जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आपल्या आगळ्यावेगळ्या व विपुल साहित्यनिर्मितीचे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या लेखकांत मधू मंगेश कर्णिक यांचे नाव महत्त्वपूर्ण आहे. मधु मंगेश कर्णिक यांचे प्राथमिक शिक्षण करुळ येथील शाळेत १९३८ ते १९४२ पर्यंत झाले. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९३१ रोजी करुळ, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे झाला.तर कणकवली येथे १९४२ ते १९५१ पर्यंत माध्यमिक शिक्षण झाले. इच्छा असूनही त्यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता आले नाही. ९ फेब्रुवारी १९५२ रोजी एस.टी. कॉपरेरेशनमध्ये ज्युनिअर क्लार्क म्हणून नोकरीस लागलेल्या कर्णिकांनी साहित्य निर्मितीसही सुरुवात केली. मधु मंगेश कर्णिक यांची पहिली कथा - कृष्णाची राधा - ही रत्नाळकर मासिकातून प्रसिद्ध झाली.’कोकणी गं वस्ती’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. कथा, कविता, नाटक, कादंबरी, ललित गद्य, बालवाङ्मय, अशा सर्वच साहित्यप्रकारांमध्ये लेखन करून कर्णिकांनी आपल्या प्रतिभेचा प्रत्यय वाचकांना वेळोवेळी दिला. मधु मंगेश कर्णिक यांनी आशयाच्या अंगाने मराठी कादंबरीत वैविध्य आणले.
देवकी, सूर्यफूल, निरभ्र, माहीमची खाडी, भाकरी आणि फूल, जेईली, सनद, कातळ, वारुळ, संधिकाल या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. ज्या भूमीशी आपली नाळ बांधली गेली आहे, त्या भूमीशी आत्मियतेने बंध राखून आणि आपल्या अनुभव विश्वाशी निगडित राहून त्यांनी प्रदीर्घकाळ कथालेखन केले. कोकणी गं वस्ती, पारघ, तोरण, मंत्र, भुईचाफा, मांडव, गुजा, संकेत, तहान, डोलकाठी, झुंबर, केवढा, गवळण, अनिकेत, उत्तरायण इत्यादी ४१ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मधु मंगेश कर्णिक कथाकार, कादंबरीकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत. इतर चौफेर लेखनही त्यांनी केले असून ते कवीसुद्धा आहेत. त्यांनी १९४५ मध्ये लिहिलेली पहिली कविता ‘बालसन्मित्र’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यांचा ‘शब्दांनो, मागुते या’ हा पहिला काव्यसंग्रह २८ एप्रिल २००१ रोजी प्रकाशित झाला. त्यात ८५ कविता आहेत. मधु मंगेश कर्णिक यांची ललित गद्यात समाविष्ठ होणारी दहा पुस्तके आहेत. १) सोबत, २) नैऋत्येकडचा वारा, ३) जिवा भावाचा गोवा, ४) माझा गाव माझा मुलुख या पुस्तकांचा समावेश होतो.
मधु मंगेश कर्णिक यांनी ‘देवकी’ व ‘केला तुका झाला माका’ ही दोन नाटके लिहिली. दूत पर्जन्याचा हे चरित्र, जगन्नाथ आणि कंपनी, शाळेबाहेरील सौंगडी, चिमणचारा, गोड गोड चिमणचारा ही खास लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कर्णिक यांच्या ‘स्वप्नपूर्ती’ या कथेवर ‘घुंगरू’ हा हिंदी चित्रपट प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला. भाकरी आणि फूल, जुईली, रानमाणूस या कथा-कादंबऱ्यांवर आधारित दूरदर्शन मालिका विलक्षण गाजल्या व लोकप्रिय झाल्या. त्यांनी विविध विशेष अंकांचे संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते व राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालक आहेत. ते कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट यांचे संस्थापकही आहेत. त्यांनी ‘करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळ’ स्थापन केले आणि त्या मंडळाचे करूळ ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलही सुरू केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता. कोकणातील मालगुंड येथे केशवसुतांचे सुंदर स्मारक उभारण्यासाठी मधु मंगेश कर्णिक यांनी अपार कष्ट घेतले. भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 28, 2017
गीतकार इन्दीवर यांचे खरे नाव श्यामल बाबू राय, इन्दीवर यांना लहान पणा पासून लेखक, संगीत आणि गायन लेखन याची आवड होती. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२४ रोजी झाला. बाबू भाई मिस्त्री यांच्या चित्रपट 'पारसमणि' मधील इन्दीवर यांची गाणी गाजली.
निर्माता-दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या चित्रपटात मा.इन्दीवर गाणी लिहिली. 'उपकार' मधील "क़स्मे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या..." ही गाणी काय किंवा 'पूरब और पश्चिम' मधील "दुल्हन चली वो पहन चली" और "कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे" ही गाणी तर अजून ही अवीट वाटतात मा. इन्दीवर यांनी संगीतकार जोड़ी कल्याणजी-आनंदजी च्या बरोबर "छोड़ दे सारी दुनिया किसी के लिये...", "चंदन सा बदन..." और "मैं तो भूल चली बाबुल का देश..." अशी सुंदर गाणी लिहिली आहेत.
राकेश रोशन यांच्या चित्रपटात इन्दीवर यांनी सदाबहार गाणी लिहिली. 'कामचोर', 'ख़ुदग़र्ज', 'खून भरी मांग', 'काला बाज़ार', 'किशन कन्हैया', 'किंग अंकल', 'करण अर्जुन' व 'कोयला' या राकेश रोशन यांच्या चित्रपटातील गाणी मा.इन्दीवर यांनी लिहिली. त्यांच्या या गाण्या मुळे राकेश रोशन यांचे चित्रपटातील गाणी आज आपण आठवणीने ऐकतो. विजय आनंद यांच्या 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटातील "नफ़रत करने वालों के सीने में...", "पल भर के लिये कोई हमें..." ही गाणी मा.इन्दीवर यांचीच.
मनमोहन देसाई यांच्या 'सच्चा-झूठा' या चित्रपटातील "मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनियां..." हे इन्दीवर यांचे गाणे आज ही लग्नात वाजवले जाते. 'सफ़र' या चित्रपटातील इन्दीवर यांचे "जीवन से भरी तेरी आंखें..." व "जो तुमको हो पसंद..." ही गाणी तर लाजबाब.
१९७५ मध्ये 'अमानुष'या चित्रपटासाठी इन्दीवर यांना 'फ़िल्म फेयर पुरस्कार' मिळाला. इन्दीवर यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी गाणी लिहिली. २७ फेब्रुवारी १९९७ मा.इन्दीवर यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
इन्दीवर यांनी लिहीलेली काही गाणी
दिल ऐसा किसीने मेरा तोडा
फुल तुम्हे भेजा है खत में
गरजत बसरत
जिंदगी का सफर
चंदन सा बदन
जो तुमको हो पसंद
मधुबन खुशबु देता है
एक तु जो मिला
पास बैठो तबीयत बहेल जायेगी
एक बार तु कहदे
इस दिल मे बसा था प्यार तेरा
ओठों से छु लो तुम
कोई जब तुम्हारा
दिल एैसा किसीने
August 15, 2017
त्यांची सुप्रसिद्ध ‘ अनटचेबल ‘ ही कांदबरी १९३५ साली निर्माण झाली.. एका दलित तरुणावर ही कांदबरी आधारलेली आहे. शौचालय साफ करणाऱ्या एका तरुणाची ही गोष्ट आहे. दलितच दलितांच्या व्यथा मांडू शकतात असे तोपर्यंत मानत कारण कोणत्याही उच्च जातीच्या लेखकाने इतकी जळजळीत कांदबरी लिहिली नव्हती. ही कांदबरी भारतात आणि भारताबाहेर इतकी गाजली की मुल्क राज आनंद यांना भारताचा ‘ चार्ल्स डिकन्स ‘ म्हणून म्हणू लागले. विशेष म्हणजे ह्या पुस्तकाची प्रस्तावना त्यांचे मित्र , जगप्रसिद्ध लेखक ई . एम . फ्रॉस्टर यांनी लिहिली होती. त्यावेळी मुल्क राज आनंद यांची ओळख फ्रॉस्टर यांच्याशी टी . एस. ईलियट यांच्या पत्रिकेत ‘ क्रायटेरियोन ‘ येथे काम करताना झाली.
July 22, 2021
७०-८० च्या दशकात फारूक शेख यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. नुरी, शतरंज के खिलाडी, चष्मे बद्दुर, गरम हवा इत्यातदी चित्रपट गाजले. ‘क्लब ६०’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
December 27, 2021
वैद्यक व्यवसायात न्यूरोसर्जन म्हणून ठाण्याचं नाव उभं करणारे न्यूरोसर्जन डॉ. विनायक दत्तात्रय जोशी हे ठाण्याचं भूषण! निव्वळ व्यावसायिक दृष्टीकोनातून आपल्या व्यवसायाकडे न पाहता समाजभावनेचे, सामाजिक भान ठेवून त्यांनी अनामत रक्कम न घेता पूर्ण, योग्य व आवश्यक ते आचार करायचे असे ध्येय ठेवून २००४ साली डॉ. जोशी यांनी “डिव्हाईन” हॉस्पिटलची स्थापना केली.
May 23, 2014
सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या महान क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात त्यांचे खूप मोठे मोलाचे योगदान होते.
November 21, 2021
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मलेशियाचा प्रतिष्ठेचा ‘द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड’ प्रदान करण्यात आला.
ब्रँड लॉरीअटकडून दिले जाणारे पुरस्कार हे जगभारातील नावाजलेल्या व्यक्तिंना दिले जातात. ८७ वर्षीय लतादीदींनी सोशल मीडियावर ट्विट करत पुरस्काराचा एक फोटो शेअर केला आहे.
ट्विटरवर फोटो शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, मला लिजेंडरी अॅवार्ड २०१७ देऊन सन्मानित केल्याबद्दल लॉरीअटचे खूप आभार. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल शाहरुख खानलाही २०१२ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. याआधी दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत राष्ट्रपती नेल्सन मंडेला, नोबल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस, रतन टाटा, स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि मायकल शूमाकरला ‘द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.
आतापर्यंत ३०,००० हूनही अधिक गाणी गायलेल्या दीदींनी त्यांच्या नंतरच्या ट्विटमध्ये त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले. माझ्या कामावर मी समाधानी आहे. यासाठी मी माझ्या चाहत्यांची आणि हितचिंतकांची आभारी आहे.
February 20, 2017
प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल यांचे सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणजे तरुण तुर्क म्हातारे अर्क. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि भूमिका असे हे बहुपदरी नाटक खूप गाजले. त्यातील इरसाल प्राध्यापक बारटक्के मधुकररावांनी भन्नाट रंगवला. त्याचे पाच हजारांवर प्रयोग झाले.
July 24, 2017
दो बिगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी आदी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. त्यांचा जन्म १२ जुलै १९०९ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळात कधी शेतकऱयांची व्यथा, रहस्यमय, विरह, समाजव्यवस्था आदी विषय त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आणि आपली वेगळी छाप त्यांनी निर्माण केली. ते खास करून चित्रपटामध्ये सौदर्याचा वापर करून घेणार दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही कलात्मक असायची. मा.बिमल रॉय यांच्या चित्रपटात संवेदनशील नातेसंबंध आणि समाजातील उपेक्षित वर्गांचे चित्रण असायचे. मा.बिमल रॉय यांनी एक तरुण फिल्ममेकर म्हणून त्याकाळी अनेकांना प्रेरणा दिली. गुलजार यांना मा.बिमल रॉय यांनी त्यांच्या "बंदिनी' या चित्रपटासाठी त्यांना संधी दिली आणि त्यांनी लिहिलेले "मोरा गोरा अंग लै ले..' हे नूतन यांच्यावर चित्रित झालेले गाणे सुपरहिट ठरले. बिमल रॉय स्वत:च एक चित्रपटाची शाळा होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
बलराज सहानी यांची दो बिघा जमींन बद्दल एक आठवण सांगितली जाते.
बलराज सहानी हे त्या काळातले एक उच्चविद्याभूषित होते. कलकत्त्यात ते तेव्हा प्राध्यापकी करत. इंग्लंडवरून शिकून आल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व हे साहेबी होतं. बिमल रॉय हे चित्रपट बनवत असल्याचं त्यांना कळल्यानंतर ते त्यांना भेटायला गेले व आपल्याला या चित्रपटात भूमिका करायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बिमल रॉय यांचं पात्र हे एका गरीब शेतक-याचं, एका रिक्षावाल्याचं होतं. बलराज सहानी यांना सुटाबुटात पाहून बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देण्याचं नाकारलं. बलराज सहानी यांनाही आपली चूक कळून आली. त्यानंतर या भूमिकेसाठीच्या पोषाखात त्यांनी वावरून त्या भूमिकेचा अभ्यास केला. इतकंच नव्हे तर आपल्या बायका-मुलांना घेऊन त्यांनी कलकत्त्यात काही काळ रिक्षा ओढण्याचाही सराव केला. या सा-या गोष्टीचा अभ्यास करून मग ते पुन्हा बिमल रॉय यांना भेटायला गेले. त्यांना त्या लुकमध्ये पाहिल्यावर मग बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देऊ केली. कलाकाराच्या प्रभावापुढे न झुकणारे असे ते दिग्दर्शक व आपल्या दिग्दर्शकाच्या समाधानासाठी प्रचंड कष्ट घेणारे ते कलाकार आता सापडणं मुश्कीलच.
बिमल रॉय हे त्या काळातले एकमेव असे दिग्दर्शक होते ज्यांच्या घरी दिलीप कुमार स्वत: कथा ऐकायला येत असे. एरवी सर्वच दिग्दर्शकांना दिलीप कुमार आपल्या घरी बोलावत अस्त. बिमल रॉय यांनी मात्र कधीही फोन केला तर ते लागलीच त्यांच्या घरी येत असत. दिलीप कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीतली सर्वात प्रभावी व्यक्तिरेखा म्हणजे देवदास हा चित्रपट होय असे दिलीप कुमार स्वत:च म्हणत आहे. भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे. रॉय यांच्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली तरी त्यातील आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. १९११ ते १९६६ या काळातील ‘उदयरे पथे’, ‘दो बीघा जमीन’, ‘परिणीता’, ‘बिराज बहू’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘परख’ आणि ‘बापबेटी’ अशी अनेक चित्ररत्ने रॉय यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देतात. मा.बिमल रॉय यांचे ८ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बिमल रॉय यांच्या काही कलाकृतीची माहिती
दो बिघा जमींन
साल:- १९५३
या चित्रपटाची प्रेरणा त्यांना बायसिकल थिव्ह्स या चित्रपटावरून आली होती. एक अल्पभूधारक असा शेतकरी, त्याच्याकडे केवळ दोन बिघा जमीन असते. या गावात त्याला अनेक संकटांचा सामन करावा लागतो. याच गावातला एक सावकार एका मिल मालकाबरोबर मिळून या गावात एक मिल बनवण्यासाठी जमीन मिळवून देण्याचं कारस्थान करतो. त्याचाही त्रास या शेतक-याला होतो. या शेतक-याला आपल्या उदरनिर्वाहासाठी शहरात यावं लागतं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात काय होतं. त्याच्या जमिनीचं काय होतं? याची कथा या चित्रपटातून पाहायला मिळते. बलराज सहानी व निरुपा रॉय यांच्या अभिनयासाठीही हा चित्रपट आठवणीत आहे. अगदी साधेपणाने कथा सांगण्याचं बिमलदांचं कौशल्यही या चित्रपटातून पाहायला मिळतं. त्या काळात या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते.
देवदास
साल:-१९५५
शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या देवदास या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती बिमल रॉय यांनी केली. आपल्या लहानपणीच्या प्रेमासाठी नंतर दारूच्या आहारी गेलेल्या व स्वत:च्या जीवनाचा नाश केलेला नायक या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. दिलीप कुमार, वैजंयती माला व सुचित्रा सेन यांच्या विलक्षण अभिनयासाठीही हा चित्रपट ओळखला जातो. एक ठाकूर आपल्या जीवनाचं कशा प्रकारे पतन करून घेतो हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं असलं तरी समाज व व्यक्तिस्वातंत्र्य या महत्त्वाच्या गोष्टीकडेही हा चित्रपट लक्ष वेधतो. आपल्या विलक्षण शैलीच्या जोरावर बिलदांच्या या चित्रपटालाही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. याच चित्रपटाचा रिमेक नंतर शाहरुख खान याला घेऊन संजय लीला भन्साली यांनी केला होता.
मधुमती
साल:-१९५८
या चित्रपटात एका पुनर्जन्मावरच्या प्रेमावरची कथा सांगण्यात आली होती. एका निर्जन जागी गेलेल्या एका इंजिनीअरला आपल्या पुनर्जन्माच्या प्रेमाची कथा आठवते व त्यानंतर त्यांच्या जीवनात काय काय उलथापालथी होतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. फ्लॅशबॅक व वर्तमानाचा सुरेख वापर करून मांडण्यात आलेली ही कथा लोकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटाबरोबरच या चित्रपटातली गाणीही गाजली. तब्बल बारा गाण्यांचा या चित्रपटात समावेश होता. ही गाणी आजही तितकीच अवीट गोडीची आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी व पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. शाहरुख खानने नंतर याच चित्रपटावर आधारित ओम शांती ओम या चित्रपटाची निर्मिती केली होती. तोही प्रचंड यशस्वी ठरला होता.
सुजाता
साल:-१९५९
जातीप्रथेच्या संदर्भात अनेक माध्यमातून चर्चा होत असते. असे असले तरी भारतात ती एक मोठी समस्या आहे. याच विषयावर आधारित चित्रपटाची निर्मिती बिमलदांनी केली होती. एका ब्राह्मण मुलाचे दुस-या जातीतल्या मुलीशी प्रेम होते. त्यानंतर समाज त्यांच्या या प्रेमाकडे कसा पाहतो. त्यांच्यापुढे कोण कोणती आव्हानं येतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले होते. या चित्रपटातल्या नूतन यांच्या जबरदस्त अशा अभिनयामुळेही हा चित्रपट गाजला होता.
बंदिनी
सर्वसामान्य भारतीय स्त्रीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात दिल्या गेलेल्या योगदानाची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नूतन यांचा दमदार अभिनय लोकांपुढे आला. अशोक कुमार व त्या वेळी नवोदित असलेल्या धर्मेद्र यानेही यात चांगली भूमिका केली होती. संपूर्णपणे स्त्रीप्रधान असलेला हा चित्रपट त्या काळातला एक क्रांतिकारी चित्रपट म्हणून गणला गेला. या चित्रपटानेही प्रचंड यश मिळवले. बिमलदा यांचे चित्रपट पाहून त्याकाळी भारतीय चित्रपटांची उंची किती होती हे दाखवणारे आहेत. आज जागतिक सिनेमाचं कौतुक करणाऱ्यांनाही हे चित्रपट आपलेसे वाटतील यात शंका नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 8, 2018
यशाचा, अपयशाचा, कारकीर्दीचा विचार करणारे अनेक अभिनेते असतात. अभिनयाचा आणि आपल्या व्यक्तिरेखेचा विचार करणारे अभिनेते अभावानेच आढळतात. कमल हासनचा समावेश असाच 'विचारी' अभिनेत्यांमध्ये करावा लागेल. तो प्रत्येक व्यक्तिरेखेचा, कथानकाचा तपशिलात जाऊन विचार करतो आणि भूमिकेची त्यानुसार रचना करतो. कमल हासनच्या या अभिनय वैशिष्ट्याचं दर्शन घडविणारा एक छोटासा चित्रपट महोत्सव दिल्लीत झाला. कमलच्या अभिनय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चित्रपट महोत्सव संचालनालयानं या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. अनेक अभिनेत्यांच्या कारकीर्दीचा असा सुवर्ण महोत्सव होतो, मग कमल हासनच्याच चित्रपटांचा असा वेगळा महोत्सव का? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्याचे उत्तर सात महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, ज्या कलावंतांच्या कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली, अशा काही प्रमुख हयात कलावंतांचा या महोत्सवात सन्मान करण्यात आला होता. त्या यादीत कमल हासनचे नाव नव्हते. कमलचे नाव नव्हते, त्याचे कारण बहुधा त्याचे वय पाहता, त्याच्या कारकीर्दीला पन्नास वर्षे झाली आहेत, असे मुळात कुणाला वाटलेच नसावे. कमल आता ५५ वर्षांचा आहे. त्याच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात वयाच्या पाचव्या वर्षी 'कलातूर कन्नम्मा' या चित्रपटाने झाली. सर्वोत्कृष्ट बाल कमल अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला होता. पुरस्कार आणि व्यावसायिक यश यांची सांगड घातली गेल्याचे भारतात क्वचितच दिसते. परंतु, त्याच्या कारकीर्दीत त्याला स्वतःला आवडणारे, पटणारे चित्रपट आणि लोकांना भावणारे चित्रपट अशा दोन्ही प्रवाहांमध्ये यशस्वीरीत्या वाटचाल केली. सर्वसामान्य प्रेक्षक त्यातला एक स्टाईलबाज, रोमँटिक नायक म्हणून ओळखतो, तर संवेदनशील प्रेक्षकांना त्याची ओळख आहे, एक विचारी अभिनेता म्हणून. स्वतःवर वाजवीपेक्षा जरा जास्तच प्रेम करणारा आणि प्रयोगांच्या आहारी जाणारा अभिनेता म्हणूनही त्याची एक ओळख आहे. केवळ कलाकार म्हणूनच नव्हे तर लेखक, निर्माता, दिग्दर्शक म्हणूनही तो कायम वेगवेगळे प्रयोग करत राहिला आणि आपल्याला असे
प्रयोग करता यावेत म्हणून पैशासाठी तो सामान्य व्यावसायिक चित्रपट करीत राहिला. त्यामुळेच कमलच्या एकूण व्यावसायिक कारकीर्दीचे दोन भाग पडले. ‘अपूर्व 'मध्ये प्रौढ स्त्रीच्या प्रेमात पडलेला तरुण किंवा मणिरत्नमच्या 'नायकन'मधली 'गॉडफादर' पद्धतीची व्यक्तिरेखा यामुळे कमल हासन अभिनयाच्या एका वेगळ्या उंचीवर पोचतो, त्याच वेळी 'अप्पूराजा'मधून तो सर्वसामान्य प्रेक्षकांचा ठाव घेतो. हिंदीत कमल इतके यश आणि लोकप्रियता क्वचितच एखाद्या दाक्षिणात्य नायकाला मिळाली असेल. 'एक दुजे के लिये' चालला तेव्हा तो आता हिंदीत मोठी खेळी खेळणार असे वाटले होते. परंतु, 'सागर', 'सदमा', 'एक नई पहेली' असे तुरळक अपवाद वगळता त्याने चित्रपटांची निवड कधी गांभीर्याने केली नाही. हिंदीच्या प्रेक्षकांनीही त्याला गंभीरपणे घेतले नाही.
'राजतिलक'सारखे टुकार चित्रपट करून त्याने हिंदीतले स्थान स्वतःच घालवले. परंतु कारकीर्दीचा असा विचार त्याने तामीळ चित्रपटसृष्टीतही केला. नाही, त्यामुळेच तो संवेदनशील प्रेक्षक आणि पिटातील प्रेक्षक, दोघांनाही आपला वाटत आल आहे. त्याचा एक तोटा असा झाला की, योग्यत असूनही त्याला 'सुपरस्टार पद' मिळू शकले नाही. स्वतःला आवडेल, पटेल आणि रुचेल ते करण्याचं जी 'मस्ती' त्याने अनुभवली, त्याच्यापुढे 'सुपरस्टार पदाला काही अर्थ राहात नाही. व्यक्तिरेखांचे, मेकअपचे, शैलीचे प्रयोग करण्याची आपली हौस त्याने पुरेपूर भागवून घेतली. 'अप्पूराजां'मध्ये त्याने गुडघ्यात पाय दुमडून ठेंगू व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली. 'इंडियन'मध्ये तरुण आणि म्हातारा अशी दुहेरी भूमिका केली. चाची ४२० मध्ये तो चक्क नऊवारी नेसून 'लक्ष्मीबाई' बनला, तर 'दशावतार'मध्ये अकारण दहा बटबटीत व्यक्तिरेखा साकारल्या. त्याने दिग्दर्शित केलेल्या 'हे राम'मध्येही त्याचा फोकस कायम स्वतःवरच होता. त्याच्या अशा 'गिमिक्स'पेक्षा त्याने 'सदमा'मध्ये साकारलेली भावूक, हळवी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अधिक आवडते, संवादरहित 'पुष्पक'मधला त्याचा प्रियकर जास्त लोभस ठरतो. त्याचे वेगळेपण तरीही मान्य करावेच लागते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सामान्य प्रतिनिधींसोबत, साध्या कपड्यांमध्ये उपस्थित राहणारे 'स्टार' फार कमी असतील. अशा खऱ्या 'स्टार'पैकी कमल एक आहे!
July 31, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti