जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अजिंठा-वेरुळचा कलाकार अशी आपल्या कलेची ओळख जगभर आपल्या कामातून पटवून देणारे शिल्पकार सुनील देवरे यांनी पौराणिक ते आधुनिक काळ असा मोठा पट आपल्या शिल्पाकृतींमधून साकारला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पाच मोठ्या प्रकल्पांसाठी शिल्पकार देवरे यांनी देखणे काम केले. शिवरायांचे अश्वारुढ पुतळे साकारले. सध्या ते अजिंठा-वेरुळच्याच टुरिझम सेन्टरच्या उभारणीत व्यग्र आहेत.
सुनील देवरे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला बोलक्या शिल्पांचा निर्माता हा लेख पुढील पानावर वाचा.
सुनील देवरे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला बोलक्या शिल्पांचा निर्माता हा लेख वाचा.
September 7, 2015
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कट्टर अनुयायी, सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक, हिंदूमहासभेचे ज्येष्ठ नेते, ‘प्रज्वलंत’चे संपादक अशी विक्रम सावरकर यांची ओळख होती.
March 1, 2024
ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. असरानी यांनी जवळपास पाच दशकापासून ते आजपर्यंत सिनेरसिकांना आपल्या विनोदी अभिनयाने खळखळून हासायला भाग पाडले आहे. असरानी हे सिंधी परिवारातील आहेत. त्यांचे वडील फाळणीनंतर जयपूर येथे स्थलांतरीत झाले. असरानी यांना चार बहिणी आणि तीन भाऊ होत. त्यांचे शिक्षण सेंट झेव्हिअर्स स्कूल आणि राजस्थान कॉलेज, जयपूर येथे झाले. आपल्या शिक्षणाचा खर्च त्यांनी जयपूर आकाशवाणी येथे कार्यक्रम करीत पूर्ण केला.
लहानपणापासूनच असरानी यांना अभिनयाचे वेड होते. १९६३ मध्ये अभिनेता होण्याची इच्छा मनात घेऊन असरानी मुंबईला आले. यावेळी त्यांची भेट किशोर साहू आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत झाली. त्यांनी असरानी यांना पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनायचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी १९६६ मध्ये आपले अभिनयाचे शिक्षण पूर्ण करून असरानी पुन्हा मुंबईत आले. त्यावेळी त्यांनी 'हरे कांच' या पहिल्या सिनेमात काम केले.
१९७१ मध्ये 'मेरे अपने' या सिनेमातून त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. परंतु १९७३ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या 'अभिमान' या सिनेमाने असरानी यांना आपली आपली ओळख करून दिली. या सिनेमात त्यांनी अमिताभ यांच्या मित्राची भूमिका केली होती ज्यासाठी त्यांना फिल्म फेअरचा उत्कृष्ठ सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. दरम्यान, त्यांच्या अभिनयाला १९७५ हे साल एक वेगळे वळण देणारे ठरले. कारण याच वर्षी रमेश सिप्पी यांचा 'शोले' सिनेमा प्रदर्शित झाला आणि यातील असरानी यांची जेलरची भूमिका ही त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड" ठरली. शोले चित्रपटातील ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ ही भूमिका आणि चुपके चुपके मधील प्रशांत किशोर श्रीवास्तव ही भूमिका खूप गाजली. यानंतर त्यांनी अनेक सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच उडान, सलाम मेम साब, चला मुरारी हिरो बनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
कोशिश आणि तेरी मेहरबानी या चित्रपटात त्यांनी गाणेही म्हटले आहे. असरानी यांना दोन वेळा सर्वश्रेष्ठ विनोदी अभिनेत्याचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत २५ सिनेमे केले तर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सर्वात जास्त सिनेमात काम केले आहे. आपल्या करिअरमध्ये असरानी यांनी तब्बल ४०० सिनेमात काम केले आहे. ते आजही तेवढ्याच जोशाने आजच्या पिढीसोबत अभिनय करताना दिसतात. ‘फॅमिली ४२०’ या मराठी चित्रपटात सुद्धा असरानी यांनी काम केले आहे. २००४ साली लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसकडून उभे राहिले होते. मात्र ते राजकारणात अधिक काळ राहिले नाहीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 1, 2019
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील अस्थिरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश कोतवाल हे हातावरील शस्त्रक्रियेतील देशातले आघाडीचे शल्यचिकित्सक. त्यांनी हे नैपुण्य अमेरिकेतील केंटकी लुईव्हिलमधील हॅंडसर्जरीची संस्था आणि न्यूयॉर्कमधील हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे मिळवले. आठ वर्षांपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दोन्ही मनगटांवर शस्त्रक्रिया करुन त्यांना हाताच्या बोटांवरील गमावलेले नियंत्रण डॉ. कोतवाल यांनी परत मिळवून दिले.
डॉ. प्रकाश कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला या हातांनी हात दिले मज हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. प्रकाश कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला या हातांनी हात दिले मज हा लेख वाचा.

MM-022
<!--डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हा लेख वाचा. या हातांनी हात दिले मज -->
August 26, 2015
इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म १५ एप्रिल १८९३ रोजी झाला.
इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले. भोर संस्थानात त्यांचे आजोबा कारभारी होते. तर सरकारी नोकरीमुळे वडिलांचे वास्तव्य उत्तर भारतात होते. त्यामुळे न. र. फाटकांचे शिक्षण उत्तर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झाले.
१९१५ मध्ये ते बी. ए. झाले. त्यावेळेस त्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या आणि पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांची वाङ्मयीन कारकीर्द मुंबईच्या ‘इंदूप्रकाश या दैनिकात वृत्तपत्र संपादन करण्यापासून झाली. नंतर नवाकाळ मध्येही त्यांनी काम केले. महिला विद्यापीठात प्राध्यापक म्हणून अध्ययन केले आणि त्यानंतर रुईया महाविद्यालयात ते शिकवू लागले.
प्रचलित विचार प्रवाहाविरूद्ध मत मांडून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणाचे वैशिष्ट्य ‘अंतर्भेदी’ या टोपणनावाने त्यांनी व्यक्तिचित्रे लिहिली. फाटकांनी चरित्रपर लेखनाला सुरुवात केली ती ‘न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे’ या ग्रंथापासून. त्यानंतर ‘अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष’, ‘ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी’, ‘श्री एकनाथ ः वाङ्मय आणि कार्य’ ही संतचरित्रे तर लोकमान्य, आदर्श भारत सेवक, नाट्याचार्य कृ. प्र. खाडिलकर यांची चरित्रे ही फाटकांनी लिहिली. त्यांचा पिड खरा तर इतिहासकाराचा. त्यांच्यासमोर गिबनचा आदर्श होता. त्यामुळे त्या व्यक्तीचे तिच्या काळाशी नाते असते ह्या जाणिवेने फाटकांनी ही चरित्रे लिहिली आहेत. न. र. फाटक हे जसे स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते तसेच ते इतिहासाचे दृष्टी ठेवून इतिहासाचा आणि वर्तमानाचा वेध घेण रे विचारवंत, भाष्यकार होते. त्यावरून फाटकांच्या वैचारिक आणि बौद्धिक पातळीची जाणीव होते. न. र. फाटक यांचे २१ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
April 15, 2019
काही काही माणसांकडे दुसर्यांना थकवणारी अफाट ऊर्जा असते. असेच वरदान भा ल कोरगावकर यांनाही लाभले आहे. म्हणूनच तर आता वयाची पंचाहत्तरी गाठत असतानाही त्यांच्या डोक्यातल्या कल्पना आणि पायाला लागलेल्या भिंगर्या अखंड गरगरत असतात.
April 19, 2011
भाषांतरकार, संस्कृतचे व्यासंगी पंडित म्हणून त्या काळात प्रसिद्ध असलेले गोविद शंकर बापट यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८४४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे झाला. त्यांचे वडील हे व्युत्पन्नशास्त्री होते.
February 4, 2010
भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या.
February 3, 2022
त्यांचे वडील राजदरबारी सनईवादक होते. वयाच्या सहाव्या वर्षी ते वाराणसीमध्ये आले. त्यानंतर तेथे वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यानी आपले काका ‘ अली बक्श ‘ यांच्याकडे सुरु केले. अत्यंत कठोर परिश्रम ते करत असत याचा आपण सामान्य माणूस विचारही करू शकणार नाही.
August 14, 2021
दुनिया जिसे कहते है', 'होश वालों को खबर क्या', 'चुप तुम रहो, चुप हम रहें' यासारख्या अनेक लोकप्रिय गझल लिहीणारे मुक्तिदा हसन निदा फाजली उर्फ निदा फाजला यांचा जन्म एका काश्मिरी कुटुंबात, दिल्ली येथे झाला, शिक्षण ग्वाल्हेर येथे झाले. त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ रोजी झाला. १९५८ साली त्यांनी ग्वाल्हेर कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. निदा फाजली यांचे वडीलही उर्दू शायर होते. लहान वयातच फाजली यांनी लिखाणाला सुरूवात केली. एकदा ते एका मंदिरासमोरून जात असताना एक व्यक्ती सूरदासाचे भजन म्हणताना त्यांनी ऐकले. त्या पदाच्या सौंदर्यामुळे प्रभावित झालेल्या निदा यांनी कविता लिहीण्यास सुरूवात केली. मात्र उर्दू कवितांमधे फारसा वाव नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मीर व गालिब यांना आत्मसात केले आणि स्वत:च्या भावना नेमक्या शब्दांत मांडू लागले. नोकरीच्या शोधात १९६४ साली ते मुंबईत आले.
सुरूवातीच्या काळात त्यांनी धर्मयुग आणि ब्लीट्स मासिकांसाठीही लेखन केले. त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे हिंदी व उर्दूतील अनेक साहित्यिक तसेच चित्रपट दिग्दर्शक प्रभावित झाले. विख्यात चित्रपट निर्माते व दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या 'रझिया-सुलतान' चित्रपटासाठी गीते लिहीणारे जान निसार अख्तर यांचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर अमरोही यांनी फाजली यांच्याकडे विचारणा केली असता चित्रपटातील दोन गाणे लिहून दिली व अशाप्रकारे त्यांनी चित्रपट गीतांसाठी लेखन करण्यास आरंभ केला. त्यानंतर त्यांनी अनेक गीते तसेच गझल लिहील्या. प्रसिद्ध टी.व्ही. मालिका 'सैलाब'च तसेच 'जाने क्या बात हुई' आणि 'ज्योती' यांचे शीर्षकगीतही त्यांच्याच लेखणीतून उतरले. त्यांच्या यादगार गझला आणि शायरींची यादी लांबलचक आहे. परंतु ‘कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता,’ ‘होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है.... ’ आणि ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है’ या जीवनातील क्लिष्टता सहजसाध्या तऱ्हेने मांडणाऱ्या या गझला निदा फाजलींच्याच.
निदा फाजली यांच्या बहुतांश गझलांना जगजित सिंह यांनीच आवाज दिला. १९९४ साली त्यांनी प्रसिद्ध गजलगायक जगजित सिंग यांच्यासोबत काढलेला आल्बम 'इनसाईट' मधील कविता आणि संगीत खूप नावाजले गेले. मा.फाजली यांना १९९८ साली 'साहित्य अकादमी पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. तर 'सूर' या चित्रपटातील गीतलेखनासाठी २००३ साली त्यांनी 'उत्कृष्ट गीतकारा'चा पुरस्कार देण्यात आला. २०१३ साली भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवले. मा.निदा फाजली यांचे ८ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
फाजली यांची साहित्यसंपदा काव्यसंग्रह : - लफ़्ज़ों के फूल - मोर नाच - आँख और ख़्वाब के दरमियाँ - खोया हुआ सा कुछ (१९९६) - आँखों भर आकाश - सफ़र में धूप तो होगी
फाजली यांच्या लोकप्रिय गझल्स व गीते : - तेरा हिज्र मेरा नसीब है, तेरा गम मेरी हयात है ( चित्रपट - रझिया सुलतान) - आई ज़ंजीर की झन्कार, ख़ुदा ख़ैर कर (चित्रपट - रझिया सुलतान) - होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है (चित्रपट - सरफ़रोश) - कभी किसी को मुक़म्मल जहाँ नहीं मिलता ( चित्रपट - आहिस्ता-आहिस्ता) - तू इस तरह से मेरी ज़िंदग़ी में शामिल है ( चित्रपट - आहिस्ता-आहिस्ता) - आ भी जा.. ( चित्रपट - सूर) - चुप तुम रहो, चुप हम रहें (चित्रपट - इस रात की सुबह नहीं) - दुनिया जिसे कहते हैं, मिट्टी का खिलौना है (गझल) - हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी (गझल) - अपना ग़म लेके कहीं और न जाया जाये (गझल) - टी.व्ही. मालिका 'सैलाब'चे शीर्षकगीत
November 10, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti