जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मनोहर पर्रीकर २००० ते २००५ व २०१२ ते २०१४ ह्या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर होते. पर्रिकर यांच्याकडे गोव्याचे राजकारण आमुलाग्र बदलणारे नेते म्हणून गोव्यात पाहिले जाते. संघाच्या विचारधारेत वाढलेले पर्रिकर मोदींप्रमाणेच डिक्टेटर सारखे काम करतात. त्यांचाही त्यांच्या मंत्र्यांवर कमी विश्वास आहे. आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास कामात घालविणारे पर्रिकर मोदींप्रमाणेच अतिशय शिस्तीचे, वेळेचे कोटेखोर नियोजन करणारे, स्वच्छ कारभार, साधी राहणी आणि मिडीयापासून दूर राहणारे नेते आहेत.
July 14, 2022
कुसुम अभ्यंकरांची दुसरी ओळख म्हणजे त्या रत्नागिरीच्या मतदारसंघातून १९७८ साली आमदार म्हणून निवडून आल्या. त्या काळात खेडोपाडी फिरून त्यांनी आपल्या मतदारांच्या अडीअडचणींकडे जातीने लक्ष पुरवले. उत्तम वक्तृत्वाची कला त्यांच्याजवळ होती. त्यामुळे माणसांशी संवाद साधून माणसे जोडण्याचे कसब त्यांनी साध्य केले होते.
February 28, 2022
हिंदी चित्रपट सृष्टीतील छम्मा-छम्मा गर्ल उर्मिला मातोंडकरचा जन्म ४ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला. "मासूम' चित्रपटातील "लकडी की काठी... काठी पे घोडा' गाण्यावर नाचणारी छोटी ऊर्मिला मातोंडकर आठवत असेलच. लहान भावांबरोबर नाचतानाचे तेव्हाचे तिचे चेहऱ्यावरील निरागस भाव आजही नजरेसमोरून तरळतात. आजही उर्मिलाला अनेक जण "मासूम' मधली घोडावाली मुलगी म्हणून ओळखतात. मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला मातोंडकरने १९८० साली कलयुग नावाच्या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर १९९१ साली पडद्यावर झळकलेल्या नरसिंहा या हिंदी चित्रपटाद्वारे तिने तरूणपणी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. उर्मिलाने आपल्या चित्रपट कारकिर्दीत मासूम सारखे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तिच्या कारकिर्दीचे विशेष म्हणजे तिने अष्टपैलू अदाकारी साकारली. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘द्रोही’.
‘रंगीला’, ‘मस्त’, ‘भूत’, ‘सत्या’, ‘कौन’ ‘दौड’ ही नावेच तिच्या विविधतेचा छानसा प्रत्यय देतात. त्याशिवाय ‘एक हसीना थी’, ‘जुदाई’, ‘पिंजर’ अशाही काही चित्रपटांतूनही तिने अष्टपैलुत्व दाखविले आहे. तिने हिंदी चित्रपटांसोबत तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका केल्या आहेत. उर्मिला मातोंडकरने आजोबा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. उर्मिला मातोंडकरने मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केले आहे. मोहसीन अख्तर मीर हा उर्मिलापेक्षा १० वर्ष लहान आहे. उर्मिलाही ४२ वर्षाची आहे. मोहसीनने २००७ मध्ये घेण्यात आलेल्या मिस्टर इंडिया टॅलेंट हंटमध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता. ए. आर. रेहमानच्या 'ताज महल' या म्युझिक व्हिडिओमध्येही मोहसीनेन काम केले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 4, 2019
आपल्या अफाट अष्टपैलू अभिनयाच्या गुणांनी नाट्य-चित्रसृष्टीवर कायमस्वरूपी ठसा उमटवणारे गंभीर प्रवृतीचे अभिनेते निळू फुले यांचा जन्म २५ जुलै १९३१ रोजी पुणे येथे झाला.
निलकांत कृष्णाजी फुले उर्फ निळूभाऊ सुरवातीच्या काळात वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात माळीकाम करत असत. हे पिढीजात काम करताना त्यांना मनापासून आनंद मिळत होता. याच क्षेत्रात करिअर करायचा त्यांचा विचार होता. मात्र, आर्थिक अडचणीमुळं त्यांना नर्सरी उघडता आली नाही. तेव्हा मिळणाऱ्या ८० रुपये पगारातले दहा रुपये निळूभाऊ राष्ट्रसेवा दलाला देत होते.
१९५७ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी निळूभाऊंनी सेवादलासाठी येऱ्यागबाळ्याचे काम नोहे हे नाटक लिहिलं. या नाटकामुळं निळूभाऊंचे नाव झालं. मग त्यांनी माळीकाम सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.
राम नगरकरांसोबत त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची हे वगनाट्य गाजवलं. महाराष्ट्रभरात या दोघांचे नाव झालं. अनंत मानेंच्या एक गाव बारा भानगडी या तमाशापटात निळूभाऊंना सिनेमातील पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या झेले अण्णांच्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली.
पुढं १९७२ मध्ये निळूभाऊंनी विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर या नाटकात काम केले आणि या नाटकानं इतिहास घडवला. त्यांना स्वतःलाही बाइंडर आणि दळवींच्या सूर्यास्तमधले अप्पाजी या भूमिका विशेष आवडायच्या. अप्पाजी ही भूमिका तात्त्विक दृष्ट्या त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील मूल्यांशी साधर्म्य सांगणारी होती, म्हणूनही असेल.
बाइंडर नंतर तेंडुलकरांच्याच सामनामध्ये निळूभाऊंना हिंदूराव धोंडे पाटील साकारण्याची संधी मिळाली.शांतारामबापूंच्या पिंजरामुळं डॉ. श्रीराम लागूंचं मोठं नाव झालं होतं. सामनात निळूभाऊंचा सामना त्यांच्याशीच होता. प्रेक्षकांना मात्र या दोन नटश्रेष्ठांची जुगलबंदी पाहण्याचा अपूर्व योग लाभला.
वास्तविक पिंजरात निळूभाऊ होतेच. त्यांची भूमिका छोटी होती. मात्र, मास्तरांकडं पाहून केवळ कुत्सितपणे हसणं एवढीच कामगिरी त्यांनी अशी जबरदस्त साकारली होती, की हे केवळ निळूभाऊच करू जाणे. मास्तर म्हणजे डॉ. लागू संतापून एकदा निळूभाऊंच्या जोरात मुस्कटात भडकावतात, हा प्रसंग म्हणजे त्या चित्रपटातील एक हायपॉइंट ठरला होता. निळूभाऊंच्या अभिनय सामर्थ्याची प्रचिती डॉ. लागूंना तेव्हाच आली होती. त्यामुळं सामना करताना दोघांनाही मजा आली. हिंदूरावची भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. तेव्हा महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातून ग्रामीण भागात होत असलेले बदल आणि या साखरसम्राटांकडून सुरू झालेला सत्तेचा गैरवापर हा मुद्दा प्रभावी होता. तेंडुलकरांनी हिंदूरावची भूमिका जबरदस्त लिहिली होती. या भूमिकेला निळूभाऊंनी पुन्हा एकदा समर्थपणे न्याय दिला.
सामना चित्रपटानंतर निळूभाऊंकडं अशाच पद्धतीच्या भूमिकांची रांग लागली. सगळेच चित्रपट काही एवढे दर्जेदार नसायचे. निळूभाऊंचाही पोटापाण्याचा व्यवसाय असल्यानं येतील त्या भूमिका कराव्या लागायच्या. बहुतेक वेळा टिपिकल खलनायक रंगवावा लागे. त्यात मग नायिकेच्या पदराला हात घालण्याचा प्रसंग अनेक वेळा यायचा. एरवी अत्यंत सच्छिल असलेल्या निळूभाऊंना वारंवार नायिकेवर बलात्कार करण्याचा सीन शूट करावा लागायचा. मराठी सिनेमांतल्या नायिकाही त्याच त्या असायच्या. कोल्हापुरातल्या मुक्कामात शेवटी ते वैतागून दिग्दर्शकाला म्हणाले, अरे, गेल्या तीन सिनेमांत मी तेच करतोय आणि बाईही तीच. निदान या खेपेला बाई तरी बदला...
एक किस्सा सांगतात की एका मराठी कलाकाराने निळूभाऊंना घरी जेवायला बोलावलं होतं. त्या वेळी त्या कलावंताच्या आईनं, असल्या नालायक माणसाला मी जेवायला वाढणार नाही, असं म्हणून त्यांना जेवणही नाकारलं होतं. ही त्यांच्या भूमिकेची ताकद होती.
त्यांच्या या नेहमीच्या पठडीतून बाहेर काढून, त्यांना एकदम प्रोटॅगनिस्टची भूमिका देण्यासाठी पुन्हा जब्बार पटेल धावून आले. अरुण साधूंच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यांवर आधारित सिंहासन या चित्रपटात दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळूभाऊंच्या वाट्याला आली. सत्ताकेंद्राच्या अत्यंत जवळ राहून, सिंहासनाचा सर्व खेळ तटस्थपणे पाहणाऱ्या दिगूची भूमिका निळूभाऊंनी समरसून केली. या चित्रपटाचा शेवट मंत्रालयाच्या बाहेर खदाखदा हसत सुटलेल्या दिगूवर होतो. निळूभाऊंनी त्या हसण्यात त्या व्यवस्थेविषयीची सर्व प्रतिक्रिया एवढी टोकदारपणे व्यक्त केली होती, की तो चेहरा आजही डोळ्यांसमोरून हलत नाही.
जब्बार पटेलांच्या बहुतेक सिनेमांत निळू फुले असायचेच. मग तो जैत रे जैत असो, की एक होता विदूषक असो.
निळू फुले यांनी थोडे-फार हिंदी सिनेमेही केले. 'कुली'मध्ये ते अमिताभसमोर तेवढ्याच ताकदीनं उभे राहिले. महेश भटच्या 'सारांश'मध्येही त्यांना खलनायक साकारायला मिळाला. पण निळू फुले हिंदीत फार रमले नाहीत. त्यांना आपल्या गावरान मराठी सिनेमांचा ठसकाच अधिक भावत असावा.
निळू फुले यांच्या व्यक्तित्वाचा आणखी एक विशेष म्हणजे ते निव्वळ अभिनेते नव्हते. त्याहीपलीकडं जाणारी,खऱ्या आयुष्यातली माणूस नावाची एक वास्तववादी भूमिका ते अगदी समरसून जगत होते. महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग निळूभाऊंना होते. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेविषयी त्यांना कळवळा होता. शबनम, झब्बा अशा साध्या वेषात एरवी ते तसेही कार्यकर्ताच वाटत. राष्ट्रसेवा दल, डॉ राममनोहर लोहिया यांच्या विचारांची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध उपक्रमांना, संघटनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे.
निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार, 'सूर्यास्त' या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार,जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे.
निळू फुले यांचे १३ जुलै २००९ रोजी निधन झाले.
निळू फुले यांची कारकीर्द
गाजलेली लोकनाट्ये
कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.
गाजलेले मराठी चित्रपट
अजब तुझे सरकार, आई (नवीन), आई उदे गं अंबाबाई, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जगावेगळी प्रेमकहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, धरतीची लेकरं, नणंद भावजय, नाव मोठं लक्षण खोटं, पटली रे पटली, पदराच्या सावलीत, पायगुण, पिंजरा, पुत्रवती, पैज, पैजेचा विडा, प्रतिकार, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मानसा परीस मेंढरं बरी, मालमसाला, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, राणीने डाव जिंकला, रानपाखरं, रावसाहेब, रिक्षावाली, लाखात अशी देखणी, लाथ मारीन तिथं पाणी, वरात, शापित, सतीची पुण्याई, सर्वसाक्षी, सवत, सहकारसम्राट, सामना, सासुरवाशीण, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्या नार्या जिंदाबाद, हळदी कुंकू, हीच खरी दौलत.
गाजलेले हिंदी चित्रपट
कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सास के
गाजलेली नाटकं, जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
July 13, 2017
अवधूत गुप्ते यांची वेगळी अशी ओळख मराठी माणसाला करून द्यायची आवश्यकता नाही. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९७७ रोजी झाला. जय जय महाराष्ट्र माझा आणि बाई बाई मनमोराचा या दोन गाण्यांच्या नादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर सारेगपम या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते गाजले. त्यांची दाद द्यायची पद्धत, कौतुक करायची पद्धत काही वेगळीच होती. अंगावर काटा आला, मित्रा तोडलंस! जिंकलंस!, टांगा पलटी घोडे फरार या शब्दांत दिलेली दाद स्पर्धकांचाही हुरूप वाढवत असे. विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती? असा थेट प्रश्नद विचारत ते दिग्दर्शकाच्याही खुर्चीवर विराजमान झाला.
खुपते तिथे गुप्तेमुळे अवधूत गुप्तें मुलाखतकार ही झाले. मराठीतील आघाडीचे संगीतकार-गायक-निर्माते-दिग्दर्शक असा नावलौकिक असलेल्या अवधूत गुप्ते यांनी मराठी व हिंदी गाण्यांसाठी पार्श्वगायन केले असून स्वतंत्रपणे संगीत-अल्बमांसाठी संगीत दिले आहे. त्यांनी मराठी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. तसेच दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाचे व परीक्षणाचे कामही केले आहे. सागरिका म्युझिक कंपनीच्या पाऊस या अल्बमामार्फत गायक व संगीतकार म्हणून त्यांचे पदार्पण झाले. त्यानंतर वैशाली सामंत ह्यांच्या सोबत त्यांनी बनवलेला ऐका दाजीबा हा इंडिपॉप अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला. ‘बाई बाई मनमोराचा पिसारा.....’, ‘जय जय महाराष्ट्र माझा...’, ‘पोरी जरा ';हळू हळू चाल...’ आणि ‘ढिपाडी ढिपांग’ या गाण्यांना तर रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
खुपते तिथे गुप्ते या वरची मुलाखत अवधूत गुप्ते यांची http://sahityasuchi.erasik.com/articles/Avadhut_Gupte
अवधूत गुप्ते यांची वेबसाइट www.avadhootgupte.com
February 21, 2018
‘पहाटगाणी’, ‘अक्षयगाणी’ ‘एक धागा सुखाचा’ ‘गीत रामायण’ ‘तो राजहंस एक’ आणि ‘शब्दस्वरांचे इंद्रधनुष्य’ हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत.
July 4, 2022
भावुक डोळे, साधारण सौंदर्य व ओठांखाली असलेला तीळ, ठेंगणी मुर्ती असं व्यक्तीमत्व असलेल्या व आपल्या उत्साहाने भारलेल्या मा.बेबी नंदा यांनी अनेक दशकं चित्रपट सृष्टी गाजवली. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. बेबी नंदा या मराठी चित्रपट सृष्टीतले एकेकाळचे आघाडीचे दिग्दर्शक निर्माते असलेल्या मास्टर विनायक यांच्या कन्या. मा.बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. मास्टर विनायक यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर घराची जबाबदारी आली. त्यासाठी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम सुरू केले. १९५० सालाच्या आसपास आलेल्या ‘जग्गु’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. बालपण संपल्यानंतर त्यांनी बहिणीच्या वगैरे भूमिका केल्या. त्यांचा या पर्वातला त्यांचा पहिला चित्रपट होता ‘तुफान और दिया’. यात बहिण भावाच्या नात्याची एक विलक्षण कथा व्ही शांताराम यांनी मांडली होती. यातल्या बहिणीच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष बेबी नंदा यांच्याकडे गेले. त्या पाठोपाठ १९५७ साली आलेल्या ‘भाभी’ या चित्रपटामधली त्यांची भूमिकाही विशेष गाजली. या भूमिकेसाठी त्यांना पहिल्यांदाच सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. ‘काला बाजार’ या देवआनंद यांच्या चित्रपटातली त्यांची भूमिकाही अशीच गाजली होती. त्या पाठोपाठ आलेल्या ‘धूल का फुल’ या चित्रपटातही त्यांनी एक लहान भूमिका केली होती. नायिका म्हणून बेबी नंदा यांचा पहिला चित्रपट होता तो एल व्ही प्रसाद यांचा ‘छोटी बहन’. हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटाने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून लगेच प्रस्थापित केले. त्याच वर्षी ‘हम दोनो’ या चित्रपटात त्यांनी देव आनंद यांच्या पत्नीची भूमिका केली. ‘अल्ला तेरो नाम..’ या गाण्याच्या वेळचा तिचा अभिनय आजही अनेकांना आठवत असेल. १९६० साली आलेल्या ‘आचल’ या चित्रपटासाठी बेबी नंदा यांना पहिल्यांदाच फिल्मफेअरचा सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे नामांकन मिळाले होते. बेबी नंदा यांनी अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले असले तरी शशी कपूर बरोबरची त्यांची जोडी विशेष गाजली. ‘चार दिवारी’ व ‘मेंहदी लगी मेरे हाथ’ या त्यांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफीसवर चांगलेच यश मिळाले. त्य़ांच्या काही चित्रपटांना प्रेक्षकांनी स्विकारलेले नसले तरी १९६५ साली आलेल्या ‘जब जब फुल खिले’ या चित्रपटाने या जोडीला मोठं यश मिळवून दिलं. बेबी नंदा यांची काश्मिरी वेषातली छबी अनेक रसिकांच्या मनात घर करुन गेली. या सिनेमातली सगळी गाणी गाजली असली तरी ‘ये समा..’ या गाण्यातला त्य़ांचा अभिनय विशेष गाजला. याच वर्षी आलेल्या ‘गुमनाम’ या चित्रपटातला बेबी नंदा यांचा अभिनयही विशेष गाजला. ‘इत्तेफाक’ या कोणतेही गाणे नसलेल्या चित्रपटातली राजेश खन्ना बरोबरची त्यांची भूमिकाही चांगलीच गाजली. मनोज कुमार यांचा ‘शोर’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केली. त्यानंतर त्यांनी नायिका म्हणून ‘छलिया’, ‘नया नशा’ अशा काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. या चित्रपटांना योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी नायिका म्हणून काम करणे थांबवले. ‘आहिस्ता आहिस्ता’ या चित्रपटात पद्ममिनी कोल्हापुरे च्या आईच्या भूमिकेत त्यांनी चरित्रभूमिकांद्वारे पुनरागमन केले. ‘मजदूर’ व ‘प्रेमरोग’ या चित्रपटातल्या भूमिकांनंतर त्यांनी चित्रपट संन्यास घेतला. १९९२ साली दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याशी नंदा यांचा साखरपुडा झाला. मात्र, त्यानंतर मनमोहन देसाई यांचे अपघाती निधन झाले. नंदा आयुष्यभर अविवाहितच राहिल्या. नंदा यांचे निधन २५ मार्च २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 27, 2017
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते तसंच ठाकरे कुटुंबियांचे जवळचे स्नेही अशी प्रकाश सावंत उर्फ बाळा सावंत यांची ओळख होती.
February 9, 2015
उदय टिकेकर यांनी ‘शमिताभ’, ‘बर्फी’, ‘रईस’, ‘लाल सलाम’ या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं आहे. ‘तुझा माझा ब्रेक अप’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘कोई अपना सा’, ‘कसौटी जिंदगी की’ या मराठी-हिंदी मालिकेत उदय टिकेकर यांनी काम केले आहे.
December 4, 2021
(१८२४-१८७४)
एकोणिसाव्या शतकातील मुंबईच्या सामाजिक जीवनात समरस झालेले एक प्रमुख व्यक्तिमत्व. व्यवसायाने डॉक्टर. त्यांच्या प्रयत्नामुळे मुंबईत ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. लोकांमध्ये स्वत्वाची भावना जागवण्याचे कार्य तळमळीने केले.
महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वंतरी. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. त्यांच्या वडिलांना दाजी म्हणत व मित्र परिवारात ते भाऊ या नावाने परिचित होते. त्यामुळे पुढे भाऊ दाजी हे नाव रुढ झाले. त्यांचा जन्म आजोळी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला. वडील पार्से (गोवा) येथे शेती तसेच कारकुनीचे काम करीत. व्यवसायानिमित्त लाड कुटूंब मुंबईला गेले (१८३२). तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करुन विकत असत. भाऊ दाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एलिफन्स्टन विद्यालयात व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खाजगीरीत्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियूक्ती झाली. (१८४३). या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला. त्यांना विठ्ठल व द्वारकानाथ हे दोन मुलगे होते. द्वारकानाथ तारुण्यातच निधन पावला. वडिलांनी संन्यास घेऊन एलेफंटा (घरापूरी) येथे वास्तव्य केले.
भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषंात एक निबंध लिहिला. निबंध स्पर्धेत त्यांना ६०० रुपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उदधृत केला आहे.
March 12, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti