(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पटकथा आणि संवादलेखन सलीमखान

    पटकथा आणि संवादलेखन सलीमखान यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. सलीम खान यांनी जरी फार कमी काळ या सिनेसृष्टीला दिला तरी त्यांच्या योगदानासाठी त्यांचे नाव नेहमीसाठी घेतले जाईल.
    कितने आदमी थे” - शोले
    “मेरे पास मां है”, - दिवार
    “डॉन को पकडना मुश्कील हि नाही नामुमकीन है”... या सारखे संवाद सिनेसृष्टीत अजरामर झालेले आहेत. पण या संवादाचे लेखक शेवटपर्यंत एकत्र राहू शकले नाही ही मात्र सिनेसृष्टीसाठी शोकांकीता ठरली. आज ही अनेकांना वाटते सलीम-जावेद ही एकच व्यक्ती आहे, पण तसे नसून या ‘दोन व्यक्ती’ ‘सलीम खान’ आणि ‘जावेद अख्तर’ आहेत. ‘सलीमखान’ यांचे पूर्वज हे अफगाणिस्तान येथील ‘अल्कोझाई’ या कबिल्यातील आहेत. ते भारतातील इंदोर या शहरात वास्तव्यात आले. ‘सलीम खान’ आणि ‘ताराचंद बडजात्या’ हे शेजारी राहणारे आणि त्यांचे अगदी घरोब्याचे संबंध होते. ‘सलीम खान’ यांचा जन्म इंदोर येथे एका सुखवस्तू घराण्यात झाला होता.

    लहानपणापासूनच ऐशोआरामाच्या सर्व गोष्टी त्यांच्या जवळ होत्या. अगदी कॉलेज मध्ये असताना त्यांना क्रिकेटचा पण खूप शौक होता. त्यांचे व्यक्तिमत्व पण एखाद्या नायकापेक्षा काही कमी नव्हते. तसे बघितले तर त्यांचा अभिनयाशी काही एक संभंध नव्हता पण तरीही ते अभिनयाकडे ओढले गेले. अशाच एकावेळी ताराचंद बडजात्या यांच्या कडील एका विवाहाप्रसंगी इंदोर येथे मुंबईतून आलेल्या सिनेसृष्टीतील काही निर्मात्यांसोबत परिचय झाला, त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला भाळून प्रसिद्ध दिग्दर्शक ‘के अमरनाथ’ यांनी सलीम खान यांना मुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी आमंत्रित केले. त्याकाळात त्यांनी चारशे रु महिना मानधन पण देऊ केले तेव्हा काहीसे अचंबित झालेले ‘सलीम खान’ त्यासाठी तयार झाले. जेव्हा स्टेशन वर आले तर तेव्हा त्यांच्या भावाने म्हंटले कि मुंबईत तर तू चालला आहेस पण कधीही घरी निरोप देऊ नको कि मला पैसे पाठवा आणि मी परत येतो. तेव्हाच त्यांचा निर्णय पक्का झाला कि आता तर काही नक्कीच करून दाखवावे लागेल.

    कसेबसे मुंबईत राहून त्यांनी अभिनयाचा निवडलेला मार्ग काही जम बसू देत नव्हता. तब्बल सात वर्ष अभिनय करून सुद्धा हवे तसे यश येत नव्हते. या दरम्यान त्यांनी ‘तिसरी मंझील’, ‘सरहद्दी लुटेरा’ आणि ‘दिवाना’ मध्ये काम केले होते. साठ चे दशक संपत चालले होते पण यश पदरात येत नव्हते आणि अपयशाचे शिखर समोर दिसत होते त्यावेळेस त्यांनी संवाद लेखक म्हणून काम करायचे ठरविले, तेव्हा त्यांनी स्वप्नातही असा विचार केला नव्हता कि आपली जोडी ही ‘जावेद अख्तर’ नावाच्या इसमासोबत होईल आणि हे नाव इतिहासात अजरामर होईल. सलीम-जावेद यांनी जवळपास बारा वर्ष एकत्र काम केले या दरम्यान त्यांनी २८ चित्रपटांसाठी पटकथा आणि संवादलेखन केले त्यापैकी वीस चित्रपट सुपरहिट झाले होते. ‘यादो कि बारात’, ‘जंजीर’, ‘क्रांती’, ‘हाथ कि सफाई’, ‘दिवार’, ‘शोले’ आणि ‘मि. इंडिया’ सारखे हिट चित्रपट दिलेत.

    या दरम्यान त्यांनी केवळ आपले करियर विकसित केले नाही तर त्यांनी पटकथा लेखक यांनी सुद्धा मानाचे स्थान दिले. त्याआधी पटकथा लेखक यांचे नाव पोस्टर वर कधीच झळकत नव्हते. पण सलीम जावेद यांच्यामुळेच संवाद आणि पटकथा लेखक यांना मानाचे स्थान मिळाले. १९८२ साली ही जोडी वेगळी झाली तेव्हा हे स्पष्ट झाले कि ‘सलीम खान’ हे तयार नव्हते पण ‘जावेद अख्तर’ यांच्या मनात काही वेगळेच होते. जोडी तुटल्यानंतर सलीम खान यांचे मन या करियर मधून पूर्ण उतरून गेले आणि त्यांनी जवळपास याला रामराम ठोकला होता. पण त्यानन्तर त्यांना अनेक प्रश्न विचारल्या गेलेत, त्या प्रश्नांना उत्तर देणे तर भागच होते. मग त्यांनी एक जबरदस्त स्क्रीप्ट तयार केली आणि तो चित्रपट आला, केवळ एकट्या सलीम खान ने पटकथा लिहिलेला “नाम”. ‘संजय दत्त’ आणि ‘कुमार गौरव’ यांनी अभिनित केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

    सलीम खान यांनी एका ‘मराठी राजपूत’ महिलेसोबत विवाह केला त्यांचे नाव होते ‘सुशीला चरक’. लग्नानंतर त्यांनी हे बदलवून ‘सलमा खान’ असे ठेवले. सलमान खान या दोघांचा मुलगा. सलीम खान स्वतः मुस्लीम असताना सुद्धा त्यांनी घरातील वातावरण अगदी मोकळे ठेवले म्हणूनच त्याच्या घरात आजही गुढी पाडवा, गणेशउत्सव आणि दिवाळीचा सण धुमधडाक्यात होतो. ८० च्या दरम्यान प्रसिद्धी तर मिळाली होती पण त्याच दरम्यान त्यांचे त्याकाळची प्रसिद्ध नर्तिका ‘हेलेन’ वर प्रेम बसले. त्यावेळच खूप गाजावाजा झाला पण असे ठरले होते कि जर सलमा खान यांची अनुमती असेल तरच हे लग्न होणार त्यामुळे काहीशा तणावानंतर या लग्नाला ‘सुशीला चरक’ यांनी अनुमती दिली. आजही या दोघी एकाच घरात सुखाने राहतात.

    हेलेन यांना कोणतीही संतती नसल्यामुळे त्यांनी एक कन्या दत्तक घेतली, आणि ती त्या परिवारातील लाडकी कन्या ठरली. तिचे नाव ‘अर्पिता खान’ ठेवल्या गेले. तिचे अर्पिता हे नाव कुणी आणि कसे ठेवले, याविषयी फार कमी जणांना ठाऊक आहे. सलमानच्या या लाडक्या बहिणीचे 'अर्पिता' हे नाव प्रसिद्ध व्यंगचित्रकार शरद जोशी यांनी ठेवले आहे. अर्पिताला सलमानचे वडील सलीम खान यांनी १९८१ मध्ये दत्तक घेतले होते. त्यावेळी सलीम खान यांच्यासोबत इंदूर येथील होळकर कॉलेजमधील त्यांचे मित्र शरद जोशी हजर होते. तेव्हा सलीम यांनी शरद जोशींकडे आपल्या मुलीचे नाव ठेवण्याची विनंती केली. शरद जोशी यांनी सलीम खान यांना म्हटले की, ही मुलगी तुम्हाला अर्पित झाली आहे, त्यामुळे हिचे नाव 'अर्पिता' ठेवायला पाहिजे. अशाप्रकारे ही अनाथ मुलगी सलीम खान यांची मुलगी 'अर्पिता खान' झाली.
    एक पिता म्हुणुन त्यांनी जसे आपले कुटुंब जोपासले तसे ते एक चांगले व्यक्तित्व म्हणून पण समोर आले. जास्त प्रसिद्धीचा हव्यास न करता आपले कार्य प्रामाणिकपणे करीत असताना त्यांनी खऱ्या अर्थाने या देशाचे जेष्ठ आणि सेकुलर व्यक्तीची प्रतीमा कायम राखली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ शशांक गिरडकर

