(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कथा लेखक ग. ल. ठोकळ

    साताऱ्याकडील ग्रामीण पार्श्वभूमीवरची, बेचाळीसच्या क्रांतिपर्वावर आधारलेली त्यांची ‘गावगुंड’ ही कादंबरी खूप गाजली. काही विद्यापीठांनी तर तिचा आपल्या अभ्यासक्रमातही समावेश केला. या काळात र. वा. दिघे यांच्या साहित्याने आपण झपाटले गेलो होतो असे ठोकळ सांगतात. अर्धशतकापूर्वी लिहिलेल्या ‘कडू साखर’, ‘गोफणगुंडा’, ‘निळे डोळे’, ‘सुगंध’, ‘मोत्याचा चारा’सारख्या ठोकळांच्या कथा आजही तितक्याच हृद्य, वेधक वाटतात. दिघ्यांच्या कादंबऱ्यांमधले अद्‌भुतरम्य आणि रोमांचकारक वातावरण काही प्रमाणात ‘गावगुंड’ मध्ये अवतरले आहे.’

      May 26, 2022


  • राजा बढे

    राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी… रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे राजा बढे.

      July 25, 2022


  • ज्येष्ठ तबलावादक पंडित निखिल घोष

    ज्येष्ठ तबलावादक, लेखक पंडित निखिल घोष यांचा जन्म २८ डिसेंबर १९१८ रोजी बारीसाल या पुर्व बंगालमधील गावी झाला.

    निखिल घोष हे जेष्ठ बासरीवादक पन्नालाल घोष यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी आपले संगीताचे शिक्षण आपले वडील अक्षय कुमार घोष यांच्या कडे घेतले, जे सतार वाजवण्यासाठी प्रसिद्ध होते तसेच त्यांनी तबला वादनाचे शिक्षण व संगीताचे शिक्षण अहमद जान थिरकवा,अमीर हुसेन खान,ओंकारनाथ ठाकूर,बडे गुलाम अली खान, अमीर खान,पन्नालाल घोष, रवि शंकर अली अकबर खान,विलायत खान ,भीमसेन जोशी, निखिल बॅनर्जी, जसराज,अमजद अली खान, शिवकुमार शर्मा अशा महान संगीतकाराकडे घेतले होते.

    निखिल घोष यांनी संगीत महाभारती या संस्थेची स्थापना १९५६ साली केली, यात त्यांनी अनेक होतकरू संगीतकाराना घडवले. याच संस्थेत अनिश प्रधान,एकनाथ पिंपळे,दत्ता यंदे इत्यादी पुढे नावारुपाला आले. त्यांनी आपले पुत्र नयन घोष व ध्रुबा घोष यांना अनुक्रमे तबला आणि सारंगी शिकवले. आपली मुलगी तुलीका घोष यांना पण या संस्थेत शिकवले. निखिल घोष यांनी अनेक मैफीली एडनबर्ग, ब्राटीसिवा, हेल्न्सकी, रोम, अथेन्स अशा विविध ठिकाणी केल्या.

    त्यांनी Fundamentals of Rag and Tals with new system हे पुस्तक लिहून संगीतात क्रांती केली. त्यांना भारत सरकारने १९९० साली पद्मभुषण पुरस्कार देऊन गौरवले होते.१९९५ साली त्यांना उस्ताद हफीज अली खान पुरस्कार मिळाला. त्यांचा विवाह १९५५ साली उषा नयमपल्ली यांच्या बरोबर झाला होता.

    पंडित निखिल घोष यांचे ३ मार्च १९९५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      June 4, 2024


  • लेखक प्रभाकर आत्माराम पाध्ये

    मो.ग. रांगणेकरांच्या ‘चित्रा’ साप्ताहिकात पाध्ये रुजू झाले. या साप्ताहिकातून पाध्यांनी राजकीय विषयांवर व्यासंगपूर्ण लिखाणास आरंभ केला. याशिवाय हरिभाऊ मोटे यांच्या ‘प्रतिभा’ साप्ताहिकात पाध्ये साहित्यिक घडामोडींवर लिहीत असत.

      March 22, 2022


  • माझी माणसं – बंडू दादा

    तो कोणाचा कोण होता माहित नाही पण माझा मात्र बंडूदादाच होता! त्याच्यात माझ्यात सहासात वर्षाचे अंतर होते . तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेल . पण वय कधीच त्याच्या माझ्यात आड आले नाही . मी लहान म्हणून त्याने कधी दुय्यमतेने वागवले नाही कि, तो मोठा म्हणून अंतर ठेवले नाही . तो एक ‘ब्राह्मणाचे अनाथ पोर ‘ हि माहिती नन्तर मिळाली पण ती गौण होती आणि गौणच राहिली . आमच्या घरातहि त्याच्यात माझ्यात कधीच भेदभाव झाला नाही .

      December 13, 2017


  • आंनदयात्री कवी बा भ बोरकर

    १९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच बा भ बोरकर यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांचा प्रभाव होता. .बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय जीवनातील संस्कार आणि गोव्याचा व कोकणचा रमणीय निसर्ग यांचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो.

      July 8, 2017


  • बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर

    शाहिद कपूरचा मुंबईत पंजाबी कुटुंबात जन्म झाला. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९८१ रोजी झाला.बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक पंकज कपूर आणि अभिनेत्री व शास्त्रीय नर्तिका नीलिमा हे शाहिद कपूरचे आईवडील. शाहिदने लहान असतानाच अभिनय क्षेत्रात पर्दापण केले होते. एक उत्कृष्ट अभिनेत्याशिवाय तो उत्तम डान्सरदेखील आहे. शाहिद ३ वर्षांचा असताना त्याचे आईवडील वेगळे झाले होते. यानंतर तो आपल्या आईसोबत दिल्लीत आजी-आजोबांसोबत राहू लागला. मोठा झाल्यानंतर त्याने मुंबई वापसी केली. मुंबईत आल्यानंतर तो कोरिओग्राफर शामक दावरच्या डान्स अकॅडमीत सहभागी झाला. नव्वदच्या दशकात शाहिदने काही सिनेमांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले. त्यानंतर तो म्युझिक व्हिडीओंसहीत काही जाहिरातींमध्येही झळकला. शाहरुख खान, काजल आणि राणी मुखर्जीसोबत केलेली 'पेप्सी'ची त्याची पहिली जाहिरात. यानंतर तो किट-कॅट, ओनिडा टीव्ही वगैरेसारख्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसला होता. सुभाष घई यांनी शाहिदला डान्स करताना पाहिले आणि त्याचा डान्स आवडल्यानंतर त्यांनी 'ताल'मध्ये या आपल्या सिनेमात शाहिदला बॅकग्राऊंड डान्सर म्हणून घेतले. ‘कहीं आग लगे लग जावे’ या गाण्यात शाहिदने अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत डान्स केला. यानंतर २००३ मध्ये आलेला रोमँटिक कॉमेडी ‘इश्क विश्क’ सिनेमातून शाहिदनं ख-या अर्थानं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमासाठी शाहिदला फिल्मफेअरच्या 'बेस्ट मेल डेब्यू' अवॉर्डने गौरवण्यातही आले. २००५ मध्ये शाहिद कपूर, करीना कपूर आणि फरदीन खानचा 'फिदा' हा सिनेमा आला होता.

    या सिनेमाच्या निमित्ताने करीना आणि शाहिद एकमेकांच्या जवळ आले. सुरज बडजात्या यांच्या 'विवाह' सिनेमातील 'प्रेम' या भूमिकेमुळे शाहिदला आणखी लोकप्रियता मिळाली. या सिनेमामुळे शाहिदची वेगळीच प्रतिमा चाहत्यांमध्ये निर्माण झाली. शाहिद आणि करीनाचा 'जब वी मेट' सिनेमाला सिनेरसिकांनी भरभरुन प्रेम दिलं. हा सिनेमा सुपर-डुपर हिट ठरला. मात्र, या वर्षी शाहिद आणि करीना यांच्या नात्यात कटुता आली आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. विशाल भारद्वाज यांच्या 'कमीने' सिनेमाने शाहिदची इंडस्ट्रीमधील इमेज बदलली. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि सिनेमाला अवॉर्डसही मिळाले. यामध्ये शाहिदने डबल रोल साकारला होता. करीना कपूरसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर शाहिदने मीरा राजपूतसोबत २०१५ मध्ये लग्न केले. शाहिद आणि मीरा या नावाहून त्यांनी आपल्या मुलीचे नाव मीशा असे ठेवले. शाहिदने आतापर्यंत जवळपास ७५-८५ सिनेमांमध्ये काम केले आहे. यातील अनेक सिनेमे हिट झाले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 25, 2019


  • मधुकर धोंड

      December 15, 2010


  • विनोबा भावे

    थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी. आजोबा आणि आईकडून विनोबांना बालपणापासूनच धर्मपरायणतेचे संस्कार मिळाले.

      September 28, 2010


  • भारताची पहिली ‘वॉल’ विजय हजारे

    विजय हजारे यांची कसोटी कारकीर्द काहीशी उशिरा म्हणजे ३१व्या वर्षी सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या वाटयाला ३० कसोटी सामनेच आले. तरीही त्यांनी छाप पाडली.

      March 11, 2022