जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
केंडे यांनी “यदाकदाचित”, “जागो मोहन प्यारे”, इत्यादी नाटकं, “शुभं करोती”, “सपनोसे भरे नैना”, “हम है लाईफ” अशा मराठी व हिंदी मालिका तसेच “गोजिरी”, “ती रात्र”, “तुला शिकवीन चांगला धडा”, “शर्यत”, “हाय काय नाय काय” इत्यादी चित्रपटांसाठी ध्वनी रचना केली.
May 23, 2014
अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या होत्या. देवेन वर्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते. देवेन वर्मा यांनी १४९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चमत्कार, जुदाई, इश्क, चोर के घर चोर, अंगुर, खट्टा-मीठा, कोरा कागज, चोरी मेरा काम यातील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी १५० हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. ‘दोस्त असावा तर असा’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले होते. मा.देवेन वर्मा यांचे २ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 14, 2019
विशाल रामचंद्र हरियाण यांचा जन्म 3 मार्च 1989 मध्ये झाला. मुळचे ते मराठी नसले तरी मराठी मातीत वाढल्यामुळे, मराठी सवंगडयांबरोबर मिसळल्यामुळे, व मराठी संस्कृतीत रूजल्यामुळे त्यांची नाळ याच भाषेच्या गर्भात अगदी खोलवर गेलेली होती. शाळेत असल्यापासुनच मराठीच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी काहीतरी भरीव व लक्षणीय करण्याची त्यांच्या मनी प्रचंड हुरहुर होती.
August 29, 2011
लोकमान्य टिळकांनी १८९५ साली म्हणजे १२५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी मागील दहा वर्षांपासून पांडुरंगजींवर आहे.
June 21, 2022
१९८० नंतरचा जवळपास दोन दशके मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता. शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. १९७९ साली ‘अष्टविनायक’ या चित्रपटात गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रिम’मध्ये आले.
October 19, 2021
राजा परांजपे यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो मात्र नट वा सहायक दिग्दर्शक म्हणून नव्हे तर संगीत विभागात ‘ऑर्गन वादक’ म्हणून! राजाभाऊंना लहानपणपासून संगीताचं उपजतच वेड होतं. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९१० रोजी झाला. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला. विद्यार्थी दशेतच ‘भारत गायन समाजा’च्या कै. बापूराव केतकरांनी त्यांच्या संगीतवेडाला चांगलं वळण दिलं. नवनवी नाटके आणि सिनेमा बघण्याचे वेड त्यांना लागले. पण रोज रोज नाटक, सिनेमा पाहायचं म्हटलं तर पैशाची चणचण त्यांना भासू लागली. पण त्यासाठी त्यांच्या संगीतवेडातूनच त्यांना एक नवीन मार्ग सापडला. राजा परांजपे यांची अभिनयातील समज पाहून तिथेच त्यांना "लपंडाव' या नाटकात अचानक संधी मिळाली. या नाटकातील एक कलाकार अचानक नाटक सोडून गेला. दात्ये यांयांनी त्याच्या जागी राजा परांजपे ना संधी दिली, त्या संधीचे त्यांनी चीज केले. पुढे केशवराव दात्ये यांनीच त्यांना "सावकारी पाश' या चित्रपटातील भूमिका मिळवून दिली. त्यानंतर ते भालजी पेंढाकर यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. भालजींच्याच काही चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला. "सावकारी पाश'मधील भूमिकेनंतर ते छोटी मोठी कामे करत होते; पण खऱ्या अर्थाने ते दिग्दर्शक झाले ते १९४८ मध्ये "बलिदान'च्या माध्यमातून आणि यशाची बरसात झाली ती "जिवाचा सखा' या चित्रपटाने.
मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील सर्वांत यशस्वी त्रयी म्हणजे राजा परांजपे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर होय. ग. दि. माडगूळकर यांच्या पटकथेवर राजाभाऊ आपल्या दिग्दर्शन कौशल्याचा असा काही प्रभाव पाडत, की तो चित्रपट वेगळाच होऊन जाई. शब्दप्रभू माडगूळकरांयांनी राजा परांजपे ना परिसाची उपमा दिली होती. तुमच्या पटकथेवर इतरांना राजा परांजपे च्याइतके यश का नाही मिळवता आले, असे त्यांना एकदा विचारले असता गदिमा म्हणाले राजाभाऊ हे परिसासारखे आहेत, त्यामुळे त्यांच्यासारखी किमया इतरांना कशी जमेल? राजा परांजपे यांनी केवळ मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले असे नाही, तर त्यांयांनी दिग्दर्शित केलेल्या चार हिंदी चित्रपटांनाही चांगले यश मिळाले. त्यातील "दो कलियॉं' हा चित्रपट तर प्रचंड यशस्वी ठरला होता. आज आपण अनेक दिग्दर्शकांच्या वैविध्यपूर्ण शैलींबद्दल बोलत असतो; पण कोणताही गाजावाजा न करता राजाभाऊ वेगवेगळ्या प्रकृतीचे चित्रपट त्याकाळात दिग्दर्शित करत होते आणि यश मिळवत होते. "पुढचं पाऊल', "ऊन पाऊस', "देवघर' यासारखे कलात्मक चित्रपट राजा परांजपे यांनी यशस्वी करून दाखवले होते. राजा परांजपे यांनी दिग्दर्शन केले आणि ज्यामध्ये त्यांयांनी स्वतः काम केले अशा "हा माझा मार्ग एकला' या चित्रपटाची सगळीकडेच वाहवा झाली, त्याचबरोबर या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदकही मिळाले होते.
अर्थात, हा बहुमान त्यांना दोनदा मिळाला होता. "पाठलाग' या रहस्यप्रधान चित्रपटालाही राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानला जातो. त्याचबरोबर या चित्रपटाचे यश पाहून हिंदीमध्येही त्याचा रीमेक केला गेला. "मेरा साया' नावाने हा चित्रपट हिंदीत आला. नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजा परांजपे चा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता, तरी दिग्दर्शन हाच त्यांच्यासाठी सर्वांत यशाचा भाग ठरला. भूमिका कोणतीही असो, मग ती विनोदी असो की कौटुंबिक अथवा कारुण्यमयी, राजाभाऊ त्या भूमिकेला आपला रंग देत असत. हेच कौशल्य त्यांयांनी चित्रपट दिग्दर्शित करताना ठेवले, त्यामुळे एकाच वेळी भिन्न प्रकृतीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही त्यांयांनी त्यामध्ये लक्षणीय यश मिळवले. व्ही. शांताराम यांनी त्यांची तुलना करताना त्यांना सत्यजित रे यांच्यापेक्षा अधिक गुण दिले होते. कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना ते त्या चित्रपटाचेच होऊन जात असत, त्या वेळी दुसरा विचारच त्यांना सुचत नसे.
२७ चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या या माणसाचे पाय शेवटपर्यंत जमिनीवर होते. शरद तळवलकर, सीमा आणि रमेश देव, राजा गोसावी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर व सचिन पिळगावकर या सारख्या अनेकांना चित्रपटसृष्टीत उभे केलेल्या या दिग्दर्शकाने आपल्या काळात अक्षरशः राजासारखे राज्य केले. स्कूल अर्थातच राजा परांजपे यांचं. या मंडळींच्या कारकिर्दीला सर्वाधिक आकार दिला तो राजा परांजपे या कसबी दिग्दर्शकाने. मा. राजा परांजपे यांचे ९ फेब्रुवारी १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 25, 2017
शंकर जयकिशन या संगीतकारातील जोडीतील जयकिशन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल. हा सुरांचा जादुगार! दुसरा शब्द नाही. जयकिशन लहानपणापासूनच ते हार्मोनियमवर गाणी वाजवत. सुप्रसिद्ध गुजराती दिग्दर्शक चंद्रवदन भट्ट यांच्याकडे संधीसाठी चकरा मारत असतानाच त्यांची गाठ मा.शंकर (शंकरसिंह रघुवंशी) या आणखी एका होतकरू संगीतकाराशी पडली. मा.शंकरही संधीच्या शोधात फिरत होते. जयकिशन त्या काळी पृथ्वी थिएटरसाठीसुद्धा काम करत. त्यामुळे पृथ्वीराज कपूर यांच्याशी ओळख झाली.
