जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
काळू-बाळू
किस्सा तसा फारच जुना! शिवा-संभा कौलापूरकर यांचा तमाशा त्यावेळी फारच लोकप्रिय होता. कोल्हापूरमध्ये त्यांच्या तमाशाचा खेळ रंगला असताना राजर्षी शाहू महाराज तमाशा पाहायला आले. महाराज आल्याबरोबर कनातीमधले सगळे प्रेक्षक, तमाशातील कलाकार त्यांना वाकून नमस्कार करायला लागले. संभा त्यावेळी राजा विक्रमादित्याची भूमिका साकारत होता. त्याने मात्र शाहू महाराजांना नमस्कार केला नाही. लोकांना खूपच आश्चर्य वाटले आणि रागही आला. वग संपल्यानंतर शाहू महाराज कलाकारांना भेटायला गेले आणि संभाने लगेच त्यांना वाकून नमस्कार केला आणि दिलगिरी व्यक्त केली. संभा म्हणाला, महाराज माफ करा.
तुम्ही आल्याबरोबर नमस्कार केला नाही, कारण मी त्यावेळी राजाची भूमिका करत होतो आणि तुम्हाला नमस्कार केला असता तर राजाचा अपमान झाला असता. संभाचे हे उत्तर ऐकताच शाहू महाराज प्रचंड खुश झाले आणि त्यांनी संभाला शाबासकी दिली. आपल्या भूमिकेशी, तत्त्वांशी इतके प्रामाणिक असलेले कलाकार म्हणजे शिवा-संभा कौलापूरकर आणि त्यांचा तमाशाचा वारसा तितक्याच समर्थपणे पुढे नेणारे काळू-बाळू ही त्यांची पुढची पिढी. याच काळू-बाळू कौलापूरकर यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने बुधवारी पुरस्कार जाहीर होणे, हा एक चांगला योगायोग आहे. आयुष्यात बऱ्याच खस्ता खाऊनही उभ्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणारी सोंगाडय़ाची जोडी म्हणजे काळू-बाळू. खरे नाव लहू आणि अंकुश खाडे. हे दोघे जुळे भाऊ. शिवा-संभा कौलापूरकरपैकी संभाची ही दोन मुले. आज २०० वर्षांची तमाशाची परंपरा या कौलापूरकरच्या घराण्याने जोपासली आहे. सातू हिरू हा या घराण्याचा मूळ पुरुष. त्यांचा तमाशा पुढे शिवा-संभा यांनी चालवला आणि पुढे काळू-बाळूने सबंध महाराष्ट्रात नाव कमावले. बालगंधर्व एकदा शिवा-संभायांचा तमाशा पाहायला गेले होते आणि त्यावेळी त्यांनी शिवा-संभा यांना तमाशात हार्मोनियम वापरण्याची सूचना केली. तेव्हापासून तमाशात हार्मोनियमची पद्धत सुरू झाली. सांगली जिल्ह्यातील कौलापूर गावात महार जातीत १६ मे १९३३ रोजी काळू-बाळूंचा जन्म झाला. दोघेही दिसायला इतके सारखे की त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, त्यांचा रंग, केसांची रचना, दंतपंक्ती, चष्म्याची फ्रेम, उंची सगळेच सारखे. त्यामुळे अनेकांची तर पंचाईत व्हायचीच परंतु त्यांच्या बायकांची पंचाईत तर जास्तच व्हायची. तमाशात याच गोष्टीचा फायदा उचलत काळू-बाळू यांनी धमाल उडवून दिली होती. त्यांची अनेक वगनाटय़े गाजली. त्यात प्रामुख्याने जहरी प्याला, राजा हरिश्चंद्र, रक्ता रंगली दिवाळी, इंडियन पिनल कोड कलम ३०२, शेराला भेटला सव्वाशेर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. वयाच्या पाचव्या वर्षीच वडिलांचे छत्र हरपले. शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालेले. तमाशा डबघाईला आलेला. अशा भीषण परिस्थितीत गरिबीचा सामना करत काळू-बाळू वाढत गेले. मात्र काही झाले तरी घराण्याने नावारूपाला आणलेला तमाशा बंद होऊ द्यायचा नाही, असा निर्धार त्यांनी लहानपणापासूनच केला होता. वयाच्या पंधराव्या वर्षी चुलतीच्या मदतीने त्यांनी पुन्हा एकदा तमाशाचा फड उभा केला आणि अल्पावधीतच त्यांनी महाराष्ट्राला वेड लावले. काळू-बाळूंना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मात्र त्यात १९९८ सालचा महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक पुरस्कार आणि २००१ सालचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार अधिक महत्त्वाचा आहे. दादा कोंडके हे काळू-बाळू यांचे मोठे ‘फॅन’ होते. मुंबईला काळूृ-बाळूंचा प्रयोग असला की दादा कोंडके दररोज तिकीट काढून त्यांच्या प्रयोगाला जाऊन बसायचे. इतका मोठा कलाकार दररोज येतो हे पाहून काळू-बाळू खूपच ओशाळायचे. मात्र तुमच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळत आहे, असे दादा कोंडके सांगायचे, तेव्हा काळू-बाळूंना स्फुरण चढायचे. दिसण्यात कमालीचे साधम्र्य हेच काळू-बाळू यांच्या अभिनयाचे खास वैशिष्टय़ होते. जहरी प्याला या वगात दोघेही शिपाईची भूमिका करायचे आणि त्यात त्यांची नावे काळू-बाळू अशी होती. तेव्हापासूनच लऊ-अंकुश खाडे या नावाऐवजी ते काळू-बाळू कौलापूरकर या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या विनोदाची एक स्वतंत्र अशी बैठक आहे. वगनाटय़ात जोडगोळीचा एकसूत्रीपणा दिसत असल्यामुळे लोकांना आनंद मिळायचा. आजघडीला जवळपास सगळे तमाशा फड मालक कर्जबाजारी असताना काळू-बाळू यांच्या तमाशाचा फड कधीही कर्जाच्या विळख्यात सापडला नाही हे विशेष. याचे कारण म्हणजे इतर तमाशा फडांप्रमाणे त्यांनी कधीही बडेजाव केला नाही. मोजकेच परंतु महत्त्वाचे साहित्य घेऊन त्यांनी तमाशाचा फड सुरू केला आणि त्याचे नियोजन इतके व्यवस्थित केले की त्यांची आर्थिक घडी कधीच विस्कटली नाही. अशा या काळू-बाळूंना राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार जाहीर होणे हे त्यांच्या करवीर नगरीसाठी खरोखरच भूषणावह आहे.
August 5, 2017
देशभक्त,अध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रलेखन व काव्यलेखन यांसाठी त्यांची ओळख होती. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने मॄणालिनी जोशी यांनी लिखाणाला सुरवात केली. कुसुमाग्रज स्वतःच्या वाढदिवसाला दरवर्षी एक नवी कविता लिहून मॄणालिनीताईंना पाठवत असत.तसेच पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या त्या अनुग्रहित शिष्या होत्या.
February 13, 2024
मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म ४ जुन १९४७ रोजी मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले.त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’मधील इरसाल पोलीस, ‘राम राम गंगाराम’मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले. आपली पत्नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून ‘टन टना टन’ (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘दामाद’ या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले.
‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘जोडी नं.१’ हे अशोक सराफ अभिनीत काही हिंदी उल्लेखनीय चित्रपट केलेले आहे. अशोक सराफ यांची खरी ओळख एक विनोदी अभिनेता म्हणून असली तरी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या इतका हरहुन्नारी भूमिका साकारणारा कलाकार दुर्मिळच आहे. क्रूरकर्मा खलनायक ते उत्तम बंडू तुपे यांच्या भस्मवर आधारित चित्रपटातील भस्म्याच्या भूमिकेबरोबरच त्यांच्या विनोदी भूमिकाही प्रचंड लोकप्रिय झालेल्या आहेत. अशोक सराफ-दादा कोंडके, अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ-सचिन, अशोक सराफ-महेश कोठारे या जोड्या मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेल्या आहेत. अशोक सराफ यांच्या नावावर प्रेक्षक आजही चित्रपट पाहायला जातात कारण प्रेक्षकांना पूर्णपणे ठाऊक असते की त्यांचा चित्रपट पैसे वसूल करून देणारा असतो. अशोक सराफ यांना “अशोकमामा’ या नावानेच अनेकजण ओळखतात, संबोधतात. मात्र, हे नाव कसे आणि कुणी दिले, हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. हे नाव आपल्याला कसे पडले, याचा उलगडा खुद्द अशोक सराफ यांनीच केला. अशोकमामाचे बारसे कसे झाले, याविषयीचा किस्सा सांगताना, अशोक सराफ म्हणतात, “काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाच्या कॅमेरामनबरोबर त्यांची मुलगी येत असे. सेटवर आली की ती विचारत असे, हे कोण? त्या कॅमेरामनने सांगितले, हे अशोक सराफ.. पण त्यांना तू अशोकमामा म्हणायचे. आणि झालं, तिने अशोकमामा म्हणायला सुरवात केली आणि त्यानंतर काही दिवसातच सेटवर जो कोणी येईल, ते सर्वजण मला अशोकमामा म्हणूनच हाक मारू लागले. अशोकमामाचे नामकरण अशा पद्धतीने झाल्याचा किस्सा खुद्द अशोक सराफ यांनीच सांगितला. आता एखाद्या सुंदर मुलीने मामा म्हणून हाक मारल्यावर तितकाच हिरमोडही होतो, अशी मिश्किाल टिप्पणी ते लगेच करुन टाकतात. मला थेट “अशोक’ अशी हाक मारणारे तसे कमीच. “अशोकजी’ असे कुणी म्हटले, तर ते माझी मलाच झेपत नाही. तर अशोक सर वगैरे माझ्या प्रकृतीतच बसत नाही. सेटवर किंवा इतरत्र गर्दीच्या ठिकाणी चाहत्यांमधून येणाऱ्या “अशोकमामा’, या हाकेतला गोडवाच आपल्याला अधिक भावतो. मा.अशोक सराफ यांना अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अशोक सराफ याची कारकीर्द
मराठी चित्रपट.
आई नं. वन , आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला , गंमत जंमत , भुताचा भाऊ , माझा पती करोडपती, एक उनाड दिवस ,अफलातून , गोंधळात गोंधळ, अशी ही बनवाबनवी, एक डाव भुताचा , सगळीकडे बोंबाबोंब , आयत्या घरात घरोबा , कुंकू ,बळीराजाचं राज्य येऊ दे , घनचक्कर , तू सुखकर्ता ,नवरा माझा नवसाचा , वजीर, अनपेक्षित, एकापेक्षा एक, चंगू मंगू , शुभमंगल सावधान, नवरा माझा ब्रम्हचारी ,आमच्या सारखे आम्हीच ,बाळाचे बाप ब्रम्हचारी, प्रेम करू या खुल्लम खुल्ला ,गोष्ट धमाल नाम्याची, पांडू हवालदार, राम राम गंगाराम,अरे संसार संसार , कळत नकळत, आपली माणसं, धूमधडाका ,एक डाव धोबीपछाड,आयडियाची कल्पना.
हिंदी चित्रपट.
कुछ तुम कहो कुछ हम कहें , बेटी नं. वन , कोयला , गुप्त, संगदिल सनम, जोरू का गुलाम, खूबसूरत, येस बॉस, करण अर्जुन ,सिंघम .
नाटके.
हमीदाबाईची कोठी,अनधिकृत, मनोमिलन, हे राम कार्डिओग्राम, डार्लिंग डार्लिंग, सारखं छातीत दुखतंय दूरदर्शन मालिका
टन टना टन (ई.टीव्ही मराठी) , हम पांच (झी वाहिनी), डोन्ट वरी, हो जाएगा (हिंदी), छोटी बडी बाते.
June 4, 2017
‘मूडस्’ हा त्यांचा कविता संग्रह १९७६ साली प्रसिद्ध झाला. ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘संदर्भ’ हे दोन कथासंग्रह त्यानंतर प्रकाशित झाले. ‘कवीची गोष्ट’ आणि ‘सावित्रीचा निर्णय’ हे दीर्घकथा संग्रह सुद्धा गाजले.
March 29, 2022
मराठीतील थोर वाचस्पती, अध्यापक तसंच संगीत विषयाचे जाणकार अशी ख्याती असलेले अरविंद मंगरूळकर हे “कालिदासाचे मेघदूत”, “नीतिशतक” , “मराठी घटना रचना आणि परंपरा” अशा अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे संपादक देखील होते. “सातवाहन राज्याच्या शेफालिका” चा गद्यानुवादाचे श्रेय अरविंद मंगरूळकराना जाते.
सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सवातील संगीतकारांची पर्वणी हा विषय त्यांच्या जिव्हाळ्याचा व अभ्यासाचा होता. नेमक्या व चपखल भाषातील वृत्तपत्रांतलं त्यांचं विवेचन आणि समालोचन खुपच गाजलं .
मराठी विश्वकोशात संस्कृत व संगीत या विषयांना मध्यवर्ती ठेवून अरविंद मंगरूळकरांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
स्व.मोगूबाई कुर्डीकरांचा जन्म १४ जुलै १९०४ रोजी गोव्यातील कुर्डी गावात झाला. लहानपणापासूनच घरातील संस्कार व आई जयश्रीबाई यांची शास्त्रीय गाण्याची तळमळ मोगूबाईंना गानतपस्विनी होऊनच शांत झाली असेल.
August 8, 2011
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी गावदेवी, मुंबई येथे झाला. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान. त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय. कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन. या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला. चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव मा.पु. ल. देशपांडे यांच्यावर होता. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ म्हणत असत. मा.'पु लं'चे शालेय शिक्षण पार्लेच्या टिळक विद्यालयात झाले. व पुढील शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात आणि विलिंग्डन महाविद्यालयात झाले. भास्कर संगीतालय येथील दत्तोपंत राजोपाध्याय यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमचे (पेटी) धडे घेतले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पु. लं ची लेखनयात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्यवाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला. असे हे पु.ल. रसिकांच्या मनात घर करून राहिले.
पु. ल. नी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे पु. लं. नी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पु. लं. च्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं भारतीयीकरण, मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पु. लं. नी केलं. १९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पु. लं. चं पहिलं दर्शन झालं. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपटक्षेत्रात पु. लं. वावरले. त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट ‘सबकुछ पु.ल.’ म्हणूनच गाजला. ही त्यांची कारकीर्द १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ इथवर बहरली. त्यातले त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले. सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पु. लं. कडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं. बटाट्याची चाळ, वार्यायवरची वरात, असा मी असा मी या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पु. लं. चं सादरीकरण थक्क करतं. राजकारण हा पु. लं. चा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षासाठी पु. लं. नी अनेक भाषणं केली. राजकारणात त्या काळापुरता पु. लं. मधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला. १९४७ ते १९५४ या काळात ते चित्रपटात रमले. ’वंदे मातरम्‘, ’दूधभात‘ आणि ’गुळाच्या गणपती‘त ते त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने प्रसिद्धीस आले. म्हणजे चित्रपटाचे कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे असे.
१९४७ सालच्या मो.ग.रांगणेकरांच्या ’कुबेर‘ या चित्रपटाला संगीत देऊन पु.ल.देशपांडे संगीत दिग्दर्शक झाले. चित्रपटातील गाणी त्यांनी म्हटली होती. आता ते पार्श्वगायकही झाले होते. वंदे मातरम्मध्ये पुल व त्यांच्या पत्नीय सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पु.ल. गायक असलेले नायक होते. त्या भूमिकेमुळे पु.ल. चित्रपटअभिनेते झाले. पु.ल.देशपांडे यांचा ’देवबाप्पा’ चित्रपटसृष्टीत अविस्मरणीय ठरला. ’नाच रे मोरा’ हे अवीट गोडीचे गाणे अजूनही मुलांचे आवडते गाणे आहे. ’पुढचं पाऊल‘ या चित्रपटात त्यांनी ’कृष्णा महारा‘ची भूमिका केली, आणि ते अभिनयसंपन्नट नट म्हणून प्रसिद्धीस आले. पु. लं. च्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं असत. मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय होते. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. ते उत्तम संवादिनी वादक होते. सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणार्या मा.पु. ल. व सुनीताबाई यांनी बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. मा.पु. लं. ना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. पु. ल. देशपांडे यांचे १२ जून २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
June 12, 2017
गुलाम दस्तगीर बिराजदार हे प्रसिद्ध गझलकार बदीऊज्जमा बिराजदार यांचे वडील होत. पंडित गुलाम यांना राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती यांनी वाचस्पती या पदवीने सन्मानित केले होते. शहाजी हायस्कूल, सोलापूर व मुंबई येथे त्यांनी संस्कृत शिक्षक म्हणून सेवा केली. आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा राष्ट्रपती यांचे हस्ते पुरस्कार मिळाला होता. तसेच विविध संस्थांनी त्यांना महापंडित, पंडितेंद्र, संस्कृतरत्नम, परशुरामश्री, विद्यापारंगत, वाचस्पती अशा पदव्या बहाल केल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य, संस्कृत पाठ्य पुस्तक निर्माण बालभारतीचे ते अध्यक्ष होते.बिराजदार यांना १८ हून अधिक पुरस्कार मिळालेले होते.
April 22, 2022
मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.
August 1, 2021
“अनंततनय” नावाने काव्यलेखन करणारे दत्तात्रेय अनंत आपटे.
“श्री महाराष्ट्र शारदामंदिर” या कवींसाठी स्थापन झालेल्या संस्थेचे ते आधारस्तंभ होते. “हृदयतरंग (भाग १ ते ३), पद्यदल आणि “श्रीमत तिलक-विजय” हे लो. टिळकांचे ओवीबद्ध चरित्र आदी काव्यपुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
११ जून १९२९ रोजी त्यांचे निधन झाले.
# Dattatrey Narayan Apte
# आपटे दत्तात्रेय अनंत
October 26, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti