(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन

    शैलीदार फलंदाज, माजी कर्णधार आणि वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९६३ रोजी हैदराबाद येथे झाला.

    शैलीदार फलंदाज, माजी कर्णधार आणि वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी पदार्पणाच्या तीन कसोटींमध्ये तीन शतके झळकवत जागतिक विक्रमासह क्रिकेटमध्ये थाटात आगमन केले होते. मोहम्मद अझरुद्दीन हा आवडता खेळाडू होता तो मनगटी फटके आणि चपळ क्षेत्ररक्षण या गुणांमुळे. ते मधल्या फळीतील फलंदाज होते. ३१ डिसेंबर १९८४ रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अजहरुद्दीनने पदार्पण केले आणि पहिल्या तीन सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली. अझरुद्दीन यांनी ९९ कसोटी सामने खेळत एकूण २२ शतके झळकवली, श्रीलंकेविरुद्ध १९९ सर्वाधिक धावा केल्या आहेत.त्याने पदार्पणात लागोपाठच्या सलग कसोटी सामन्यांत शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. ४५ च्या सरासरीने आणि एकदिवसीय सामन्यात ३७ च्या सरासरीने ७ शतके केली. क्षेत्ररक्षक म्हणून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५६ झेल घेतले. ३०० एकदिवसीय सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला.

    १९८०च्या मध्यावर निवृत्त होत गेलेल्या काही मातब्बर फलंदाजांची उणीव अझरने भासू दिली नाही. मोहम्मद अझरुद्दीन यांनी ४७ कसोटीत भारताचे कर्णधारपद भूषवले होते. कर्णधार म्हणून मोहम्मद अझरुद्दीन बऱ्यापैकी यशस्वी ठरला, तरी ते यश अझरच्या नेतृत्वगुणांचे नक्कीच नव्हते. २००० मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर बीसीसीआयने जीवनभर बंदी घातली. कारकीर्दीच्या अखेरच्या दिवसांमध्ये मॅच-फिक्सिंगमध्ये तो गुंतल्याचे आढळल्यानंतर अझरची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. ८ नोव्हेंबर २०१२ रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली होती. २००९ मध्ये, काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर मोरादाबाद मतदारसंघातून मोहम्मद अझरुद्दीन संसदेत सदस्य म्हणून निवडून आले होते.

    १९८६ मध्ये अझरुद्दीन यांना अर्जुन पुरस्कार आणि १९८८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९१ साली त्यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला. १९८७ मध्ये अझरुद्दीन यांनी नऊरीन यांच्याशी विवाह केला होता. १९९६ साली त्यांनी नऊरीन बरोबर घटस्फोट घेतला आणि अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले. अझरचे संगीता बिजलानी बरोबरही २०१० साली घटस्फोट झाला.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      February 8, 2022


  • बालसाहित्यकार डॉ. लीला गणेश दीक्षित

    ‘प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. परभणीला २००५ साली झालेल्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

      June 11, 2021


  • डॉ. मोहन भागवत (सरसंघचालक)

    मोहन भागवत हे २००९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झाले आहेत. ते ब्रह्मचारी आहेत व त्यांनी भारत व विदेशात भरपूर भ्रमण केले आहे.

      November 26, 2021


  • सरहद्दगांधी या नावाने प्रसिद्ध असलेले खानअब्दुल गफारखान

    बादशाह खान ‘फ्रंटियर’वर म्हणजे, तत्कालीन ब्रिटिश इंडियाच्या सीमेवर राहून पख्तुनिस्तानात हे अहिंसेचे काम करत होते. म्हणून ते पुढे ‘फ्रंटियर गांधी’ किंवा ‘सरहद्द गांधी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते गांधीजींचे अनुयायी नव्हते, तर एकाच विचाराने प्रेरित झालेले सहकारी होते. गांधीजी तर म्हणत असत की, त्या प्रांतात अहिंसेचे व्रत स्वीकारणे व अमलात आणणे, हे भारतात सत्याग्रही होण्यापेक्षा कठीण आहे! गांधीजींच्या आणि बादशाह खान यांच्यात २१ वर्षांचे अंतर होते. गांधीजी मोठे आणि बादशाह खान त्यांना सहकारी मानण्यापेक्षा गुरुस्थानी मानत. आयुष्याचा प्रत्येक क्षण लोकसेवेसाठी खर्च व्हायला हवा, असे व्रत दोघांनी घेतले होते. दोन्ही ‘गांधींचा’ फाळणीला विरोध होता आणि हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन-पारशी हे सर्व एकाच मानवजातीचे आहेत आणि त्यांच्यात भेदाभेद, गैरसमज व शत्रुत्व असणे हे अनैसर्गिक आहे, असे त्यांचे मत होते.

      June 3, 2022


  • चित्रकार लिओनार्दो दीसेर पिएरोदा विंची

    त्याचे वडिल सधन होते. लिओनार्दोच्या शिक्षणाकडे, देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला वेरोशिओ या प्रसिद्ध चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले. चित्रकला, शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने वेरोशिओ कडे केला. याचवेळी त्याने स्वत: हुन इतर शाखांचाही अभ्यास चालु ठेवला. चर्चच्या दबावामुळे लिओनार्दोला अखेर मॅडोना ऑफ द रॉक्सचे दुसरे चित्र ही रंगवावे लागले. पहिले चित्र सध्या फ्रान्सच्या पॅरिस येथील लूव्र संग्रहालय येथे आहे तर दुसरे लंडन येथील म्युझियममध्ये आहे. पहिल्या चित्राला सध्या मॅडोना ऑफ द रॉक्स (लुव्र व्हर्जन) व दुसऱ्या चित्राला मॅडोना ऑफ द रॉक्स (लंडन व्हर्जन ) म्हणुन ओळखतात.

      April 15, 2022


  • चित्रपट सृष्टीतील एक अपूर्ण कहाणी

    आज स्मिता जीवंत असती तर आम्ही तिच्या ६३ व्या जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या असत्या…. मेंदूत स्मृती नावाची गोष्ट शाबूत असे पर्यंत तरी स्मिता तुला नाही विसरू शकत आम्ही….कधीच नाही…….मन:पूर्वक अभिवादन

      October 18, 2018


  • सुरेंद्रनाथ निफाडकर

    मराठी माणसं या मासिकाचे सह-संपादक. १९७१ ची रोमांचक युद्धगाथा या पुस्तकाचे लेखक.

      August 15, 2012


  • बॅरिस्टर बाबासाहेब भोसले

    विद्यार्थी दशेपासूनच स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेले बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे प्रखर बुद्धिमत्ता आणि तल्लख विनोदबुद्धी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.

      August 30, 2010


  • मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर

    मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९००रोजी झाला. दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू.

    त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवले. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवलं. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता.

    त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता. १९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वत:ची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे मा.दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली. ‘भावबंधन’ या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’ मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छोडो छोडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत.

    हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. नाट्यगीतांप्रमाणे शास्त्रोक्त संगीतही मा.दीनानाथ उत्तम प्रकारे, स्वतःच्या स्वतंत्र व कल्पक वळणाने गात असत. त्यांनी नाट्यसंगीतात पंजाबी ढंग प्रथम आणला, असे मानले जाते. त्यांनी मैफली गाजवल्या, संगीत समारोहांत स्वतःचे स्थान सिद्ध केले. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून निराळे. सुंदर गाणे रसिकांना ऐकवले.

    रामकृष्णबुवा वझे ह्यांचे ते गंडाबंद शागीर्द होत; तथापि इतर अनेकांची गायकी आत्मसात करून त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली घडवली. श्रीमत् शंकराचार्यांनी दीनानाथांना ‘संगीत रत्न’ म्हणून गौरवले. सारंगीवादन, कथ्थक नृत्य, संस्कृत साहित्य, शिकार हे त्यांचे आवडते छंद होते. १९३४ मध्ये ’बलवंत पिक्चर कॉर्पोरेशन’ काढून त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. कृष्णार्जुन युद्ध हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यात त्यांनी अर्जुनाची भूमिका केली. त्यांची ‘सुहास्य तुझे मनासि मोही’ यासारखी या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर ही दीनानाथ व त्यांच्या द्वितीय पत्नी श्रीमती (ऊर्फ माई) यांची अपत्ये होत. या सर्वांच्या गळ्यात ‘दीनानाथांचा सूर’ आहे. दीनानाथांना श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले.

    दीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. १९२२ साली इंदूर असताना त्यांना ज्योतिषविद्येचा पहिला पाठ शंकरशास्त्री घाटपांडे या तेथील प्रसिद्ध ज्योतिषीबुवांकडून मिळाला होता. दीनानाथांनी ‘ज्योतिष आणि संगीत’ या विषयावरील ग्रंथ लिहायला घेतला होता. गायनाचा व ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग-रागिण्यांचे रंग, वर्णने, स्वरांच्या रंगांवरून त्यांचा निसर्गातील-सूर्यकिरणांतील रंगांशी, वेळेशी कसा संबंध लागतो आणि म्हणून अमूक वेळेला अमूक राग गाणे’ ही कल्पना कशी सिद्ध होते, यांवर त्या ग्रंथात माहिती असणार होती.

    सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे राग-स्वर कसे तेच आहेत वगैरे छाननी त्यांनी या ग्रंथात केली होती. दुर्दैवाने ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झाले. प्रसिद्ध क्रिकेटपटू सी. के. नायडू हे मास्टर दीनानाथांचे खास मित्र. मास्टर दीनानाथ हे सी. के. नायडू यांची क्रिकेटची मॅच बघायला यायचे, तर नायडू हे मास्टर दीनानाथांची नाटके पाहायला येत. मास्टर दीनानाथ यांचे २४ एप्रिल १९४२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 29, 2018


  • अनंत मराठे ऊर्फ अनंतकुमार

    अनंत मराठे हे गायक पं. राम मराठे यांचे कनिष्ठ बंधू. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. रामशात्री या चित्रपटात त्त्यांनी बेबी शकुंतला यांच्या बरोबर बाल अभिनेता म्हणून काम करून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अनेक मराठी हिंदी गुजराथी बंगाली चित्रपटात त्त्यांनी कामे केली होती. बरखा, सीता स्वयवर, जय संतोषी मा, संपूर्ण रामायण भरत मिलाप अशा दोनशेहून अधिक पौराणीक चित्रपटात कामे केली. मनोज कुमार यांच्या शहिद या चित्रपटातील राजगुरू यांची भूमिका व हमारी याद आयेगी या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका खूप गाजली होती. सोनाराने कान टोचले या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले होते. जावई माझा भला या चित्रपटातील भुमिकेसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.

    प्रपंचमाया या दूरदर्शन मालिकेतही त्यांनी अभिनय केला होता. प्रभातच्या 'रामशास्त्री' य गाजलेल्या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेले व त्यांनी स्वतः गायलेले 'दोन घडीचा डाव' हे गाणे खूप गाजले होते. अनंत मराठे यांचे १९ फेब्रुवारी २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 24, 2018