जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सज्जाद हुसेन यांना बालपणापासून संगीताची आवड होती. त्यांचा जन्म १५ जून १९१७ रोजी झाला.त्यांनी लहान वयातच सतार, व्हायोलीन, वीणा, बासरी, पियानो सारख्या वाद्ये शिकून घेतली. मेंडोलीन हे त्यांचे अतिशय आवडते वाद्य होते. सज्जाद हुसेन हे चित्रपटसंगीताचे बेताज बादशाह होते.
सज्जाद हुसेन यांच्या रचलेल्या चाली ऐकायला खूप सोप्या असत. पण त्यांची नक्कल करायचा जेव्हा प्रयत्न होई तेव्हा त्या संगीतकाराला त्या सोप्या चालीमागची अवघड वाट दिसायची आणि त्यांची तारांबळ उडत असे. त्यातच सज्जाद हुसेन यांना गाण्याची एक ही मात्रा कमी जास्त झालेली चालत नसे. तशी झाल्याबद्दल त्यांनी प्रसंगी लताबाई तर कधी नूरजहाँ यांना सुध्दा सुनावले होते. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांना अतिशय कमी चित्रपटांचे संगीत द्यायचे काम मिळाले.
सज्जाद हुसेन यांनी आपल्या संगीतात मेंडोलीनचा सढळ वापर केलेला आढळून येतो. १९६३ च्या “रुस्तम सोहराब” या चित्रपटानंतर त्यांना अनेक वर्षे वाट पहावी लागली. त्या काळात त्यांनी आपल्या बाणेदार स्वभावानुसार कुणाकडे काम मागण्याऐवजी आपल्या मेंडोलीनवर अनेक प्रयोग करणे पसंत केले.
सज्जाद हुसेन यांनी आपल्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत फक्त १७ चित्रपट केले.
सज्जाद हुसेन यांचे २१ जुलै १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=TtkHzdEgIyM
June 15, 2018
भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी झाला.
विक्रम साराभाई यांचे वडील हे एक उद्योगपती होते. शिवाय ब-याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने त्या लोकांचे (रविंद्रनाथ टैगोर, जवाहरलाल नेहरू, सरोजनी नायडू , महात्मा गांधी) त्यांच्या घरी जाणे-येणे होते. त्यामुळे खरंतर विक्रम साराभाईंना उद्योग क्षेत्रात अथवा राजकारणात जम बसवण्यासाठी पोषक वातावरण होते. पण त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहले होते आणी ते संपूर्ण भारत देशाचे नशीब बदलणारे असे काहीतरी होते. त्यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:ची माँटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच यूरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे विक्रम साराभाईंचे शिक्षण झाले. त्यांना लहानपणापासूनच गणित आणि भौतिक शास्त्र हे विषय विशेष आवडीचे होते. आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते कैंब्रिज विश्वविद्यालय येथे शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोर मधील ‘इंडियन इंस्टीट्यूट आफ साइंस’ मध्ये नोबेल पुरस्कार विजेते सर सी.वि.रमण यांच्या मार्गदर्शनाखाली 'कोस्मिक किरणा'वर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाटयम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मा.मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणी मल्लिका ही दोन अपत्ये झाली.
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर ते ब्रिटनमध्ये परत गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून पी.एच.डी. पदवी मिळवली. आणि त्याच वर्षी मायदेशी परत आले. ११ नोव्हेंबर १९४७ ला अहमदाबादला Physical Research Laboratory ची स्थापना केली हे त्यांचे पहिले पाउल. पुढे जाऊन अवकाश संशोधनात त्यांनी जे कार्य केले त्याबद्दल काही सांगायला नकोच. केरळजवळील थुंबा हे ठिकाण लॉन्च पेड़साठी निश्चित झाले होते कारण हे ठिकाण मैग्नेटिक इक्वेटर लाइन (चुंबकीय भूमध्य रेखा) च्या अगदी जवळ होते. पण त्या ठिकाणी शंभरेक घरे आणि एक चर्च होते. आणि ते लोक तिथून बाजुला हटण्यास तयार नव्हते. त्या जागेच्या भौगोलिक आणि वैज्ञानिक महत्वामुळे त्या जागेसाठी केरळ सरकारची मदत मागितली गेली पण केरळ सरकारही ती जमीन मिळवण्यात अपयशी ठरले. मग एके दिवशी स्वत: विक्रम साराभाई त्या चर्चच्या फादर कड़े गेले आणि त्यांना सगळे पटवून दिले. आणि काय चमत्कार दुस-याच दिवशी फादर आणि तिकडचे लोक तिथून बाजूला होण्यास तयार झाले. पुढे तिथे 'थुंबा रॉकेट लौन्चिंग स्टेशन' ची स्थापना केली गेली.
