(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चतुरस्त्र लेखिका आणि कवयत्री शांता शेळके

    पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत.

    शांता शेळके यांची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण; पण त्याचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देत असत. ‘नवयुग’मध्ये त्या काम असताना मा.अत्रे एकदा त्यांना म्हणाले होते, ‘शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणं रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणं तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे.’ अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्र्रचुर भाषाशैली बदलली. मा.शांता शेळकेंनी साधेपणा आयुष्यभर जपला. निसर्गाविषयी मात्र त्यांना विलक्षण ओढ होती. निसर्गाच्या सांनिध्यात त्या तहानभूक विसरून तासन्तास बसत. निसर्ग हाच त्यांचा खरा सखा सोबती होता. निसर्गाच्या अनेक छटा त्यांनी त्यांच्या अनेक गीतांतून व्यक्त केल्यात. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे.

    जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे ’पाण्यावरच्या पाकळ्या’ नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात. जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी, कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी "किलबिल किलबिल पक्षी बोलती", "विहीणबाई विहीणबाई" अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या मा.शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलानाच्या त्या अध्यक्षा होत्या. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात. गीतांचे लावण्या, कोळीगीते असे विविध प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले.

    शांता शेळके यांचे ६ जून २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    शांता शेळके यांची काही गाणी
    https://www.youtube.com/watch?v=cjmmEnmf5IQ

    चुकवू नये अशा शांता शेळके यांच्या वरील नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रमाची लिंक
    https://www.youtube.com/watch?v=Uu2aB9LY-AE&list=PLqhKd63J-s6FKAZgFh9i9EdWtfdRgmH0n
    https://www.youtube.com/watch?v=nPvJrSERxXA
    https://www.youtube.com/watch?v=MYdiWHCAvUQ
    https://www.youtube.com/watch?v=g7MDSoFFJxQ
    https://www.youtube.com/watch?v=2xA9mMiEO6g
    https://www.youtube.com/watch?v=QJCggfj3gRs
    https://www.youtube.com/watch?v=XSUlZIQxPWI
    https://www.youtube.com/watch?v=ORaa2x980fY
    https://www.youtube.com/watch?v=6CF8BWBj5WI
    https://www.youtube.com/watch?v=5paqPYi6sM4
    https://www.youtube.com/watch?v=iSGWoHWcZmw

      June 7, 2017


  • मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

    एकाच नावाच्या दोन व्यक्ती असेल तर फार आश्चर्य वाटते. पण जेव्हा एकाच नावाच्या दोन व्यक्ती एकाच इंडस्ट्रीमध्ये असेल तर इंडस्ट्रीसह, प्रेक्षक व मिडीयाची देखील तारांबळ उडते. या दोन व्यक्ती म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या सुंदर तारका सोनाली कुलकर्णी. या दोघींची ओळख सांगण्यासाठी प्रेक्षकांनी देखील छोटी सोनाली-मोठी सोनाली, सीनिअर सोनाली-ज्युनिअर सोनाली, अप्सरावाली सोनाली-दिल चाहतावाली सोनाली अशी वेगवेगळी नावेदेखील त्यांना दिली आहे.

    गंमत म्हणजे, मिडीया व प्रेक्षकांची तारांबळ उडू नये म्हणून या दोन सोनालींनी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्येच बदल केला आहे. सीनिअर सोनालीने इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमध्ये आय लिहिते तर ज्युनिअर सोनाली डबल ई लिहीते. आज ज्युनिअर सोनालीचा वाढदिवस. तिचा जन्म १८ मे १९८८ रोजी खडकी पुणे येथे झाला. सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात ३० वर्षे काम केले आहे.

    तिच्या आई, सविंदर ह्या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD येथे काम केले आहे. सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालय येथे झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय येथे झाले आहे. तिने फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. तसेच पुणे येथील इंदिरा स्कुल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारिते मधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

    सोनाली कुलकर्णीने कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कार चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. ती मुळची पुण्याची आहे. सोनाली ही प्रामुख्याने तिच्या नटरंग ह्या चित्रपटामधील 'अप्सरा आली' ह्या लावणीवरील नृत्यासाठी साठी ओळखली जाते. ह्या अभिनयासाठी तिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा, आणि झपाटलेला २ अशा चित्रपटामध्ये काम केले. २०१४ मध्ये सोनालीने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत मितवा हा चित्रपट केला होता , ज्याच्यासाठी तिला झी गौरव पुरस्कार च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकरीता नामांकन प्राप्त झाले.

    स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतून हिंदी चित्रपटांकडे गेलेल्या काही मोजक्याच अभिनेत्रींना यश मिळाले आहे. यात सोनाली कुलकर्णीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. तिने ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला, ज्यात तिने रितेश देशमुख च्या पत्नी, ममता हीची भूमिका केली होती. तसेच अजय देवगण याच्या सिंघम २ ह्या चित्रपटात देखील सोनाली ने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. सोनाली कुलकर्णीचे 'सोशल मीडिया'वर फॅन सुद्धा जबरदस्त आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 20, 2017


  • शिवाजीराव पाटील-निलंगेकर

    राजकारणाचा व मंत्रीपदाचा दीर्घ अनुभव असलेल्या शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द अल्प असली तरी राज्याला विकासाच्या दिशेने नेणारी होती.

      September 3, 2010


  • प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा

    तनुजा यांचा जन्म एका चित्रपटसृष्टीशी निगडीत कुटुंबात झाला. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ रोजी झाला. बालपणी तनुजा यांना आई आणि आजीचे इतके प्रेम मिळाले, की ५० च्या दशकात त्यांना टॉम बॉय पुरस्कार मिळाला. त्या पार्टीमध्ये ग्लॅमरस ड्रेस परिधान करायच्या, खुलेआम सिगारेट आणि दारू पित होत्या. त्या काळातील ट्रॅडिशन अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या तनुजा बिनधास्त आयुष्य जगत. त्याचा परिणाम अनेकदा त्याच्या सिनेमांवरसुध्दा दिसत होता. तनुजा यांना आजही ‘बहारें फिर आएंगी’, ‘ज्वेल थीफ’, ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘अनुभव’ या सिनेमांसाठी ओळखले जाते. हिंदीव्यतिरिक्त त्यांनी मराठी, बंगाली आणि गुजराती सिनेमांमध्येही आपले टॅलेंट दाखवले आहे. समर्थ कुटुंबात जन्मलेल्या तनुजा यांचे पती दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर होते. तर आई शोभना समर्थ या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तनुजाच्या बालपणी त्यांचे आईवडील विभक्त झाले होते. तनुजा यांना त्यांची आई शोभना यांनी सिनेसृष्टीत लाँच केले होते. तनुजा यांच्या पहिल्या सिनेमाची निर्मिती शोभना समर्थ यांनी केली होती. तनुजा यांनी १९५० मध्ये 'हमारी बेटी' या सिनेमाद्वारे बालकलाकाराच्या रुपात फिल्मी करिअरला सुरुवात केली. मुख्य अभिनेत्री म्हणून १९६० मध्ये रिलीज झालेला 'छबीली' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. मात्र १९६१ मध्ये रिलीज झालेल्या 'हमारी याद आएगी' या सिनेमाद्वारे त्यांना पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली.

    स्वतःला यशस्वी अभिनेत्री म्हणून सिद्ध केल्यानंतर सुद्धा तनुजा यांची तुलना नेहमी बहीण नूतनसोबत होत राहिली. करिअरच्या काही वर्षांत वहिनी आणि सहायक अभिनेत्रींच्या भूमिका केल्यामुळे तनुजा यांचे फिल्मी करिअर हवे तसे यशस्वी होऊ शकले नाही. तनुजा आणि शोमू मुखर्जी (दिग्दर्शक-निर्माते) यांची पहिली भेट ‘एक बार मुस्कुरा दो’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. एका वर्षांच्या डेटिंगनंतर १९७३ मध्ये दोघांनी लग्न केले. मुख्य अभिनेत्री म्हणून यश न मिळाल्याने तनुजा यांनी पुढे सेकंड लीड भूमिका करण्यास सुरुवात केली. राज कपूर यांच्या 'प्रेम रोग'मध्ये त्या अशाच भूमिकेत होत्या. बलराज साहनी यांचा मुलगा परीक्षित साहनीच्या पहिल्या 'पवित्र पापी' सिनेमात तनुजा यांनी अविस्मरणीय अभिनय केला. त्यानंतर त्या, भाभी, मावशी आणि आई भूमिका साकारू लागल्या. त्यांनी काही मालिकांमध्येसुध्दा काम केले. 'एन ऑगस्ट रेक्विम' नावाच्या इंग्रजी सिनेमातसुध्दा तनुजा झळकल्या होत्या. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार'मध्ये त्या दिसल्या होत्या. या सिनेमात काजोलचा पती आणि तनुजा यांचा जावई अजय देवगण मुख्य भूमिकेत होता.

    तनुजा यांनी छबीली, बहारें फिर आएंगी, ज्वेल थीफ, हाथी मेरे साथी, मेरे जीवन साथी, अमीर-गरीब, याराना, सोनी महिवाल, 'आज और कल', ‘बहारे फिर भी आएगी’, ‘दो चोर’, ‘दो दूनी चार’, ‘घराना’, ‘हाथी मेरे साथी’, ‘ज्वेल थीफ’, ‘जीयो और जीने दो’ आणि ‘प्रेमरोग’सारखे हिट सिनेमे केले आहेत. त्यांना दोन उत्कष्ट सहायक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१४ मध्ये त्यांना फिल्मफेअर कडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.विकिपीडिया

      October 3, 2017


  • कुशाभाऊ सुंदरराव ठाकरे

    स्व. कुशाभाऊ ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे ४थे अध्यक्ष होते. त्यांनी १९९८ ते २००० या कालावधीत पक्षाचे अध्यक्षपद भूषविले. भाजपाचे ते पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष.

      April 21, 2011


  • अद्वैत दादरकर

    अद्वैत दादरकर हा मुंबईमधील रहिवासी असून मराठी प्रायोगिक रंगभुमीच्या प्रसारासाठी व प्रचारासाठी त्याने लिहीलेली अनेक दर्जेदार नाटके व बसविलेले एकपात्री अभिनयाचे खेळ आज महाराष्ट्राच्या संवेदनशील प्रेक्षकाच्या मनाला चांगलेच भिडले आहेत.

      August 16, 2011


  • पंडितराव नगरकर

    पंडितराव नगरकर यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. जन्म अहमदनगर जिल्ह्यातील भातोडी-पारगाव येथे. शिक्षण मॅट्रिकपर्यंतच. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे, १९३० साली ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. इंपीरिअल कंपनीच्या रुक्मिणीहरण (१९३४) या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. त्यावेळी त्यांचा परिचय सुलोचना पालकर या गायिकेशी झाला आणि तो दीर्घकाळ टिकून राहिला. त्यांचे दोन विवाह झाले होते. हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या. संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी-संन्यास ही नाटके ‘सुलोचना संगीत मंडळी’ करीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कला-विलास’ च्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले. शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या पिकली पाने या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली.
    व्ही. शांताराम यांनी १९५०-५१ साली त्यांच्या अमरभूपाळी या बोलपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांची निवड केली. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी जोडीने गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. मा. पंडितराव नगरकर यांचे २८ जुलै १९७७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ.मराठी विश्वकोश
    मा.पंडितराव नगरकर यांची गाणी
    सांगा मुकुंद कुणि हा
    गोल तुझ्या शरीराचा
    घडीघडी अरे मनमोहना
    घनश्याम सुंदरा श्रीधरा
    ती पाहताच बाला
    तू पाक सूरत कामिना
    मम हृदयाची ललित रागिणी
    मराठी असे आमुची
    माझी बेगम आली
    शुभमंगल या समया

      January 3, 2017


  • विजय तेंडुलकर

    प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, राजकीय विश्लेषक विजय तेंडुलकर यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी कोल्हापुर येथे सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडिल कारकून होते. शिवाय प्रकाशनाचा छोटासा व्यवसायही ते चालवायचे. ज्या काळात मुलांना खेळण्याशिवाय इतर काही सुचत नसते अशा वयात अर्थात वयाच्या सहाव्या वर्षी तेंडुलकरांनी आपल्या लेखनास प्रारंभ केला. घरात विखुरलेली पुस्तके हे त्यांच्या लेखनाचे मूळ ठरले. बालवयात त्यांच्या लेखनाचे भरपूर कौतुक झाले. घरातील संस्कारांचाही त्यांच्या लेखनावर सुरुवातीच्या काळात बराचसा परिणाम झाल्याचे दिसून येते. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. यासाठी त्यांनी आपल्या शिक्षणावरही पाणी सोडले. या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. १९५५ पासूनच त्यांनी लेखन सुरू केले.

    चरितार्थासाठी प्रारंभी त्यांनी पत्रकारितेचा पेशा स्वीकारला. नवभारत, मराठा, लोकसत्ता, नवयुग, वसुधा आदी वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून त्यांनी सदरलेखनाचे आणि संपादनाचे काम केले. १९४८ मध्ये 'आमच्यावर प्रेम कोण करणार' ही त्यांची कथा पहिल्यांदा प्रकाशित झाली. १९५१-५२ च्या सुमारास भारतीय विद्याभवनाने नव्याने सुरू केलेल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने तेंडुलकरांचे नाट्यलेखन सुरू झाले. त्यांनी आरंभीच्या काळात निवडलेले नाट्यविषय कौटुंबिक स्वरूपाचे आणि मध्यमवर्गीय जीवनाशी निगडित होते. विजय तेंडुलकरांची साहित्य संपदा अफाट आहे. अर्थातच यात नाटकांची संख्या जास्त आहे. विपुल लेखन करणार्याय तेंडुलकरांनी कादंबरी हा प्रकार आयुष्यात खूपच उशिरा हाताळला. या कादंबर्यां ची नावेही त्यांनी 'कादंबरी एक व दोन अशी दिली. 'गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. मात्र 'श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. 'शांतता कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणार्यास विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. 'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि 'घाशीराम कोतवाल' मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.

    'माणूस नावाचे बेट', 'मधल्या भिंती', 'सरी गं सरी', 'एक हट्टी मुलगी', 'अशी पाखरे येती', 'गिधाडे', 'छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. 'निशांत', 'आक्रोश', 'अर्धसत्य' या चित्रपटांच्या पटकथा तेंडुलकरांच्या लेखणीतूनच साकारल्या. मराठीतही 'सामना', 'सिंहासन', 'आक्रित', 'उंबरठा' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. "देशातील वाढता हिंसाचार" या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस" या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले. नवनाट्याविषयी आस्था बाळगणार्या् संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांबद्दल त्यांना जिव्हाळा होता. विजय तेंडुलकर यांचे १९ मे २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 20, 2017


  • अजित सोमण

    प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक अजित सोमण यांचा जन्म ६ ऑगस्ट १९४७ रोजी झाला.

    अजित सोमण यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालय, तसेच स.प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे इंग्रजी तसेच रानडे इन्स्टिट्यूट येथे पत्रकारिता, तर सिम्बायोसिस येथे अजित सोमण यांनी Creative writing and Mass communication अशा विषयांचे अध्यापन केले.

    पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अप्लाईड म्युझिक, म्युझिक ॲप्रीसिएशन हे विषय शिकवले. या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'संगीत' या पुस्तकाचे ते सहलेखक होते. सोमण यांनी लिहिलेल्या अनेक जिंगल्स व जाहिराती प्रसिद्ध झाल्या. "ऊंचे लोग ऊंची पसंद", "चवीनं खाणार त्याला केप्र देणार", " या वर्षी पु.लंची दिवाळी तुमच्या घरी ", "सकाळ घरात आला की, आजोबांपासून नातवापर्यंत सासूपासून सुनेपर्यंत सगळ्यांचा स्वार्थ एकदम जागा होतो", " प्रत्येक कुटुंबासाठी-कुटुंबातील प्रत्येकासाठी सकाळ" या काही त्यांच्या गाजलेल्या जाहिराती आहेत.
    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

      June 4, 2022


  • रजनीकांत

    रजनीकांत यांची स्टाईल, अभिनय याला कुणीच टक्कर देऊ शकत नाही. आतापर्यंत त्यांनी सुमारे १५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. रजनीकांत यांनी फिल्मी इंडस्ट्रीतील नुकतीच आपल्या करिअरची यशस्वी ४३ वर्षे पूर्ण केली आहेत.

      July 20, 2022