      November 24, 2018


  • नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड

    गिरीश कर्नाड म्हटलं की 'तुघलक' आणि 'हयवदन' ही दोन प्रमुख नाटके चटकन डोळ्यासमोर येतात. कारण ती बहुसंख्य भारतीय भाषांत भाषांतरीत झाली आहेत. पण या व्यतिरिक्तही त्यांची अनेक नाटके गाजली. शिवाय केवळ नाटक हेच त्यांचं कार्यक्षेत्र आहे, असंही नाही, आपलं बहुतांश लेखन कन्नड मध्ये करणार्याव या ज्येष्ठ नाट्यकर्मीची मातृभाषा मात्र कन्नड नाही. ती आहे कोकणी. आणि प्राथमिक शिक्षण झालं मराठीत. कर्नाड कुटुंबिय कोकणी असलं तरी त्यांचा जन्म १९ मे १९३८ रोजी माथेरान येथे झाला. पुढे हे कुटुंब कर्नाटकात स्थलांतरीत झालं आणि त्यांनी कन्नड भाषा आपलीशी केली.

    गिरीश कर्नाड यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशांत बरेच नाव कमावले. गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले. हा चित्रपट एस्‌. एल्‌. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते. नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे तब्बलियू नीनादे मगने व ओंदनोंदू कालादल्ली हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट, आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत. गिरीश कर्नाड यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला आहे. कर्नाड यांची १९६१ नंतर ययाती, तुघलक अग्नी और बरखा, नागमंडळ, अंजू मल्लिगे अशी अनेक नाटके गाजली. ‘संस्कार’ या कन्नड चित्रपटापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीस सुरुवात झाली.

    कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला ‘उत्सव’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, मराठी अशा ७० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. १९८२ मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाटकात पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आधुनिक आशय व्यक्त केला. सोशिकता ही नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखांची परंपरा त्यांनी मोडली. त्यांच्या नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखा डिमांडिंग आहेत. कर्नाड यांनी आपल्या नाटकात केलेली पारंपरिक मांडणी, आशय यांची पुनर्मांडणी अद्भुत आहे. कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिखाण केले असूनही त्यांनी नेहमी स्वत:ला मराठी संस्कृतीशी जोडून ठेवले.

    गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ’घडले कसे’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. त्यातले कथानक आई-वडिलांचा वादग्रस्त विवाह, या घटनेपासून सुरू होऊन स्वत:च्या लग्नापाशी थांबते. गिरीश कर्नाड यांना भारत सरकारने पद्मभूषण, पद्मश्री व ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरव केला आहे. गिरीश कर्नाड यांनी १९७४-७५ मध्ये पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालकपद भूषिवले आहे. गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.

    गिरीश कर्नाड यांना कालिदास सन्मान पुरस्कार, तन्वीर सन्मान पुरस्कार, नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार, भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल, ’वंशवृक्ष’साठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार, ’संस्कार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक, संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, होमी भाभा फेलोशिप असे अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत. 'युनेस्कोअ' तर्फे जागतिक रंगभूमीच्याश राजदूत म्हणून गिरीश कर्नाड यांची निवड झाली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 20, 2017


  • मराठी सिनेसृष्टीतील कलाकार सचिन खेडेकर

    १९९० साली सचिन खेडेकर यांनी जीवा सखा या मराठी चित्रपटा द्वारे पदार्पण केले. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले आहे. त्यांचा जन्म १४ मे १९६५ रोजी झाला.

    मराठी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी बॉलिवुडमध्येदेखील आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आतापर्यत अनेक बॉलिवुड चित्रपट केले आहे. त्यांचा पहिला बॉलिवुड चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला आहे. जिद्दी असे या बॉलिवुड चित्रपटाचे नाव आहे.

    आपली माणसे, चिमणी पाखरे, विधिलिखित, लालबाग परळ, शिक्षणाच्या आईचा घो, काकस्पर्श, फक्त लढ म्हणा असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय त्यांचा हा चित्रपट फारच गाजला होता.

    रूस्तम, क्रिश ३, मुंबई कटींग, आजान, जंग, बादशाह, रॉक, अनुराधा, बबल गम, तीस मार खॉं असे अनेक तगडे बॉलिवुड चित्रपटदेखील त्यांनी केले आहेत.

    त्यांची सिंघम या सुपरहीट बॉलिवुड चित्रपटातील गोठया नावाची भूमिका विशेष गाजली होती.कौन होईल मराठी करोडपती हा छोटया पडदयावरील त्यांचा कार्यक्रमाचे अॅकंरींग त्यांनी केले होते.सचिन खेडेकर यांना बॉलिवुड ,मराठी चित्रपट आणि छोटया पडदयावर देखील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच ऐकण्यास मिळाले आहे. सैलाब या टीव्ही शोसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारदेखील मिळाला आहे. तसेच ऐतिहासिक भूमिकेसाठीदेखील त्यांना उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 15, 2017


  • अरुण साधू

    ‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते. ३० वर्ष त्यांनी पत्रकारिता केली.

      June 18, 2022


  • साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री भानुप्रिया

    भानुप्रिया हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील असे एक नाव आहे, ज्याला कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९६७ रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंदरी(रंगमपेटा गाव)येथे झाला. भानुप्रियाने तामिळ,तेलगु,कन्नड आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केले आहे. भानुप्रियाचे खरे नाव मंगा भामा आहे. तिच्या घरी अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती. शाळेत असताना दिग्दर्शक भाग्यराजा गुरू एके दिवशी शाळेत आले. त्यांना त्यांचा सिनेमात एका टीन एज मुलीला घ्यायचे होते. त्यांनी भानुप्रियाची निवड केली.

    मात्र फोटोशूटवेळी भानुप्रिया खूप छोटी दिसली. त्यामुळे त्यांनी तिला सिनेमातून काढून टाकले. जेव्हा भानुप्रियाला हे समजले,तेव्हा ती पुन्हा शाळेत कधीच गेली नाही. कारण शाळेतील विद्यार्थी आपली थट्टा उडवतील असे तिला वाटले होते. वयाच्या १७ व्या वर्षी भानुप्रियाने अभिनय करिअरला सुरुवात केली.तिचा पहिला सिनेमा १९८३ मध्ये रिलीज झालेला'मेल्ला पेसुन्गल'आहे.हा एक तामिळ सिनेमा होता. ९० च्या दशकात बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेल्या भानुप्रियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये दीडशेहून अधिक सिनेमे केले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 15, 2018


  • संगीतकार वसंत प्रभू

    मराठी संगीताच्या इतिहासात वसंत या नावाला काही आगळंवेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं? वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीन संगीतकार. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९२४ रोजी झाला. या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीत रसिकांच्या चार पिढ्या आजवर तृप्त झाल्या आहेत. त्यातील एक संगीतकार वसंत प्रभू.

    वसंत प्रभू यांनी सुरुवातीला हिंदी चित्रपटात‘बाल अभिनेता’ म्हणून काम केले.मा.वसंत प्रभू यांचे मूळ नाव व्यंकटेश प्रभू. पण हिंदी चित्रपटासाठी हे नाव चालणार नाही म्हणून त्यांचे ‘वसंत’ असे नामकरण करण्यात आले. मूळ गाव पाणे मंगरूळ, वडीलांचा हॉटेल व्यवसाय, बालवयापासूनच मेळ्यात गाणं-नृत्य-अभिनय करून ह्यांत रसिकमान्य झालेला “वसंत प्रभू‘ नावाचा तरुणही संगीतात काहीतरी करण्यासाठी धडपडत होता. त्याच वेळी “एचएमव्ही‘चे वसंतराव कामेरकर ह्यांनी प्रभू ह्यांची योग्यता ओळखून त्यांना एचएमव्हीत संगीतदिग्दर्शक म्हणून नोकरी दिली होती. दामूअण्णा माळी म्हणून प्रभू ह्यांचे एक मित्र होते. दामूअण्णा आणि पी. सावळाराम ह्यांचीही मैत्री होती. दामूअण्णांनी सावळाराम ह्यांची प्रभू ह्यांच्याशी ओळख करून दिली. ही “शब्द‘-“स्वरा‘ची भेट म्हणजे रसिकांसाठी “सुवर्णयोग‘च ठरला. कारण, भावगीत विश्वा्त सावळाराम-प्रभू ह्या द्वयीनं सोन्यासारखी एकाहून एक गाणी दिली. माणूस जसा नशीब घेऊन जन्माला येतो, तशीच गाणीसुद्धा नशीब घेऊनच जन्माला येतात! ह्या द्वयीची अशी अनेक गाणी नशीबवान ठरली. त्यातल्या एका गाण्याचं नशीब जास्तच जोरावर होतं. ते प्रचंड गाजलं. वर्षानुवर्षं वाजत राहिलं. अनेक वेळा ऐकूनही ताजंतवानंच राहिलं. प्रत्येक पिढीला आवडणारं ते गाणं आहे “गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का?
    जा, मुली जा, दिल्याघरी तू सुखी रहा...

    आचार्य अत्रे ह्यांनी ह्या गीताचं कौतुक करताना म्हटलं होतं “गंगा-जमुना‘ हे गाणं एका पारड्यात व इतर सगळी गाणी दुसऱ्या पारड्यात घातली तरी “गंगा-जमुना‘चं पारडं जड होईल!‘‘
    ‘सखी शेजारीणी’ हे गाणे गाण्यासाठी वसंत प्रभू यांनी अरुण दातेच पाहिजेत अशी खास फर्माईश केली होती. तेव्हा अरुण दाते हे प्रसिद्धीस आले नव्हते. वसंत प्रभू यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले. संगीतकार वसंत प्रभू, जनकवी पी. सावळाराम आणि लता मंगेशकर या त्रयीने मराठी भावसंगीताची मुहूर्तमेढ रोवली. या त्रयीची अजरामर गीते अजूनही आपल्या ओठी आहेत. वसंत प्रभू यांचे चरित्र मानसीचा चित्रकार तो या नावाने मधु पोतदार यांनी लिहिले आहे.
    वसंत प्रभू यांचे १३ ऑक्टोबर १९६८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ मधु पोतदार

    वसंत प्रभू संगीत दिलेली काही गाणी
    चाफा बोलेना
    चंद्र तोच अन्‌ तेच तारे
    चंपक-गोरा कर कोमल
    चांद मोहरे चांदणे
    जन पळभर म्हणतिल
    जन्मोजन्मीं तुम्हीच यावे
    जय देवी मंगळागौरी
    जिथे सागरा धरणी मिळते
    जीर्ण पाचोळा पडे तो
    तुझे डोळे पाण्याने भरले
    तूच कर्ता आणि करविता
    तें दूध तुझ्या त्या
    दिनरात तुला मी किती

      January 19, 2018


  • संगीतकार एस.एन.त्रिपाठी

    एस.एन.त्रिपाठी यांनी आपल्या प्रदीर्ध कारकिर्दीत अनेक प्रकारे चित्रपट विश्वात काम केले. संगीत दिग्दर्शक, गायक, नट, कथा आणि पटकथा लेखक आणि निर्माते म्हणून काम केले. एस.एन.त्रिपाठी यांची पौराणिक चित्रपटांमधे मात्र मक्तेदारी कुणीच मोडू शकलं नाही. धार्मिक आणि पौराणिक चित्रपट अधिक संख्येने वाट्याला येऊन देखील सातत्याने श्रवणीय गाणी देणारे संगीतकार म्हणून ओळख होती. पौराणिक चित्रपट संगीताचा बादशाह म्हणून ते प्रसिद्ध होते.

      May 27, 2019


  • विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झीरवाळ

    नरहरी झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यातील वनारे हे त्यांचं गाव. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे.

      June 21, 2022


  • अभिनेत्री जयश्री तळपदे ऊर्फ जयश्री टी

    १९६९ मध्ये "अभिलाषा' या चित्रपटाद्वारे जयश्री टी यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर एकापाठोपाठ एक चित्रपट त्या करीत गेल्या. एक उत्तम अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. काही चित्रपटांतील गाण्यांवर त्यांनी केलेली नृत्येही लोकप्रिय ठरली. शर्मिली या चित्रपटातील रेशमी उजाला है, तसेच मैं सुंदर हूं चित्रपटातील नाच मेरी जान फटाफट, व तराना चित्रपटातील सुलताना सुलताना या गाण्यांवरील नृत्यांनी त्यांना ख्याती मिळवून दिली.

    मराठीमध्ये त्यांनी "बायांनो नवरे सांभाळा', "ह्योच नवरा पाहिजे', "आपलेच दात आपलेच ओठ', "गोष्ट धमाल नाम्याची', "मानाचं कुंकू', "तूच माझी राणी' असे काही चित्रपट केले. दादा कोंडके, अमोल पालेकर, अशोक सराफ, यशवंत दत्त, अरुण सरनाईक अशा आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. मराठी, हिंदीबरोबरच भोजपुरी, तमीळ, तेलगू, मल्याळम, बंगाली आदी जवळपास अठरा भाषांतील चित्रपटांत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ५० ते ६० गुजराती चित्रपटांमध्ये जयश्री टी यांनी काम केले आहे. "केशर चंदन', "तेजल गारासनी', "ढोला मारू' असे त्यांचे काही गुजराती चित्रपट गाजलेले आहेत. अठरा भाषांमध्ये जवळपास सातशे चित्रपट जयश्री टी यांनी केले आहेत.

    अभिनेता चित्रसेन तळपदे हे त्यांचे वडील व अभिनेत्री मीना टी. ही बहीण.विनायक यांचे चिरंजीव जयप्रकाश कर्नाटकी हे जयश्री टी यांचे पती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      June 12, 2017


  • माई मंगेशकर

    माई मंगेशकर या मूळच्या धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावच्या होत. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची अपत्ये होय.

      June 16, 2022