(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड.अपर्णा रामतीर्थकर

    हिंदुत्व विचारसरणीचा पगडा असलेल्या अपर्णा रामतीर्थकर यांनी सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदाऱ्या’ यासारख्या विषयांवर २००८ पासून तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली होती. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या.

      April 28, 2022


  • पुरुषोत्तम दारव्हेकर

    त्यांनी एकंदर अकरा नाटके लिहिली. त्यांचे कटयार काळजात घुसली‘ हे संगीत नाटक त्यातील नाटयगीतांमुळे खूपच गाजले आणि एकंदरच नाटककार म्हणून ‘दारव्हेकर श्रेष्ठच होते. पंरतु लोकांना जास्त भावले ते दिग्दर्शक पुरुषोत्तम दरव्हेकर यांची पावती म्हणजे वसंत कानेटकरांचे ‘अश्रूंची झाली फुले‘ हे नाटक त्यांनी दिग्दर्शित केले आणि कायम लोकांच्या स्मरणात राहिले. त्यांनंतर वि. वा. शिरवाडकर यांचे ‘नटसम्राट‘ हे नाटक नाटयसंपदातर्फे रंगभूमीवर आले या नाटकाचे दिग्दर्शनसुध्दा पुरुषोत्तम दारव्हेकर यांनीच केले होते.

      March 11, 2015


  • दिलीपराज प्रकाशन संस्थेचे संस्थापक प्रा. द. के. बर्वे

    १९५० साली ‘आंबटषौक’ हा त्यांचा प्रौढ वाचकांसाठी पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला, पण त्यानंतर ते प्रामुख्याने वळले बालकुमार साहित्याकडे. बालवाङ्मयाची जवळजवळ सत्तर उत्तमोत्तम पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्यकार म्हणून चांगले नाव मिळवले आणि बालसाहित्यात मोलाची भर घातली.

      December 24, 2021


  • रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर

    भालचंद्र पेंढारकरांनी अनेक नाटकांना संगीत दिले आहे त्यांची नावे आकाशगंगा , आकाश पेलताना , दुरितांचे तिमिर जावो , पंडितराज जगन्नाथ बहुरूपी हा खेळ असा , रक्त नको मज प्रेम हवे , सत्तेचे गुलाम आणि स्वामिनी अशी आहेत.

      August 31, 2021


  • देवकी पंडित

    तानसेन, मल्हार, सवाई गंधर्व यांसारख्या प्रख्यात संगीत महोत्सवांमधून त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजल्या. तसेच ‘अस्तित्व’, ‘कभी हां कभी ना’, ‘मान्सून वेडिंग’, ‘वॉटर’, ‘साज’ अशा हिंदी चित्रपटांसाठी केलेल्या पाश्र्वगायनातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला.

      June 30, 2022


  • मराठीतील बालवाङ्मफयाचे जनक विनायक कोंडदेव ओक

    १८८१ साली मुलांसाठी बालबोध या नावाचे एक मासिक काढून त्यातून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. विविध प्रकारचे लेखन वैपुल्याने केले व मराठी बालवाङ्मलयाचा पाया घातला.

      February 25, 2022


  • हिंदी पार्श्वगायिका शमशाद बेगम

    शमशाद बेगम यांनी १६ डिसेंबर १९४७ रोजी लाहोर येथे पेशावर रेडिओवरुन गायनाची सुरुवात केली. आपल्या गोड गळ्याने त्यांनी रसिकांच्या मनांचा ठाव घेतला. त्यानंतर पेशावर, लाहोर व दिल्ली रेडिओ स्टेशनवर त्यांनी गाणी गायली.

    १९४४ मध्ये त्या मुंबईत आल्या. बेगम यांनी नौशाद, एस. डी. बर्मन, सी. रामचंद्रन, ओ.पी. नय्यर या संगीतकारांसाठी पार्श्वगायन केले. लाहोरमध्ये खजांची आणि खानदान या चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले. त्यांनी १९७५ सालापर्यंत पार्श्वगायन केले. मा. शमशाद बेगम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायन कला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. लेके पेहला पेहला प्यार (सीआयडी), मिलते ही आँखे दिल हुआ, कभी आर कभी पार (आर पार), मेरी नींदो मे तुम (नया अंदाज), ओ गाडीवाले गाडी जरा धीरे हाक रे (मदर इंडिया), कही पे निगाहे कही पे निशाना (सीआयडी), मेरे पिया गये रंगून (पतंगा), एक तेरा सहारा (शमा), सैयॉं दिलमें आना रे, छोड बाबुल का घर, कजरा मोहब्बतवाला आँखियोंमें ऐसा डाला (द्वंद्वगीत) अशी अवीट गोडीची अनेक गाणी त्यांनी गायली. त्यांना स्वत:ला "छोड बाबुल का घर' हे सर्वात आवडायचे. . "मुगले आझम' मधील "तेरी महफिल में' या सदाबहार कव्वालीतही त्यांचा आवाज आहे. त्यांनी चित्रपटांमधील अनेक कव्वाल्यां-मध्ये सहगायकांसमवेत पार्श्वगायन केले होते. मा.शमशाद बेगम यांनी मराठीतही गाणे गायले. १९५२ साली सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली "नरवीर तानाजी' या चित्रपटासाठी शमशाद यांनी आशा भोसले, अमर शेख, वसंतराव देशपांडे यांच्यासमवेत पार्श्वगायन केले.

    भारत सरकारने २००९ साली पद्मभूषण पुरस्कार देवून त्यांच्या गायकीचा गौरव केला.

    शमशाद बेगम यांचे २३ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    शमशाद बेगम यांची गाणी

    https://youtu.be/WPklTciei-c

      April 23, 2017


  • पार्श्वगायक मुकेश

    ते गायक-अभिनेता कुंदनलाल सहगल यांचे मोठे प्रशंसक होते आणि त्यांच्याप्रमाणेच गायक अभिनेता बनण्याचे त्यांचे स्वप्न होते.

      July 22, 2021


  • अभिनय सम्राट व दिग्दर्शकांचे दिग्दर्शक बाबूराव पेंढारकर

    ९३९ साली हंस पिक्चर्सचा ‘देवता’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात बाबूराव पेंढारकरांनी प्रथमच नायकाची भूमिका केली आणि आपल्या समर्थ अभिनयाच्या बळावर ‘सुखाचा शोध’, ‘देवता’, ‘पैसा बोलतो आहे’, ‘पहिला पाळणा’ अशा अनेक चित्रपटांत नायकाची व्यक्तिरेखा साकारली. वाढत्या वयाला लक्षात घेत त्यांनी चरित्र भूमिकाही प्रभावीपणे अभिनित केल्या.

      June 22, 2022


  • ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद करणारे पहिले भारतीय गीतकार समीर

    आत्ता पर्यत तब्बल ६५० चित्रपटांसाठी हजारोंच्या संख्येने गीतांचे लेखन करणारा आणि तरीही अंतरंगात कुठे तरी कातर, हळव्या मनाचा कवी अशीच गीतकार समीर अंजान पाण्डेय ऊर्फ शीतल पांडे'' उर्फ मा.समीर यांची ओळख. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.ज्येष्ठ गीतकार मा.अंजान हे समीर यांचे वडील. इंडस्ट्रीचा बेभरवशीपणा अनुभवला असल्याने मा.अंजान यांनी मा.समीर यांच्या गीतकार होण्याला विरोध केला. पण समीर यांचा पिंड कवी मनाचाच असल्याने घरच्या विरोधाला जुमानता तो प्रकट होत राहिला. बँक अधिकारी म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या मा.समीर यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करायचे या उद्देशाने त्यांनी बँकेतील सुरक्षित नोकरी सोडली आणि सिनेक्षेत्रात गीतकार म्हणून पाऊल टाकले. सुरुवातीला त्यांनी ‘बेखबर’, ‘इन्साफ कौन करेगा’, ‘जबाब हम देंगे’, रखवाला’, ‘महासंग्राम’ आदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. मात्र या गाण्यांमुळे त्यांना यश व प्रसिद्धी मिळाली नाही. सातत्याने संघर्ष केल्यानंतर अखेर १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील गाण्यांनी समीर यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सांसो की जरुरत है जैसे’, ‘मै दुनिया भूला दुंगा’, ‘नजर के सामने जिगर के पास’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. चित्रपट रसिक व श्रोत्यांवर आपल्या शब्दांनी गारूड करणाऱ्या समीर यांनी आपल्या कारकिर्दीत शंभरहून अधिक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. अन्नू मलिक, आदेश श्रीवास्तव, इलया राजा, ए.आर. रहेमान, जतीन ललित, दिलीप सेन-समीर सेन, नदीम-श्रवण, राजेश रोशन, शंकर एहसान-लॉय आदी संगीतकारांबरोबर समीर यांची जोडी जमली. ‘आँखे’, ’आशिकी’, ’कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कुली नंबर वन’, ‘जुर्म’, ‘तेरे नाम’, ‘दबंग-२’, ‘दिल है की मानता नही’, ‘दिवाना’, ‘देवदास’, ‘धडकन’, ‘धूम’, ‘फिजा’, बेटा’, ‘बोल राधा बोल’, ‘राजाबाबू’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘रावडी राठोड’, ‘शोला और शबनम’, ‘सडक’, साजन’, ‘सावरियाँ’, ‘हम है राही प्यार के’, ‘हीरो नंबर वन’, अशा अनेक चित्रपटांसाठी मा.समीर यांनी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली आहेत. मा.समीर यांनी मराठी आणि भोजपुरी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली आहेत. मा.समीर यांनी फेब्रुवारी २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली आहेत. सर्वाधिक गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदले गेले आहे. या आधीचे रेकॉर्ड गीतकार मा.आनंद बक्षी यांचे होते; त्यांनी ६२४ चित्रपटांसाठी ३ हजार २०० गाणी लिहिली होती. मा.समीर यांना आपल्या समूहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    समीर यांची काही गाणी
    आए हो मेरी जिंदगी में
    आखों ने तुम्हारी
    आपके प्यार मे हम
    घुंगट की आड से
    चाहा है तुझको
    जो हाल दिल का
    तुम्हे अपना बनाने की कसम खाई है
    तेरी उम्मीद तेरा इंतजार
    धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना
    धूम मचा ले धूम
    दिल ने दिल से क्या कहा
    दिल है के मानता नही
    देखो जरा देखो

      February 25, 2017