जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
प्रदीप भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी आहे. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, रवी पटवर्धन हे त्यांचे सहकलाकार. नाटकातून काम केलेले असल्याने ‘स्टेज फीअर’ म्हणून जे काही असते त्याची भीती, दडपण त्यांच्यावर नव्हते.
November 9, 2021
‘हम अंग्रेजोंके जमाने के जेलर है’ या शोलेतल्या संवादाने व आपल्या अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांना रिझवणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी अनेक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी झाला. ‘फॅमिली ४२०’ या मराठी चित्रपटात सुद्धा असरानी यांनी काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 1, 2018
अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत कानडी व मराठी भाषेचा अभ्यास त्यांनी घरीच केला. त्यांचा जन्म ३१ मार्च १८४३ रोजी धारवाड जिल्ह्यात गुर्लहोसूर या गावी झाला. नंतर कोल्हापूर व धारवाड येथे शिक्षणासाठी राहून मुलकी परीक्षेपर्यंत ते शिकले. त्यापूढील शिक्षणासाठी पुण्यास असताना त्यांना नाटकांचा नाद लागला व ते नाटक मंडळ्यांस पदे रचून देऊ लागले. स्वतःची नाटक मंडळी काढून त्यांनी काही नाटकेही केली. तथापि ही नाटक मंडळी मोडली आणि ते गुर्लहासून येथे येऊन राहिले. त्यानंतर त्यांनी वकिलीची परीक्षा देण्यासा प्रयत्न केला; पण तो यशस्वी न झाल्यामुळे ते नोकरी करू लागले. शिक्षक, जमादार आणि महसूल आयुक्ताच्या कचेरीतील कर्मचारी अशा विविध प्रकारच्या नोकऱ्या त्यांनी केल्या. अण्णासाहेबांनी प्रारंभी अल्लाउद्दिनाची चितुडगडावरील स्वारी हे नाटक लिहावयास घेतले होते; ते अपुरेच राहिले. शिक्षक असताना शांकरदिग्जय हे गद्य नाटक त्यांनी लिहिले (१८७३).
पुणे येथे १८८० साली एका पारशी नाटक मंडळीचे ऑपेराच्या धर्तीवरील एक नाटक त्यांच्या पाहण्यात आले. तसे नाटक मराठीत करून दाखविण्याची इच्छा त्यांस होऊन त्यांनी कालिदासाच्या अमिज्ञानशाकुंतर या नाटकाचे भाषांतर केले. त्यामध्ये स्वतःची पदेही घातली आणि उत्तम नटसंच मिळवून ते रंगभूमीवर आणले (१८८०). या नाटकास लाभलेले अपूर्व यश आणि लोकप्रियता पाहून १८८० मध्ये `किर्लोस्कर नाटक मंडळी' ची त्यांनी स्थापना केली. त्यानंतर सुभद्राहरणावरील संगीत सौभद्र हे नाटक स्वतंत्रपणे त्यांनी लिहिले (१८८२). प्रणयभावनेचे मनोहर चित्रण त्यांनी ह्या नाटकात केले आहे. त्यांच्या सर्व नाटकांत हेच नाटक अधिक लोकप्रिय आहे. सुसंघटिक कथानक, अकृत्रिम संवाद, विलोभनीय व्यक्तिरेखा, प्रासादिक पदे आणि नाट्योपरोधावर आधारलेल्या विनोदाचा अखंडपणे वाहणारा अंतःप्रवाह या वैशिष्ट्यांमुळे या नाटकाचे आकर्षण मराठी प्रेक्षकांच्या मनात आजही टिकून आहे. अण्णासाहेब स्वतः चांगले नट व दिग्दर्शक होते. महाराष्ट्रात संगीत नाटकांचे नवे युग त्यांनी निर्माण केले. इतकेच नव्हे, तर उत्तम संगीत नाटके कशी असावीत, याचा आदर्श घालून दिला.
अण्णासाहेब, किर्लोस्करअण्णासाहेब, किर्लोस्करजुन्या विष्णुदासी नाटकांतील सूत्रधार, विदूषक, गणपती व सरस्वती यांच्या अनुक्रमाने होणाऱ्या प्रवेशाची परंपरा सोडून देऊन संस्कृत नाटकातील सूत्रधार, परिपार्श्वक व नटी यांच्या संवादांनी नाटकांची प्रस्तावना करण्याची त्यांनी प्रथा पाडली. नाटक मंडळ्या व नट यांच्याविषयी समाजात असलेली अनुदारपणाची भावना त्यांनी रसिकांना उदात्त करमणुकीचे नवे माध्यम उपलब्ध करून दिले. परिणामी समाजातील उच्च वर्गात मोडणारे लोकही त्यांच्या नाटक मंडळीशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवू लागले. मोडणारे लोकही त्यांच्या नाटक मंडळीशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवू लागले. अण्णासाहेबांनी काव्यरचनाही बरीच केली आहे. पौराणिक नाटक मंडळ्या व कीर्तनकार यांना त्यांनी आख्याने रचून दिली. त्यांना कानडी, उत्तर हिंदुस्थानी आणि मराठी (लावणी इ.) गाण्यांच्या अनेक चाली अवगत होत्या व ते शीघ्रपणे कवने रचू शकत असत. त्यांनी `दक्षिणा प्राइझ कमिटी'ने बक्षीस लावल्यावरून स्पर्धेसाठी शिवाजी महाराजांवर पाचशे आर्यांचे एक दीर्घकाव्य रचिले होते.
परवाच ३१ ऑक्टोबर ला 'संगीत शाकुंतल' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला १३६ वर्षे झाली. ज्याला अस्सल मराठी संगीत नाटक म्हणून संबोधिता येईल आणि त्या मराठी `शाकुंतला'चा पहिला प्रयोग म्हणजे (नंतरच्या काळात लोकप्रिय झालेल्या) संगीत नाटकाची गंगोत्री होय. या प्रयोगात जवळपास शंभर पदे होती. आणि या पदांची रचना ओवी, लावणी, साकी, दिंडी इ. रूढ छंदांना अनुसरणारी होती. 'संगीत शाकुंतल' नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. 'पंचतुंड नररुंडमालधर' ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणार्याझस तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत असा अचानकपणे बदलून गेला. मा.अण्णासाहेब किर्लोस्करांनी एकूण पाच नाटके लिहीली.
अल्लाउद्दिनाची चितुरगडावरील स्वारी एकांकीका, अपूर्ण फार्स , शांकर दिग्जय गद्य नाटक, संगीत शांकुतल कालिदासकृत 'अभिज्ञान शांकुंतलम' चे भाषांतर , संगीत सौभद्र सात अंकी संगीत नाटक
संगीत रामराज्यवियोग तीन अंकी - अपूर्ण संगीत नाटक. महाराष्ट्रात १९४३ मध्ये साजरी झालेली त्यांची जन्मशताब्दी व त्यांच्या निधनानंतर `किर्लोस्कर नाटक मंडळी'ने पुणे येथे बांधलेले `किर्लोस्कर नाटकगृह' या दोन घटना त्यांच्या सहकाऱ्यांचे व मराठी रसिकांचे त्यांच्यावर केवढे प्रेम होते याची साक्ष देतात. त्यांच्या सर्व लेखनाचा संग्रह समग्र किर्लोस्कर या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे निधन २ नोव्हेंबर १८८५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ मराठी विश्वकोश
November 11, 2017
ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे.
June 17, 2022
वर्षा उसगांवकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटांतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या वर्षाने केवळ त्यासाठी गोवा सोडून मुंबईत बस्तान बसवले.
तिची दखल मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीने घेतली ती आचार्य अत्रे लिखित 'ब्रम्हचारी' या नाटकातील बोल्ड नायिकेमुळे.
नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांमध्येही तिने काम केले आहे.
वर्षा उसगावकरचे काही चित्रपट :
तुझ्यावाचून करमेना
गंमत जंमत
खट्याळ सासू नाठाळ सून
सगळीकडे बोंबाबोंब
मज्जाच मज्जा
रेशीमगाठी
आत्मविश्वास
हमाल दे धमाल
कुठं कुठं शोधू मी तुला
नवरा बायको
अफलातून
भुताचा भाऊ
पसंत आहे मुलगी
आमच्या सारखे आम्हीच
मालमसाला
उपकार दुधाचे शेजारी शेजारी
पटली रे पटली
घनचक्कर
बाप रे बाप
डोक्याला ताप नाही
मुंबई ते मॉरिशस
ऐकावं ते नवलच
एक होता विदूषक
शुभमंगल सावधान
विकिपिडियावरील माहितीचे पान (इंग्रजी)
## Varsha Usgaonkar
April 14, 2010
२००० साली प्रदर्शित झालेल्या रिफ्यूजी या सिनेमातून करिना कपूरने आपल्या सिने करिअरची सुरुवात केली. करिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅमिली असलेल्या कपूर परिवाराशी संबंधित आहे. कपूर परिवाराचे भारतीय सिनेमाशी ८५ वर्षापासूनचे जुने नाते आहे.
September 21, 2017
साने गुरुजींनी लिहिलेल्या “श्यामची आई”वर प्र.के. अत्र्यांनी श्यामची आई चित्रपट बनवला. त्यात श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारली. हा चित्रपट आणि त्यातील त्यांनी रंगवलेली आईची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना १९५३ सालचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार लाभला.
July 23, 2017
अपनालय. मुंबई शहरातील गलिच्छ वस्त्यांमध्ये, झोपडपट्टय़ांमध्ये सुमारे ४० वर्षांपासून काम करीत असलेली सेवाभावी संस्था. उद्दिष्ट अगदी साधं. कुपोषण दूर करणं. डॉ. अभय बंग समितीचा अहवाल येईपर्यंत मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये कुपोषणाची समस्या असू शकते, यावर कुणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं. पण बंग समितीनं हा आकडा ५६ हजारांच्या घरात जाऊ शकतो असं मत अधिकृतपणानं नोंदवलं आणि सरकार खाडकन जागं झालं.
सुदूर ग्रामीण भागामध्ये जशी प्राथमिक आरोग्य केंद्रं असतात, तशी आरोग्य केंद्रं महानगरांमधल्या उपेक्षित वस्त्यांमध्ये नाहीत याविषयीची चिंता बंग समितीनं त्या अहवालात व्यक्त केली होती. मुंबईत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, महापालिकांचे दवाखाने आहेत, मॅटर्निटी होम्स आहेत, लसीकरण केंद्रं आहेत पण तळागाळातील गोरगरीबांना परवडतील अशी प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्र नाहीत, ही गोष्ट महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याला शोभणारी नाही, यावर बंग समितीनं तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. २००५ साली एका झोपडपट्टीत कुपोषणानं झालेल्या मृत्युची दखल प्रसिद्धी माध्यमांनी गंभीरतेनं घेतल्यानंतर शासनानं मुंबईमध्ये ११०० आंगणवाडय़ा स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. पण या आंगणवाडय़ांना सरकार ना जागा देऊ शकलं होतं, ना शिक्षक. अशीच स्थिती प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांची असल्याबद्दल बंग समितीनं नाराजी व्यक्त केलेली होतीच. सरकारी नियुक्ती स्वीकारायला एकही डॉक्टर तयार होत नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना शासनानं यावर ठोस उपाययोजना करायला हवी असं मत समितीनं मांडलं होतं. बंग समितीनं कुपोषणाच्या गंभीरतेकडे लक्ष वेधण्या आधीपासूनच खरं तर अपनालयानं या विषयात काम सुरू केलं होतं. १९७२ साली अपनालयाची स्थापना झाली. आज मुंबई महानगरातील दहा प्रमुख झोपडपट्टय़ांमध्ये अपनालयाची केंद्रं आहेत. त्यांचं काम चालतं ते प्रामुख्यानं कचरा गोळा करणाऱ्यांच्या वस्त्यांमध्ये. दिवसभर कचरा गोळा करायचा, संध्याकाळी तो आणून कचरा गोळा आणि खरेदी करणाऱ्या भंगारवाल्यांकडे जमा करायचा, आणि हातावर पडतील तेवढे पैसे घेऊन पोटाची खळगी भरायची, हेच या कामगारांचं जीवन. पैसे मिळाले तर मिळाले, नाहीतर एखादा दिवस पाणी पिऊनच उपाशीपोटी काढायचा ही स्थिती. पण हे पाणी पिऊन पोटाची खळगी भरणं कोवळ्या मुलांना कसं चालायचं. त्यांचं पोट जाळण्यासाठी मग त्यांना अंगावर पाजायचं एवढंच त्यांच्या हातात उरणारं. आईच जिथे उपाशी, कुपोषित तिथे त्या मुलांचं पोषण व्हायचं कसं. गेल्या सहा महिन्यात मुंबई शहरातल्याच एका उपेक्षित वस्तीत १७ बालकांचे मृत्यु झाल्याची दुर्घटना घडली ती याच परिस्थितीतून. नॅशनल इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत अपनालयाचे ज्ञानेश्वर तरवडे आणि त्यांची ऐंशी सहकाऱ्यांची टीम या मुलांच्या देखभालीची, त्यांना स्वच्छ पाणी, सकस आहार मिळेल याची, कचरावेचक महिलांचे बचतगट चालवून त्यांना पुरेसा रोजगार मिळेल याची काळजी घेतच आहेत. पण त्याचबरोबर हजार-बाराशे कुटुंबांचं नियमित आरोग्य सर्वेक्षण, एडसग्रस्तांची देखभाल, क्षयरूग्णांसाठी औषधोपचार आदींचा अंतर्भाव त्यात आहेच. जो मुंबईत पैसा कमावतो त्याचेसाठीच सोयीसुविधा ही स्थिती योग्य नाही, जीवनदायी सुविधा सर्वाना सारख्याच हव्यात, हेच तर अपनालयाचं ध्येय आहे.
---------------------------------
From Aniket
ज्ञानेश्वर तरवडे हे मुंबईमधील झोपडपट्टयांमध्ये अत्यंत हालाखीच्या परिस्थितींमध्ये गुजराण करणार्या हजारो कचरावेचक मजूरांच्या कल्याणाकरिता अपनालय नावाची सेवाभावी संस्था चालवित आहेत. १९७२ मध्ये अपनालयाची सुरूवात अगदी मोजक्या प्रमाणात व घरगुती स्वरूपात झालेली होती. आज तरवडे व त्यांच्या ८० सहकार्यांच्या निरपेक्ष व सेवाभावी मेहेनतीमुळे अपनालयाचा वृक्ष भलताच बहरला आहे व मुंबईतल्या दहा प्रमुख झोपडपट्टयांमध्ये तो असंख्य निराधार कुटुबांना मायेची सावली देत आहे. मुंबईतल्या झोपडपट्टीवासीयांच्या सानिध्यात राहून त्यांचा संघटित आवाज सरकारपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या वस्त्यांचे आरोग्य सर्वेक्षण करून रोग्यांना योग्य ते औषधोपचार पुरविणे, लहान मुलांना सकस आहार, आरोग्यदायी वातावरण, निर्मळ पाणी व पोषणद्रव्यांचा पुरवठा करणे व त्यासाठी वेगवेगळ्या सरकारी योजनांचा अधिकतम लाभ घेणे असे त्रिवेणी लक्ष्य डोळ्यांशी ठेवून तरवडेंची ही संस्था गरिबांच्या विकासकार्यांमध्ये अव्वल बनली आहे. याशिवाय क्षयरोग, व एड्स अशा महाभयंकर रोगांनी पिडीत रूग्णांना मानसिक, वैद्यकिय, व आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी उपक्रमदेखील सध्या यशस्वीपणे सुरू करण्यात आलेला आहे. या सर्व उपक्रमांची मांडणी, अंमलबजावणी, व त्याकरिता लागणारे भांडवल उभी करण्याची कसरत, व ही कसरत प्रभावीपणे वठविण्यासाठी आवश्यक असलेली कला त्यांना चांगलीच अवगत झालेली आहे.
August 5, 2017
कॅनडातील मॅकगील विद्यापीठातून गणितात पीएचडी आणि त्यानंतर कॅनडातल्याच कॅलगरी विद्यापीठात गणिताचे अध्यापन करताना प्रा. जगन्नाथ वाणी यांनी आपले समाजसेवेचे सूत्र कधी सोडले नाही. कॅनडातून भारतातील उपक्रमांना भरघोस अर्थसाह्य मिळवून दिले व स्वत: ही संगीत, चित्रपटनिर्मिती अशा अनेक प्रांतात वेगळा ठसाही उमटविला. विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याचा गौरव कॅनडा सरकारने सर्वोच्च सन्मान देऊन केला.
सूत्र जनसेवेचे
July 14, 2017
खासदार कपिल पाटील यांचा विकासात्मक दृष्टिकोन ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे. कपिल पाटील यांच्या व्हिजनमुळे ठाणे जिल्ह्यात अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. १२ पदरी ठाणे-भिवंडी बायपास, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, एमएमआरडीएने ग्रामीण भागासाठी दिलेला निधी, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो आदी कार्य ही कपिल पाटील यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष आहे.
March 16, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti