जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ओमप्रकाश यांचा जन्म १९ डिसेंबर १९१९ रोजी झाला. ओमप्रकाश यांचे पूर्ण नाव 'ओम प्रकाश बक्शी' होते. शिक्षण लाहोर मध्ये. त्यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. १९३७ मध्ये मा.ओमप्रकाश 'ऑल इंडिया रेडियो सिलोन' मध्ये २५ रुपये वेतनावर नोकरी करत होते. रेडियो सिलोन वर त्यांचा 'फतेहदीन' हा कार्यक्रम लोकप्रिय होता.
ओम प्रकाश आपल्या कारकिर्दीत ३५० चित्रपटात कामे केले आहे. त्यांच्या प्रमुख चित्रपटात 'पड़ोसन', 'जूली', 'दस लाख', 'चुपके-चुपके', 'बैराग', 'शराबी', 'नमक हलाल', 'प्यार किए जा', 'खानदान', 'चौकीदार', 'लावारिस', 'आंधी', 'लोफर', 'ज़ंजीर' यांचा समावेश आहे 'कोणीही' वादळ ',' भटक्या ',' जंजीर ', त्यांचा 'नौकर बीवी का' थी हा चित्रपट होता. अमिताभ बच्चन यांच्या बरोबर त्यांचे खूप छान ट्युनिंग होते. 'नमक हलाल' मधील दद्दू व 'शराबीतील' मुंशीलाल या व्यक्तिरेखानी मा.ओमप्रकाश यांनी कमाल केली होती. देव आनंद यांना कोणतीही चित्रतारका 'भैय्या' असे म्हणत नाहीत, पण आपणाला मात्र त्या अगदी तरूण वयात असल्यापासून 'भैय्या' म्हणतात अशी तक्रार चरित्र अभिनेता ओमप्रकाश अनेकदा करीत असत. ओमप्रकाश यांचे निधन २१ फेब्रुवारी १९९८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
अरुण कशाकरांचा ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकीचा, तसेच जुन्या गायक मंडळींबाबतचा अतिशय डोळस अभ्यास आहे. कशाळकरांची गायकी ही तिन्ही घराण्यांच्या गायकाचा मिलाफ आहे.
June 20, 2022
अमीरबाई यांचे संगीत आणि नाटक प्रेमी कलाराकारांचे घराणे. अमीरबाई पंचवीस वर्षांच्या असताना त्यांसनी एच. एम. व्ही. कंपनीसाठी एक कव्वाली गायली. त्यामुळे त्यांचा तेथील कलाक्षेत्रात प्रवेश सुलभ झाला.
March 5, 2018
अभिनेता सुशांत शेलार यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९८० रोजी मुंबई येथे झाला. सुशांत शेलार हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव असून ते थिएटर, टीव्ही पण जोडलेले आहेत. मुंबईतून त्यांनी शालेय शिक्षण व महाविद्यालय केले. त्यांनी बालपणी अनेक नाटके व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता १९९१ साली बाल कलाकार म्हणून काम करणारी त्यांची कारकीर्द सुरू झाली.
मयूरपंख मध्ये बाल कलाकार म्हणून काम केले होते. महाविद्यालयीन दिवसांपासून ते आपल्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय होते आणि आपल्या कारकीर्दीसाठी अनेक गोष्टी करीत आहेत. त्यांच्या काही नाटकांमध्ये मी नथुराम गोडसे बोलतोय, अयत्यावर कोयता, बहुरुपी पु. ल आणि आधी बसू मग बोलू यांचा समावेश आहे. सुशांत शेलार यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिले आहेत. त्याचा दुनियादारी हा चित्रपट प्रचंड हीट झाला होता. या चित्रपटातील त्याची प्रीतमची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्याचबरोबर त्यांनी क्लासमेट, तू ही रे, धूम टू धमाल, मॅटर, ब्लाइड गेम, संघर्ष अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.
सुशांत शेलार यांनी रूपेरी पडदयाबरोबरच आपल्या अभिनयाची चुणूक छोटया पडदयावरदेखील दाखविली आहे. त्यांनी या गोजिरवाण्या घरात, मयूरपंख, किमयागार, घे भरारी, काटा रूते कोणाला, इंद्रधनुष्य अशा अनेक मालिकादेखील केल्या आहेत. सुशांत शेलार हे एक चांगला कवी आहेत आणि त्यांनी कविता व इतर लेखन केले आहे. ते आपल्या वैयक्तिक जीवनात श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत. त्यांची समर्थ व्हिजन नावाची संस्था आहे.
सुशांत शेलार यांची ‘कबड्डी’ खेळाशी लहानपणापासून एक नाळ जोडली गेली आहे. या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांने या ‘कबड्डी’ सामन्यांचे आयोजन केले आहे. सुशांत शेलार यांचे वडील अरुण दत्तात्रय शेलार हे उत्तम कबड्डीपटू होते. त्यांच्या स्मरणार्थ ‘शेलार मामा फाऊंडेशन’च्या वतीने दर वर्षी सुशांत शेलार हे सामने भरवित असतात. सुशांत शेलार यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सुशांतच्या चाहत्यांना तो एक नवीन जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. सुशांत शेलार हे शिवसेनेच्या चित्रपट सेना कार्याध्यक्ष आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 17, 2018
स्टार प्रवाह वरील “लक्ष्य” या मालिकेतील सलोनी देशमुख भूमिकेनी त्यांना खुप प्रसिद्धि मिळवून दिली.
June 17, 2022
कर्तृत्व आणि परिश्रमावर विश्वास असणारा नेता. या विश्वासामुळेच बाभूळगावच्या सरपंच पदापासून सुरु झालेला प्रवास आज केंद्रिय अवजड उद्योग मंत्रालयापर्यंत येऊन ठेपला आहे. दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले.
September 3, 2010
प्र.के अत्रे म्हणत असत "बालगंधर्व.....फक्त पांचच अक्षरे......पण महाराष्टाचे पंचप्राण ह्या अक्षरात गुंतले आहेत. त्यांचा जन्म २६ जून, १८८८ रोजी झाला. लोण्यात जशी खडीसाखर विरघळते त्याप्रमाणे "बालगंधर्व" ही अक्षरे मराठी मनात विरघळतात.
बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.
बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारनाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली. बालगंधर्वांनी कंपनीतील सर्वांना चांदीच्या थाळीतून वरण-भात तूप आणि पक्वान्नं खाऊ घातली, त्यांनाच आंधळ्या प्रेमापोटी जर्मनच्या थाळीतून जेमतेम अर्धी भाकरी अन् मूठभर भात खाण्याची वेळ यावी, यापरता दैवदुर्विलास कोणता? मोत्यांचा चारा खाऊन जगणाऱ्या "राजहंसा‘वर अशी वेळ आली, ती निव्वळ अव्यवहारीपणा, आंधळं प्रेम अन् व्यक्तिगत अवगुणांमुळं, असं आचार्य प्र. के. अत्रे, गंधर्व कंपनीतील हीरो-कृष्णराव चोणकर आणि विनायकराव पटवर्धन-यांनी लिहून ठेवलंय...अन् तरीही अनुपम सौंदर्य अन् स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व हे महाराष्ट्राला पडलेलं देखणं, सुरेल स्वप्न होतं. महाराष्ट्राचे महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी त्यांचं यथार्थ वर्णन केलंय...
जशा जन्मती तेज घेऊन तारा । जसा मोर घेऊन येतो पिसारा ।
तसा येइ कंठात घेऊन गाणे ।
असा बालगंधर्व आता न होणे ।।
रतीचे जया रूपलावण्य लाभे ।
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे ।
सुधेसारखा साद; स्वर्गीय गाणे।
असा बालगंधर्व आता न होणे ।।
अनुपम सौंदर्य अन् स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!
बालवयातच लोकमान्य टिळकांकडून मिळालेली "बालगंधर्व‘ ही उपाधी, १९०५ मध्ये झालेला "किर्लोस्कर नाटक मंडळी‘तील प्रवेश, त्यानंतर छत्रपती शाहूमहाराजांनी दिलेला उजव्या अधू कानाच्या ऑपरेशनचा सल्ला, १९१२ मध्ये झालेली "गंधर्व नाटक मंडळी‘ची स्थापना, १९१९ मध्ये कंपनीची एकट्याकडं मालकी, केशवराव भोसले यांच्याबरोबर झालेला १९२१ मधील "संयुक्त मानापमान‘चा प्रयोग, त्या काळात झालेलं एक ते दीड लाखाचं कर्ज, १९२८ पर्यंत त्यांनी केलेली साडेतीन लाखांची परतफेड...अन् १९३० नंतर त्यांना लागलेली उतरण...असे हे बालगंधर्व यांच्या जीवनातील काही टप्पे...
बालगंधर्व यांचे १५ जुलै १९६७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 27, 2017
१९५० साली ‘आंबटषौक’ हा त्यांचा प्रौढ वाचकांसाठी पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला, पण त्यानंतर ते प्रामुख्याने वळले बालकुमार साहित्याकडे. बालवाङ्मयाची जवळजवळ सत्तर उत्तमोत्तम पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्यकार म्हणून चांगले नाव मिळवले आणि बालसाहित्यात मोलाची भर घातली.
December 24, 2021
रंगनाथ पठारे हे कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. वैचारिक, समीक्षा आणि अनुवाद असे प्रकारही त्यांनी हाताळले. मात्र, ते रमले कथा-कादंबरीत.
June 1, 2021
मराठी मालिका आणि सन्मान सोहळ्यात दिसणारा एक चेहरा आपणा सर्वांच्याच ओळखीचा आहे. आपल्या निवेदनाने आणि अभिनयाने तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे संस्कृत भाषेतील प्रभुत्वामुळे सर्व श्रोत्यांना भुरळ घालणारी समीरा गुजर-जोशी ही देखील ठाण्यातलं एक रत्नच!
May 23, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti