(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अभिनेते मिलिंद गुणाजी

    महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि अन्य प्रेक्षणीय स्थळे यांची दूरचित्रवाणीच्या पडद्यावर ओळख करून देणारे मिलिंद गुणाजी यांचे ते कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. मिलिंद गुणाजी हे उमदे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे यात शंकाच नाही.

      July 23, 2017


  • मराठी सृष्टीतील नावाजलेले कलाकार सचिन खेडेकर

    १९९० साली सचिन खेडेकर यांनी जीवा सखा या मराठी चित्रपटा द्वारे पदार्पण केले. त्यांचा जन्म १४ मे १९६५ रोजी झाला. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले आहे. मराठी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी बॉलिवुडमध्येदेखील आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आतापर्यत अनेक बॉलिवुड चित्रपट केले आहे. त्यांचा पहिला बॉलिवुड चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला आहे. जिद्दी असे या बॉलिवुड चित्रपटाचे नाव आहे. आपली माणसे, चिमणी पाखरे, विधिलिखित, लालबाग परळ, शिक्षणाच्या आईचा घो, काकस्पर्श, फक्त लढ म्हणा असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय त्यांचा हा चित्रपट फारच गाजला होता. रूस्तम, क्रिश ३, मुंबई कटींग, आजान, जंग, बादशाह, रॉक, अनुराधा, बबल गम, तीस मार खॉं असे अनेक तगडे बॉलिवुड चित्रपटदेखील त्यांनी केले आहेत.
    त्यांची सिंघम या सुपरहीट बॉलिवुड चित्रपटातील गोठया नावाची भूमिका विशेष गाजली होती. कौन होईल मराठी करोडपती हा छोटया पडदयावरील त्यांचा कार्यक्रमाचे अॅकंरींग त्यांनी केले होते. सचिन खेडेकर यांना बॉलिवुड ,मराठी चित्रपट आणि छोटया पडदयावर देखील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच ऐकण्यास मिळाले आहे. सैलाब या टीव्ही शोसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारदेखील मिळाला आहे. तसेच ऐतिहासिक भूमिकेसाठीदेखील त्यांना उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 14, 2019


  • पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर

    राष्ट्रीय पातळीवर संगीत प्रसाराचं अवघड काम यशस्वीपणे करण्याचं श्रेय पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांना दिलं जातं. ते स्वतः द्रष्टे संगीतकार, थोर गायक आणि भाष्यकार होते. त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी मैफिली रंगवल्या, “रघुपती राघव राजाराम“ हे भजन स्वतः गाऊन त्यांनी लोकप्रिय केलं.

    स्वतःची अशी स्वतंत्र संगीत लेखन पध्दती सुरु केली व सुमारे साठ संगीतविषयक ग्रंथ लिहून प्रकाशित केले. तसेच गांधर्व महाविद्यालय स्थापून पध्दतशीर अभ्यासक्रमाधारे संगीत शिकवून संगीतप्रसार करणार्‍या तज्ज्ञांची फळी उभी केली. स्त्रियांना संगीत शिकवण्याची स्वतंत्र व्यवस्था करुन दूरदृष्टी दाखवली. विष्णू दिगंबरांचा गायकीचा ठसा आणि संगीत प्रसाराचे प्रयत्न कधीही न पुसले जाणारे आहेत.

    पंडित विष्णू दिगंबर गाडगीळ पलुस्कर यांचा जन्म कुरुंदवाड इथे १९ ऑगस्ट १८७२ रोजी झाला. दिवाळीच्या दिवसांत फटाका चेहर्‍यासमोर अचानक फुटल्यामुळे लहान वयात डोळे अधू झाले. या अवस्थेतही विष्णू दिगंबर मात्र सतत कार्यमग्न राहिले. संगीताच्या क्षेत्रात परिवर्तन घडल्याशिवाय संगीत विद्येला व विद्यार्थि वर्गालाही चांगले दिवस येणार नाहीत याची विष्णू दिगंबर यांना खात्री झालेली होती. त्यामुळे संगीत आणि संगीतकाराला समाजजीवनात योग्य स्थान मिळावं या ध्येयपूर्ततेसाठी त्यांनी १८९६ साली मिरज हे गाव सोडलं व संपूर्ण भारत दौर्याला प्रारंभ केला.

    ५ मे, १९०१ रोजी त्यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. विद्यालयातून संगीत शिक्षण ही संकल्पना त्या वेळी नव्हतीच. गुरुकुलात राहून विद्या शिकणं ही संकल्पना त्या वेळी नव्हतीच. गुरुकुलात राहून विद्या शिकणं ही जी संगितविद्येची परंपरा होती, त्याला काहीसा छेद देऊन त्यांनी विद्यालयीन शिक्षणपध्दती सुरु केली. मात्र हे करत असताना त्यांनी गुरुशिष्यपरंपरेचा त्याग केलेला नव्हता. विद्यालयात दोन प्रकारचे विद्यार्थी होते. एक प्रकार असा की विद्यार्थी नियमित वेळेत येत व निघुन जात, तर दुसर्‍या प्रकारच्या विद्यार्थ्यीवर्गाला पंडितजी उपदेशवर्ग असं म्हणत. या उपदेशवर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा दिनक्रम निश्चित केलेला होता. हे शिष्यच उद्याचे संगीतकार आहेत, याची पूर्णत्वाने खात्री पंडितजींना होती.

    लाहोरसारखं एका परप्रांतातील गाव त्यांनी शिक्षणशाळा सुरु करण्यासाठी निवडलं. जो प्रदेश पाहिलेला नाही, जिथल्या भाषेचा गंध नाही, संस्कार-रीतीभाती ठाऊक नाहीत, अशा अनोळखी गावी, अनोळखी प्रदेशात त्यांनी विद्यालय सुरु केलं. निव्वळ आत्मविश्वासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरलेलं संगीतामृतप्रवाह‘ हे मासिकही त्यांनी सुरु केलं.

    लाहोरनंतर १९०८ साली पंडितजींनी विद्यालयासाठी मुंबईमध्ये एक भली मोठी इमारत बांधली. शिवाय विद्यार्थ्यासाठी वसतिगृह काढलं. छापखाना काढला आणि ‘नारदी शिक्षा‘ ‘मांडूकी शिक्षा‘ असे ग्रंथ छापण्यास सुरुवात केली. वाद्यांची व्यवस्था नीट असावी या हेतूने वाद्यांचा स्वतःचा कारखाना काढला, त्यामुळे नवीन बनावटीची वाद्यंही तयार होऊ लागली. हा एवढा मोठा प्रपंच चालवण्यासाठी व त्यासाठी आर्थिक व्यवस्था स्वबळावर होण्यासाठी त्यांनी सामुदायिक जलसे सुरु केले. त्यामुळे अत्यल्प रसिकांना अभिजात संगीत ऐकायला मिळू लागलं.

    एवढा मोठा संस्थापक प्रपंच चालवत असतांना त्यांनी स्वतःच्या गायकीकडे दुर्लक्ष केलं नाही. ते दूरदर्शी असल्यामुळे त्यांनि स्वतःच्या आवाजाचा अभ्यास स्वतःच केला. आपला आवाज मोठा आहे, मात्र तो तानक्रियेस म्हणावा तसा साहयभूत होणार नाही ही जाणीव झाल्याबरोबर त्यांनी मंद्रसाधनेला सुरुवात केली. विविध पलटे अशा पध्दतीने घोटले की तानक्रिया करते वेळी कोणताही त्रास होऊ नये आणि आवाजाला जडत्व राहू नये यासाठी त्यांचे हे प्रयत्न चालू होते. या कष्टाचं अर्थातच त्यांना फळ मिळालं. पंडितजींचा आवाज बुलंद होता, मात्र त्यात अत्यंत निर्मळ गोडवा होता. पूर्ण तीन सप्तकांत सहजतेने फिरणारा तो आवाज होता. सुरेलपणा हे त्या आवाजाचं प्रमुख वैशिष्टय होतं. लयतालाची पंडितजींची समज तर त्या काळी सर्वत्र गौरवलेली होती. गायन मांडणीसाठी त्यांनी काही सोपे उपाय सांगितले व त्या उपायांचा उपयोग शिष्यांकरवी प्रस्तुतीकरणात राबवला. त्यांनी सुरु केलेली ही पध्दतही संगीताला त्यांचं असलेलं योगदान म्हणता येईल.

    पंडितजींच्या काही वैशिष्टयांचा उल्लेख करावयास हवा. कारण त्या वैशिष्टयांचे चांगले परिणाम आज संगीतावर झालेले पाहावयास मिळतात. १) गाण्याविषयी समाजात अभिरुची निर्माण व्हावी हे सांस्कृतिक कार्य त्यांनी स्थापन केलेल्या गांधर्व महाविद्यालय संस्थेमार्फत करुन दाखवलं. २) जे जे नवं व चांगलं ऐकावयास मिळेल त्याचा शक्य असल्यास स्वतःच्या गायकीत समावेश करुन घेण्याची त्यांची तयारी असे. ३) खोटं बोलणं, वागणं , खोटे मानअपमान त्यांना कधी आवडले नाहीत. ते शेवटपर्यंत खरं काम करत राहिले. ४) संगीत प्रचार व प्रसारासाठी स्वतःजवळ वक्तृत्व हवं म्हणून स्वतःभाषेचा अभ्यास केला आणि हिंदी, ब्रज व मराठी भाषेवर प्रभूत्व मिळवलं. इतकंच नाही, तर संपूर्ण भारतातला श्रेष्ठ वक्त्यांत त्यांचं नाव घेतलं जात असे.
    ५) पलुस्करांची शिष्यशाखा संख्येने, गुणवत्तेने व कर्तृत्वाने खूप संपन्न होती.

    पुढे विष्णू दिगंबर यांचा कर्तृत्वकाळ साधारणपणे ३४ वर्षाचा मानला तर एवढयाशा काळात किती अफाट काम त्यांनी उभं करुन ठेवलं आहे, याचा अंदाज येतो. त्यांच्या ग्रंथसंपदेमुळे आणि गांधर्व महाविद्यालयामुळे त्यांच्या मृत्यूनंतरच्या अनेक पिढया संगीताला जोडून राहू शकल्या. गांधर्व महाविद्यालय ही संस्थांही सुमारे शंभर वर्ष कार्यरत आहे. त्यावरुन विष्णू दिगंबरांच्या द्रष्टेपणाची झेप कळते.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

    गायक पं.दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर (25-Oct-2021)

    पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर (28-May-2017)

    पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर (25-Oct-2016)

      March 11, 2015


  • मेहता पब्लिशिंग हाउस’ चे अनिल मेहता

    आनंद यादवांच्या ‘माळ्यावरची मैना’ या कथासंग्रहाने मेहता पब्लिकेशनचा प्रवास सुरू झाला. आत्तापर्यंत ४५०० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. विविध भाषांमधील पुस्तकांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांनी बंगाली, गुजराती, हिंदी, कानडी या भाषांमध्ये देखील पुस्तके करायला सुरुवात केली.

      March 3, 2025


  • बालकवी ठोंबरे

    बालकवींच्या फ़ुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी-आनंद, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिकांस संमोहित केले आहे. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत.

      August 13, 2021


  • हरीष सदानी

    स्त्रियांच्या प्रश्नांविषयी अनेक स्त्री संघटना काम करताना दिसतात. पुरुषांनाही स्त्रियांपासून कायद्याने संरक्षण देण्यासाठी सध्या दबावगट तयार होतो आहे. मात्र या परिस्थितीत स्त्रियांच्या संरक्षणासाठी व त्यांचा आत्मसन्मान अबाधित ठेवण्यासाठी पुरुषांनी तयार केलेली मावा (मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अ‍ॅब्युज) ही संस्था अपवादात्मक ठरावी. एकमेकांचा आदर करीत, व एकामेकांबद्दलचा विश्वास वृध्दिंगत करून स्त्री-पुरुषांना सहजीवन जगता यावे यासाठी अंधेरीतील ही संस्था काम करते. विश्वस्त म्हणून या संस्थेचे काम करणार्‍या हरीष सदानी यांना महाराष्ट्र फाउण्डेशनने पुरस्कार देऊन त्यांच्या सेवेला गौरविले आहे.

      July 27, 2011


  • दरबार ब्रासबॅण्डचे इक्बाल दरबार

    इक्बाल दरबार यांनी यूके, यूएई, सिंगापूर, मॉरिशस, मालदीव, फ्रान्स इत्यादी ठिकाणी नौशाद कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल ओ.पी नय्यर, आरडी बर्मन, श्रीकांत ठाकरे यांच्या सारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुतेक सर्व नामांकित संगीत दिग्दर्शकांच्या समवेत त्यांच्या मैफिलीच्या वेळी साथ दिली आहे. इक्बाल दरबार हे पुणे आकाशवाणी वरील ‘ए’ ग्रेड कलाकार आहेत. त्यांनी पुणे आकाशवाणी वरील मालिका, नाटक आणि चित्रपटांसाठी संगीत आणि शीर्षक ट्रॅक दिले आहेत.

      March 31, 2022


  • पंडित हृदयनाथ मंगेशकर

    मंगेशकर हे नांव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर एकाहून एक संगीतरत्न असणारी पाचही भावंड उभी राहतात. लता, आशा, उषा, मीना आणि त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ. पंडित हृदयनाथ यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला.

      January 22, 2010


  • हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री झरिना वहाब

    अमोल पालेकर आणि झरिना वहाब यांच्या अभिनयानं सजलेला 'घरोंदा' हा हिंदी सिनेमा अनेकांच्या आजही स्मरणात आहे. तिचा जन्म १७ जुलै १९५९ रोजी झाला. चितचोर हा चित्रपट ही खूप गाजला होता. त्यातली अल्लड, लग्नाळू वयातली झरिना वहाब यांनी काम अप्रतिम केले होते. ‘चितचोर’ चित्रपटात नायिकेची भूमिका करून एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या झरिना वहाब हिने तिच्यापेक्षा सहा वर्षाने लहान असलेल्या आदित्य पांचोलीशी लग्न केलं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      July 17, 2017


  • संगीतकार वसंत प्रभू

    मराठी संगीताच्या इतिहासात वसंत या नावाला काही आगळंवेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं? वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीन संगीतकार. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९२४ रोजी झाला. या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीत रसिकांच्या चार पिढ्या आजवर तृप्त झाल्या आहेत. त्यातील एक संगीतकार वसंत प्रभू.

    वसंत प्रभू यांचे खरे नाव व्यकंटेश प्रभू
    मूळ गाव पाणे मंगरूळ, वडीलांचा हॉटेल व्यवसाय, बालवयापासूनच मेळ्यात गाणं-नृत्य-अभिनय करून ह्यांत रसिकमान्य झालेला "वसंत प्रभू‘ नावाचा तरुणही संगीतात काहीतरी करण्यासाठी धडपडत होता. त्याच वेळी "एचएमव्ही‘चे वसंतराव कामेरकर ह्यांनी प्रभू ह्यांची योग्यता ओळखून त्यांना एचएमव्हीत संगीतदिग्दर्शक म्हणून नोकरी दिली होती. दामूअण्णा माळी म्हणून प्रभू ह्यांचे एक मित्र होते. दामूअण्णा आणि पी. सावळाराम ह्यांचीही मैत्री होती. दामूअण्णांनी सावळाराम ह्यांची प्रभू ह्यांच्याशी ओळख करून दिली. ही "शब्द‘-"स्वरा‘ची भेट म्हणजे रसिकांसाठी "सुवर्णयोग‘च ठरला. कारण, भावगीत विश्वा्त सावळाराम-प्रभू ह्या द्वयीनं सोन्यासारखी एकाहून एक गाणी दिली. माणूस जसा नशीब घेऊन जन्माला येतो, तशीच गाणीसुद्धा नशीब घेऊनच जन्माला येतात! ह्या द्वयीची अशी अनेक गाणी नशीबवान ठरली. त्यातल्या एका गाण्याचं नशीब जास्तच जोरावर होतं. ते प्रचंड गाजलं. वर्षानुवर्षं वाजत राहिलं. अनेक वेळा ऐकूनही ताजंतवानंच राहिलं. प्रत्येक पिढीला आवडणारं ते गाणं आहे "गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का?
    जा, मुली जा, दिल्याघरी तू सुखी रहा‘

    आचार्य अत्रे ह्यांनी ह्या गीताचं कौतुक करताना म्हटलं होतं "गंगा-जमुना‘ हे गाणं एका पारड्यात व इतर सगळी गाणी दुसऱ्या पारड्यात घातली तरी "गंगा-जमुना‘चं पारडं जड होईल!‘‘
    ‘सखी शेजारीणी’ हे गाणे गाण्यासाठी वसंत प्रभू यांनी अरुण दातेच पाहिजेत अशी खास फर्माईश केली होती. तेव्हा मा.अरुण दाते हे प्रसिद्धीस आले नव्हते. मा.वसंत प्रभू यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले. संगीतकार वसंत प्रभू, जनकवी पी. सावळाराम आणि लता मंगेशकर या त्रयीने मराठी भावसंगीताची मुहूर्तमेढ रोवली. या त्रयीची अजरामर गीते अजूनही आपल्या ओठी आहेत.

    वसंत प्रभू यांचे चरित्र मानसीचा चित्रकार तो या नावाने मधु पोतदार यांनी लिहिले आहे.
    वसंत प्रभू यांचे १३ ऑक्टोबर १९६८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.मधु पोतदार

    वसंत प्रभू संगीत दिलेली काही गाणी
    चाफा बोलेना
    चंद्र तोच अन्‌ तेच तारे
    चंपक-गोरा कर कोमल
    चांद मोहरे चांदणे
    जन पळभर म्हणतिल
    जन्मोजन्मीं तुम्हीच यावे
    जय देवी मंगळागौरी
    जिथे सागरा धरणी मिळते
    जीर्ण पाचोळा पडे तो
    तुझे डोळे पाण्याने भरले
    तूच कर्ता आणि करविता
    तें दूध तुझ्या त्या
    दिनरात तुला मी किती

      November 9, 2017