शंकर यांनी जयकिशन यांनाही पृथ्वी थिएटरमध्ये बोलावून हार्मोनिअम वाजवायचे काम मिळवून दिले. त्यांच्या सोबतच पृथ्वी थिएटरमध्ये एक गोरा देखणा तरूण आपल्या निळ्या डोळ्यांत नव्या चित्रपटाची स्वप्ने घेवून फिरत होता. त्याने आग नावाने पहिला चित्रपट काढला. त्या चित्रपटाला संगीत देणार्या ला राम गांगुली यांना सहाय्यक म्हणून शंकर काम करत होते. दुसर्यात चित्रपटाच्यावेळी त्या तरूणाच्या लक्षात आल्या की जुन्या लोकांशी आपले जमणार नाही. समवयस्क शंकरसोबत त्याच्या काळजाच्या तारा जुळल्या.शंकरने जयकिशनला सोबत घेण्याचा आग्रह धरला. त्याचे नाव राज कपुर. पृथ्वी थिएटर ची निर्मिती "बरसात" या चित्रपटासाठी राज कपूर हे संगीतकार म्हणून नवीन जोडीच्या शोधात होते त्यांनी शंकर आणि जयकिशन यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. आणि १९४८ साली प्रदर्शित झालेल्या "बरसात" ची गाणी सुपरहिट झाली आणि इथून पुढे शैलेंद्र, हसरत जयपुरी, लता मंगेशकर, मुकेश आणि शंकर - जयकिशन यांनी भारतीय संगीत क्षेत्रात एक इतिहास घडवला. हे दोघेही काही काळ त्याकाळचे प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल- भगतराम यांच्या हाताखाली सहायक म्हणून काम करत होते. शंकर - जयकिशन या जोडीने जवळजवळ १७० हून जास्त चित्रपटांना संगीतसाज चढवला. ज्यामध्ये विशेष संगीतामुळे गाजलेले बादल, सीमा, बसंत बहार, चोरी - चोरी, कठपुतली, यहुदी, अनाडी, छोटी बहन, दिल अपना और प्रीत पराई, जिस देश मे गंगा बहती है, जंगली, प्रोफेसर, दिल अपना और प्रीत पराई, हमराही, राजकुमार, आम्रपाली, सुरज, तिसरी कसम, मेरा नाम जोकर, असली नकली इत्यादी चित्रपटाचा समावेश होतो. त्यांना चोरी - चोरी , अनाडी, दिल अपना और प्रीत पराई, प्रोफेसर, सुरज, ब्रम्हचारी, मेरा नाम जोकर, पहचान, आणि बेईमान या चित्रपटासाठी एकूण नऊ वेळा सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून फिल्मफ़ेअर पुरस्कार मिळाला आहे. शंकर जयकिशनचे नाव काढले की पहिल्यांदा राज कपुरच डोळ्यांसमोर येतो व मुकेशचा आवाज आपल्या कानात घुमायला लागतो. 'शंकर-जयकिशन' यांनी गोपनीयता म्हणून कुठल्याही गीताची चाल वैयक्तिक कुणी बांधली ते कुणालाही सांगायचे नाही असा एक अलिखित नियम पाळला होता. मात्र संगम चित्रपटातील एक गीत "ये मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज न होना!" हे बिनाका गीतमाला या नभोवाणीवरील एका कार्यक्रमामध्ये खूप दिवस प्रथम क्रमांकावर वाजू लागले आणि जयकिशन यांनी हे गीत मी रचले असे सांगून तो नियम मोडला. मो. रफी आणि राज कपूर यांनी त्यांच्यातील मतभेद मिटवून त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण केला. गोरापान चेहरा, गोबरे गाल व कपाळावर रुळणाऱ्या रेशमी काळ्याभोर बटा - एखाद्या हिरोला लाभावे असे व्यक्तिमत्व. पण टेबलवरील हार्मोनियमवर बोटे फिरू लागली की, त्यातून स्वर्गीय गोडीचे सुर पाझरू लागत. संगीतकार जयकिशन यांचे हेच तर वैशिष्ट्य होते. 'शंकर-जयकिशन' या संगीतकार जोडीतील संगीतकार ... संगीत दोघांच्याही रक्तात वहात होते. पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की जयकिशन यांच्या अकाली जाण्यानंतरही १६ वर्षे एकट्या शंकर यांनी चित्रपटांना संगीत दिले पण नाव मात्र ‘शंकर जयकिशन’ असेच ठेवले होते. तसा त्या दोघांत करारच झाला होता असं म्हणतात. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगावी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
January 3, 2017
बोकील, शांताराम
संपादक केबिनबद्ध नसावा, त्याने दीनदलितांच्या, भूमिपुत्रांच्या, पीडितांच्या हितासाठी आणि धर्मनिरपेक्षतेचा आधार घेऊन भाषा-धर्म-जाती-प्रदेशवादाच्या नावाखाली राजकारणाला विरोध करण्यासाठी कृतिशील असले पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणारा कार्यकर्ता-पत्रकार, शांताराम बोकील यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव हे गोष्टीवेल्हाळ शांताराम बोकील यांचे जन्मगाव.
विद्यार्थीदशेपासून बोकील शेती आणि शेतीच्या प्रश्नाकडे ओढले गेले. त्यांच्यावर पं. नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते झाले. काँग्रेसी कार्यकर्ता होण्याचे समर्थनही करण्याचे धाडस बोकील यांनी पत्रकार झाल्यावर जाहीरपणे केले. या कार्यकर्ता होण्याने शेतीचे प्रश्न समजून घेताना त्यामागचे राजकीय भान बोकील यांना आले. सातारा जिल्ह्य़ातील म्हसवड या गावी सहा दशकांपूर्वी शेतकरी कुळाचा हक्क डावलला जाण्याविरुद्ध मोठे आंदोलन उभे झाले, त्यात क्रांतिसिंह नाना पाटील आणि माजी आमदार तुषार पवार यांच्यासोबत शांताराम बोकीलही आघाडीवर होते. या यशस्वी आंदोलनानंतर बोकील पत्रकारितेकडे वळले आणि तेथेच रमले. ‘पुढारी’ या दैनिकातून ग. गो. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची १९६० साली सुरू झालेली पत्रकारिता २००१ पर्यंत अखंड सुरू राहिली. या काळात शांताराम बोकील यांनी गोव्यात ‘नवप्रभा’, विदर्भात ‘नागपूर पत्रिका’, ‘लोकमत’ आणि ‘जनवाद’, औरंगाबाद आणि नांदेडच्या ‘लोकपत्र’ तसेच, कोल्हापूरच्या ‘पुढारी’ या दैनिकांचे कार्यकारी संपादकपद सांभाळत असताना महाराष्ट्रातील कृषी जगताचे साक्षेपी भाष्यकार-संपादक अशी ख्याती संपादन केली. उपसंपादक आणि सहाय्यक संपादक म्हणून नोकरी करताना आणि कार्यकारी संपादक म्हणून वृत्तपत्राचे नेतृत्व करताना शांताराम बोकील यांनी, पं. नेहरू तसेच यशवंतराव चव्हाण यांच्यावरील निष्ठा आणि शेतकऱ्यांशी असलेल्या बांधिलकीशी प्रतारणा केली नाही. या तीन मुद्यांवर मतभेदाचे प्रसंग उद्भवले तेव्हा नोकरी सोडण्याचा बाणेदारपणा बोकील यांनी दाखवला. संपादक म्हणून वैपुल्याने वावरताना राज्याच्या ज्या भागात गेले तेथील अभ्यास हे त्यांचे अविभाज्य अंग झाले. ते एक छान शिक्षकही होते. त्यांची शिकवण्याची पद्धत मात्र कठोर होती. सहकाऱ्यांच्या भाषाविषयक आणि अन्य चुका दाखवताना त्यांची जीभ दांडपट्टय़ाच्या वेगाने वार करत असे. मात्र त्यात व्यक्तिगत विखार नसे; बोकील क्षणार्धात समजदार शिक्षकाच्या भूमिकेत शिरत आणि भाषा, व्याकरण, शैली, एखाद्या प्रतिपाद्य विषयावरील त्यांच्याकडील माहितीचा खजिना रिता करत. पत्रकारिता समरसून शिकवण्याच्या त्यांच्या या तळमळीची आठवण त्यांच्यासोबत काम केलेले अनेक सहकारी आजही काढतात. पानाच्या टपरीपासून ते बडय़ा राजकीय धेंडांपर्यंत बोकीलांचा वावर ‘डॉमिनेटिंग’ शैलीत पण सहज असे. अशा बडय़ा धेंडाने बोलताना एखादा तपशील चुकीचा दिला तर त्याला फाडकन सुनावण्यास बोकील कचरत नसत. शेती आणि शेतकरी तसेच, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि मुस्लिमद्वेषाचे धोकादायक वळणावर पोहोचलेले राजकारण हे बोकील यांच्या लेखनाचे, वक्तृत्वाचे मुख्य विषय असत. या विषयांवर त्यांची शैली तडजोडवादी कधीच नव्हती. त्यामुळेच पत्रकार म्हणून त्यांना स्थैर्य प्राप्त झाले नाही आणि आर्थिकदृष्टय़ाही संपन्नता दिली नाही, याबद्दल काहीशी कटुता शांताराम बोकील यांना होती. पण त्यापेक्षा जास्त खंत महाराष्ट्राने त्यांचे प्रतिपादन नीट ऐकले नाही, याची होती आणि त्यापेक्षा किती तरी जास्त पट वैषम्य या देशाने नेहरूवादाची कास सोडल्याचे होते. बोकील सर्वधर्मसहिष्णू धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते होते. ही धर्मनिरपेक्षता म्हणजे जात निरपेक्षताही आहे आणि नेहरूवाद तसेच यशवंतरावांचे विचार हाच त्याचा आधार आहे, अशी त्यांची पक्की धारणा होती. जातीरहित धर्मनिरपेक्षतेचे स्वप्न साकार होण्याचे समाधान राजकारण्यांनी बोकील यांना लाभू दिले नाही ते नाहीच!
August 5, 2017
स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले “सहकार” मंत्री म्हणून बाळासाहेब भारदे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने गौरविले. ते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते.
November 23, 2021
किराणा घराण्याचे गायक पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर जन्म २ जानेवारी १९३७ रोजी श्रीवर्धन तालुक्यातील " दिवेआगर येथे झाला.
अच्युत अभ्यंकर यांनी आकाशवाणी येथे अनेक गाण्याचे कार्यक्रम केले. तसेच पं. अभ्यंकर यांनी देश–विदेशांत असंख्य मैफिली सादर केल्या. आपले गुरु पं. फिरोझ दस्तुर यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देऊन पं. अभ्यंकर यांनी ठाण्यातील अनेक संगीत संस्थात संगीत विद्यादानाचे अमूल्य काम केले. १९९२ ते १९९५ सालापर्यंत मुंबई विद्यापीठात हिंदुस्थानी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. पं अभ्यंकर यांना सुरमणी, गायनाचार्य, संगीत ऋषी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ठाणे महापालिकेतर्फे २००६ साली ‘ठाणे गौरव पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
पं अभ्यंकर यांच्या तालमीत ठाण्यातील अनेक नावाजलेले गायक आणि गायिका गायकीचे धडे घेतले. डॉ वरदा गोडबोले, लीला शेलार, विभावरी बांधवकर, मधुवंती दांडेकर, प्रणव पटवर्धन हे यापैकी काही. पं राम मराठे यांच्यासह अच्युत केशव अभ्यंकर यांनी संगीत मंदारमाला या नाटकाच्या काही प्रयोगांमध्ये विशेष भूमिका बजावली होती. पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर यांचे ९ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी सृष्टी/इंटरनेट
January 2, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti