जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आज १५ सप्टेंबर..आज 'दूरदर्शन' या केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा वाढदिवस
१५ सप्टेंबर, १९५९ रोजी एक छोटासा ट्रान्समीटर व स्टुडिओ यांच्या साह्याने दूरदर्शनचे काम चालू झाले. राजधानीत दूरदर्शनची ही मुहूर्तमेढ रोवली जाताना ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा त्यात मोलाचा वाटा होता. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे!!! पु.लं. नीच "दुरदर्शन" हे नाव सुचवले.
दूरदर्शनवरुन बातमीपत्राची नियमित सेवा १९६५ पासून सुरु झाली. १९७२ मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. १९७५ मध्ये चेन्नई, श्रीनगर, अमृतसर व लखनौ या शहरांमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरु झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात केला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपरीमेंट ची चाचणी १९७५-७६ या वर्षी घेण्यात आली. याद्वारेच जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रचार घरोघरी करण्यात आला. १९८२ मध्ये दिल्ली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फ़त प्रसारण सुरु करण्यात आले.
१९८२ मध्ये टीव्ही रंगीत झाला. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरचे भाषण देश पाहू लागला आणि 'नॅशनल ब्रॉडकास्टर' ही दूरदर्शनची ओळख रुजली. 'ऑल इंडिया रेडिओ'च्या सावलीतून दूरदर्शन बाहेर आले.१९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले. आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलाच भाव खावून जायची. हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन दर्शकांना भारावणारे असेच होते. गेल्या दोन दशकांत झालेल्या संज्ञापन क्रांतीमुळे दूरदर्शनचा भारतातला एकाधिकार संपत गेला. नंतर सगळ्या राष्ट्रीय चर्चांमध्ये दूरदर्शनचे स्थान नगण्य होत गेले. सरकारने दूरदर्शनमध्ये चैतन्य यावे, यासाठी 'प्रसार भारती'ची स्थापना केली. देशात ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येपर्यंत कोणतेही खासगी चॅनल जात नाही. दूरदर्शन मात्र जाते. याशिवाय, दूरदर्शनकडे देशभरात ४६ स्टुडिओंचे जाळे आहे. इतके विशाल जाळे कोणत्याही खासगी वाहिनीकडे नाही. असे असूनही दूरदर्शनचा समाजमनावर फारसा प्रभाव आज नाही. असे का, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. सरकारच्या विरोधात फारशा न जाणाऱ्या पण वस्तुनिष्ठ बातम्या हे दूरदर्शनचे खरे शक्तिस्थान होते. गेल्या दशकभरात दूरचित्रवाणी हा मीडियाचा सर्वाधिक जाहिराती व त्यामुळे उत्पन्न मिळणारा अवतार झाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.म.टा./इंटरनेट
September 15, 2016
व्याकरणाची आवड आणि भाषिक प्रश्नांबद्दलच्या कुतूहलामुळे ते भाषाविज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी लिंग्विस्टिक्स विथ अॅन्थ्रॉपॉलॉजी या विषयात पीएच.डी.केली.
July 8, 2022
(एप्रिल 10,इ.स. 1843ःजांबोटी,बेळगांव जिल्हा -जून 18,इ.स. 1901ःमुंबई)
हे मराठी लेखक व संपादक होते. `विविधज्ञानविस्तार मासिकाचे आद्य संपादक. मराठीतील `मोचनगड` या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक. मराठी लघुलिपीचे आद्य उत्पादक. प्राथमिक शिक्षण जांबोटी व बेळगांव येथे. मुंबईच्या एल्फन्स्टिन हायस्कूलमधून मॅट्रिक(1864) व त्याच हायस्कूलमध्ये शिक्षक(1867). 1888 साली हुबळी ऍंग्लोव्हर्नाक्युलर शाळेत हेडमास्तर व 1892 मध्ये बेळगांव जिल्ह्याचे असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर.
कॉलेजात असताना `मित्रोदय` या वृत्तपत्रातून(1866) ते लेख लिहू लागले. इंग्लंडमधील `एडिंबरो रिव्ह्यू` व `क्वार्टर्ली रिव्ह्यू` या नियतकालिकांच्या धर्तीवर मासिक निघावे या विचाराने 1867 मध्ये `विविधज्ञानविस्तारा`ची स्थापना झाली. त्याचे गुंजीकर हे पहिले संपादक. पण सरकारी नोकरीमुळे त्यांचे नाव अंकावर छापण्यात आले नव्हते. पहिल्या अंकात संपादकांनी या मासिकाचे स्वरूप पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.ः यांच्या परिमाणानुसार त्यात नानाविध विषयांचा संग्रह केला जाईल. शास्त्रीय विषय, देशज्ञान, विख्यात पुरुषांची चरित्रे, नवीन पुस्तकांचे गुणावगुणविवेचन, नीतिवादाचे निबंध इत्यादी अनेक विषयांचा संग्रह करणार आहोत.गुंजीकरांना मराठी, संस्कृत, इंग्रजीबरोबरच गुजराथी, कानडी व बंगाली याही भाषा अवगत होत्या. त्यामुळे या वाचनाच्या बळावर ते अनेक नावीन्यपूर्ण व विविध माहिती सांगणारी सदरे सजवू शकले. पहिली सात वर्षे(1867-1874) त्यांनी सातत्याने व परिश्रमपूर्वक संपादन केले. अनेक व्यासंगी विद्वानांचे सहकार्य मिळवून उच्च दर्जाचे ज्ञानप्रसारक नियतकालिक असा लौकिक त्यांनी `वि.ज्ञा.वि`ला मिळवून दिला. त्यांनी त्यात लिहिलेल्या लेखातील काही निवडक लेख, संकलित लेख, प्रथम खंड (1942) यात आले आहेत. `मराठी भाषा`, `मराठी भाषेचे कोश`, `देशभाषांची दुर्दशा`, `आपल्या भाषेची स्थिती`, `आपल्या भाषेचे पुढे काय होणार?`, `मराठी कविता`, `काव्यविचार`, `व्याकरणविचार` आदी त्यातले लेख पाहिले म्हणजे त्यांचे सखोल विचार व तळमळ लक्षात येते. त्यांच्या चार स्नेह्यांनी मुंबईत सुरू केलेल्या(10 ऑक्टोबर, 1871)`दंभहादक(?)` या मासिकासाठीही त्यांनी काही लेखन केले आहे. नियतकालिकांसाठी चालणार्या लेखनाबरोबरच त्यांचे स्वतंत्र ग्रंथलेखनही चालू असे. त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणेः मोचनगड (ऐतिहासिक कादंबरी, 1871), गोदावरी (अर्पू), अभिज्ञान शाकुंतल (भाषांतर, 1870), रोमकेतुविजया (शेक्सपिअरच्या `रोमियो व ज्युलिएट`चे भाषांतर, 1872), विद्यावृद्धीच्या कामी आमची अनास्था (व्याख्यान, 1887), सरस्वती मंडळ (1884),भ्रमनिरास (1884), सौभाग्यरत्नमाला (1886), कौमुदीमहोत्साह, भाग-1 (भट्टोजी दीक्षित यांच्या `सिद्धान्तकौमुदी` या व्याकरण ग्रंथाचे भाषांतर, खंड 1, 2 ,3 --1877; 4, 5 --1878; भाग 6--1879), सुबोधचंद्रिका (भगवगीतेवरील मराठी टीका, 1884), `रामचंद्रिका`, कन्नडपरिज्ञान (1895)लाघवी लिपी किंवा अतित्वरेने लिहिण्याची युक्ती (1878).त्यांचे भाषा, लिपी आदिसंबंधी लेख `रामचंद्र भिकाजी गुंजीकर संकलित लेख` संपादक अ.का.प्रियोळकर या ग्रंथात आले आहेत. भाषा, व्याकरण व लेखनशुद्धी हे गुंजीकरांच्या चिंतनाचे विषय होते. वाडमयक्षेत्रात वावरणार्या अनेक समकालीनांना व उत्तरकालीनांना त्यांच्या लेखांनी विचारप्रवृत्त व कार्यप्रवृत्त केले. मोचनगडच्या रूपाने गुंजीकरांनी ऐतिहासिक कादंबरीचा एक उत्कृष्ट आदर्श निर्माण केला आहे. शिवाजीच्या उदयकालातील मराठ्यांचे जीवन व तत्कालीन वातावरण यांचे जिवंत चित्रण या कादंबरीत आढळते. गोदावरी पोर्तुगीजांच्या इतिहासाशी संबंधित अशी कादंबरी, पण ती पूर्ण होऊ शकली.
March 11, 2015
गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. जेव्हा जेव्हा विश्वनाथ यांनी शतक झळकावले तेव्हा एकदाही भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही.
February 12, 2022
संदीप खरे यांनी इयत्ता चौथीत असताना पहिली कविता केली. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्याने कविता आणि कथा या विषयात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९७३ रोजी झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजलेल्या 'उमलते अंकुर' या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या कविता ही कवी म्हणून ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरली. ‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’, ‘तुझ्यावरच्या कविता’ आणि ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या त्याच्या कवितांसग्रहांची विक्रमी विक्री झाली आहे. त्याने स्वत: स्वरबद्ध केलेल्या तसेच सलिल कुलकर्णी आणि अन्य संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या सीडीही अपार लोकप्रियता लाभली आहे.
सलग अनेक वर्षे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असलेला आणि १२०० प्रयोगांजवळ पोहोचलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम तर मराठी भावसंगीतामध्ये एक इतिहास घडवतो आहे. या कार्यक्रमातील गीतांसोबत संदीप करीत असलेल्या गद्य कवितांचे सादरीकरण हे देखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले आहे. ‘मी मोर्चा काढला नाही, मी संपही केला नाही’.. ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात’.. ‘लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं’.. ‘दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला’.. ‘डिपाडी डिपांग’.. यांसारख्या कविता आणि लोकप्रिय गीतांमधून कवी संदीप खरे यांनी खरे मराठीत नाव कमवले आहे.
संदीप खरे हे ‘मोबाइल अॅप’च्या माध्यमातून रसिकांच्या भेटत असतात. ‘संदीप खरे’ज वर्ल्ड या अॅपद्वारे रसिकांना संदीपच्या काही कविता विनाशुल्क तर काही कविता अल्बमच्या माध्यमातून सशुल्क उपलब्ध होणार असून मोबाइल अॅपच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचणारा संदीप खरे हे मराठीतील पहिलाच कवी ठरले आहे. जगभरातील मराठी रसिकांमध्ये आणि विशेषत: युवा पिढीमध्ये संदीप खरे यांच्या कविता अत्यंत लोकप्रिय आहेत. पायरसी आणि ‘संदीप खरे’ज वर्ल्ड – ‘गुगल प्ले स्टोअर’वरून हे अॅप विनाशुल्क ‘डाऊनलोड’ करता येऊ शकेल.
https://play.google.com/store/apps/details…
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 13, 2019
मनोज बाजपेयी यांनी आपल्या करिअर ची सुरवात दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या ‘स्वाभिमान’ या मालिकेपासून केली. ह्या मालिकेत मनोज बाजपेयी यांच्या बरोबर आशुतोष राणा आणि रोहित रॉय यांच्यामुळे त्यांचीही मालिका सुपरहिट ठरली. बैंडिट क्वीन या चित्रपटापासून त्यांनी बॉलीवुड मध्ये प्रवेश केला. १९९८ मधील राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका मिळाली आणि तेंव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले.
April 23, 2022
संन्यास घेण्याअगोदर ते पत्रकार होते. बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी भाग घेतला होता. तुरुंगवासही भोगला होता. स्वातंत्र्यानंतर २७ वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत होते. त्यांनी लिहिलेली अडीचशेवर पुस्तके याचीच साक्ष देतात.
November 18, 2021
आग्रा गायकीमध्ये अनेक राग ठराविक पद्धतीने गायले जातात. काणेबुवाही अगदी त्या ठराविक पद्धतीनेच ते राग शिकवत. त्यामुळे ते तसेच गळ्यावर चढायचे. डोळस पद्धतीने गाणं ऐकायला आणि मग ते गायला काणेबुवांनी त्यांना शिकवलं. विलायत हुसेन खान साहेब इचलकरंजीला असताना काणेबुवांना जी तालीम द्यायचे ती बघण्याचं आणि अनुभवण्याचं भाग्य पं शरद जांभेकर यांना मिळाली होती.
June 25, 2022
हिंदीप्रमाणे मराठी चित्रपटांवर त्यांनी प्रकाश टाकला. हिंदीमधीलदेखील राज कपूर, देव आनंद, बी. आर. चोप्रा यांच्यासह अनेक कलावंतांसोबत त्यांनी प्रत्यक्ष सेटवर जाऊन त्या काळी लिखाण केले. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, नायक, नायिका, संगीतकार, गीतकार, विनोदी कलावंत, खलनायक या सर्वांसोबत त्यांची बातचीत आजही त्यांच्या ध्यानात आहे.
February 26, 2022
लहानपणापासूनच कबड्डीची आवड असणार्या सौ. मिनल संजय पालांडे यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच कबड्डीसाठी झोकून दिलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला कबड्डी संघात त्यांनी सहा वर्षं महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं आणि एक वर्ष कर्णधार म्हणूनही त्यांनी संघाचं नेतृत्व केलं.
May 16, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti