचा सहभाग असलेली ‘प्रपंच’ ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. ‘आम्ही तिघी’ या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता.

      June 10, 2021


  • दासगणू महाराज

    त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथांपैकी अमृतानुभव भावार्थमंजिरी, पासष्टीभावार्थदीपिका, श्रीगुरूचरित्र सारामृत, श्रीगोदा महात्म्य, श्रीगौडपादकारिका, श्रीईशावास्य भावार्थबोधिनी व मंत्रार्थप्रकाशिका, श्रीनागझरी महात्म्य, श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी, श्रीमध्वविजय, श्रीमांगीशमाहात्म्य, श्रीशनिप्रताप, श्रीशंडिल्यभक्तिसूत्र भावदीपिका हे प्रमुख ग्रंथ त्यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेची साक्ष पटवितात.

      November 26, 2021


  • रवींद्र म्हात्रे

    ब्रिटनमध्ये कार्यरत जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या सहयोगी जम्मू-काश्मीर लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी बर्मिंगहम मध्ये त्यांचे अपहरण केले तेव्हा भारतीय राजदूत रवींद्र म्हात्रे पहिल्यांदा ३ फेब्रुवारी १९८४ रोजी प्रसिद्धीस आले.

      July 25, 2022


  • राजमाता जिजाबाई (जिजाऊ)

    महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, राजमाता जिजाबाई. महाराजांना त्यांनी घडवलं आणि महाराष्ट्राचं बवितव्यच बदललं.

    जिजाऊ या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. इ.स. १६०५ मध्ये जिजाबाई आणि शहाजीराजांचा विवाह झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला असता, जिजाबाई आपल्या पतीशी कायम एकनिष्ठ राहिल्या. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.

    राजांचे संगोपन आणि कुशल कारभार

    शिवाजीराजे १४ वर्षांचे असतांना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, अदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेवांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला, शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. त्यांच्यावर संस्कार घडवले.

    आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत. राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नात जिजाबाईंच्या प्रेरणेचा खूप मोठा हातभार होता.

    जीवन

    शहाजी राजांनी बंगळूरात तुकाबाईंशी दुसरे लग्न केल्यावर जिजाबाईंच्या वाटयाला फारसे पती प्रेम व राजांच्या वाटयाला पिताप्रेम आले नाही. परंतु आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

    राजांच्या प्रथम पत्नी सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती. राजांचाही त्याला पाठींबा होता. या धर्म-राजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढंच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

    राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णतः जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

    शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर थोडयाच दिवसांत, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      July 11, 2015


  • मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नट आणि नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते

    मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नट आणि नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म २४ सप्टेंबर १८८९ रोजी झाला.

    दाते अवघे पाच वर्षांचे असताना त्यांचे वडील मरण पावले. घरची अत्यंत गरिबी असल्यामुळे इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाल्यानंतर चरितार्थासाठी केशवरावांनी मुंबई गाठली व तेथे सुरुवातीला त्यांनी कंपाऊंडर म्हणून काम केले. त्या काळात महाराष्ट्र नाटक मंडळींची काही नाटके पाहिल्यानंतर नट होण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनात निर्माण झाली. एका हौशी नाट्यसंस्थेच्या झुंजारराव नाटकातील सारजेची भूमिका हीच केशवरावांची पहिली भूमिका. पुढे एका हितचिंतकाच्या मध्यस्थीने त्यांनी २० मे १९०७ रोजी महाराष्ट्र नाटक मंडळीत प्रवेश केला.

    कीचकवध हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाटक महाराष्ट्र नाटक मंडळीच्या रंगभूमीवर २२ फेब्रुवारी १९०७ रोजी आले; तेव्हापासून त्या नाटकाचा व त्या नाटकातील गणपतराव भागवत यांच्या कीचकाच्या भूमिकेचा अतिशय बोलबाला झाला होता. कीचकाची पत्नी रत्नप्रभा, हिची भूमिका करण्याची संधी केशवरावांना लाभली (१९०८). त्यामुळे त्यांना भागवतांच्या अभिनयकौशल्याचे अगदी जवळून दर्शन घडले. कोणत्याही भूमिकेचा कसा आणि किती विचार केला पाहिजे, नटाच्या जीवनात शिस्तीची आणि चारित्र्याची किती गरज असते आणि नटाने प्रत्येक भूमिका रंगभूमीवर कशी जगली पाहिजे, याचे शिक्षण केशवरावांना भागवतांच्या सान्निध्यात मिळाले. महाराष्ट्र नाटक मंडळीचे मालक ⇨ त्र्यंबकराव कारखानीस आणि नाटककार खाडिलकर या दोघांना केशवराव गुरूस्थानी मानत.

    महाराष्ट्र नाटक मंडळीच्या नाटकांत केशवरावांनी काही स्त्रीभूमिका केल्यानंतर ते नायकाच्या भूमिका करू लागले. प्रेमसंन्यास नाटकातील जयंत (१९१२), सत्वपरीक्षा नाटकातील हरिश्चंद्र (१९१४), पुण्यप्रभाव नाटकातील वृंदावन (१९१६) आणि विचित्रलीला नाटकातील विचित्र (१९१६) या त्यांपैकी काही ठळक भूमिका होत. केशवरावांचा विवाह रमाबाई यांच्याबरोबर १९१७ साली झाला. रमाबाईंची सोबत केशवरावांना ३० जानेवारी १९६८ पर्यंत लाभली. आपल्या सुखी आणि नेटक्या संसाराचे सारे श्रेय केशवराव रमाबाईंना देत असत. महाराष्ट्र नाटक मंडळीचे १९१९ साली केशवराव एक भागीदारमालक झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत बेबंदशाही नाटकातील गणोजी शिर्के (१९२४), खडाष्टक नाटकातील कवीश्वर (१९२७) व सवतीमत्सर नाटकातील राम (१९२७) या भूमिका उत्कृष्ट रीतीने केल्या. महाराष्ट्र नाटक मंडळीच्या भागीदारीतून निवृत्त झाल्यानंतर १९२० ते १९३४ या काळात केशवरावांनी समर्थ नाटक मंडळी व नाट्यमन्वंतर या संस्थांच्या नाटकांत भूमिका केल्या. समर्थ नाटक मंडळीच्या आग्र्याहून सुटका या नाटकातील औरंगजेब (१९३०) आणि नाट्यमन्वंतराच्या आंधळ्यांची शाळा या नाटकातील मनोहर (१९३३) या भूमिका त्यांनी गाजविल्या. केशवराव हे उत्कृष्ट नाट्यशिक्षकही होते. नट आणि नाट्यशिक्षक अशा दोन्ही भूमिका करून त्यांनी नाट्यमन्वंतर या प्रयोगशील नाट्यसंस्थेला कलात्मक यश आणि व्यावसायिक प्रतिष्ठा मिळवून दिली.

    बोलपटांच्या आगमनानंतर केशवरावांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. प्रभात फिल्म कंपनीच्या अमृतमंथन (१९३५), कुंकू (१९३७) आणि शेजारी (१९४१) या चित्रपटांत तसेच ⇨ बाबूराव पेंटर यांच्या शालिनी सिनेटोन निर्मित सावकारी पाश (१९३६) या चित्रपटात त्यांनी प्रभावी भूमिका केल्या. सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक व्हि. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिरात शांताराम यांचे सहकारी आणि सल्लागार या नात्याने केशवराव यांनी १९४२ ते १०६७ या काळात अतिशय मोलाची कामगिरी केली. राजकमलच्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटातील त्यांची भूमिका बरीच लोकप्रिय झाली होती.

    केशवराव चित्रपटसृष्टीत रंगले होते. तरी त्यांचे मन मात्र रंगभूमीवरच गुंतलेले असे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या भाऊबंदकी नाटकाला भारताच्या राजधानीत पहिले पारितोषिक मिळाले (१९५४); त्याचे दिग्दर्शन केशवरावांनीच केले होते. संघाच्या सवाई माधवराव यांचा मृत्यू या नाटकात केशवशास्त्र्यांची भूमिका करून (१९४६–६३) केशवरावांनी त्या समर्थ शोकांतिकेला जिवंत केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या मंगलदिनी (१ मे १९६०) राजकमल कलामंदिराच्या नाट्य शाखेने केलेल्या शिवसंभव नाटकाचा प्रयोग प्रत्यक्ष शिवनेरी येथे करण्यात आला; त्या प्रयोगाचे दिग्दर्शक केशवराव होते. रंगभूमीवरील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना १९६४ साली संगीत नाटक अकादमीचे राष्ट्रपतिपदक मिळाले.

    ‘नोच्यार्थो विफलोऽपि दूषणपदम्‌ दूष्यस्तु कामो लघु:|’ हे महाराष्ट्र नाटक मंडळींचे ब्रीदवाक्य होते आणि केशवरावांच्या जीवनाचेही तेच सारसर्वस्व होते. मा.केशवराव दाते यांचे १३ सप्टेंबर १९७१ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ.मराठी विश्वकोष, इंटरनेट / जोग वि. वा. संपा. नटश्रेष्ठ केशवराव दाते, मुंबई, १९७६.

      September 13, 2017


  • वीर खुदिराम बोस

    भारतातील पहिल्या बॉंबचा यशस्वी रित्या प्रयोग करणारे पहिले क्रांतिकारक म्हणजे खुदिराम बोस.खुदिराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी बंगाल मधील मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी गावी झाला.त्र्यलोक्यनाथ बोस हे त्यांचे वडील. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीप्रियादेवी. खुदिराम यांना एक मोठी बहीण होती तिचे नाव अपरूपा. खुदिराम 10 वर्षाचे असताना त्यांचे आईवडील निजधामास गेले. यानंतर त्यांचा सांभाळ हा त्यांच्या बहिणीने केला.पुढील शिक्षणासाठी खुदिराम हे मिदनापूर येथे आले. जसे जसे वय वाढत होते तसे तसे क्रांतिकार्याची ओढ खुदिराम याना लागत गेली.

    मिदनापूर येथे “युगांतर” या क्रांतिकारक गुप्त संस्थेचे ज्ञानेन्द्र नाथ बोस यांनी त्यांना क्रांतिकार्यत येण्यास सांगितले. 1905 साली ब्रिटिश व्हाइसरॉय लोर्स कर्झन याने बंगालच्या फाळणीला मान्यता दिली आहे अशी घोषणा केली. या निर्णयामुळे बरेच बंगाली तरुण त्वेषाने पेटून उठले. या फाळणीचा विरोध सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपिनचंद्र पाल, आणि लोकमान्य टिळक या सर्वांनी केला.

    यानंतर मिदनापूर येथे 1906 साली स्वदेशीच्या आंदोलना वेळी एक शेतकी प्रदर्शन भरले होते यावेळी खुदिराम आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी पत्रके वाटली. सत्येंद्रनाथ यांच्या कडे युगांतर मिदनापूर चे नेतृत्व होते. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या धाडी मध्ये कसे बसे प्रयत्न करून खुदिराम यांनी तिथून पळ काढला,त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. यामुळे त्यांना आपले घरदार ओडावे लागले आणि ते एका विणकामच्या शाळेच्या वस्तीगृहवर जाऊन राहू लागले. पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी एक दिवशी अचानक छापा घातला आणि खुदिराम यांना अटक केली.1906 एप्रिल मध्ये खुदिराम यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला.हा खटला मिदनापूर येथील सेशन कोर्टसमोर चालला. यातून 16 मे 1906 रोजी खुदिराम बोस निर्दोश सुटले.

    बंगालच्या फाळणी विरोधी आंदोलनात बऱ्याच क्रांतिकार्यना क्रूर शिक्षा ठोठावण्यात आल्या. या शिक्षा देणाऱ्या मध्ये कलकत्त्याच्या चीफ मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड हा अग्रेसर होता. याच चीफ मॅजिस्ट्रेट ने नंतर युगांतर, नवशक्ती, संध्या,वसुमती, यांच्या संपादकांना कठोर शिक्षा दिल्या. याबद्दल ब्रिटिश सरकारने किंग्जफोर्डची मुझफ्फरपूर ला जज म्हणून बदली केली. आता क्रांतिकारकांचा निर्णय झाला होता बैठकीत किंग्जफोर्ड ला यमसदनी धडण्याचा निर्णय झाला होता. यानंतर खुदिराम कलक्त्यास येऊ लागले तिथे त्यांचे मामा सतीशचंद्र दत्त यांच्याकडे कॉर्पोरेशन ⅘ स्ट्रीट येथे उतरत असत. याचदरम्यान युगांतरच्या कलक्त्यामधील कार्यालयात गेले त्यावेळी त्यांना किंग्जफोर्ड बद्दल चा बेत समजला. याच वेळी त्यांची आणि प्रफुल्लकुमार चाकी यांची भेट झाली.

    पुढचा बेत आखण्यासाठी सगळे क्रांतिकारी एकत्र जमलेल्या गुप्त बैठकीत किंग्जफोर्ड ला मारण्याची जबाबदारी कोण घेणार याचा निर्णय होणार होता. त्यासाठी सगळ्यांच्या नावाच्या चिठया टाकण्यात आल्या. यात पहिले नाव होते प्रफुल्लकुमार चाकीं आणि नरेंद्र गोस्वामी. पण अचानक नरेंद्र गोस्वामी ने हे काम करण्यास नकार दिला.त्यांच्या जागी मग खुदिराम बोस यांची निवड करण्यात आली. 23 एप्रिल 1908 रोजी दोघेही जण मुजफ्फरपूर ला येण्यासाठी निघाले.

    किंग्जफोर्ड ला मारण्यासाठी बॉम्ब चा वापर होणार होता, पण भारतात बॉम्ब बनवण्याची कृती उपलब्ध नव्हती. यासाठी लंडनहून हेमचंद्र दास हे बॉम्ब बनवण्याची कृती घेऊन सेनापती बापट यांच्या सांगण्यावरून भारतात आले.सेनापती बापट यांनी एका रशियन मुलीच्या मदतीने मिळवलेली भाषांतर करून हि केउती मिळवली होती आणि या मागची प्रेरणा होती स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर. खुदिराम यांच्याजवळ असणारा बॉम्ब हा आता याच कृतीवरून बनवलेला होता.

    24 एप्रिल रोजी खुदिराम आणि प्रफुल्लकुमार मुजफ्फरपूर येथे पोहचले.यानंतर किंग्जफोर्ड च्या संपूर्ण हालचालींची रेकी करण्यात आली. 30 एप्रिल रोजी दोघेही जण कामगिरीवर निघाले. थोड्याच वेळात ते किंग्जफोर्ड च्या बंगल्यासमोर येऊन उभे राहिले.रात्री साडेआठच्या वेळेस खुदिराम बॉम्ब घेऊन किंग्जफोर्ड च्या गाडीचे घोडे आणि समोरून येणाऱ्या गाडीचे घोडे यांच्यात साम्य दिसल्यावर त्या गाडीच्या दिशेने धावत सुटले. त्यांच्या पाठोपाठ प्रफुल्लकुमार हि निघाले.त्या वेळी अंधार असल्यामुळे गाडीच्या आतील बाजूस कोण आहे हे खुदिराम याना समजू शकले नाही. खुदिराम यांनी नेम धरून त्या गाडीवर तो बॉम्ब फेकला आणि स्फोट होऊन प्रचंड आवाज झाला. भारतातातील पहिला श्रीगणेशा मुजफ्फरपूर मध्ये झाला होता.पण स्फोट झालेल्या गाडीत किंग्जफोर्ड हा नव्हताच. यात स्त्रिया आणि दोन युरोपिअन जीव मारले गेले.

    यानंतर खुदिराम बोस यांना अटक झाली त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. या खटल्या अंतर्गत 11 ऑगस्ट 1908 या दिवशी खुदिराम यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सकाळी 6 वाजता या दिवशी खुदिराम यांना फाशी देण्यात आली. आणि या भारतमातेसाठी एक 19 वर्षाचा तरुण हसत हसत फासावर गेला.

    संदर्भ - मृत्युंजयाचा आत्मयज्ञ - वि श्री जोशी

      August 11, 2016


  • अभिनेत्री हेमल इंगळे

    जन्म.२ मार्च १९९६ कोल्हापूर येथे. हेमल इंगळेने सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी हि आशिकी’ या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

      April 27, 2024


  • योगाचार्य श्रीकृष्ण उर्फ अण्णा व्यवहारे

    ठाणे येथे सुरुवात करुन गेली ४५ वर्षे योगप्रसारासाठी सर्वस्व अर्पण करणारे ज्येष्ठ योगाचार्य श्रीकृष्ण उर्फ अण्णा व्यवहारे हे ठाणे शहराचे एक भूषण होते.  २६ जानेवारी १९६५ रोजी त्यांनी घंटाळी मित्र मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसह अण्णांनी योगसाधनेची चळवळ ठाणे शहरात उभी केली.

      August 25, 2019


  • संतोष नेवपूरकर

    पिंपळी रसायनात पीएचडी मिळवलेले औरंगाबादचे वैद्य संतोष नेवपूरकर हे आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेच्या माध्मातून देशभरात आयुर्वेदातील संशोधनाचे प्रसारकार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांचा बुध्यांक, बोन मॅरोवरील उपचार याविषयी त्यांनी विविधांगी संशोधन केले आहे. शिरोधारा उपचारासाठी तयार केलेल्या भांड्यासाठी पेटन्ट मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

    संतोष नेवपूरकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला संशोधनाची बहुगुणी मात्रा हा लेख पुढील पानावर वाचा.

    संतोष नेवपूरकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला संशोधनाची बहुगुणी मात्रा हा लेख वाचा.

    nevpurkar-santosh-modified

      September 8, 2015