जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आज १३ ऑक्टोबर
आज संगीतकार वसंत प्रभू यांची पुण्यतिथी.
जन्म:- १९ जानेवारी १९२४
मराठी संगीताच्या इतिहासात वसंत या नावाला काही आगळंवेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं? वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीन संगीतकार. या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीत रसिकांच्या चार पिढ्या आजवर तृप्त झाल्या आहेत. त्यातील एक संगीतकार वसंत प्रभू.
वसंत प्रभू यांचे खरे नाव व्यकंटेश प्रभू. मूळ गाव पाणे मंगरूळ, वडीलांचा हॉटेल व्यवसाय, बालवयापासूनच मेळ्यात गाणं-नृत्य-अभिनय करून ह्यांत रसिकमान्य झालेला "वसंत प्रभू‘ नावाचा तरुणही संगीतात काहीतरी करण्यासाठी धडपडत होता. त्याच वेळी "एचएमव्ही‘चे वसंतराव कामेरकर ह्यांनी प्रभू ह्यांची योग्यता ओळखून त्यांना एचएमव्हीत संगीतदिग्दर्शक म्हणून नोकरी दिली होती. दामूअण्णा माळी म्हणून प्रभू ह्यांचे एक मित्र होते. दामूअण्णा आणि पी. सावळाराम ह्यांचीही मैत्री होती. दामूअण्णांनी सावळाराम ह्यांची प्रभू ह्यांच्याशी ओळख करून दिली. ही "शब्द‘-"स्वरा‘ची भेट म्हणजे रसिकांसाठी "सुवर्णयोग‘च ठरला. कारण, भावगीत विश्वा्त सावळाराम-प्रभू ह्या द्वयीनं सोन्यासारखी एकाहून एक गाणी दिली. माणूस जसा नशीब घेऊन जन्माला येतो, तशीच गाणीसुद्धा नशीब घेऊनच जन्माला येतात! ह्या द्वयीची अशी अनेक गाणी नशीबवान ठरली. त्यातल्या एका गाण्याचं नशीब जास्तच जोरावर होतं. ते प्रचंड गाजलं. वर्षानुवर्षं वाजत राहिलं. अनेक वेळा ऐकूनही ताजंतवानंच राहिलं. प्रत्येक पिढीला आवडणारं ते गाणं आहे "गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का?
जा, मुली जा, दिल्याघरी तू सुखी रहा‘
मा.आचार्य अत्रे ह्यांनी ह्या गीताचं कौतुक करताना म्हटलं होतं "गंगा-जमुना‘ हे गाणं एका पारड्यात व इतर सगळी गाणी दुसऱ्या पारड्यात घातली तरी "गंगा-जमुना‘चं पारडं जड होईल!‘‘
‘सखी शेजारीणी’ हे गाणे गाण्यासाठी वसंत प्रभू यांनी अरुण दातेच पाहिजेत अशी खास फर्माईश केली होती. तेव्हा मा.अरुण दाते हे प्रसिद्धीस आले नव्हते. मा.वसंत प्रभू यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले. संगीतकार वसंत प्रभू, जनकवी पी. सावळाराम आणि लता मंगेशकर या त्रयीने मराठी भावसंगीताची मुहूर्तमेढ रोवली. या त्रयीची अजरामर गीते अजूनही आपल्या ओठी आहेत.
मा.वसंत प्रभू यांचे चरित्र मानसीचा चित्रकार तो या नावाने मा.मधु पोतदार यांनी लिहिले आहे.
मा.वसंत प्रभू यांचे १३ ऑक्टोबर १९६८ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.वसंत प्रभू यांना आदरांजली.
१३ ऑक्टोबर १९६८
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मा.मधु पोतदार
मा.वसंत प्रभू संगीत दिलेली काही गाणी
चाफा बोलेना
चंद्र तोच अन् तेच तारे
चंपक-गोरा कर कोमल
चांद मोहरे चांदणे
जन पळभर म्हणतिल
जन्मोजन्मीं तुम्हीच यावे
जय देवी मंगळागौरी
जिथे सागरा धरणी मिळते
जीर्ण पाचोळा पडे तो
तुझे डोळे पाण्याने भरले
तूच कर्ता आणि करविता
तें दूध तुझ्या त्या
दिनरात तुला मी किती
October 13, 2016
सुलोचनाबाई यांनी भालजी पेंढारकर यांना अगुरु मानले. रेखीव आणि बोलक्या डोळ्याच्या रंगू दिवाण यांचे नामकरण भालजींनी ‘ सुलोचना ‘ असे केले आणि ह्याच नावाने त्या खूप लोकप्रिय झाल्या.
August 15, 2021
१९४१ साली ‘ नाट्यनिकेतन ‘ या संस्थेत प्रवेश केल्यावर संगीत अभिनेत्री म्ह्णून त्या चांगल्याच प्रस्थापित झाल्या त्यांनी या संस्थेत अकरा नाटकांमधून भूमिका केल्या त्यामध्ये ‘ संगीत कुलवधू ‘ या नाटकात त्यांना अजरामर कीर्ती मिळाली.
August 16, 2021
कादंबरीकार होण्याच्या आधी गुलशन नंदा दिल्लीतील बल्लीमारान भागात एका चश्माच्या दुकानात काम करत होते. गुलशन नंदा यांना एकदा बसने प्रवास करत असताना एकाने लिखाण करण्यास सांगितले व ते यशव्वी कादंबरीकार आणि हिंदी पटकथा झाले. साठच्या दशकात गुलशन नंदा हे लेखक पॉकेट बुक्सच्या पहिल्या पिढीतले तळपणारे तारे होते.
गुलशन नंदा यांच्या कादंबर्यांकनी विक्रीची नवनवीन विक्रम प्रस्थापित करतांनाच बॉलीवुडला कटी पतंग, दाग, अजनबी, नया जमाना, झील के उस पार, शर्मिली, खिलौना, आदींसारखे जवळपास २५ सुपरहिट चित्रपटही दिलेत.
गुलशन नंदा यांच्या हिंदी कादंबर्यावर जितके हिंदी चित्रपट निघाले तितके हिंदी चित्रपट इतर कोणत्याही हिंदी लेखकाच्या कादंबऱ्यांवर निघाले नसतील.
गुलशन नंदा यांचे निधन १६ नोव्हेंबर १९८५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 16, 2018
भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली "लोकधारा" मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली. नंतर त्यांना "सही रे सही" नाटकातून ओळख मिळाली. त्यांच्या इतर नाटकांमध्ये "श्रीमंत दामोदर पंत", "ऑल द बेस्ट", "आमच्या सारखे आम्हीच" आणि "ढॅण्ट ढॅण" या नाटकांचा समावेश आहे. नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत त्यांची जोडी जमली. या जोडीनी अनेक यशस्वी नाटके व चित्रपट दिले आहेत. भरत जाधव हे त्यांच्या कॉमिक टाइमिंग साठी ओळखले जातात. भरत जाधव यांनी ८५ चित्रपट, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ८५०० हून अधिक नाटकाचे प्रयोग केले आहेत. मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारा तो पहिला अभिनेता आहे. सही रे सही या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. ‘सही रे सही’ या नाटकाचे 'अमे लई गया, तमे रही गया' या नावाने गुजराथीत भाषांतर झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
इंग्रजांच्या जोखडातून भारताची मुक्तता झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अशी त्यांची प्रमुख ओळख आहे. अनेक चळवळीतील त्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला.
July 13, 2025
अत्यंत तर्कनिष्ठ व वस्तुनिष्ठ विचार मांडणारे नरहर कुरुंदकर हे एक प्रभावी वक्ते सुद्धा होते. त्यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी झाला. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्य होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.
