जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कवी केशवसुत म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी…
November 7, 2016
अनिकेत केळकर हा मराठी चित्रपट , नाट्य आणि मालिका सृष्टीत कार्यरत असलेला एक अभिनेता. त्याने हिंदी सृष्टीतही काही प्रोजेक्ट्स केलेली आहेत.
August 8, 2020
मुंबई महापालिकेत नगरसेवक ते महापौर…… पुढे विरोधी पक्षनेता ते थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री….नंतर खासदार, केंद्रिय मंत्री आणि उल्लेखनीय म्हणजे लोकसभा अध्यक्ष. यशाची अशी सतत चढती कमान असलेले मनोहर जोशी हे एक कल्पक नेतृ़त्व.
September 3, 2010
पंडितकाकांनी कार्बोरेटरला लागणाऱ्या क्रिटिकल पार्टचे मशीनिंग सुरू करून पुरवठा करण्याचे शिवधनुष्य उचलले. सतत काम आणि नवीन गोष्टींचा शोध घेत असल्यामुळे कामामधून निवृत्ती त्यांना माहीतच नव्हती. फायमुळे इचलकरंजी आणि आजूबाजूला असलेल्या परिसरात प्रचंड रोजगारनिर्मिती होऊ लागली.
July 4, 2022
प्रफुल्ला दिलीप डहाणूकर, माहेरच्या प्रफुल्ला सुब्राय जोशी. प्रफुल्ला डहाणूकर या एक मराठी चित्रकार होत्या. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट्स सेंटर, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, गोवा कला अकादमी आदी अनेक कलासंस्थांच्या त्या अध्वर्यू होत्या. प्रफुल्ला डहाणूकर यांचे वडील सुब्राय अनंत जोशी, यांचा वाहतुकीचा व वाहनांचा व्यवसाय होता. प्रफुल्ला डहाणूकर पाच वर्षांच्या असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईत आले.
March 1, 2024
आपल्या या संवाद लेखनाचे इंगीत सांगताना, स्वत: दिनकरराव म्हणत, ‘मेळ्याचे संवाद लिहिताना संवाद लेखनाची गुरूकिल्ली सापडली. संवाद कलापथक-नाटक अथवा चित्रपटातले असोत, ते बोलीभाषेत लिहावेत, ऐकता क्षणीच प्रेक्षकांना कळलं पाहिजे. भालजी पेंढारकरांच्या साध्या-सोप्या-खटकेदार संवादाची छाया माझ्या संवादलेखनावर पडली आहे. त्यामुळे या क्षेत्रातले ते माझे गुरू आहेत.’ असे आवर्जून ते कबूल करताना आणि संवाद-लेखनाचे महत्त्व पटवून देताना गुरूबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करत असत.
March 21, 2022
शिवसेनेच्या इतिहासात मा.बाळासाहेबांप्रमाणेच मनोहर जोशी यांचे स्वतंत्र स्थान होते. शिवसेनेची स्थापना जून १९६६ मध्ये झाली. १९६७ एप्रिलमध्ये मनोहर जोशी यांनी पक्षसंघटनेत प्रवेश केला. तेंव्हापासून आजपर्यंत ५० वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेतील चढऊतारांचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे.
March 1, 2024
वत्सला देशमुख या मराठी रंगभूमी तसंच चित्रपटातील अभिनेत्री असून हिंदी-मराठी चित्रपटांमधुन विविधांगी व चारित्र्य संपन्न अभिनेत्री तसंच सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत.
June 4, 2014
मार्च २०१२ मध्ये सायनाने स्वीस ओपन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर जून २०१२ मध्ये थायलंड ओपन ग्रां प्री सुवर्ण सन्मान पटकावला. २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये तिने कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
March 17, 2022
डॉ. विद्याधर ओक म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वच म्हणावं लागेल. त्यांचा जन्म १५ जून १९५२ रोजी झाला. डॉक्टर, शास्त्रज्ञ, हार्मोनियम वादक, लेखक, संगीत संशोधक, ज्योतिषशास्त्रज्ञ असं परिपूर्ण व्यक्तिमत्त्व. गोविंदराव पटवर्धनांच्या या पट्टशिष्याने निष्णात हार्मोनियमवादक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. डॉ. विद्याधर ओक हे कलाक्षेत्राला ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि २२ श्रुतींचं अस्तित्व दाखवणारे संशोधक म्हणून परिचित आहेत. वैद्यकीय क्षेत्राला ते उत्तम फार्माकाॅलॉजिस्ट म्हणून माहीत आहेत.
कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. तर भारतीय, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य ज्योतिषतज्ज्ञ म्हणून चाळीसहून अधिक वर्षांचा त्यांचा व्यासंग आहे. याशिवाय विविध विषयांवर संशोधन आणि लेखन ते करत असतात. घरी संगीताची उत्तम परंपरा असल्याने बालवयातच त्यांनी आईकडून हार्मोनियम शिकायला सुरुवात केली. ज्येष्ठ हार्मोनियमवादक गोविंदराव पटवर्धन यांचं शिष्यत्व घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं. गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ डॉ. ओक हार्मोनियम वादनात रममाण आहेत. बॅडमिंटनच्या अनेक आंतरशालेय ज्युनियर चॅम्पियनशिप त्यांनी जिंकल्या आहेत.
१९६९-७० दरम्यान रुईया कॉलेजमधून विज्ञान शाखेत शिक्षण घेत असताना आणि त्यानंतर जी.एस. मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेताना अनेक चषकांवर त्यांच्या नावाची मोहोर आहे. बुद्धिबळामध्येही ते प्रवीण आहेत. डॉ. विद्याधर ओक आणि ‘२२ श्रुतींची हार्मोनियम’ हे समीकरण रसिकांच्या मनात घट्ट रुजलेलं आहे. त्यांनी केलेल्या संशोधनासाठी विविध ठिकाणी त्यांना गौरवण्यात आलं आहे. २२ श्रुतींच्या विश्लेषणाबरोबरच सतार, सरोद, सारंगी, वीणा, रुद्रवीणा, एकतारी, तंबोरा या वाद्यांवर २२ श्रुतींच्या अचूक जागा कुठे वाजतील याचं तारेचं ‘पर्सेंटेज प्रमाण’ डॉ. ओक यांनी त्यांच्या संशोधनात दिलेलं आहे. ज्येष्ठ मोहनवीणा वादक विश्वमोहन भट्ट यांनी ‘या संशोधनासाठी तुला नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे’, असे गौरवोद्गार काढले होते.
डॉ. विद्याधर ओक यांच्या संगीत, औषधशास्त्र, संशोधन, लेखन आणि ज्योतिष या क्षेत्रांतल्या योगदानासाठी राज्य सरकारतर्फे दिला जाणारा केशवराव भोसले पुरस्कार, उत्तुंग सांस्कृतिक परिवारातर्फे ‘पु. ल. देशपांडे पुरस्कार’, ठाणे महानगरपालिकेचा ‘ठाणे भूषण पुरस्कार’, सावरकर न्यासतर्फे ‘विनायक दामोदर सावरकर पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (नाटक) ज्ञानोबा माझा (म. टा. सन्मान) यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
‘मित्र जिवाचा’, ‘मनोरंजक स्वभावशास्त्र’, गोविंदराव पटवर्धन यांच्या जीवनचित्रावर प्रकाश टाकणारं ‘गोविंद गुणदर्शन’, २२ श्रुती, श्रुती गीता, ‘ताजमहाल’ हे संगीत नाटक, ‘श्रुतीविज्ञान व रागसौंदर्य’ आणि नुकतंच प्रकाशित झालेलं ‘पुनर्जन्म - मिथ्य की तथ्य’ या पुस्तकांचं लेखन डॉ. विद्याधर ओक यांनी केलय. सध्याचे आघाडीचे हामोर्निअम वादक आणि संगीत संयोजक आदित्य ओक हे डॉ. विद्याधर ओक यांचे चिरंजीव. आदित्य ओक यांचा जादूची पेटी हा कार्यक्रम सध्या खूप गाजत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 15, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti