(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी जयाप्रदा

    जयाप्रदा यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलगू सिनेमाद्वारे केली होती. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९६२ रोजी झाली.वयाच्या १४ व्या वर्षी जयाप्रदा यांना आपल्या शाळेतील डान्स प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यांचे नृत्य बघून एक दिग्दर्शक प्रभावित झाले होते. त्यांनी भूमिकोसम या सिनेमात त्यांना नृत्य सादर करण्याची ऑफर दिली. मात्र त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही. त्यानंतर आईवडिलांच्या म्हणण्यावरुन त्यांनी ही ऑफर स्वीकारली. या सिनेमासाठी जयाप्रदा यांना केवळ १० रुपये मानधन मिळाले होते. १९७९ सालीआलेल्या 'श्री श्री मुवा' या सिनेमाचा हिंदी रिमेक असलेल्या 'सरगम' या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे जयाप्रदा यांना एका रात्रीत स्टारडम मिळाले. त्यानंतर मात्र रिलीज झालेले काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. कामचोर या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना नशीबाने साथ दिली. हा सिनेमा यशस्वी ठरला. बॉलिवूड सिनेमांमुळे मा.जयाप्रदा यांना खरी ओळख प्राप्त झाली. बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये जयाप्रदा यांची गणना व्हायची. अमिताभ बच्चन, जितेंद्र यांच्यासोबतची त्यांची जोडी चांगली गाजली. मा.जयाप्रदा यांनी विवाहित श्रीकांत नाहटा नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. श्रीकांत नाहटा हे निर्माते आहेत. या लग्नावरुन बराच वाददेखील निर्माण झाला होता. सिनेमात उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणा-या जयाप्रदा यांचा राजकारणातील प्रवेशदेखील चर्चेत राहिला. सिनेमासोबतच राजकारणातदेखील त्यांनी नाव कमावले. तेलगू देशम पक्षाद्वारे त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    जयाप्रदा यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=ARKnsS541g8

      April 15, 2017


  • ज्येष्ठ व्हायोलिन वादक भालचंद्र देव

    असेच एकदा त्यांच्या क्लासच्या गुरुपौर्णीमेच्या कार्यक्रमात यांनी दुर्गा राग वाजवीत होते. इतक्यात जवळच राहणारे प्रसिध्द संगीततज्ञ सरदार आबासाहेब मुजूमदार त्या ठिकाणी हजर झाले. भालचंद्र चे वादन संपल्यावर ते गुरुजींना म्हणाले, `वा! बबनराव हे रत्न तुम्ही कुठून पैदा केलेत.. ? एका थोर जाणकाराकडून भालचंद्र यांना मिळालेली ती पहिली पावती शाबासकी होती.

      April 5, 2022


  • माझा मित्र कवी प्रवीण दवणे

    नुकतेच प्रवीण दवणेचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले , त्यापैकी एकाचे प्रकाशन दुबईमध्ये झाले. ‘ आमी ‘ नावाची आखाती देशांची आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यांनी मिळून पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा दुबईत नुकताच झाला झाला .,तेथे प्रवीण दवणेचा ‘ नवी कोरी सांज या मराठी कविता संग्रहाचे प्रकाशन झाले , त्या कवितांचे वाचन तिथे झाले तेव्हा सर्व जणांनी त्याला उस्फुर्त प्रतिसाद दिला.

      April 6, 2021


  • गोवा मुक्ती मोर्चा सेनानी पद्मश्री मोहन रानडे

    दुसऱ्या महायुद्धानंतर निवडून आलेल्या क्लेमंट ऍटर्लीच्या मजूर पक्षाच्या शासनाने भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरविले. हे मोठे जटील काम होते तसेच मुस्लिमांच्या मागणीप्रमाणे वेगळे राष्ट्रही निर्माण करायचे होते. ही कामगिरी लॉर्ड माउंटबॅटन यांच्यावर सोपविण्यात आली. मार्च १९४७ मध्ये ते शेवटचे व्हाइसराय म्हणून भारतात आले. त्यांनी ३ जून १९४७ रोजी भारतास १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली.

      June 25, 2022


  • बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू

    तब्बूचं पूर्ण नाव तब्बसुम फातिमा हाश्मी आहे, मात्र लोक त्यांना तब्बू म्हणून ओळखतात. तिचा जन्म ४ नोव्हेंबर १९७१ रोजी झाला. तब्बूच्या आई वडिलांची फारकत झाली तेव्हा तब्बू खूप लहान होती, तब्बूने आपल्या वडिलांना पाहिलं नसल्याचंही सांगण्यात येतं. शबाना आझमींची पुतणी आणि फराहाची बहीण असल्याने तब्बूचे बालपणच ग्लॅमर जगतात गेले. वयाच्या १४ व्या वर्षीच तिने 'हम नौजवान' मधून पदार्पण केले होते. तब्बूने आपल्या बॉलीवूड करिअरमध्ये आपल्या लूक्स सोबत अनेक प्रयोग केले आहेत. मात्र तब्बूने आपली हेअर स्टाईल कधी बदलली नाही, तब्बू आपले काळेभोर लांब केस आपली संपत्ती मानते. रुक रुक, अरे बाबा रुक’ म्हणत ती या सिनेमासृष्टीत आली. आल्यापासून आपल्या एक एक चित्रपटामधून सुरू झालेली तिची ही यात्रा तिला शब्दश: विजयपथावर घेऊन गेली. एकाहून एक वेगवेगळय़ा प्रकारच्या भूमिका केलेल्या तब्बूने आपले स्वत:चे असे एक स्थान या चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे.

    ‘माचीस, ‘हुतुतू, ‘बॉर्डर, ‘चांदनी बार, ‘अस्तीत्व’ यासारख्या चित्रपटात सुंदर भूमिका केल्या आहेत. हिंदीत एवढी यशस्वी असलेली तब्बू दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्येही मोठ्या प्रमाणावर काम करत असते. विशेषतः साथऊच्या चित्रपटांमध्ये तब्बूचा बोल्ड लूक आपल्याला पाहायला मिळतो. तब्बूला माचिस आणि चांदनी बारसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाला डेट केलेल्या तब्बूचे नाव दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनसोबत जुळले होते. यांच्या अफेअर खूप चर्चा एकवटली होती. परंतु दोघांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. नागार्जुन विवाहित होते आणि त्यांना आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. आपल्या नात्याचे काहीच भविष्य नाहीये याची जाणीव झाल्यानंतर तब्बूने नागार्जुनसोबतचे नाते तोडले. तब्बूचं लग्न झालेलं नाही. तब्बूला फोटोग्राफीची आवड आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 7, 2017


  • ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम

    एक महिला असूनही चंद्रकला कदम या बेधडकपणे गुन्हेगारी जगतातील संशयितांना पकडण्यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून गुन्हेगारांची हुबेहूब रेखाचित्रे रेखाटून आपली कला समाजकार्य म्हणून जोपासत आहेत. काही गुन्ह्यांतील संशयित गुन्हेगारांची रेखाचित्रे काढून त्यांना यशस्वीरीत्या पकडून देण्यामध्ये चंद्रकला कदम यांच्या रेखाचित्रांची आजवर पोलिसांना पुरेपूर मदत मिळाली आहे

      December 15, 2021


  • रेल्वे मंत्री सुरेश प्रभू

    वाजपेयी यांच्या काळातील मंत्रीपदाचा तसेच विविध अभ्यास मंडळांवरील अनुभव आणि कार्यक्षमता लक्षात घेता सुरेश प्रभू रेल्वे खात्यात सध्या धडाकेबाज काम करत आहेत.

      July 16, 2017


  • जिगरबाज मल्ल गणपतराव आंदळकर

    गादीवरील खेळाचा पुरता अनुभव नसतानाही १९६४ साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशाचे नेतृत्व केले. पाकिस्तानच्या मल्लाशी कुस्ती म्हटली की कुस्तीशौकिनांना चेव चढतो. एक दोन नव्हे तर तब्बल ४० पाकिस्तानी मल्लांना अस्मान दाखवून त्यांनी कोल्हापूरच्या मातीची ताकद दाखवून दिली.

      April 18, 2022


  • जेष्ठ गायिका माणिक वर्मा

    अमृताहुनी गोड स्वर यांचा देवा, क्षणभर उघड नयन देवा, तुझा नि माझा एक पणा, निघाले आज तिकडच्या घरी, झुलवू नको हिंदोळा अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. त्यांचा जन्म १६ मे १९२६ रोजी झाला.माणिक वर्मा यांचा जन्म पुण्याचा. सेवासदन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीतं, भजनं नेहमीच कानांवर पडत. त्यांच्या आईनंच त्यांचं गाणं जागवलं आणि मग त्यांच्या अवघ्या आयुष्याचंच सुंदर गाणं झालं.

    सुरुवातीच्या काळात गाणं सादर करताना इतरांचं अनुकरण केलं जाई. पण माणिक वर्मा यांच्या आई हिराबाई दादरकर ''यांनी त्यांचं गाणं ख-या अर्थाने विकसित केलं आणि नंतर त्या किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. त्यातून मग गणेशोत्सवातून सुगम संगीताचे कार्यक्रम होऊ लागले.

    पदवी प्राप्त केल्यानंतर शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण सुरू झालं. सुरुवातीला जगन्नाथबुवा पुरोहित, नंतर इनायत खाँसाहेब, ‘भारत गायन समाज’चे अप्पासाहेब भोंपे यांसारख्या दिग्गजांकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर सुरेशबाबू माने यांनी माणिकताईंचा किराणा घराण्याशी परिचय करून दिला.

    दरम्यान पुण्यासारख्या चोखंदळ रसिकांसमोर शास्त्रीय संगीत सादर करण्याची त्यांना संधी मिळाली. पुढे तर सुरतलाही त्यांनी आपली कला पेश केली. यानंतर मात्र सार्वजनिक कार्यक्रम, मैफिली यांची मालिकाच सुरू झाली. लांबलांबचे दौरे आखले जाऊ लागले आणि माणिक वर्मा हे नाव संगीतविश्वात गाजू लागले. गाण्यांच्या मैफिलींसाठी हिराबाई बडोदेकर तर चित्रपट संगीतासाठी सुधीर फडके त्यांचे आदर्श होते. किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता त्याचबरोबर इतर घराण्यांचीही गायकी आत्मसात करून त्यांनी स्वत: ची स्वतंत्र शैली निर्माण केली.

    किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत आणि चित्रपटगीतांना स्वरसाज चढवला. ग. दि. मांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांचे संगीत लाभलेल्या 'गीत रामायण'चे साप्ताहिक प्रक्षेपण पुणे आकाशवाणीवर सुरू झाले, तेव्हा त्यात माणिक वर्मांनी अनेक गीते गायली. ती लोकप्रियही झाली. मराठी भाषेतील अनेक गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. चेहऱ्यावर मंद स्मित असे आकर्षक व घरंदाज व्यक्तिमत्व लाभलेल्या माणिक वर्मांनी अनेक कठीण चालींची गाणी इतक्या सहजतेने गायली की घराघरातील बायका ती गाऊ लागल्या.

    'घननीळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा', हे 'ळ'चा प्रास असलेले तशाच नागमोडी वळणाचे गाणे गदिमांनी रचले व फडकेंनी स्वरबद्ध केले. ते तितक्याच लडिवाळ आवाजात माणिक वर्मा यांनी गायलेलुद्धा. भक्ति व भावगीतांमध्ये रमलेल्या मा.माणिक वर्मा यांनी एकच लावणी गायली. गदिमांची 'जाळीमंदी पिकली करवंद' ही लावणी 'पुढचं पाऊल' या चित्रपटात हंसा वाडकर यांच्या अदाकारीसह चित्रित झाली. मा.बाळ कोल्हटकरांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी' या नाटकातील त्यांनी गायलेले 'आली दिवाळी दिवाळी' हे ह्रदयस्पर्शी गीत खूपच गाजले होत. माणिकबाईंचा विवाह फिल्म्स डिव्हिजनमधील मा.अमर वर्मा यांच्याशी झाला. लग्नाची बातमी जेव्हा संगीत जगतात पसरली, तेव्हा काहींनी माणिकताईंचे अभिनंदन केले. काहींनी नाराजी व्यक्त केली. पण या विवाहामुळे जी खळबळ माजली होती, त्यावर पु. लं.च्या एका वाक्याने फुलांची चादर पसरली.

    ‘अमर वर्मा यांच्याशी माणिक दादरकर यांचा विवाह होत आहे,’ असे पु.लं.ना जेव्हा सांगण्यात आले. तेव्हा पु.ल. पटकन म्हणाले, ‘माणिकने वर्मावर घाव घातला की..’ आणि मग माणिक दादरकर-अमर वर्मा यांच्या लग्नाच्या पत्रिका निघाल्या. त्या पत्रिकांवर त्या काळाला अनुसरून त्या काळातील समाजाची दैवते असलेले महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांचे फोटो होते. मा.माणिक वर्मा यांची चार रत्न म्हणजे राणी वर्मा, भारती आचरेकर वंदना गुप्ते आणि अरुणा जयप्रकाश...राणी वर्मा यांनी आईचा म्हणजे मा.माणिक वर्मा यांच्या संगीताचा वारसा पुढे चालवला तर वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर अभिनयाच्या क्षेत्रात चमक दाखवताना दिसल्या. गायिका सुनीता खाडिलकर या माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी.

    १९७४ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला. माणिक वर्मा यांच्या स्वरांचा सन्मान संगीत नाटक अकादमी पुरस्कार, यांसारख्या पुरस्कारांनी करण्यात आला. माणिक वर्मा यांनी आयुष्यभर सुरेल आराधना केली आणि त्यांचा हा स्वर अमृताहूनी गोड असाच होता, आहे आणि रसिकांच्या हृदयात चिरंतन राहील. दर वर्षी रंगशारदा महोत्सव योजने अंतर्गत १९९८ सालापासून मे महिन्यात तीन दिवसांचा माणिक वर्मा संगीत महोत्सव साजरा होतो. माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. माणिक वर्मा यांचे ‘किती रंगला खेळ’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या स्वरांइतकेच आनंद देते. माणिक वर्मा यांचे १० नोव्हेंबर १९९६ रोजी निधन झाले.

    माणिक वर्मा यांची वेबसाईट
    http://www.manikvarma.com
    माणिक वर्मा यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=EfM1M0SW-DA
    'जाळीमंदी पिकली करवंद' ही लावणी
    https://www.youtube.com/watch?v=C4x27eCejpQ
    हसले मनी चांदणे
    https://www.youtube.com/watch?v=0cRSC3AAdHU

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 15, 2017


  • ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक विद्याधर गोखले

    ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२४ रोजी झाला.पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे मध्यप्रदेशाच्या काँग्रेस प्रशासनात मंत्री होते. लहानपणी घरातून मिळालेल्या संस्कारांचा विद्याधर गोखले यांच्यावर प्रभाव होता. अमरावती येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९४४ मध्ये ते मुंबईला आले. जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे त्यांनी अध्यापन केले. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जात. यानंतर विद्याधर गोखले यांनी दैनिक लोकसत्तामध्ये बरीच वर्षे पत्रकारिता केली व त्यानंतर पाच वर्ष त्यांनी संपादक म्हणूनही काम पाहिले. पत्रकारिता करीत असताना वृत्तपत्राबरोबरच त्यांची लेखणी नाटयलेखन करू लागली. संगीत नाटकांच्या परंपरेचा वारसा त्यांनी पुढे चालवला. गोखले यांनी एकूण १८ नाटके लिहिली.

    त्यापैकी काही ऐतिहासिक, पौराणिक तर सामाजिक विषयांवर आधारित आहेत. त्यांची संगीत नाटकं तर लोकप्रिय झालीच पण त्यातील पदांनी आजपर्यंत मराठी मनाला भुरळ घातली आहे. संगीत सुवर्णतुला, पंडितराज जगन्नाथ, मंदारमाला , जावयाचे बंड, चमकला ध्रुवाचा तारा, जयजय गौरीशंकर ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण साक्षीदार, अमृत झाले जहराचे, मदनाची मंजिरी, स्वरसम्राज्ञी ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं. तर बावनखणी हे पेशवे काळावर लिहिलेले संगीत नाटक. गझलसम्राट गालिब, शायरेआजम, शायरीचा शालिमार ही गालिबचे काव्य आणि गालिबचे चरित्र यावरील पुस्तके आहेत. तर फार्सी, उर्दू, हिदी, मराठी आणि संस्कृत कवींच्या कथा सांगणारे कविकथा हे त्यांचे पुस्तकही गाजले होते. शंकर सुखकर हो हा नाट्यविषयक संदर्भांचा संग्रह नाटकाबद्दल एक वेगळीच दृष्टी देऊन जातो. गोखले यांची लेखणी राजस, रसिकतेची साक्ष देणारी विविधांगी आणि प्रतिभावान अशीच होती. लोकसत्तेतले त्यांचे अग्रलेख हा उत्कृष्ट संपादनाचा, लेखनाचा एकेक नमुना होता. रंगशारदा ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली. नाटकात नृत्ये योजण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला. मा.विद्याधर गोखले यांचे २६ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ ग्लोबल मराठी

      January 4, 2018