प्रा. नरहर कुरुंदकर यांचे ‘इसापनीती’ हे भाषण आणीबाणीच्या काळात खूप गाजले. मनुस्म्रुतीवरच्या पुस्तकात मा. नरहर कुरुंदकर लिहितात, मध्ययुगीन जगात सर्वच देशात विषमता होती. अमेरिका, युरोप ते अरबस्तानापर्यंतचा इतिहास गुलामिच्या आणी स्त्री छळाच्या काळ्या शाइने लिहिला आहे. पण ह्या गुलामिचे आपल्या धर्माने ज्या प्रमाणात समर्थन केलेले आहे, तेव्हढे जगाच्या पाठीवर कोठेही आढळणार नाही. कर्म करत रहा, फळ अत्ता मागू नकोस, पुढल्या जन्मी तुला ते मिळेलच. त्यानुसार तुझी जात ठरेल अन त्यावरून लायकी; ही धार्मीक शिकवण हिंदूना घातक ठरली. देशाला दुर्बल करणार्या . ह्या धार्मीक व्यव्स्थेचे समर्थक आजाही अस्तित्वात आहेत. ही कुरुंदकरांची खरी खंत होती. मनुस्म्रुतीत शुद्राला कर नाही असे मनुसमर्थक म्हणतात. पण त्याचवेळी शुद्राला धनसंचयाचा अधिकारच मनू देत नाही. तर तो कर भरणार कोठून ? अशा बाबी डोळ्याआड करतात. केवळ ग्रंथप्रामाण्यातून हे घडत नाही पण जातीचा दंभ मनूच्या उच्चवर्णीय समर्थकाना बौद्धीक गुलामगिरीत ढकलतो हे कुरुंदकर दाखवून देतात. परंपरेची बौद्धीक गुलामी अमान्य करणार्या उच्चवर्णीयांनाही मनू शूद्राचीच वागणूक देतो असे प्रतिपादून मनूच्या उच्चवर्णीय समर्थकानाही ते चक्रावून टाकतात. सुभाषबाबूंचे आकलन करताना मा.कुरुंदकर लिहितात - जे सशस्त्र क्रांतीकारक आहेत, ते सगळे अहिंसाविरोधी. जे अहिंसाविरोधी ते सर्व गांधीविरोधी आणी जो गांधीविरोधी तो हींदुत्ववादी अशी सोयीची समजूत मध्यमवर्गीयांनी केलेली आहे. सुभाषबाबूंनी त्यांच्या आझाद हिंद रेडीओवरच्या भाषणातून गांधीचा उल्लेख राष्ट्रपिता असाच केला होता. बंगाल मधल्या दास पॅक्ट नुसार ५२ % मुसलमानाना ६०% जागा मिळणार होत्या आणी सुभाषबाबू ह्या करारात सामील होते हे पटवून देत कुरुंदकर सुभाषबाबूंचे मुस्लीम प्रेम दाखवून देतात. स्वतःला गांधीवादी म्हणवणारे कुरुंदकर महात्मा गांधीचे अमक्या विषयावरचे विचार साफ चूक आहेत असे म्हणायला कचरत नाहीत. फाळणीच्या वेळी गांधीजींनी मुस्लीमांचे लांगुलचालन केले होते असा आरोप हिंदुत्ववादी करतात. त्याला उत्तर देताना कुरुंदकर म्हणतात " एका मुसलमानाला तीन मतांचा अधिकार देउन; लखनौ कराराच्या वेळी कोंग्रेस मधील मुस्लीम लांगुलचालनाचा पाया; खुद्द लोकमान्य टिळकांनी घातलेला आहे. हे हिंदुत्ववादी का विसरतात ?" श्रोत्यांच्या प्रस्थापित कल्पनांना तडाखे हाणत त्यांना संपूर्णतः नव्याने विचार करायला शिकवणे हे कुरुंदकरांचे वैशिष्ट्य होते. क्लिष्ट विषयांवर धक्कादायक भाष्ये करताना कुरुंदकरांची भाषा मार्मिक, प्रवाही तरी विचारप्रवर्तक अशी होती.
बाबा आमटे यांनी मा.कुरुंदकरांवर लिहिलेल्या ओळी वास्तवाच्या जाणीवांना वाचा यावी; तस बोलायचास प्रज्ञेच्या दाहक हुंकारासारखा. काळोख उजळत येणाऱ्या किरणांसारखा यायचा तुझा शब्द; नीतीच्या वाटा प्रकाशत,आयुष्याचे अर्थ दाखवत. त्यातून दिसायचे नवे प्रश्न नव्या दिशा; कुणाला गवसायचा प्रकाश कुणाला संधी, तर कुणाला सापडायचे ते स्वत:च.
कुरुंदकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड शहरात त्यांच्या नावाचे ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापन झाले आहे. या प्रतिष्ठानने २०१० साली, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या आणि काही विद्यार्थ्यांच्या मदतीने सोसायटीच्याच स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात नरहर या अभ्यास केंद्रातर्फे कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र सुरू केले आहे. या अभ्यास केंद्रातर्फे वेगवेगळ्याक्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांना त्यांच्या प्रकल्पासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मा. ऩरहर कुरुंदकर यांचे निधन १० फेब्रुवारी १९८२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
February 10, 2017
सरदार हे गांधीवाद आणि मार्क्सवाद या दोन्ही विचारसरणीचा संस्कार असणारे समाजवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. सर्व जातीतील त्यांचे मित्र होते. त्यांनी कधीच जात-पात मानली नाही. आपल्या अनेक मित्रांचे , वारल्यांचे आयुष्य मातीमोल झालेले त्यांनी पाहिलेले होते. त्याचा परिणाम त्यांच्यावर खूप झाला आणि समाजवादी प्रेरणा त्यांना तेथूनच झाली.
December 11, 2021
पंकज मलीक ह्यांनी सुरुवातीच्या बंगाली आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले. हे रवीन्द्र संगीतात विशारद होते. त्यांचा जन्म १० मे १९०५ रोजी झाला. रवीन्द्र संगीताला शान्तिनिकेतन मधून लोकांच्या पर्यत पोहचवण्याचे श्रेय पंकज मलिक यांनाच जाते. रवीन्द्र टागोर यांचे पंकज मलिक हे लाडके होते. रवीन्द्र टागोर यांची एक कविता दिनेर शेषे घुमेर देशे ला पंकज मलिक यांनी संगीत दिले होते. ते रवीन्द्र टागोर यांना आवडले व त्यांनी हे गाणे पंकज मलिक यांना पी सी बरुआ यांचा चित्रपट मुक्ति मध्ये वापरण्यास परवानगी दिली. पंकज मलिक यांनी प्रथम न्यू थिएटर्ससाठी मूकपट व बोलपटात संगीत सहाय्य केले. रवींद्र संगीताचा खुबीने केलेला वापर व वाद्यवृंदाचा घसघशीत वापर हा त्यांचा विशेष होता. ते दशक म्हणजे सर्वकाही पंकज मलिक असेच होते. हिंदी गीतांमध्ये "टांगा ऱ्हीदम‘ आणण्याचा पहिला यशस्वी प्रयोग मलिक यांनीच केला. त्यानंतर तोच धागा इतर संगीतकारांनी पकडला. त्यांच्या ‘डॉक्टर’ ह्या चित्रपटातील गाणी सुमधुर आहेत. तो चित्रपट तर स्वतः पंकज मलिक ह्यांनी आपल्या संयत सुरेख अभिनयाने सजवला होता. या सिनेमामध्ये पंकज मलिक यांनी संगीत दिलेले व गायले ‘चले पवन की चाल’ या गाण्यामध्ये घोड्यांच्या टापांचा अतिशय सुंदर उपयोग त्यांनी केला होता. व ‘आई बहार आज आई बहार’ किंवा ‘कबतक निरास की अंधियारी’ ही गीते कमालीची सुंदर आहेत. सैगल यांची 'सोजा राजकुमारी' किंवा 'मैं क्या जानू' ही अजरामर गाणी पंकज मलिक यांनी संगीतबद्ध केलेली होती. पंकज मलीक यांना भारत सरकारने पद्मश्री व दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव केला होता. पंकज मलिक हे कलकत्ता आकाशवाणीला पहिल्या पासून जोडलेले होते.
पंकज मलिक यांच्या वर एक चरित्रपट सई परांजपे बनवला होता त्या बद्दल बोलताना सई परांजपे म्हणतात, पंकज मलिक या श्रेष्ठ संगीत दिग्दर्शकावर एक चरित्रपट मी प्रस्ताव मांडला. त्या वर्षी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता, तेव्हा माझ्या प्रस्तावाला लगेचच मान्यता मिळाली. पण स्वत: पंकज मलिक या सिनेमासाठी मुळीच राजी नव्हते. किंबहुना, ते मुळात कुणाला भेटायलाच तयार नव्हते. त्यांना मनापासून हा सोपस्कार नको होता. भाव खाण्याचा त्यात लवलेश नव्हता. पण एकदा कशीबशी त्यांची भेट घेऊन, त्यांना रूपरेषा समजावून त्यांचे मन मी वळवू शकले. पुढचे सोपे होते. एकदा ‘हो’ म्हटल्यावर मग हवे ते सहकार्य आनंदाने द्यायला ते तयार झाले. त्यांचे घर केवळ शूटिंगसाठी नव्हे, तर ‘अड्डा’ म्हणून आमचे हक्काचे ठिकाण झाले. पंकजदा मला नेहमी ‘माय डियर सिस्टऽर’ अशी छान हाक मारीत. ते हाडाचे कलावंत होते. नट होते. झकासपैकी ‘शोमन’ होते. त्यामुळे त्यांच्या मुलाखती, त्यांचे किस्से बहारदार होत. मधे मधे ते गाणे गुणगुणत, एखादी नक्कल करीत, एखादा संवाद रंगवून सांगत. त्यांच्या गच्चीवर चित्रित केलेला एक प्रसंग : दादा कट्टय़ावर रेलून बसले होते. आठवणी सांगत होते. जवळच त्यांची पत्नी ऊन द्यायला कापडावर काही वाळवण पसरत होती. कॅमेरा चालू होता. बोलता बोलता दादा ‘दो नैना मतवाले’ हे त्यांचे प्रसिद्ध गाणे गाऊ लागले. आपल्या पत्नीकडे पाहत.. अगदी ‘आशिकाना अंदाजसे’! साठेक वर्षीय दीदींनी मग लटक्या रागाने असा काही मुरका मारला की बस्स! नॅशनल फिल्म अर्काइव्हज्कडून आम्ही पंकजदांच्या काही गाण्यांचे दुर्मीळ भाग मिळवले.
‘चलो पवनकी चाल’ इ. जुन्या गीतांचे चित्रण पाहणे-ऐकणे हा थरारक अनुभव होता. रायचंद बोराल हे प्रख्यात संगीत दिग्दर्शक न्यू थिएटरच्या संगीत विभागाचे प्रमुख होते. त्यांना बॉलीवूडच्या संगीताचे जनक मानतात. त्यांचा आणि दादांचा फार पूर्वीपासूनचा सहप्रवास. दोघांनी उभरत्या बंगाली सिनेसृष्टीत मोलाची कामगिरी केली होती. इतिहास घडवला होता. तेव्हा त्यांचे अनुभवाचे बोल पंकजदांच्या चरित्रपटासाठी अत्यावश्यक होते. पण अनेक वर्षांपासून दोघांमध्ये बेबनाव झाला होता. बातचीत बंद होती. तेव्हा या सिनेमात बोरालांच्या सहभागाविषयी ‘दुहेरी’ विरोध होता. मोठय़ा प्रयासाने दोघांची मने वळवून अखेर या धुरंधर संगीतकाराची सुंदर मुलाखत डबाबंद केली. हेमंतकुमारांच्या बाबतीतही तोच प्रकार. दोघांचा वर्षांनुवर्षे अबोला आणि म्हणून विरोध. पण एव्हाना मी समजूत घालण्यात तरबेज झाले होते. तेव्हा हाही तिढा मी सोडवला. मग हेमंतकुमार पंकज मलिक यांच्या योगदानाबद्दल अप्रतिम बोलले. एवढेच नाही, तर दादांनी बसवलेले एक गीतही गायले.पंकज मलिक नंतर जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते फाळके पुरस्कार घ्यायला पुढे झाले तेव्हा पाश्र्वसंगीत म्हणून मी त्यांचेच ‘आई बहार आई, आई बहार’ हे सदाबहार गाणे साऊंड ट्रॅकवर लावले. हा सिनेमा खरोखरच चांगला झाला होता. त्याला केवढे ऐतिहासिक आणि संग्राह्य़ मोल होते. अवघा काळ बोलका झाला होता. पण दुर्दैव! त्याचा दूरदर्शनवर आज मागमूसही उरलेला नाही. पंकज मलिक यांचे १९ फेब्रुवारी १९७८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
May 10, 2017
फिराक गोरखपूरी हे जात्याच अती बुद्धीमान होते. त्यांच्या घरी काही पंडितांचा राबता असल्याने ती बीजे त्यांच्या मनात पुर्वीपासूनच पेरली गेलेली होती. आपल्या कॉलेज जीवनात त्यांनी वर्डस्वर्थ, टेनीसन, तुलसी, कबीर, मीरा यांच्या साहित्याचा प्रगाढ अभ्यास केला. स्वामी रामतीर्थ यांचे वेदान्तावरील, विवेकानंदांची अनेक भाषणे यांचा अभ्यास केला.
April 27, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti