जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी गांधी हत्याकांडात त्यांचे घर जळाले अन् त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांना आयुष्यातली पहिली कविता ‘मानवते तु विधवा झालीस’ सुचली. त्यांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला.
May 10, 2019
शैलीदार फलंदाज, माजी कर्णधार आणि वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९६३ रोजी हैदराबाद येथे झाला.
शैलीदार फलंदाज, माजी कर्णधार आणि वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी पदार्पणाच्या तीन कसोटींमध्ये तीन शतके झळकवत जागतिक विक्रमासह क्रिकेटमध्ये थाटात आगमन केले होते. मोहम्मद अझरुद्दीन हा आवडता खेळाडू होता तो मनगटी फटके आणि चपळ क्षेत्ररक्षण या गुणांमुळे. ते मधल्या फळीतील फलंदाज होते. ३१ डिसेंबर १९८४ रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अजहरुद्दीनने पदार्पण केले आणि पहिल्या तीन सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली. अझरुद्दीन यांनी ९९ कसोटी सामने खेळत एकूण २२ शतके झळकवली, श्रीलंकेविरुद्ध १९९ सर्वाधिक धावा केल्या आहेत.त्याने पदार्पणात लागोपाठच्या सलग कसोटी सामन्यांत शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. ४५ च्या सरासरीने आणि एकदिवसीय सामन्यात ३७ च्या सरासरीने ७ शतके केली. क्षेत्ररक्षक म्हणून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५६ झेल घेतले. ३०० एकदिवसीय सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला.
१९८०च्या मध्यावर निवृत्त होत गेलेल्या काही मातब्बर फलंदाजांची उणीव अझरने भासू दिली नाही. मोहम्मद अझरुद्दीन यांनी ४७ कसोटीत भारताचे कर्णधारपद भूषवले होते. कर्णधार म्हणून मोहम्मद अझरुद्दीन बऱ्यापैकी यशस्वी ठरला, तरी ते यश अझरच्या नेतृत्वगुणांचे नक्कीच नव्हते. २००० मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर बीसीसीआयने जीवनभर बंदी घातली. कारकीर्दीच्या अखेरच्या दिवसांमध्ये मॅच-फिक्सिंगमध्ये तो गुंतल्याचे आढळल्यानंतर अझरची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. ८ नोव्हेंबर २०१२ रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली होती. २००९ मध्ये, काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर मोरादाबाद मतदारसंघातून मोहम्मद अझरुद्दीन संसदेत सदस्य म्हणून निवडून आले होते.
१९८६ मध्ये अझरुद्दीन यांना अर्जुन पुरस्कार आणि १९८८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९१ साली त्यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला. १९८७ मध्ये अझरुद्दीन यांनी नऊरीन यांच्याशी विवाह केला होता. १९९६ साली त्यांनी नऊरीन बरोबर घटस्फोट घेतला आणि अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले. अझरचे संगीता बिजलानी बरोबरही २०१० साली घटस्फोट झाला.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 8, 2022
गुलशन बावरा यांचे मूळ नाव गुलशन कुमार मेहता. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९३७ रोजी झाला. त्यांचे वडील बांधकाम संबंधित व्यवसाय करीत होते. गुलशनदांचे आयुष्यच मुळी लहानपणापासून संकटांनी घेरलेले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोरच आई वडिलांची हत्या झाली. त्यानंतर भेदरलेल्या गुलशन बावरा यांनी त्यांच्या लहान भावासकट एका छावणीत आश्रय घेतला आणि त्यानंतर माघारी परतणाऱ्या जमावाबरोबर ते भारतात आले. तेथून ते जयपूरमधल्या आपल्या बहिणीच्या घरी आले. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास जयपूरमधूनच सुरू झाला.
नंतर गुलशन बावरा यांनी दिल्लीस येऊन मॅट्रिक आणि दिल्ली विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली होती.
पदवी मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वेत नोकरीसाठी अर्ज केला. रेल्वे भरती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना कोटा येथे नियुक्ती देण्यात आली, पण जेव्हा ते कामावर हजार होण्यास कोट्याला पोहचले तर ती जागा अगोदरच भरलेली होती. मग त्यांना मुंबईस पुनर्नियुक्ती देण्यात आली आणि अशा तऱ्हेने ते माया नगरीत दाखल झाले.
१९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रसेना या चित्रपटाद्वारे त्यांना ब्रेक मिळाला. या चित्रपटातील त्यांनी लिहिलेले मैं क्या जानूँ कहाँ लागे ये सावन मतवाला रे हे गीत लता मंगेशकरांनी गायले. या चित्रपटाला कल्याणजी-आनंदजी या द्वयींचे संगीतदिग्दर्शन लाभले. त्यांनी १९६१ साली नोकरी सोडून दिली.चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती सट्टा बाजार या चित्रपटाद्वारे. चित्रपटसृष्टीत अगदी नवखे असल्याने त्यांची वेषभूषा ही गबाळ्यासारखी होती. त्यामुळे या चित्रपटाचे वितरक असणाऱ्या शांतिभाई पटेल यांनी त्यांचे नामकरण बावरा असे केले. तेव्हापासून ते गुलशन बावरा या नावाने ओळखले जाऊ लागले.
चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी गुलशनदा केवळ वीस वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ २४० गाणी लिहिली आहेत. पैकी कल्याणजी-आनंदजी ह्या संगीतकारांसाठी गुलशन बावरा यांनी एकूण ६९ गाणी लिहिली तर आर. डी. बर्मन यांच्यासाठी १५० गाणी लिहिली.त्यांना मेरे देश की धरती आणि यारी है इमान मेरा या गाण्यांसाठी दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. मेरे देश की धरती (उपकार), यारी है इमान मेरा (जंजीर), अगर तुम ना होते (अगर तुम ना होते), वाद कर ले साजना ( हाथ की सफाई), कस्मे वादे निभायेंगे हम (कस्मे वादे) ही काही त्यांची गाजलेली गीते. गुलशन बावरा यांचे ७ ऑगस्ट २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 7, 2017
लहान पणासूनच अपर्णाला पर्यटनाची आवड, त्यातही ट्रेकिंग सारख्या अॅडव्हेंचर प्रकाराची अधिकच ! म्हणजेच सतत चित्तवेधक गोष्टींकडे ओढा थोडा अधिक असायचा ,आणि म्हणून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न डॉ. अपर्णा यांचा असायचा, वाहनांची सुध्दा प्रचंड आवड असल्यामुळे एक निश्चय केला होता की स्वावलंबी बनल्यावर स्वत: ची गाडी किंवा बाईक खरेदी करुन आपल्या “अॅडव्हेचर ”ची आवड ही पूर्ण करायची, त्यासाठी सर्वप्रथम बाईक चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं
March 7, 2014
आज मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर यांची पुण्यतिथी
जन्म:- २० जानेवारी १८९८
आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मा.मास्टर कृष्णराव.
त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण मा.बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशीझाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. १९१० साली मास्टर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या.
गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मा. कृष्णरावांकडे आली. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मा.कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.
नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली.
मा.कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या.
संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी १९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत,भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर. पी. एम. ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.
अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत.
वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण नेहरूंनी आधीच जन गण मन निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली.मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार देण्यात येतो. मा.मास्टर कृष्णराव यांचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून मा मास्टर कृष्णराव यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- ग्लोबल मराठी / विकिपिडीया
October 20, 2016
दत्तात्रेय व्यंकटेश केतकर हे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९० रोजी झाला.
'जान्हवी टीकेसह ज्ञानेश्वरी' , ' जिज्ञासोद्यान (ज्ञानेश्वरीतील शब्दसंशोधन)', 'ज्ञानेश्वर - ५५ दुर्गम स्थलांचे अर्थ' ही पुस्तके, तसेच वडील ज्योतिषाचार्य व्यं. बा. केतकर यांचे चरित्र त्यांनी लिहिले.
## Dattatrey Vyankatesh Ketkar
July 31, 2017
गुलाम अली यांचे नाव त्यांच्या वडलांनी बडे गुलाम अली खाँ यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवले. ख्यातनाम गझल गायक गुलाम अली यांचा जन्म ५ डिसेंबर १९४० रोजी झाला. गुलाम अली थोडे मोठे झाल्यावर बडे गुलाम अली खाँ यांच्याकडे त्यांना शिष्य बनवण्यासाठी वडलांनी चकरा मारायला सुरुवात केली. बडे गुलाम हे त्या काळचे सर्वात मोठे आणि अत्यंत व्यग्र असे व्यक्तिमत्त्व होते.
गुलाम अली यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांचे वडील त्यांना पहाटे पाच वाजता उठवायचे. नाही उठले तर काठीने मारून उठवायचे. का, तर बडे गुलाम अली खाँचे नाव खराब होऊ नये. तेव्हा ते पाच वर्षांचे होते. बरेच दिवस गेल्यावर एके दिवशी बडे गुलाम अली खाँ त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या वडलांच्या असंख्य बिनत्यांची आबरू ठेवण्यासाठी गुलाम अली यांना ‘काहीतरी गा’ असे म्हणाले. त्यांनी धीर करून ‘सैयाँ बोलो तनिक मोसे रहियो न जाए’ ही ठुमरी गायली. गाणं संपताच बडे गुलाम यांनी पंधरा वर्षांच्या छोट्या गुलामला मिठी मारली आणि त्यांना आपला गंडा बांधला.
तथापि, बडे गुलाम खरोखरीच अतिशय व्यग्र असल्याने त्यांचे तीन बंधू बरकत अली खाँ, मुबारक अली खाँ आणि अमानत अली खाँ यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. १९६० साली गुलाम अली यांनी लाहोर आकाशवाणीवर गायक म्हणून कारकिर्दीची सुरवात केली. त्यानंतर त्यांना गझल गायक म्हणून भारत, पाकिस्तान व जगात अमाप लोकप्रियता मिळाली. गुलाम अलीजी एक मेहबूब गजल गायक आहेत. पाकिस्तानातील गजलचे बादशहा मेहदी हसन यांच्या नंतरच्या पुढच्या पिढीचे आणि समर्थ गजल गायक आहेत. त्यांच्या ‘चुपके चुपके’ने तीन दशकांपूर्वी लावलेले वेड अद्याप ओसरायला तयार नाही.
हिंदुस्थानी ठुमरी गायकीची शैली गजलच्या फॉर्मसाठी यशस्वीपणे वापरणाऱ्या गुलाम अली यांनी शेकडो गजला गायल्या आहेत. त्यातील एक निवडणे हे इतर गजलांवर अन्याय केल्याशिवाय शक्य नाही. गुलाम अली व आशा भोसले यांचा मिराज ए गझल हा अल्बम फारच सुंदर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 9, 2019
बाबा आमटेंच्या आनंदवन आश्रमात आशा शस्त्रक्रियेमुळे ३५ टक्यांवरुन १ टक्का इतका खाली गुंतागुंतीचे प्रमाण आणले आहे. यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण करुन अंध आणि प्रौढांना नवी दृष्टी दिली आहे.
June 28, 2022
स्वातंत्र्य सैनिक, विद्वान राजकारणी, कणखर प्रशासक आणि समाजजीवनाचे सांस्कृतिक भान असलेले बहुभाषी एन.के.पी. साळवे यांच्या निधनामुळे स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीतील एक खंदा पुरस्कर्ता नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची जाणीव या चळवळीला यापुढेही होत राहील. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे जन्मलेले एन.के.पी. साळवे तारुण्यातच स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले.
एक निष्णात चार्टर्ड अकाऊन्टंट म्हणून जशी त्यांची ओळख होती तशीच उत्कृष्ट वक्ता म्हणूनही. धर्माने ख्रिश्चन असलेल्या साळवे यांचे हिंदी, मराठी, उर्दू, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरही कमालीचे प्रभुत्व होते. त्यामुळेच कोणत्याही सभेतील त्यांचे भाषण हा वक्तृत्वाचा उत्तम वस्तुपाठच असे. उर्दू शेरोशायरीच्या पखरणीशिवाय त्यांचे भाषण संपत नसे.
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि चार्टर्ड अकांऊन्टट असल्यामुळे बऱ्याच औद्योगिक संघटनांशीही त्यांचा संबंध होता. व्यक्तिगत मतभेदापलीकडे दृष्टी लाभलेले ते व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी व पुढे खाण व पोलाद खात्याचे राज्यमंत्री आणि सांसदीय कामकाज मंत्री होते. महाराष्ट्रात येणाऱ्या एन्रॉनचा वीज प्रकल्पामुळे त्यांची केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणून कारकिर्द अधिक गाजली. त्यांच्याच काळात या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रवेशव्दार मुक्त झाले. संसदेत करप्रणाली, घटना, सार्वजनिक लेखा या विषयावरील त्यांची भाषणे विशेष गाजली.
नवव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केंद्र आणि राज्याचा महसूल विभागणीबाबत महत्त्वाची भूमिका बजावली. क्रीडा क्षेत्रातही एन.के.पी. साळवे या नावाला एक वेगळे वलय होते. १९४३ ला अखिल भारतीय पंच समितीवर त्यांची निवड झाली. विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे १० वर्ष अध्यक्ष असताना त्यांनी विदर्भात क्रिकेटला चांगले दिवस आणले. भारतीय नियामक मंडळाचे ते ४ वर्ष, तर आशियाई क्रिकेट कौन्सिलचेही ते अध्यक्ष होते. १९८७ मध्ये भारतात प्रथमच झालेल्या रिलायन्स विश्वकप सामन्याच्या वेळी भारत-पाक व्यवस्थापन समितीचेही ते अध्यक्ष होते. नागपुरातील सी.पी. क्लब, गोंडवाना क्लबसह मुंबई, दिल्लीतील क्रिकेट विश्वाशीही त्यांचा जवळून संबंध होता.
August 5, 2017
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू सैनिकांपैकी एक असलेले श्री शामराव देशमुख हे मुंबईतील सीकेपी बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक आहेत.
November 7, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti