(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ अभिनेते ओमर शरीफ

    ‘डॉक्टर झिव्हॅगो’, ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ यासारख्या चित्रपटांवर आपल्या अभिनयाची लक्षणीय मोहोर उमटविणारे ओमर शरीफ यांना डेव्हिड लीन यांच्या ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या चित्रपटातील शरीफ अलीच्या भूमिकेबद्दल ऑस्कर पुरस्कारासाठी १९६२ मध्ये ओमर यांचे नामांकन झाले होते.

    त्यांचा जन्म १० एप्रिल १९३२ रोजी झाला.परंतु त्यांना या चित्रपटातील कामगिरीसाठी ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच चित्रपटात भूमिका करण्याच्या निमित्ताने मा.ओमर शरीफ यांनी प्रथमच इंग्रजी चित्रपटात अभिनय केला. त्याआधी ओमर शरीफ यांनी इजिप्तमधील २० चित्रपटांमध्ये काम केले होते. १९६५ मध्ये ‘पेल हॉर्स’ या चित्रपटात ओमर यांनी ग्रॅग्री पेकबरोबर काम केले. त्याच वर्षी पुन्हा डेव्हिड लीन यांच्या साथीने ‘डॉक्टर झिव्हॅगो’ या चित्रपटात काम करून पुन्हा एकदा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार पटकावला.

    ‘ब्लेझिंग सन’ या चित्रपटातील सह अभिनेत्री फतेन हमामा यांच्याशी मा.ओमर शरीफ १९५३ मध्ये विवाहबद्ध झाले.

    ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या चित्रपटाबद्दल ओमर शरीफ यांच्या मनात एक हळवा कोपरा होता. सन २०१२ मध्ये त्यांनी ‘गार्डियन’ ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘हा चित्रपट आपण केला तेव्हा ती एक ‘क्रेझी’च बाब ठरली होती. या चित्रपटात अभिनेत्री नाहीत, त्या वेळचे प्रख्यात कलाकार नाहीत किंवा मारझोड नाही. विशेष असे काहीही नाही, असे वाटले. परंतु दिग्दर्शक डेव्हिड लीन हे अत्यंत बुद्धिमान दिग्दर्शक होते. ते खरोखरच थोरच होते’ असे ओमर शरीफ यांनी म्हटले होते.

    नंतरच्या काळात, १९६९ मध्ये जगभरात गाजलेल्या ‘मॅकेनाज गोल्ड’ या चित्रपटात ओमर शरीफ यांचीही भूमिका गाजली होती. खरं तर मॅकेनाज गोल्ड आला तोवर मा.ओमर शरीफ हे हॉलिवूडमधलं एकदम उत्तुंग व्यक्तिमत्त्व झालं होतं. केवळ त्यांच्यासाठी सिनेमांच्या पटकथा लिहिल्याचं दशक त्यांनी पार केलं होतं. हा दबदबा निर्माण केला तोही अमेरिका आणि इंग्लडमध्ये जन्माला न येता.

    इजिप्तमध्ये आणि ग्रीक घराण्यात जन्मलेल्या ओमर शरीफ यांचं सगळं आयुष्य हॉलिवूडच्या अन्य कलाकारांपेक्षा वेगळं ठरलं. निळ्या, हिरव्या डोळ्यांच्या पाणीदार कलाकारांमध्ये काळ्याभोर डोळ्यांचा आणि मिशी राखलेला कलावंत नेहमीच उठून दिसला. हॉलिवूडमधली त्यांची एंट्रीच मोठी दणदणीत झाली होती. मॅकनोच्या भूमिकेतल्या ग्रेगरी पेकला कोलोरॅडोच्या भूमिकेतल्या ओमार शरीफ यांनी अक्षरशः खाऊन टाकलं. पोलिस ज्याच्या मागावर आहेत, असा कोलरॅडो आपल्या स्वभावातल्या हिंसेचं समर्थन करत नाही. ओमारने आपल्या डोळ्यांनी साधलं इतकाच तो फरक. थंडपणे शत्रूचा काटा काढायचा, आपल्या टोळीतल्या लोकांनाही दया दाखवायची नाही, इतका कमालीचा राक्षसीपणा नुसत्या नजरेने व्यक्त करण्याची पद्धत शरीफ यांनी रूढ केली, जी शोलेतून नंतरच्या हिंदी सिनेमांत झिरपली.

    ओमर शरीफ यांचे १० जुलै २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 11, 2017


  • जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ

    अली अकबर खाँ यांच्या घराण्याचा सम्राट अकबराच्या दरबारातील तानसेनाच्या घराण्याशी थेट संबंध होता. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९२२ रोजी झाला. त्यांचे वडील पद्मविभूषण अल्लाउद्दीन खाँ हे त्या काळातील भारतीय संगीतातील एक अग्रणी व्यक्तित्व होते. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे वडील व काका फकीर अफताबुद्दीन यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला. बारा वर्षांहून अधिक काळ दिवसाला १८ तासांहून अधिक काळ सराव करणाऱ्या अली अकबर खाँ यांना त्यांचे वडील वयाची शंभरी पार केली तरी संगीताचे धडे देत होते. १९७२ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर उस्तादांनी घराण्याची संगीताची परंपरा अखेरयत कायम ठेवली. वयाच्या १३ व्या वर्षी अलाहाबादला पहिला जाहीर कार्यक्रम करणाऱ्या खाँसाहेबांनी २० व्या वर्षी एचएमव्हीसाठी लखनौला ध्वनिमुद्रण केले. जोधपूर घराण्यात राजगायक म्हणून सात वर्षे काम करत असतानाच त्यांना उस्ताद हा पहिला सन्मान बहाल केला गेला. लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांच्या विनंतीवरून १९५५ ला न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम केल्यापासून त्यांना व भारतीय शास्त्रीय संगीताला साऱ्या संगीत विश्वाचे दरवाजे खुले झाले. १९५६ मध्ये कोलकात्ता येथे त्यांनी अली अकबर संगीत महाविद्यालयाची स्थापना केली. पाश्चिमात्य जगाचा शास्त्रीय संगीताकडे असलेला ओढा पाहून १९६५ मध्ये अमेरिकेत संगीत केंद्र सुरू केले.

    कॅलिफोर्नियात अली अकबर संगीत महाविद्यालय स्थापन केल्यानंतर स्वित्झर्लण्डमध्येही त्यांनी त्याची शाखा उघडली. जगभर दौरे करणाऱ्या उस्तादांनी चेतन आनंद यांच्या आँधिया, आयव्हरी-र्मचट यांच्या हाऊस होल्डर, सत्यजित रे यांच्या देवी, बर्नाडो बटरेलुस्सी यांच्या लिटल बुद्धा इ. चित्रपटांनाही त्यांनी पाश्र्वसंगीत दिले. भारतीय अभिजात संगीताला जगभर मान्यता मिळवून देणाऱ्या उस्तादांचे पौर्वात्य व पाश्चिमात्य संगीतविश्वात असंख्य चाहते आहेत. जगविख्यात व्हायोलिन वादक लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांनी तर त्यांचे ‘ग्रेटेस्ट म्युझिशियन इन द वर्ल्ड’ असे वर्णन केले होते. भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना सरोदवादनाचा कार्यक्रम करण्याची विनंती भारतीय राजदूतवासाने केली होती. अमेरिकेत त्यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप बहाल केली होती. त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. खाँसाहेब पाश्चात्य आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील अढळ ध्रुवतारा म्हणून गेली पाच दशके ओळखले जात होते. अली अकबर खाँ यांचे १८ जून २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      June 18, 2018


  • सख्खे शेजारी’ – भारतरत्‍न डॉ. पांडुरंग वामन काणे

    लहानपणी फक्‍त एवढेच कळायचे की ते खूप विद्वान आहेत. दिवस-रात्र वाचन, लेखन करतात. History of Dharma Shastra हा जगप्रसिद्ध ग्रंथ त्‍यांनी लिहिला आहे. केवळ शिक्षण-संशोधन नव्‍हे तर सतत पुरोगामी विचारांचा पुरस्‍कार करणारे अशी थोर, महान, विद्वान व्‍यक्‍ती आणि आमचे ‘सख्खे शेजारी’ वाडीतील आम्‍ही सर्व जण त्‍यांना ‘काणे अण्णा’ च म्हणत असू. राहण्याचे ठिकाण म्हणजे, अर्थातच, – सुप्रसिद्ध, आंग्रेवाडी, दुसरा मजला, वि. पी. रोड, गिरगाव, मुंबई.

      July 24, 2020


  • हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जलाल आगा

    जलाल आगा हे सुप्रसिद्ध विनोदी नट आगा यांचे चिरंजीव. उच्च शिक्षणानंतर पुण्यातील F.T.I मध्ये शिक्षण घेतले. मा जलाल आगा यांनी मुगल-ए-आझम या चित्रपटातल्या बालपणातल्या जहांगीराची भूमिकेद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. जलाल आगा यांनी १९६७ साली के.ए.अब्बास यांच्या बंबई रात की बाहो में या चित्रपटा द्वारे हिरो म्हणून पदार्पण केले. त्यांचे शोले मधील गाणे मेहबुबा मेहबुबा अजुन ही लक्षात आहे. त्यांनी ज्युली, घर घर की कहानी, थोडीशी बे वफाई, दिल आखीर दिल है,गांधी अशा चित्रपटातुन १९९० च्या दशकापर्यंत विनोदी व चरित्र अभिनेता म्हणून हिंदी, तसेच काही इंग्लिश चित्रपटांतून अभिनय केला.

    सई परांजपे यांनी सांगीतलेली जलाल आगा यांची F.T.I मधील आठवण.
    उच्च शिक्षण झालेला, हुशार, मिश्किल आणि महाद्वाड. एकसारखे काही ना काहीतरी करून वर्गाला आणि मलाही तो हसवायचा. एकदा मी मुलांना एक उतारा लिहून घ्यायला सांगत होते. मधला मजकूर गाळायचा होता. तेव्हा मी म्हटलं, ‘या वाक्यानंतर काही टिंबे टाका. म्हणजे काही भाग गाळला आहे, हे लक्षात येईल.’ हात वर करून जलाल उभा राहिला. गंभीर चेहरा करून त्याने विचारले, ‘दीदी, किती टिंबं टाकायची?’ एकदा मी त्याच्यावर फारच रागावले. त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचे ठरवून त्याच्याकडे अजिबात न पाहता मी वर्ग घेऊ लागले. दोन दिवसांच्या या उताऱ्यानंतर तो मला भेटला आणि म्हणाला, ‘मला रागवा, उभे करा; पण प्लीज, माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. नटाला ती फार कठोर शिक्षा आहे. मी यापुढे शिस्त पाळीन.’ त्यानंतर दोन-चार दिवस तो बरा वागला. जलाल आगा यांचे ५ मार्च १९९५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 5, 2019


  • प्रसिध्द प्राच्य विद्यापंडीत मॅक्सम्युल्लर

    ’एन्शन्ट संस्कृत लिटरेचर’, ’लेक्चर्स ऑन दी सायन्स ऑफ लॅग्वेज’, ’इंन्ट्रोडक्शन टू सायन्स ऑफ रिलिजन’, ’बायोग्राफिज ऑफ वर्डस’, ’सिक्स सिस्टिम्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी’ हे त्यांनी लिहिलेले काही प्रमुख ग्रंथ होत.

      October 28, 2021


  • तरला दीपक नांदेडकर

    निवृत्त उपसंचालक, इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्शन

      December 15, 2010


  • गौरी पटवर्धन

    चित्रपटाच्या आर्थिक गणितांपासून अलिप्त राहून अभिव्यक्तीला प्राधान्य देणार्‍या गौरी पटवर्धन यांनी सातत्याने वेगळे काम केले आहे. 'मोदीखानाच्या दोन गोष्टी' या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या माहितीपटातून त्यांनी वेगळा विचार मांडला आहे.

    गौरी पटवर्धन यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला गोष्ट वेगळ्या दिग्दर्शिकेची हा लेख पुढील पानावर वाचा.

    गौरी पटवर्धन यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला गोष्ट वेगळ्या दिग्दर्शिकेची हा लेख वाचा.

    patwardhan-gauri-modified

      September 7, 2015


  • म्यानमारच्या नेत्या आंग सान सूची

    म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू ची यांच्याबद्दल आपण नेहमी वाचत असतो. 72 वर्षांच्या सू ची यांचे आयुष्य अनेकविध घटनांनी व चढउतारांनी भरलेले आहे. त्यापैकी महत्त्वाच्या घडामोडींमधून त्यांचा जीवनप्रवास समजू शकेल.

    आंग सान सू ची यांचे वडिल आंग सान हे म्यानमारचे पितामह म्हणून ओळखले जातात तसेच त्यांना म्यानमारच्या स्वातंत्र्याचे शिल्पकारही म्हटले जाते. क्रांतीकारी वृत्तीचे आंग सान 1948 ते 47 असे ब्रिटिश क्राऊन कॉलनी ऑफ बर्माचे प्रमुख होते. स्वातंत्र्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले असले तरी त्यांना ब्रह्मदेश स्वतंत्र झालेला पाहता आला नाही. स्वातंत्र्यापुर्वी 6 महिने आधीच त्यांची हत्या करण्यात आली.

    आंग सान सू ची यांचा जन्म 19 जून 1945 रोजी रंगूनमध्ये झाला. 1960 मध्ये त्या आईबरोबर भारतात आल्या. त्यांची आई डॉव खिन क्यी यांची म्यानमारच्या नेपाळ व भारतामधील राजदूतपदावरती नेमणूक झाली होती.

    भारतामध्ये आंग सान यांनी नवी दिल्लीमधील कॉन्व्हेंट ऑफ जिझस अॅंड मेरीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि लेडी श्रीराम महाविद्यालयामध्ये राज्यस्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर सेंट ह्युज महाविद्यालय, ऑक्सफर्ड येथे तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये बी.ए पदवी मिळवली आणि राज्यशास्त्रात एम.ए पदवी संपादित केली. त्यानंतर त्यांनी एम. फिल पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणानंतर सू ची यांनी संयुक्त राष्ट्रासाठी तीन वर्षे काम केले.

    त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉ. मायकेल एरिस यांच्याशी त्या 1 जानेवारी 1972 रोजी विवाहबद्ध झाल्या. डॉ. एरिस हे तिबेटीयन संस्कृतीचे अभ्यासक आणि भूटानच्या राजघराण्यातील मुलांचे शिक्षक होते. 1973 साली या दाम्पत्याला अलेक्झांडर आणि 1977 साली किम ही अपत्ये झाली.

    1988 साली आईची काळजी घेण्यासाठी सू ची म्यानमारमध्ये परतल्या मात्र लष्करशाहीने पोखरलेल्या मायदेशामध्ये लोकशाहीसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले व सरकारच्या विरोधातील प्रमुख आवाज म्हणून त्यांनी अल्पावधीत स्वतःचे स्थान निर्माण केले.

    मायकल यांच्याशी त्यांची 1995 साली शेवटची भेट झाली.एरिस यांना कर्करोग झाल्यामुळे त्यांना म्यानमारमध्ये जाण्याची किंवा सू ची यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी हवी होती. मात्र सू ची यांना तेथिल सरकारने परवानगी दिली नाही. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोफी अन्नान तसेच पोप जॉन पॉल दुसरे यांनी विनंती करुनही म्यानमार सरकारने एरिस यांना व्हीसा दिला नाही.

    1989 साली प्रथम सू ची यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले. म्यानमारमध्ये आल्यानंतर 21 वर्षांपैकी 15 वर्षे सू ची यांनी नजरकैदेत घरातच काढली. एरिस यांचा 1999 साली ऑक्सफर्डमध्ये वयाच्या 53 व्या वर्षी मृत्यू झाला.

    13 नोव्हेंबर 2010 रोजी सू ची यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली. आज सू ची म्यानमारच्या पहिल्या स्टेट कौन्सिलर बनल्या असून हे पद पंतप्रधानांसारखेच आहे. तसेच त्या देशाच्या परराष्ट्रमंत्रीही आहेत.

    आंग सान सू ची यांना देशविदेशातील विविध सन्मान मिळाले नोबेल, राफ्टो, साखरोव, जवाहरलाल नेहरु अॅवॉर्ड, सायमन बोलिव्हॉं प्राईझ, ऑलोफ पामे प्राईझ, भगवान महावीर वर्ल्ड पीस, कॉंग्रेशनल गोल्ड मेडल अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

    म्यानमारमधील वांशिक तणाव कमी होऊन रोहिंग्यांचा प्रश्न शांततेत सोडवावा, रोहिंग्यांवरील अन्याय दूर केला जावा यासाठी आंग सान सू ची यांच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव येत आहे

      October 10, 2017


  • आर्या आंबेकर

    आर्या आंबेकर

    आर्या ही मराठी गायिका आहे. झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिटिल चँप्स या संगीत विषयक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

      November 9, 2010


  • डॉ. सुलभा हेर्लेकर

    सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील जुन्या-नव्या पिढीला जोडणारा दुवा ज्येष्ठ कवयित्री डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या निधनाने निखळला. नवोदित कवयित्रींना ‘अभिव्यक्ती’ च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे मोठे काम डॉ. हेर्लेकरांनी केले होते. आशा बगे, जयश्री रुईकर, सुनीती आफळे, डॉ. आशा सावदेकर आणि डॉ. सुलभा हेर्लेकर या विदर्भाच्या पंचकन्या.. वैदर्भीय साहित्य क्षेत्रात प्रत्येकीला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. यात कवयित्री म्हणून डॉ. सुलभा हेर्लेकर यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.

    कवितेवर मनस्वी प्रेम करणारी ही प्रगल्भ कवयित्री पु.शि. रेगे आणि इंदिरा संत यांच्या साहित्याची मोठी चाहती. इंदिरा संतांवरचा अभ्यास, कविता व समीक्षेच्या क्षेत्रातील मुशाफिरी आणि कविता वाचनाच्या प्रयोगांच्या निमित्ताने त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. कवी अनिलांनी हेर्लेकर यांचे वेगळेपण एकेकाळी हेरले होते. ‘पहाटपक्षी’, ‘नितळाई’ सह अनेक काव्यसंग्रहांतून पुढे त्यांनी हे स्थान टिकवले. शासकीय सन्मानासह अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. दर्जेदार कवयित्री म्हणून स्वत:चा आब राखतानाच नवोदित लेखिका व कवयित्रींना तेवढीच सन्मानाची वागणूक देण्याचा कटाक्ष त्यांनी बाळगला.

    जुन्या आणि नव्या कवयित्रींचे सख्य जुळविण्याचे अवघड काम त्यांनी अगदी सहज पार पाडले. राम शेवाळकरांनी लेखिका संमेलनासाठी स्थापन केलेल्या ‘अभिव्यक्ती’तून हेर्लेकरांच्या प्रगल्भतेचा खऱ्या अर्थाने परिचय घडला. त्या व्यासपीठावरून नव्या कवयित्रींना समोर आणण्याची त्यांची धडपड शेवटपर्यंत राहिली. विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ त्रमासिकाच्या पाच वर्षे केलेल्या संपादनातून त्यांची साहित्यिक जाण व दर्जा स्पष्टपणे जाणवला. संशोधन, सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि संस्थात्मक कार्यातील त्यांचा सहज वावर प्रत्येकालाच हवाहवासा वाटे. जवळजवळ चार दशके त्यांनी कवी संमेलने गाजवली.

    शालीनता, सुसंस्कृतपणा, सभ्यता यांची सांगड घालून देतानाच घर-दार आणि जिव्हाळ्याचा वाङ्मयीन गोतावळा जपणाऱ्या डॉ. सुलभा हेर्लेकरांनी गंभीर आजारपणाची खबरबात कोणापर्यंत पोचू दिली नव्हती. त्यामुळे हेर्लेकरांचे अचानक जाणे वाङ्मयीन गोतावळ्याला चटका लावून गेले आहे.

      August 5, 2017