२१ नोव्हेंबर १९६५ ला तिथून पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण केले गेले. पुढे या केंद्राला संयुक्त राष्ट्रने अंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली. हा चमत्कार घडवणारे ते विक्रम साराभाईच. म्हणूनच की काय पुढे या केंद्राला विक्रम साराभाई स्पेस सेंटर असे नाव दिले गेले. इंग्लंडच्या प्रयोगशाळेत संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांना भारताच्या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन करून डॉ. विक्रम साराभाई यांनी भारतात आणलं होतं. ''ब्रिटनप्रमाणे वातानुकुलित लॅब्ज आणि ऑफिससारख्या सोयी आम्ही देऊ शकणार नाही, पण बसायला एक टेबल, खुर्ची आणि एक कपाट नक्कीच देऊ शकतो'', असं म्हणून डॉ. साराभाईंनी देशापुढील आव्हानही स्पष्ट केलं होतं. कारण त्यावेळी संशोधनासाठी विशेष बजेट वैगेरे नव्हते. डॉ. विक्रम साराभाई यांनी शास्त्रज्ञांना स्वप्न दाखवलं, नवी दिशा दिली. खंबीर नेतृत्व हाही त्यांचा एक व्यक्तिविशेष. डॉ. अब्दुल कलाम यांनीही आपल्या अग्निपंख या आत्मचरित्रात साराभाई यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक केले आहे. ते स्वप्न पाहायचे आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हवी ती मेहनतही घ्यायचे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य त्यांच्या सहका-यांसाठी नेहमीच एक प्रेरणा स्रोत ठरले आहे.
त्यांनी त्यांच्या सहका-यांना एक वेगळी दृष्टी दिली. अंतराळ संशोधनात बजावलेल्या मोलाच्या कामगिरीसाठी इंटरनॅशनल अस्ट्रोनॉमिकल युनियनतर्फे भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार ठरलेल्या अश्या डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव चंद्रावरील मोठ्या विवरांना देण्यात आल आहे. (भारताच्या अणुऊर्जा तंत्रज्ञानातील जनक डॉ. होमी भाभा आणि नोबेल पारितोषिक विजेते सी. व्ही. रामन यांचीही नावे चंद्रावरील विवरांना दिली गेली आहेत.) डॉ. विक्रम साराभाई यांच्या अथक परिश्रमानंतरच १९६९ साली भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्त्रो) स्थापना झाली. आईआईएम अहमदाबादच्या स्थापनेतही डॉ. विक्रम साराभाई यांची मुख्य भूमिका होती. होमी भाभा यांच्या मृत्यु नंतर ते १९६६ मध्ये परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची अध्यक्षपदे त्यांच्याकडे होती. अवकाश संशोधनाबरोबरच त्यांनी टेक्स्टटाईल, फार्मासिटिकल, अणुऊर्जा, कला या क्षेत्रातही विशेष कामगिरी केली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या ATIRA (Ahmedabad Textile Industry’s Research Association) ने आधुनिक वस्त्रोद्योगाचा पाया रचला. फार्मासिटिकल उद्योगात सर्वप्रथम इलेक्ट्रोनिक डाटा प्रोसेसिंग आणि रिसर्च टेक्निकचा वापर त्यांनीच केला. Electronics Corporation of India Limited (ECIL),Uranium Corporation of India Limited (UCIL) अशा अनेक संस्थांची स्थापना त्यांनी केली.
१९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला, त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली गेली होती. आर्यभट्टच्या सफल संक्षेपणानंतर अनेक उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले गेले. ज्यासाठी श्री.साराभाई यांची नेहमीच आठवण केली जाते. कारण या सगळ्या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टि आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ.विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली भारत सरकारचा पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आला. विक्रम साराभाई यांचे ३० डिसेंबर १९७१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 12, 2018
सोहराब मोदी यांनी चित्रपटांतही अभिनय केला आहे. दिग्दर्शन आणि निर्मितीमध्येही त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १८९७ रोजी झाला. आपल्या ’मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले. १९३५ मध्ये आलेला त्यांचा खून का खून हा चित्रपट शेक्सुपिअरच्या हॅमलेटवर आधारित होता. सोहराब मोदी यांनी १९५६ मध्ये 'झाँसी की रानी' नावाचा भव्य हिंदी चित्रपट काढला होता. त्यात झाशीच्या राणीचे काम मोदी यांची पत्नी मेहताब हिने केले होते. हा भारतात बनलेला पहिला रंगीत चित्रपट होता.त्याचबरोबर पृथ्वीे वल्लेभ, , मिर्झा गालिब, जेलर या चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच सामाजिक आणि राष्ट्रीय विषयाचा समावेश असायचा. भारत सरकारतर्फे १९७९ साली मा.सोहराब मोदी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. सोहराब मोदी यांचे निधन २८ जानेवारी १९८४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 11, 2017
विख्यात मराठी कवी. संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढारकर.
July 14, 2017
दत्तात्रेय व्यंकटेश केतकर हे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९० रोजी झाला.
'जान्हवी टीकेसह ज्ञानेश्वरी' , ' जिज्ञासोद्यान (ज्ञानेश्वरीतील शब्दसंशोधन)', 'ज्ञानेश्वर - ५५ दुर्गम स्थलांचे अर्थ' ही पुस्तके, तसेच वडील ज्योतिषाचार्य व्यं. बा. केतकर यांचे चरित्र त्यांनी लिहिले.
## Dattatrey Vyankatesh Ketkar
July 31, 2017
१९६०-६१ साली पुण्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी १९४ मिनिटांमध्ये ८७ धावा केल्या. त्यांनी ह्या धावा केलेल्या पाहून मुंबई बोर्ड प्रेसीडेंटस ११ मधून त्याच संघाविरुद्व नाबाद १०६ धावा केल्या. त्यांनी १९६१ मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली. ते १९६१ च्या डिसेंबर मध्ये त्यांचा पहिला कसोटी सामना जो इंग्लंडविरुद्ध ग्रीन पार्क , कानपुर येथे झाला होता त्या सामन्यात खेळले. त्या सामन्यांमध्ये ते लॉक कडून २८ धावांवर ‘ हिट विकेट ‘ करून बाद झाले. हा सामना अनिर्णित राहिला.
July 2, 2021
ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे.
August 13, 2021
चित्रपट क्षेत्रातील ग्लॅमर सोडून सर्जशील नाट्यकलावंत घडवण्याचा वसा रंगकर्मी प्रसाद वनारसे यांनी घेतला आहे. देशविदेशातील नाट्यप्रशिक्षणांमुळे नाट्यगुरू अशी त्यांची ओळखही निर्माण झाली आहे.
प्रसाद वनारसे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हाडाचा नाट्यशिक्षक हा लेख पुढील पानावर वाचा.
प्रसाद वनारसे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हाडाचा नाट्यशिक्षक हा लेख वाचा.
September 7, 2015
‘काठी न् घोंगडं’च हे गाणं शाहीरांनी गायले १९७५ मध्ये. पण त्याचे रेकॉर्डिंग एचएमव्हीने १९७७ साली केले. रेकॉर्डिंग दरम्यान काही केल्या गाण्यात मजा येईना. त्यावेळी एच.एम.व्ही.मध्ये असलेल्या श्रीनिवास खळे यांनी गाण्याच्या सुरुवातीला ‘ओ राम्या राम्या….हं’, अशी हाळी सुचवली. प्रत्येक कडव्याच्या अखेरीस ती वापरली आणि गाणे जिवंत झाले.
June 10, 2022
आपल्याकडे ज्यूंचे मन आहे, आपल्याकडे ज्यूंची बुद्धिमत्ता आहे आणि आपल्याकडे त्यांची विनोदाची शैलीही आहे, असे स्वतःचे वर्णन करणारे हॉवर्ड जेकबसन हे २०१०चे बुकर पारितोषिकाचे विजेते आहेत. यापूर्वी दोनवेळा ते या पारितोषिकाच्या जवळ आले होते, पण त्यांचे पुस्तक निवडले गेले नाही. 'द फिंक्लर क्वेश्चन' या कादंबरीला २०१०चे बुकर पारितोषिक जाहीर करण्यात आले. त्यांचे पारितोषिक कदाचित हुकले असते, पण ते त्यांना ३ विरुद्ध २ मतांनी जाहीर झाले. याआधी २००६ मध्ये 'कलुकी नाईट्स' आणि २००२ मध्ये 'हूज सॉरी नाऊ?' या कादंबऱ्यांना ते कदाचित मिळाले असते.
त्यांना हे पारितोषिक मिळत असल्याने ते विल्यम गोल्डिंग यांच्यानंतरचे ज्येष्ठ कादंबरीकार म्हटले पाहिजेत. गोल्डिंग यांना ते मिळाले तेव्हा ते ६९ वर्षांचे होते तर जेकबसन यांचे वय ६८ वर्षांचे आहे. जगभरच्या साहित्यिक वर्तुळामध्ये ५० हजार पौंडांच्या या पारितोषिकाला प्रचंड मान दिला जातो. जेकबसन हे इंग्लंडमध्येच शिकले आणि वाढले. तसे ते मूळचे मँचेस्टरचे. व्हिटफिल्डच्या स्टँड इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले.
त्यानंतर ते केंब्रिजच्या डाऊनिंग कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदवीधर झाले. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीमध्ये ते प्राध्यापक या नात्याने तीन वर्षे होते. तिथल्या त्या रहिवासाच्या आधाराने त्यांनी १९८७ मध्ये 'द लँड ऑफ ऑस्ट्रेलिया' हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक लिहिले होते. आपले स्वतःचे वर्णने ते 'ज्यूंचा जेन ऑस्टेन' असे करतात. प्रख्यात कादंबरीकार जेन ऑस्टेन अठराव्या शतकात होऊन गेल्या. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांमध्ये 'सेन्स अँड सेन्सिबिलीटी' तसेच 'प्राईड अँड प्रेज्युडिस' या कादंबऱ्यांचा समावेश होतो. काही टीकाकारांकडून त्यांना इंग्रजीचे 'फिलिप रॉथ' असे म्हटले जात असल्याने त्यावर आपले स्वतःचे वर्णन त्यांनी जेन ऑस्टेन असे केले असायची शक्यता आहे. पाच हजार वर्षांच्या काळात ज्यूंच्या वाट्याला आलेल्या हृदयद्रावक अनुभवांमुळे आपल्याला ज्यूंविषयी जिव्हाळा वाटतो असे सांगायलाही ते कमी करत नाहीत. १९९८ पासून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये प्रामुख्याने सुखान्ताचा कल्पनातीत शोध घेण्यात आला आहे. त्यांचे लिखाण हे सरळ मार्गी म्हणून ओळखण्यात येते. स्त्री-पुरुष संबंध आणि इंग्लंडमध्ये ज्यूंना विसाव्या शतकात आलेले अनुभव असा त्यांच्या लिखाणाचा हा प्रवास आहे.
ते अतिशय ओघवत्या भाषेत विनोदी पद्धतीने लिहिणारे लेखक म्हणूनही परिचयाचे आहेत. 'द फ्लिंकर क्वेश्चन' या कादंबरीची मांडणीही त्यांनी अतिशय विनोदी पद्धतीने केलेली आहे. आजवर जेकबसन यांनी रेडिओवरही काम केले आहे. १९८३ पासून सर्वसाधारणपणे त्यांनी लिहायला प्रारंभ केला. त्यावेळी त्यांनी 'कमिंग फ्रॉम बिहाईड' ही पहिली कादंबरी लिहिली. त्यापुढल्याच वर्षी त्यांनी 'पीपींग टॉम' ही कादंबरी लिहिली. २००८ मध्ये त्यांनी 'द ॲक्ट ऑफ लव्ह' ही कादंबरी लिहिली होती. 'द फिंक्लर क्वेश्चन'
या कादंबरीमध्ये त्यांनी प्रेम, निराशा आणि पुरुष मैत्रीबंध या विषयावर प्रामुख्याने लिहिले आहे. बुक पारितोषिकाचे वैशिष्ट्य असे, की पारितोषिव समितीमध्ये कोणाचा सहभाग आहे ते जाहीर केले जाते. 'फायनान्शियल टाइम्स'च्या वाङ्मयीन संपादिक रोझी ब्लॉ, निवेदिका, लेखिका आणि रॉयल ऑपेर हाऊसच्या नृत्य दिग्दर्शिका डेबोरा बुल, पत्रकार आणि लेखक टॉम सटक्लिफ, चरित्रकार आणि टीकाका फ्रान्सेस विल्सन यांचा या समितीत समावेश होता. या निवड समितीच्या अध्यक्षपदी कवी सर ॲन्ड्र्यू मोशन हे होते. बुकर पारितोषिकामुळे त्यांच्या कादंबरीची विक्री ४५ टक्क्यांनी वाढणार असल्याचे त्यांच्या प्रकाशकांनी म्हटले आहे. बुकर पारितोषिकाच्या इतिहासात अशा तऱ्हेने एका प्रहसनात्मक कथानकाला प्रथमच पारितोषिक देण्यात आले आहे. या पारितोषिकाचे तुम्ही काय करणार असे त्यांना विचारले असता त्यांनी आपण या रकमेतून आपल्या पत्नीसाठी बॅग खरेदी करणार आहोत असे गमतीने म्हटले. आपल्याला केव्हा ना केव्हा तरी बुकर पारितोषिक मिळावे असे वाटत असे, ते आता मिळाले, अशीच त्यांची प्रतिक्रिया आहे.
July 27, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti